( ओळखलत का साहेब मला?)
लेखनविषय:
ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी,
कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’.
कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली,
स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली .
पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले,
निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले
कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे
राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे
खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला
‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला.
आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा,
पक्षात परत घेउन तुम्ही, फक्त लढ म्हणा
(लढाऊ ) सैनीक
७/११/१४
वाचने
3288
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
फुटीरतीचे (फीतुरतीचे?)
लाचारीचे समर्थन.
वरील दोन्ही प्रतिसाद योग्य
झक्कास !
आभार ..
छान आहे...
कुसुमाग्रजांची आठवण
In reply to कुसुमाग्रजांची आठवण by आयुर्हित
उठता बसता कुणालाही श्रेय न
कोकणी आंब्याची परिस्थिती
In reply to कोकणी आंब्याची परिस्थिती by विवेकपटाईत
कैरी
कविता आवडली
अतिशय कणाखर कविता !
आवडेश