मदत हवी आहे - सोसायटी फॉर्मेशन बाबत
नमस्कार,
आम्ही २ वर्षापुर्वी पुण्यात एक २ बीएचके घेतला होता. घर घेताना अर्थातच बिल्डरच्या फायद्यासाठीच लिहील्या गेलेल्या, अत्यंत एकतर्फी अॅग्रीमेंट्वर सह्याही केल्या होत्या. तेव्हा आपल्याला घर विकुन बिल्डरनेच आपल्यावर अनंत उपकार केले आहेत की काय अशी शंका यावी इतक्या अटी होत्या. आजुबाजुला माहिती काढली असता अॅग्रीमेंट् अशीच असतात असे समजले आणि मग बाकी घराचा प्लान वगैरे चांगला असल्याने व्यवहार करुन टाकला.
त्या अॅग्रीमेंट्मधील काही अटी साधारण अशा:-
१. बिल्डिंगच्या आजुबाजुचा मोकळा भाग (पार्किंगच्या बाजुने असतो तो जायचा यायचा रस्ता), इमारतीमागील बाग आणि मायनस मधले पार्किंगला जाण्या येण्याचा मार्ग हे प्रमोटर कडे राहतील.
२. इमारतीसमोर बरीच मोकळी जागा आहे. तिथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणार असं आधीच सांगितलं होतं. तर त्याच्या बांधकामात आम्ही कोणताहि अडथळा आणणार नाही. आणि नियम १ मध्ये सांगितलेल्या सर्व जागा ह्या कॉम्प्लेक्स सोबत कॉमन असतील.
आमच्या इमारती समोर रस्ता रुंदीकरण झाल्याने वाढीव एफ.एस.आय मिळत असल्याने हे बांधकाम अजुन सुरु नाही. पण आता सुरु होईल. मागच्या २ वर्षात अनेकदा मागे लागुनही बिल्डर सोसायटी करुन देत नाही. आणि समोरच्या बांधकामासोबत एकत्र सोसायटी करु म्हणे. आम्हाला तसे नको आहे. तर आम्ही आमची सोसायटी फॉर्म करु शकतो का? तसे केल्यास "मी सह्या करणार नाही" असं बिल्डरने सरळ सरळ सांगितलं आहे.
आता म्हणे एक पत्र त्याने पाठवले आहे ज्यात वर दिलेल्या अटी परत लिहील्या आहेत आणि आमची हरकत नाही म्हणुन सह्या करायला पाठवले आहे. जरी आधी अॅग्रीमेंट् मध्ये आम्ही सह्या केल्या असल्या तरी
१. असे मान्य केल्याने आमची सिक्युरिटी धोक्यात येत आहे.
२. मायनस फ्लोअर मधुन पायर्यांनी कुणीही सरळ आमच्या बिल्डींग मध्ये घुसु शकेल. शिवाय मायनसला ठेवलेल्या गाड्यांची सुरक्षितताही धोक्यात येते आहे.
तर आम्ही ह्याला विरोध करु शकतो का?
आम्ही केलेल्या अॅग्रीमेंट्मध्ये मॅजेस्टिक गेट वगैरे बाबींचाही समावेश होता जे अजुन बिल्डरने करुन दिलेले नाही. एकदा मीटींग झाली होती त्यात तो म्हणे की समोरचे कॉम्प्लेक्स बांधुन झालं की त्यात मी ते करेन. पण नक्की कसे होईल ते माहिती नाही..
प्लान प्रमाणे त्याने पार्किंगमध्ये थोडा बदल केल्याने (पैसे वाचवायला बहुदा) आता लिफ्ट लॉबीच्या चहु बाजुंनी पार्किंग आले आहेत. जर सर्वांनी आपापल्या पर्किंग मध्ये गाड्या लावल्या तर मेन गेट मधुन लिफ्ट लॉबी पर्यंत यायला वाट नाही. ह्याचा विरोध करुनही अजुन त्यावर उपाय नाही.
सोसायटी करुन देतो म्हणूनही ह्यावर अजुन काहीच हालचाल नाही.
हे सर्व अॅग्रीमेंट् मधील अटींचे उल्लघंन आहे का? आम्ही ह्यावर निश्चित कारवाई कशी करु शकतो?
ग्राहक मंच ह्याबाबत कशी मदत करु शकते?
वाचने
19758
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
बिल्डरने महागडा वकील आधीच
In reply to बिल्डरने महागडा वकील आधीच by खेडूत
एका वकिलाकडून तपासून मग घर
In reply to एका वकिलाकडून तपासून मग घर by टवाळ कार्टा
घर घेण्यापूर्वी बिल्डर गोड
मला वाटते…
In reply to मला वाटते… by पगला गजोधर
तशी कागदपत्र क्लिअर आहेत.
In reply to तशी कागदपत्र क्लिअर आहेत. by पिलीयन रायडर
तुमच्या सोसायटीत ...
In reply to तुमच्या सोसायटीत ... by पगला गजोधर
सेल-डीड ...
In reply to तशी कागदपत्र क्लिअर आहेत. by पिलीयन रायडर
बिल्डर माणुस वाईट नसुन बेरकी
सोसायटी फॉर्मेशन करु शकतो
तर आम्ही आमची सोसायटी फॉर्म
In reply to तर आम्ही आमची सोसायटी फॉर्म by द-बाहुबली
चांगला वकील त्वरित गाठण्याशी
In reply to चांगला वकील त्वरित गाठण्याशी by रेवती
+१
कटकटच आहे
१. बर्याच लोकांना ११ लोकांना
In reply to १. बर्याच लोकांना ११ लोकांना by काळा पहाड
बिल्डर लोकांबाबत 'दिसला तर ठेचा ?
ह्याबद्दल जास्त माहिती नाही..
In reply to ह्याबद्दल जास्त माहिती नाही.. by गणेशा
विचारा हो..
सगळ्यांच्या प्रतिसादातुन
In reply to सगळ्यांच्या प्रतिसादातुन by पिलीयन रायडर
आणि हो..
In reply to सगळ्यांच्या प्रतिसादातुन by पिलीयन रायडर
३. वाढीव एफ.एस.आय सोसायटीला
In reply to ३. वाढीव एफ.एस.आय सोसायटीला by द-बाहुबली
आणी हो बिल्डरला मिळालेला एफ
उपनिबंधक ,सहकार यांच्या
रोजच्या म. टा. पेपर मध्ये
In reply to रोजच्या म. टा. पेपर मध्ये by सनईचौघडा
हे कधीच्या मटा मध्ये आले आहे?
In reply to हे कधीच्या मटा मध्ये आले आहे? by पिलीयन रायडर
हे पहा
.
In reply to . by झकास
अत्यंत उपयुक्त साईट -
ते माहीत माहित नाही पिरातै पण
In reply to ते माहीत माहित नाही पिरातै पण by सनईचौघडा
http://maharashtratimes
अप्पा बळवंत चौक वा बुकगंगा मधे ...
माझ्याकडून थोडिशी भर.....
बिल्डर म्हणू नये चांगला आणि
टका सौ टका बरोबर बोललेत. मी
In reply to टका सौ टका बरोबर बोललेत. मी by कंजूस
हे कधी झालं ? ?
In reply to हे कधी झालं ? ? by माम्लेदारचा पन्खा
अगदी अगदी. आता भेटला
In reply to अगदी अगदी. आता भेटला by कॅप्टन जॅक स्पॅरो
:|
तुमच्याकडे सकाळ येत असेल तर
सौ टका विनोद आवडला असं म्हटलं
वाखु साठवतो.
महत्वाचा विषय
मधल्या काळात पालिकेतील