मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" : निकाल

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" नमस्कार मंडळी. पहिल्या छायाचित्रण स्पर्धेप्रमाणेच दुसर्‍या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ३१ प्रवेशिकांना ४० जणांनी मते दिली. त्यातून सर्वात जास्त मते मिळणारी छायाचित्रे पुढीलप्रमाणे: विशेष म्हणजे यावेळी बहुतेक छायाचित्रांना कोणी ना कोणी तरी पसंती दिली आहे. सर्वच छायाचित्रे विषयानुरूप आनंद देणारी होती. यातील पहिल्या आलेल्या ३ छायचित्रांचा समावेश मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये करत आहोत. तसेच विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत. १) कन्फ्युज्ड अकौंटंट : . . २) चिगो . a ३) सह्यमित्र . http://1.bp.blogspot.com/-ynOZtbV1fKM/VBA4XXPy90I/AAAAAAAAAIU/y5aTHEczUk0/s1600/joy.jpg पुन्हा एकदा सर्व स्पर्धक, आणि मतदात्यांना मनापासून धन्यवाद! विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! पुढच्या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons). धागा थोड्याच वेळात प्रकाशित करत आहोत. पुढच्या म्हणजे तिसर्‍या स्पर्धेचे नियम या दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. आपला सहभाग असाच असू द्या! धन्यवाद!

वाचने 5221 वाचनखूण प्रतिक्रिया 25

शिद Wed, 09/24/2014 - 21:04
विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार! पहिल्या व तिसर्‍या फोटोबद्दल मी मत दिलं होतं व ते विजेत्या छायाचित्रांमध्ये निवडून आल्याबद्दल आनंद जाहला. :)

एस Wed, 09/24/2014 - 22:10
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे, प्रतिसादकांचे आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

य्य्य्य्याआआआआ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif माज्जा निकाल मॅच झाला!!!!! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif गोंदुश गोंदुश ..आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif ================================= ए..धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 09:10
सर्व स्पर्धकांचे कौतुक आहे. पहिल्या तिघांचे विशेष अभिनंदन. >>>>प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत. प्रशस्ती ही चार लोकात झाली तर जास्त आनंददायी असते. अशी व्यक्तीगत निरोपाद्वारे, अगदी कानांत सांगितल्यासारखी, करण्याऐवजी, त्या त्या चित्राखाली, जाहीर केली तर विजेत्यांना योग्य न्याय मिळेल.

असंका गुरुवार, 09/25/2014 - 20:03
शेवटची तारीख डोक्यावर असल्याने, थोडे उशिरा आणि थोडे थोडक्यात आभार मानत आहे!! सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद...!! (अत्रुप्त आत्मा यांचे खासकरून आभार, इतकं मनमोकळं कौतुक करणारं कुणी असतं हे मला पूर्णपणे नवीन आहे!!)

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आंबा खाणार्‍या चिमणीचा फोटु तर तर फारच आवडला होता. तिचे विषेश अभिनंदन आणि अनेक आशिर्वाद पैजरबुवा,