दुष्काळ आणी पॅकेज:काही किस्से २

जेपी जनातलं, मनातलं
दुष्काळ आणी पॅकेज;काही किस्से १ वेळः साल २००५ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दुष्काळग्रस्तांनसाठी १०७५ कोटीचे पॅकेज जाहिर केले.एकीकडे हे पॅकेज जाहीर झाले व दुसरीकडे सरकारने कापसाच्या हमीभावावर दिला जाणार २०% बोनस रद्द केला.त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांना पहिल्या वर्षी १७०० कोटी,दुसर्‍या वर्षी १४०० कोटी तर तिसर्‍या वर्षी १५०० कोटीचा फटका बसला. म्हणजेच १००० कोटीच्या बदल्यात शेतकर्‍यांचे ५००० कोटी गेले.मुळात या पॅकेज मध्ये शेतकर्‍यांच्या चढउतार निधीतील ७७९ कोटी समाविष्ट करुन सरकारने चलाखी दाखवली आणी हे पॅकेज फक्त ३०० कोटीचे राहीले. परीणाम कोरडवाहु शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ.. ================================================================================= वेळ : साल २००६ तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ३७५० कोटीचे पॅकेज जाहीर केले.यातले २७०० कोटी दीर्घकालीन सिंचन व्यवस्थेसाठी होते.त्यामुळे प्रत्यक्षात शेतकर्‍यांना १००० कोटीचा लाभ झाला.त्यातही कृषीसाहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाला. पॅकेज अंर्तगत सिंचनाच्या सोयी नसताना शेतकर्‍यांना मोटार पंपाचे वाटप झाले. वाटलेल्या अनेक गायी म्हशी भाकड निघाल्या.अनुदानाची आकडेवारी फुगवली.घोटाळा उघडकीस आल्यावर चारशे सरकारी कर्मचारी निलंबीत.पुढे कारवाई शुन्य. परीणाम कोरडवाहु शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ.. ================================================================================= वेळः साल २००८ युपीए सरकारने गाजावाजा करुन जाहीर केलेली ७२ हजार कोटींची कर्जमाफी योजना आली. यातुन राज्याच्या वाट्याला १० हजार कोटी आले.त्यातील ५२% रक्कम पश्चिम महाराष्ट्राला मिळाली,तर विदर्भाला २२% टक्के मिळाले.उर्वरीत रक्कम बाकीच्या राज्याला मिळाली. कारण हि कर्जमाफी करताना शरद पवांरानी अतिशय चलाखीने पाच एकराची अट ठेवली. राज्यात कोरडवाहुचे सिलिंग ५० एकर तर ओलीताचे १८ एकर आहे.त्यापेक्षा जास्त जमीन शेतकर्‍यांना ठेवता येत नाही. त्यामुळे ओलीताच्या क्षेत्रात जमीनधारणा कमी तर कोरडवाहुत जास्त असते. विदर्भात कोरडवाहु शेतकरी असल्याने व त्याची जमीनधारणा जास्त असल्याने कर्जमाफीचा फायदा त्यांना मिळाला नाही. या योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील ३ एकर ओलीत क्षेत्रावरील १ कोटीचे कर्जमाफ झाले.तर विदर्भात तेवढ्याच कोरडवाहु जमिनीवरिल २५,०००/- कर्ज माफ झाले. परिणाम कोरडवाहु शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ.. =============================================================================== जाता जाता - काही दिवसांपुर्वी श्री.जयंत कुलकर्णी यांनी देवास बद्दल एका लेखात माहिती दिली होती. त्या लेखातील फक्त देवासलाच पाहु नका,त्याचे वृत्तांकन करणार्‍या ..राहुल कुलकर्णीला पण फॉलो करा. कोकणात पावसाचे वाया जाणारे पाणी अडवुन दुष्काळ ग्रस्त भागात वळवण्याचा"लातुर पॅटर्न" २००२ साली तयार झालता. पण दुसर्‍या टर्म मधे विलासरावांनी स्वत:च्या विकासा कडे लक्ष दिले आणी तो प्लॅन मागे पडला. राहुल कुलकर्णीने तो प्लॅन २०१२ साली पुन्हा समोर आणला.फक्त आणलाच नाही तर योग्य जागी पोहचेल हे पण पाहीले. (लेख माझ्या वाचनावर आधारीत आहे.त्याबद्दल कुठलाही विदा नाही.)
वर्गीकरण

18 टिप्पण्या 7,988 दृश्ये

Comments

कैलासवासी सोन्याबापु नवीन

चला एकंदरीत वैदर्भीय शेतकरी झोडपणे सर्वत्र सुरु असताना आपण भारी किस्से सांगितलेत!!! ७२ हजार कोटि गंगेत ह्या ऊसवाल्यांनी अन द्राक्षवाल्यांनी लई टाळु वरचं लोणी खात हात धुवून घेतलेत खरे!! :( , पण असो शिव्या देताना तर्काची गरज नसते हा सर्वोत्तम भाग असतो!!

श्रीरंग_जोशी नवीन

बहुतेकवेळा ही सरकारी पॅकेजेस म्हणजे प्रत्यक्षात धूळफेकच असते. शेकडो किंवा हजारो कोटींची आकडेवारी लिहिली की काही काळापुरते राजकीय लाभाचे वारे सत्त्याधाऱ्यांना स्वतःकडे वळवता येतात. आघाडी सरकारच्या काळात हे पॅकेजचे स्तोम फारच माजले होते. दरवर्षी शिलकीचा अर्थसंकल्प मांडला जायचा. प्रत्यक्ष अंमलबजावणी व त्या संकल्पाचा दूरदूरपर्यंत संबंध नसायचा. बाकी यानिमित्ताने माझी जुनी रूपककथा आठवली.

मुक्त विहारि नवीन

आयला शेती कुणाची आणि लाभ कुणाला? थोडक्यात परत एकदा सामना... कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.

आदूबाळ नवीन

In reply to by बॅटमॅन

आर्य विदोत्सुक मंडळ
लोल! शालूकराचा बोळ वगैरे पत्ता आणि रंग उडालेली गंजकी पाटीही डोळ्यांसमोर आली!

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by बॅटमॅन

ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांच्या नव्या ब्लॉगपोस्टमध्ये राहूल कुळकर्णी यांच्याबद्दल उल्लेख आहे. ‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…

जेपी नवीन

In reply to by श्रीरंग_जोशी

रंगा या लिंक बद्दल आभार. तुळजापुर ,टिस, त्यातुन राहुल कुलकर्णी चा उल्लेख आवडला. आत्ताच तिथे काम करणार्या काही मिंत्राशी बोललो.

विवेकपटाईत नवीन

मुटे साहेबांची प्रतिक्रिया पाहिजे. विदर्भावर लय भारी अन्याय.... शेवटी म्हणतातच ' अजा-पुत्रं बलिं दद्यात् देवः दुर्बल-घातकः'

खटपट्या नवीन

राहुल कुलकर्णीने तो प्लॅन २०१२ साली पुन्हा समोर आणला.फक्त आणलाच नाही तर योग्य जागी पोहचेल हे पण पाहीले.
म्हणजे नेमके काय केले ??

विलासराव नवीन

वेळः साल २००८ युपीए सरकारने गाजावाजा करुन जाहीर केलेली ७२ हजार कोटींची कर्जमाफी योजना आली. यातुन राज्याच्या वाट्याला १० हजार कोटी आले.त्यातील ५२% रक्कम पश्चिम महाराष्ट्राला मिळाली,तर विदर्भाला २२% टक्के मिळाले.उर्वरीत रक्कम बाकीच्या राज्याला मिळाली. कारण हि कर्जमाफी करताना शरद पवांरानी अतिशय चलाखीने पाच एकराची अट ठेवली. राज्यात कोरडवाहुचे सिलिंग ५० एकर तर ओलीताचे १८ एकर आहे.त्यापेक्षा जास्त जमीन शेतकर्‍यांना ठेवता येत नाही. त्यामुळे ओलीताच्या क्षेत्रात जमीनधारणा कमी तर कोरडवाहुत जास्त असते. विदर्भात कोरडवाहु शेतकरी असल्याने व त्याची जमीनधारणा जास्त असल्याने कर्जमाफीचा फायदा त्यांना मिळाला नाही. या योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील ३ एकर ओलीत क्षेत्रावरील १ कोटीचे कर्जमाफ झाले.तर विदर्भात तेवढ्याच कोरडवाहु जमिनीवरिल २५,०००/- कर्ज माफ झाले. यावेळी माझ्या आतेभावाचे ४-५ लाख माफ झाले. बागायत जमीन असताना.चांगले उत्पन्न असताना. कारण कर्जमाफीची अट पुर्ण झाली.

जेपी नवीन

@रेवती आज्जे =)) .स्वामी संकेतानंद,सोन्याबापु,रंगा,आदुबाळ,पिंपातला उंदीर आणी नाद खुळा - धन्यवाद!!! @मुवि-मागच्या भागात आमी दंडवत केला या भागात तुमी,फिट्ट्मफिरट झालि नेक्स्ट भागात गळाभेट करु. *wink* @ खटपट्या- सगळच मी कस सांगु,अश्याने जेपी तापणार नाय तर काय होईल. =)) @ बॅटमॅन- राहुल कुलकर्णी बद्दल व्यक्तीगत मी काय सांगणार.रंगाने थोड सांगीतल आहे,बा़की जालावर शोधल्यास सापडेल. अवांतर- ट्राय सिरीज पुर्ण करावी,हि विनंती.. -जेपी आणी वाचनोत्सुक मंडळाचे कार्यकर्त. *wink* @विवेक पटाईत-गंगाधर मुटे साहेब इकडे येणार नाहीत.कारण त्यांना स्वत: पलीकडे काही दिसत नाही. @विलासराव -त्या काळी माझ्या मामाच २ लाखाच कर्ज माफ झालत.कारण निकष पुर्ण झालता. ============================================================================= मी लेख एकतर चांगला लिहीला आहे किंवा वाईट..कारण मागच्या भागात हिरिरीने मत मांडणारे यावेळेस गायब आहेत. असो आता दुष्काळ आणी पॅकेज चा ३ आणी अंतिम भाग येणार आहे.त्यात तिसरी बाजु मांडतो. शेती आणी शेतकरी यांचे एक ३ डी चित्र उभे राहील.त्यानंतर कुणी शेतकर्‍याला बोल लावेल असे वाटत नाही.

रेवती नवीन

अहो जेपी, का हसताय गरिबाला? मला या विषयातलं काही माहित नाही कारण शेती केली नाही, मग उगीच कुठं मत द्यायचं? म्हणून बोलले नाही. आणि जे चुकीचं होतय ते तर दिसतच्चे!