मदत हवी आहे - सोसायटी फॉर्मेशन बाबत
In reply to बिल्डरने महागडा वकील आधीच by खेडूत
एका वकिलाकडून तपासून मग घर घ्यायचं का नाही ठरवावे.म्हणजे कै? जरा डिट्टेल मध्ये लिहिता का?
In reply to एका वकिलाकडून तपासून मग घर by टवाळ कार्टा
In reply to मला वाटते… by पगला गजोधर
In reply to तशी कागदपत्र क्लिअर आहेत. by पिलीयन रायडर
सभासदांची एकी हा खर कळीचा मुद्दा आहेएकदम बरोबर…….
ही कामे आउट्सोर्स करता येतात का? तसे करावे का?"तसे करतात का / तशी सर्विस उपलब्ध आहे का ?", या बद्दल काही माहिती नाही, पण हे म्हणजे तैनाती फौज स्वीकारण्या सारखे होईल. बिल्डरला जास्ती काही करावे लागणार नाही, सभासदात फुट टाकली की त्याचे काम होते (मत भूल … डीवाइड अंड रूल !) कोणीतरी पुढाकार घेऊनच अशी कामे करायला लागतात ! (तुमच्या सोसायटीत शासकीय विभागातून (कोर्ट/रेल्वे/महसूल/सहकार/शिक्षक/बँक ) निवृत्त झालेले जेष्ठ नागरिक असतील, तर त्यांची अमुल्य मदत अश्या पुढाकाराच्या कामात होतेच होते …. ) कागदपत्रे क्लियर आहे त्यामुळे, तुम्हा सर्वाना एकीने सोसायटी स्थापायला शक्य आहे असे वाटते ! (चू भू दे घे, जा प्र टा …. )
In reply to तुमच्या सोसायटीत ... by पगला गजोधर
तशी कागदपत्र क्लिअर आहेत.तुम्ही सर्वांनी आपापले सेल-डीड करून घेतले असेलच त्याच्याकडून .... नुसते अग्रीमेंट नव्हे...खूप महत्व आहे त्याला...
In reply to तशी कागदपत्र क्लिअर आहेत. by पिलीयन रायडर
बिल्डर माणुस वाईट नसुन बेरकी आहे.असं बिल्डर लोकांबद्दल सहानूभूतीनं वागू नये. बिल्डर हा वाईट'च' असतो. रस्त्यावर मरताना दिसला तरी बिल्डरला पाणी पाजू नये.
ही कामे आउट्सोर्स करता येतात का? तसे करावे का?हो. पण त्यापेक्षा सोसायटीतले कुठलेतरी एक उत्साही रिटायर्ड आजोबा पकडा. त्यांना पगार द्या आणि ते जास्त चांगलं होईल कारण त्यांचा पण त्यात इंटरेस्ट असेल.
तर आम्ही आमची सोसायटी फॉर्म करु शकतो का?हो. ६०% लोकांचे इंडेक्स २ तयार असतील तर बिल्डरला सोसायटी निर्माण करणे रोखता येणार नाही. चांगला वकिल गाठा. एकदा सोसायटी झाली तिच्या एनोसी शिवाय बिल्डरला फार काही करता येणार नाही. लक्षात घ्या हा वाढीव एफेसाय सोसायटीला मिळतो. तुम्ही घाइ करुन स्वतंत्र सोसायटी निर्माण केलीत तर हा वाढीव एफेसाय वापरायला बिलडरला तुमच्या सोसायटीला पैसे द्यावे लागतील( माझा ६th सेन्स सांगतो किमान ९० लाख रुपये, जे तुमच्या सोसायटीच्या हक्काचे असतील) हे वाचवायला तो एकत्रीत सोसाय्टी करायच्या मागे आहे. आणखी कोणतेही कारण एकत्रीकरणामागे नाही.
तसे केल्यास "मी सह्या करणार नाही" असं बिल्डरने सरळ सरळ सांगितलं आहे.हो का ? बघुन घेउ. चांगला वकिल त्वरीत गाठा. - मी वकील नाही.
In reply to तर आम्ही आमची सोसायटी फॉर्म by द-बाहुबली
In reply to चांगला वकील त्वरित गाठण्याशी by रेवती
बिल्डिंगच्या आजुबाजुचा मोकळा भाग (पार्किंगच्या बाजुने असतो तो जायचा यायचा रस्ता), इमारतीमागील बाग आणि मायनस मधले पार्किंगला जाण्या येण्याचा मार्ग हे प्रमोटर कडे राहतील.ज्यावेळी सोसायटी फॉर्म होईल त्यावेळी फ्लॅटचा बिल्ट अप एरिया सोसायटी हॅन्ड ओव्हर करावा लागेल. हे भाग बिल्ट अप चा भाग आहेत का? जर असतील तर बिल्डर बिल्ट अप एरिया च्या काही भागावर अनधिकृत रित्या ताबा ठेवतोय. तेव्हा जरी तुम्ही हे सही केलेलं असेल तरी हे कोर्टात बिल्डर विरूद्ध जावू शकतं.
आता म्हणे एक पत्र त्याने पाठवले आहे ज्यात वर दिलेल्या अटी परत लिहील्या आहेत आणि आमची हरकत नाही म्हणुन सह्या करायला पाठवले आहे.तुम्ही कुठल्याही पत्रावर उगीचच सही करू नये. आधी तुमच्या वकीलाला दाखवा. ता.क. जनरली बिल्डर लोकांबाबत 'दिसला तर ठेचा' हे धोरण योग्य. पण कायद्याचं राज्य वगैरे काहीतरी असल्यानं तसं करता पण येत नाही. पण फक्त एक सांगतो. लोक ५० हजार रुपयांसाठी काहीही करायला तयार होतात. तुमचे तर सर्वांचे मिळून कित्येक शेकडो करोड घामाचे पैसे पणाला लागले आहेत. 'जंटलमन लोकांनी' व्हायोलंट झाल्याशिवाय भारत सुधारणार नाही.
In reply to १. बर्याच लोकांना ११ लोकांना by काळा पहाड
In reply to ह्याबद्दल जास्त माहिती नाही.. by गणेशा
In reply to सगळ्यांच्या प्रतिसादातुन by पिलीयन रायडर
In reply to सगळ्यांच्या प्रतिसादातुन by पिलीयन रायडर
३. वाढीव एफ.एस.आय सोसायटीला मिळेल (सध्याच्या इमारतीला की नवीन बांधायची आहे समोर तिला? कारण शेवटी प्लॉट एकच आहे ना?)आत्ता सोसायटी अस्तित्वात आहे का ? अर्थातच नाही. सध्य स्थितीमधे फक्त आपल्या बिल्डींग्ज व रीकामी जागा इतकेच आहे. एफ.एस.आय सोसायटीला मिळणार आहे. म्हणून सर्वप्रथम ती फॉर्म करावी लागेल. म्हणजेच सध्य स्थितीमधे प्रोजेक्टमधे अधिकृत इनक्लुड केलेल्या बांधलेल्या व रिकाम्या जागा यात अंतर्भुत होतिल. याबरोबरच आपणास वाढीव एफ.एस.आय सुधा मिळेल/ लागु होइल. पण कदाचीत आपल्या बिल्डींगचे स्ट्रक्चर अजुन मजले चढवण्यासाठी योग्य नसेल अथवा आपली(सोसाय्टीची) इछ्चा नसेल म्हणून वा इतर कोणत्याही कारणाने आपण मिळालेला एफ.एस.आय वापरणार नाही. अशा वेळी तो आपणास (सोसाय्टीला) कोणत्याही बिल्डरला विकता येउ शकतो. आता बिल्डरला हा एफ.एस.आय वापरायचा आहे ( जे सोसायटी केल्या शिवाय शक्य नाही). पण त्याचे पैसे सोसायटीला मात्र द्यायची इछ्चा नाहीये म्हणून तो शॉर्टकट काय काढत आहे, तर त्याचे नवीन बांधकाम याच सोसायटीमधे इनक्लुड करायचा प्रयत्न करत आहे (एकत्रीकरण) जेणे करुन आपल्या सोसायटीला मिळालेला एफ.एस.आय त्याला आपोआप (फुकटच) वापरता येइल. पण आपण त्वरा करुन एकदा का सोसायटी बनवलीत तर सोसाय्टीच्या आवारातील रिकाम्या अथवा कोणत्याही जागी बांधकाम करायला (सोसायटी प्लान/ प्रोजेक्ट ब्लुप्रिंट बघावी)त्याला सोसायटीची परवानगी काहीही झाले*** तरी घ्यावीच लागेल. ज्यासाठी त्याच्या कडुन वाढीव एफ.एस.आय ची रक्क्म मोबदला म्हणून घेउ शकता. नाहीतर सरळ हा एफ.एस.आय सोसायटी दुसर्या कोणत्याही बिल्डरला विकुन तितकाच पैसा उभा करु शकेल. व मग मात्र आपल्या बिल्डरला तेथे काहीही लुडबुड करता येणार नाही. बिल्डरला हे सर्व टाळायचे असल्याने तो तुमची स्वतंत्र सोसायटी उभी करु देत नाही असे सकृत दर्शनी स्पष्ट दिसत आहे. *** मी आपले अॅग्रीमेंट प्रत्यक्ष वाचलेले नसल्याने वरील वाक्य ९९% निसंधीग्ध धरावे १००% नाही. तरीही एकदा सोसायटी झाली तर काहीही उपद्व्याप करायला बिल्डरला सोसायटीची परवानगी नेहमी घ्यावीच लागेलच असे माझा कॉमनसेन्स सांगतो. बाकी हे सर्व व्यवहारज्ञानाचे बोल आहेत. आपण या मुद्यांवर वकिलाशी चर्चा करणेच श्रेयस्कर.
In reply to ३. वाढीव एफ.एस.आय सोसायटीला by द-बाहुबली
In reply to रोजच्या म. टा. पेपर मध्ये by सनईचौघडा
In reply to हे कधीच्या मटा मध्ये आले आहे? by पिलीयन रायडर
In reply to . by झकास
In reply to ते माहीत माहित नाही पिरातै पण by सनईचौघडा
In reply to टका सौ टका बरोबर बोललेत. मी by कंजूस
In reply to हे कधी झालं ? ? by माम्लेदारचा पन्खा
In reply to अगदी अगदी. आता भेटला by कॅप्टन जॅक स्पॅरो
बिल्डरने महागडा वकील आधीच