मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिनेमे पाहायचेत.

इनिगोय · · जनातलं, मनातलं
सिनेमे पाहायचेत. कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे. या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल अशी कोणतीही भीतीदायक दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे. थोडक्यात मुलाची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं? चित्रपट.. मालिका.. शाॅर्ट फिल्म्स.. इन्स्पिरेशनल व्हिडिओज.. यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील?

वाचने 40691 वाचनखूण प्रतिक्रिया 110

सदस्यनाम Sun, 07/19/2015 - 15:41
अशीच अमुची आई सुजाण असती, आम्हीही स्मार्ट हुशार झालो असतो, वदले कोणतरी....... ;) . . . निदान असे खच्चुन याद्या देणारे मामा अन मावश्या तरी हवे होते हो. गांधी, शिवाजी अन चार्ली चाप्लीन वर आमचे बालपण आटपले. कधीमधी लौरेन हार्डी अन टीव्ही वरचे थोडेफार :(

In reply to by सदस्यनाम

इनिगोय Tue, 08/04/2015 - 19:40
लोल! अहो, आमच्या शाळेतही सिनेमाहाॅल होता. मोठी स्क्रीन आणि भारतीय बैठक. तिथे महिना-पंधरा दिवसातून एखादा अॅनिमेटेड सिनेमा दाखवत असत, खूप छान छान सिनेमे तिथेच पाहून झाले.

श्रीरंग_जोशी Mon, 07/20/2015 - 09:09
The World's Fastest Indian हा एक सत्यकथेवर आधारीत चित्रपट आहे. मला एकदम प्रेरणादायी वाटला. फक्त ८ वर्षाच्या मुलाला तो रटाळ वाटण्याची शक्यता आहे. प्रथम स्वतः पाहून ठरवावे की मुलाला दाखवावा का?

In reply to by श्रीरंग_जोशी

द-बाहुबली Tue, 07/21/2015 - 15:56
कोणत्याही मुलाला या जगात फक्त म्हातारेच लोक अस्तित्वात आहेत हे पटवुन द्यायचे असेल तर हा चित्रपट अवश्य दाखवावा.... मायला बार-गर्ल पासुन सगळेच जेष्ठ नागरीक घेतलेत राव... संथ अन अशक्य चित्रपट आहे.

In reply to by द-बाहुबली

श्रीरंग_जोशी गुरुवार, 07/23/2015 - 20:25
चित्रपटाच्या कथेचा विषय प्रयत्नवाद आहे हो. तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या तर आजवर कधी ध्यानातही आल्या नव्हत्या इतकी ही (सत्य)कथा मला प्रेरणादायी वाटली. कदाचित थोड्या मोठ्या मुलांना नक्कीच आवडेल.

प्यारे१ Sun, 07/26/2015 - 02:33
गाड़ी शतकाजवळ आली म्हणून काही भारतीय चित्रपटांचा शोध घेतला जे लहानग्यांसाठी उपयुक्त ठरतील. अंजलि हा तमिळ की तेलुगु डब्ड चित्रपट आहे. फरारी की सवारी हा एक + राहुल बोस बरोबर एक क्रिकेटीयर मुलाचा चित्रपट असे दोन क्रिकेट वेड्या मुलांचे चित्रपट आहेत. दूरदर्शन ची एकच वाहिनी होती तेव्हा एक बाल चित्रपट पाहिला होता ज्यात जयंत नारळीकर चित्रपटाच्या शेवटी पृथ्वीवर धूमकेतू आदळण्याची शक्यता निर्माण झाली असता काय काय करता येईल असं काही सांगतात ते अंधुकसं आठवत आहे. दूरदर्शनला च रविवारी सकाळी 11 ला एक सीरियल लागायची ज्यामध्ये बहिण भावाला एका झाडाच्या ढोलीत एक जादुई मुलगा भेटतो आणि ते एकत्र काय काय मजा करतात वगैरे मालिका होती. पन्नास वर्षांनी म्हातारे झाल्यावर ते त्याला भेटायला पुन्हा येतात एवढंच आठवतंय. छोटा चेतन, जजंत्रम ममन्त्रम वगैरे बहुधा नको असावेत.

In reply to by जेम्स वांड

जेम्स वांड Sat, 05/02/2020 - 14:35
२०१४ मध्ये २० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने एक तत्कालीन सगळ्या बाल कलाकारांचे रियुनियन आयोजित केले होते, ओरिजिनल पोस्टर सारखेच हे पोस्टर बनवले होते .