मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( ओळखलत का साहेब मला?)

अमोल केळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी, कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’. कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली, स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली . पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले, निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला ‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला. आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा, पक्षात परत घेउन तुम्ही, फक्‍त लढ म्हणा (लढाऊ ) सैनीक ७/११/१४

वाचन 3288 प्रतिक्रिया 0