सिनेमे पाहायचेत.
सिनेमे पाहायचेत.
कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल अशी कोणतीही भीतीदायक दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.
थोडक्यात मुलाची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं?
चित्रपट..
मालिका..
शाॅर्ट फिल्म्स..
इन्स्पिरेशनल व्हिडिओज..
यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील?
वाचने
40696
वाचनखूण
प्रतिक्रिया
110
In reply to लाईफ इज ब्युटिफूल by सानिकास्वप्निल
मस्त जंगी यादी! थँक्स :)
In reply to लाईफ इज ब्युटिफूल by सानिकास्वप्निल
One more "The Croods"
1) charli and the chocolate factory.
2) the parents trap.
अशीच अमुची आई सुजाण असती,
आम्हीही स्मार्ट हुशार झालो असतो, वदले कोणतरी....... ;)
.
.
.
निदान असे खच्चुन याद्या देणारे मामा अन मावश्या तरी हवे होते हो.
गांधी, शिवाजी अन चार्ली चाप्लीन वर आमचे बालपण आटपले. कधीमधी लौरेन हार्डी अन टीव्ही वरचे थोडेफार :(
In reply to अशीच अमुची आई सुजाण असती, by सदस्यनाम
लोल!
अहो, आमच्या शाळेतही सिनेमाहाॅल होता. मोठी स्क्रीन आणि भारतीय बैठक. तिथे महिना-पंधरा दिवसातून एखादा अॅनिमेटेड सिनेमा दाखवत असत, खूप छान छान सिनेमे तिथेच पाहून झाले.
The World's Fastest Indian हा एक सत्यकथेवर आधारीत चित्रपट आहे. मला एकदम प्रेरणादायी वाटला. फक्त ८ वर्षाच्या मुलाला तो रटाळ वाटण्याची शक्यता आहे. प्रथम स्वतः पाहून ठरवावे की मुलाला दाखवावा का?
In reply to आणखी एक by श्रीरंग_जोशी
कोणत्याही मुलाला या जगात फक्त म्हातारेच लोक अस्तित्वात आहेत हे पटवुन द्यायचे असेल तर हा चित्रपट अवश्य दाखवावा.... मायला बार-गर्ल पासुन सगळेच जेष्ठ नागरीक घेतलेत राव... संथ अन अशक्य चित्रपट आहे.
In reply to कोणत्याही मुलाला या जगात फक्त by द-बाहुबली
चित्रपटाच्या कथेचा विषय प्रयत्नवाद आहे हो. तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या तर आजवर कधी ध्यानातही आल्या नव्हत्या इतकी ही (सत्य)कथा मला प्रेरणादायी वाटली.
कदाचित थोड्या मोठ्या मुलांना नक्कीच आवडेल.
In reply to आणखी एक by श्रीरंग_जोशी
माझादेखील आवडता चित्रपट
अजून एक..Finding Nemo- मला फार आवडला होता..
मकडि , फाइनडिन्ग नेमो पण छान आहेत. पण मकडि बघुन कदचित घाबरायला होइल.
october sky बघा
लहान मुलांसाठी मस्त चित्रपट आहे
"आजादी की ओर" (गौरी शंकर माकडांवरचा सिनेमा) लहानपणी पाहिल्याचा आठवतो...छान आहे...
गाड़ी शतकाजवळ आली म्हणून काही भारतीय चित्रपटांचा शोध घेतला जे लहानग्यांसाठी उपयुक्त ठरतील.
अंजलि हा तमिळ की तेलुगु डब्ड चित्रपट आहे.
फरारी की सवारी हा एक + राहुल बोस बरोबर एक क्रिकेटीयर मुलाचा चित्रपट असे दोन क्रिकेट वेड्या मुलांचे चित्रपट आहेत.
दूरदर्शन ची एकच वाहिनी होती तेव्हा एक बाल चित्रपट पाहिला होता ज्यात जयंत नारळीकर चित्रपटाच्या शेवटी पृथ्वीवर धूमकेतू आदळण्याची शक्यता निर्माण झाली असता काय काय करता येईल असं काही सांगतात ते अंधुकसं आठवत आहे.
दूरदर्शनला च रविवारी सकाळी 11 ला एक सीरियल लागायची ज्यामध्ये बहिण भावाला एका झाडाच्या ढोलीत एक जादुई मुलगा भेटतो आणि ते एकत्र काय काय मजा करतात वगैरे मालिका होती. पन्नास वर्षांनी म्हातारे झाल्यावर ते त्याला भेटायला पुन्हा येतात एवढंच आठवतंय.
छोटा चेतन, जजंत्रम ममन्त्रम वगैरे बहुधा नको असावेत.
१) बॉर्न फ्री
२) ब्लॅक स्टॅलीयन
३) इट्स अ मॅड मॅड वर्ल्ड
Spirit: Stallion of the Cimarron - हा माझा खूप आवडता चित्रपट आहे. हा ८-१० वर्षे वयोगटातल्या मुलांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.
Animals Are Beautiful People हा पण एक सुंदर चित्रपट आहे. वन्य प्राण्यांवर आहे.
मस्त यादी! थँक्स :)
पण हा एक सिनेमा आपला तुफान आवडता आहे

In reply to कोणी आधी सजेस्ट केलाय का माहिती नाही by जेम्स वांड
२०१४ मध्ये २० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने एक तत्कालीन सगळ्या बाल कलाकारांचे रियुनियन आयोजित केले होते, ओरिजिनल पोस्टर सारखेच हे पोस्टर बनवले होते

मस्त जंगी यादी! थँक्स :)