( ओळखलत का साहेब मला?)
लेखनविषय:
ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी,
कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’.
कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली,
स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली .
पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले,
निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले
कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे
राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे
खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला
‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला.
आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा,
पक्षात परत घेउन तुम्ही, फक्त लढ म्हणा
(लढाऊ ) सैनीक
७/११/१४
वाचने
3288
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
फुटीरतीचे (फीतुरतीचे?) उदातीकरण
लाचारीचे समर्थन.
याला शुद्ध मराठीत म्हणायचे झाले तर :-
ढुं**** चार लाथा हाणा पण आपला म्हणा.........
वरील दोन्ही प्रतिसाद योग्य आहेत.
झक्कास !
आभार ..
सध्याच्या स्थितीवर एकदम योग्य....
कविता जमली खरी पण
तेवढी कुसुमाग्रजांची कणा आठवण ठेवा राव!
In reply to कुसुमाग्रजांची आठवण by आयुर्हित
उठता बसता कुणालाही श्रेय न देता कॉपी पेस्ट करणार्यांनी श्रेय देण्याची आठवण करावी हे पाहून डोळे पानावले.
कोकणी आंब्याची परिस्थिती सध्या लाजिरवाणी आहे, मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले, आता कुर्सी ही गेली. परतीची वाट धरतील का?
In reply to कोकणी आंब्याची परिस्थिती by विवेकपटाईत
आंबा संपलाच आता जवळपास विवेकजी.
पण १ छोटी कैरी आहे की त्याच आंब्याची...
असे कार्यकर्ते आहे म्हणूनच नेते आहेत. यात कोणत्याही प्रकारे लाचारीचे समर्थन नाहिये. "अहो महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती." माणसाने कसे लवचिक असले पाहिजे. कार्यकर्त्याने चार दिवस वाघाचे जीवन जगण्यापेक्षा हजार वर्षे शेळीचे जीवन जगले पाहिजे. शेवटी चार दिवसात काय रिझल्ट मिळणार हो ? शेवटी क्वांटिटी महत्त्वाची. क्वालीटीच काय घेऊन बसलात भाऊ ?
मोडेन पण वाकणार नाही इ. इ. सुविचार फळ्यावर आणि पुस्तकात लिहायला चांगले असतात.
अतिशय कण/णा खर कविता
कणा पेक्षा हि काकण भर सरस कविता !
आवडेश
फुटीरतीचे (फीतुरतीचे?)