<इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत>

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
25 Jul 2014 - 2:35 pm
गाभा: 

महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .)
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-bord...
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला बेळगाव यळ्ळुर वर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले मुख्यमंत्री, आपले राज्यपाल, आपले पोलिस अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर बेळगाव यळ्ळुरपासून सुरुवात होऊन इतर काही जिल्हेही एक-एक करून फुटतील व महाराष्ट्र म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली किमान दोन पक्ष अस्मिताधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.

बेळगाव यळ्ळुर मध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने कन्नडिगां सारख्या देशद्रोह्यांना शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!

या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रनोबदांना बंगालीत पाठविली नाही आहेत. आपणही पाठवु नका!

राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in

जय हिंद!
जय महाराष्ट्र !
जय पुणे !
जय हिंजवडी फेज १ !
जय आपलं क्युबिकल नंबर !
जय बेन्च !
आणि सर्वात महत्वाचे

जय मिसळपाव !!

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

25 Jul 2014 - 3:04 pm | धमाल मुलगा

यळ्ळूरकरांच्या लढ्याला चिरडण्याचं कारस्थान जोरदार चालू आहे तर.
पुर्वी अपर्णाताईनं मिपावर यळ्ळूरच्या लढ्याबद्दल लिहिलं होतं त्याची आठवण झाली - http://www.misalpav.com/node/17029

प्रसाद१९७१'s picture

25 Jul 2014 - 3:32 pm | प्रसाद१९७१

नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा? बेळगाव पाकीस्तानात चाललय की काय?

इथे महारष्ट्रात काय चांगले होतय की कोणाला महारष्ट्रात यावे असे वाटावे. गुंड आणि टग्यांचे राज्य इथे. आतातर खुल्या वर्गातल्या जागा पण कमी झाल्या.

सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल>>> कसली पुण्याई?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Jul 2014 - 3:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अरे ते सॅर्कॅस्टिक का म्हणतात तसे आहे असे वाटतय.
कानडावू विठ्ठलू कर्नाटकू ऐवजी कानडावू विठ्ठ्लू महाराष्ट्र्रू असे म्ह्णायचे ह्यापुढे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jul 2014 - 8:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

आवो, ते शिर्षक < > आसं टोकेरी कंसात लिवलंय बगा ! आता हसा बगू ;)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Jul 2014 - 3:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

दुसर्‍या राज्यात जावून ही असली पाट्या,ध्वज लावायची टगेगिरी करावीच का म्हणते मी?त्यांच्या लोकांनीही येथे कोल्हापूरात्,सोलापूरात असले प्रकार केले तर चालवून घ्यायचे का?
ईतक्या वर्षानंतरही असल्या पेटवापेटवीच्या प्रकारांना महत्व दिले जाते हे मराठी माणसाचे दुर्दैव.

बॅटमॅन's picture

25 Jul 2014 - 3:42 pm | बॅटमॅन

मराठी जतन करण्याचे अन्यही बरेच मार्ग आहेत. उगी राडेबाजी का करावी ते समजत नाही.

मृत्युन्जय's picture

25 Jul 2014 - 3:55 pm | मृत्युन्जय

सहमत आहे. जर ते मुळात कर्नाटकात आहे तर तिथे महाराष्ट्राचा दगड लावणेच चुकीचे आहे

धमाल मुलगा's picture

25 Jul 2014 - 4:44 pm | धमाल मुलगा

सीमाप्रश्न सुटला? कधी?

यळ्ळूरकर गेली कित्येक वर्षं कर्नाटक सरकारशी लढत आहेत. अधिक माहितीसाठी : कॉलिंग: अपर्णा अक्षय!

स्पंदना's picture

30 Jul 2014 - 8:16 pm | स्पंदना

आर मी तुला बोलवते आहे आन तू मला बोलाव! झाल!
म्या बेळगावात हाये. मला वाचीव!

नितिन थत्ते's picture

25 Jul 2014 - 4:00 pm | नितिन थत्ते

>>जय बेन्च !

बेन्चवर आहात वाट्टं....
(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते).

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2014 - 6:01 pm | प्रसाद गोडबोले

(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते).
>>> आपली हरकत नाही त्यालाही :) ! तिकडे कन्नडिग्गांच्या राज्यात बंगळुरुला गोल्द्मन सच्स ची मस्त ऑफर सोडुन इथे पुन्यात येवुन बसलोय ... अल्मोस्त १००% रेज द्यायला तयार झाले होते ते सोडुन आमचं पुणं आमचा सातारा म्हणुन इथे येवुन बसलोय :( !

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त होतेय की काय? :)

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2014 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त होतेय की काय

>>> चिडचिड ? तुकाराम बुवांनी तर म्हणुन ठेवलय "ठेविले अनंते तैसेची रहावे | बेन्चवरी असु द्यावे समाधान || "

त्यामुळे काही चिडचिड नाही ... मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं *pardon* ... खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती *biggrin*

बाकी पुढील चर्चा व्यनितुन !!

>>खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती

अजूनही वेळ गेली नाही गिर्जाकाका, एखादा स्त्रीआयडी घ्यायचा विचार करु शकतोस. ;) ह. घे. हो. ;)

मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं >> कधीतरी वा मेबी तुमच्या बाबतीत सहसा टाईमपास म्हणून काड्या वा टिंगल वगैरे ठीके, पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? :) प्रयत्न तर करा, जमत असल्यास.

खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते>> नाही, माहित होते, तिकडेही झालेय की हे आयडी प्रकरण आणि कधी ना अक्धी कळतेच की लोकांना.

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2014 - 6:46 pm | प्रसाद गोडबोले

पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? प्रयत्न तर करा, जमत असल्यास.

नको . आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ...

अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत (आणि कोणी अंतर्जालावर लिहुन खुप मोठा कादंबरीकार कथाकार कवी झालयाचे पाहण्यात नाही )

त्यापेक्षा आपलं बरं ... वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!

आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ...

आमचंही असंच आहे. :)

अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत

एक मिपाप्रसिद्ध उदाहरण आमच्या पाहण्यात आहे.

वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!

आमचं तर कामच असं आहे की मिपा बंद करण्याची आवश्यकताच भासत नाही. क्रोमच्या इतर सतराशे साठ टॅबमध्ये एक टॅब मिपाचीही.

तुमच्या धाग्याला बेळगांवच्या वाटेला लावण्याबद्दल क्षमस्व. ;)

ते हवेत जाणं, न जाणं स्वतःवर अवलंबून असतं. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण जशी ही एक प्रकारची नशा असते ना, तशीच कोणत्याही आणि जवळपास प्रत्येक धाग्यावर टिंगलटवाळी करायचीही नशाच असते. त्याची उदाहरणं मिपावर आजवर कमी नाहीत. ( तुम्हांला उद्देशून वगैरे हे नाही, गेल्या ५ वर्षांत जे पाहिलं आहे ते सांगतेय)

इथे वा कोणत्याही संस्थळावर कादंबरीकार, कथाकार वगैरे व्हायला कोणी येत नाही, येऊ नये. ५- ५० लाईक्स ने फुगून जाऊ नये, असं होत असेल, कोणी ह्यासाठी येत असेल तर त्यांनी आपापले इगो तपासून पहायची गरज आहे हे नक्की. इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं. थट्टा, विनोद, मस्करी ह्याचं वावडं नाहीच, फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे.

असो. शुभेच्छा तुम्हांला. :)

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2014 - 7:10 pm | प्रसाद गोडबोले

इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं.

स्वांतसुखाय >>> मी आनंदासाठी काहीच करत नसतो .... अनंदाने करीत असतो *i-m_so_happy*

फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे.

कुस्करी झाली तरी ती अंतर्जालीयच राहील ह्याची आजवर काळजी घेतली आहे , कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ... आंतर्जालीय वास्तव्य आणि खरे अस्तित्व ह्या मध्ये डिस्टिन्क्शन करायला शिकले पाहिजे आपण ( माझ्यामते मला आजवर तरी ते जमले आहे :) ) ! कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो ( हे माझं मत नाही , सोशल नेटवर्किंग आणि त्याचे ह्युमन सायकी वरील परिनाम ह्यावरचा कोणतव्हीअभ्यासक हेच सांगेल ) आणि ह्याच कारणासाठी मल्टीपल आणि अन ट्रॅकेबल आयडी अलाऊड असले पाट्रॅकेबलसं माझं प्रांजळ मत आहे :)

तुमच्या शुभेच्छांचा आदराने स्विकार करत आहे . मनःपुर्वक धन्यवाद :)

त.टी : पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आलातर तुमच्या लक्षात येईल अंतर्जालावरचा प्रगो अन खर्‍या आयुष्यातला पश्या ही दोन खुप वेगळी व्यक्तिमत्वे आहेत :)

कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ...

हे बाकी खरं आहे. :)

प्यारे१'s picture

25 Jul 2014 - 7:17 pm | प्यारे१

+११११ आतापर्यंत तरी. ;)

एक दोघांना भेटायचंय. मात्र भेटल्यावर काय होईल माहिती नाही. :P

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2014 - 7:33 pm | प्रसाद गोडबोले

जेव्हा कधी योग येईल तेव्हा तुला भेटायला येताना मी माझे पुष्पक विमानच घेवुन येणार आहे *angel*

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jul 2014 - 8:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक माहिती आहे, दुसरा कोण याचा अंदाज लावत आहे ;) :)

कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो

हाण तेजायला! या वाक्यासाठी तुला पार्टी लागू.

कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो

जे ब्बात!! आता ब्याट्या पार्टी देतोय म्हणताना मी वेगळे कष्ट घेत नाही. ;)

यशोधरा's picture

25 Jul 2014 - 7:17 pm | यशोधरा

ओके. हरकत नाही :)

पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आला तर तुमच्या लक्षात येईल आंतर्जालावरची यशो अन खर्‍या आयुष्यातली यशो ही दोन वेगळी व्यक्तिमत्वे नाहीत. :)

प्रभाकर पेठकर's picture

26 Jul 2014 - 2:15 am | प्रभाकर पेठकर

*ok* *smile*

मला वाटतं आता इतिहासाची पानं मागे पलटत बसण्यापेक्षा राज्याराज्यांतून शेजारच्या राज्यांची भाषा शिकवण्याचे वर्ग काढा .महाराष्ट्रात कानडी आणि गुजराथी वगैरे .महानगरपालिकांच्या शाळांत संध्याकाळी शिकवा .आज आम्हाला शेजारच्या राज्यात पर्यटन करायला गेल्यावर इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे .विनोबा भावेंचं उदाहरण घ्या .आठ देशी आणि सहा परदेशी भाषा येत होत्या . पुढे जाण्याचे विचार नवीन पिढीसमोर मांडा हो.

प्रसाद१९७१'s picture

25 Jul 2014 - 5:09 pm | प्रसाद१९७१

मी बेळगावात जन्माला आलो असतो तर मला मराठी बरोबर कन्नड पण आली असती.
मी पुण्यात / बंगलोर ला दोन्हीकडे लोकल भाषेत बोलू शकलो असतो.

कन्नड ग्रुप मधे कन्नड म्हणुन आणि मराठी लोकांच्यात मराठी म्हणुन खपुन गेलो असतो.

बॅटमॅन's picture

25 Jul 2014 - 5:16 pm | बॅटमॅन

कन्नड शाळा सांगली-मिरजेत अजूनही आहेत- किमान २००३ सालापर्यंत तरी पाहिल्याचे आठवते. अन्य सीमावर्ती भागांतही असाव्यात बहुधा.

कन्नड शाळा सोलापुरातही आहेत.
निपाणीत कन्नडपेक्षा मराठी शाळा जास्त आहेत. सरकारकडून तेवढं आधीच केलं गेलंय. पण सरकारी कागदपत्रे, कोर्टकचेर्‍या, वगैरे कन्नडमध्ये. याचा त्रास होतो लोकांना.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Jul 2014 - 7:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपलं झालं थोडं व्याह्यानी धाडलं घोडं असा प्रकार आहे हा सगळा. कायदेशिर पणे महाराष्ट्राचा भाग असणार्‍या प्रदेशात काय सोयीसुविधा देतयं सरकार? अजुन वाढीव भाग समाविष्ट करुन काय साधणार आहे? हाच प्रश्ण महानगरपालिकेच्या हद्दीत नव्यानी समाविष्ट होणार्‍या गावांबद्दलही विचारता येईल.

मूळ स्रोत आणि त्याचं नंतर एकदा आलेलं विडंबन हेही नजरेखालून घालायला हरकत नाही ;-)

बाकी मटा मधली बेळगावची बातमी वाचली तेंव्हाच मिपावर धागा निघणार याची खात्री होती, तो विडंबनात्मक निघाला हे फार बरं!

काळा पहाड's picture

29 Jul 2014 - 5:02 pm | काळा पहाड

महाराष्ट्रात येवून बेळगावचं भले काही भलं नाही होवो (खरं म्हणजे हेच खरं असावं). पण कन्नड्यांना हाणायला काय हरकत आहे? शिवसेना नेहमी तर या मुद्द्यावरून शंख करत असते. आता कर्नाटकाच्या एसट्या महाराष्ट्रात का फोडल्या जात नाहियेत? नॅशनल हायवे कोल्हापूरला बंद करून त्यांच्याकडे जाणारे ट्रक्स अडवता येवू शकतात. कृष्णेचं पाणी ब्लॉक करता येवू शकतं. शेट्ट्यांना हाकलून देता येवू शकतं. नाशिकचा कांदा अडवता येवू शकतो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Jul 2014 - 7:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तुमची ती कॅनरा बॅन्क्,कॉर्पोरशन बॅन्क व इन्फोसिसही फोडता येईल असे हे आवेशात येवून म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या आहेत.
ह्या घटनेचं निमित्त करुन मराठी मुद्द्यावर 'मनसे'ला पुढं आणण्याचं कार्य काँग्रेसकडून होत असण्याची शक्यता वाटते आहे.

पोटे's picture

29 Jul 2014 - 8:49 pm | पोटे

सीमावाल्यांची अवस्था संत मीराबाईगत झालेली आहे.

मीराबाईला अन्न वस्त्र निवारा तिचा नवरा द्यायचा. पण ती लबाड बाई त्याला सुख न देता देवाच्या लाकडी पुतळ्याला नवरा मानत होती.

सीमावाल्याना सोयी कर्नाटक देते ( अर्थात रेव्हेन्युही घेते.) पण याना कुंकु मात्र म्हाराश्ट्राचे हवे आहे

प्रसाद गोडबोले's picture

29 Jul 2014 - 11:08 pm | प्रसाद गोडबोले

आपला अभ्यास किती आपण बोलतो किती ? काहीतरी ताळमेळ ठेवा राव !!

फारच अपेक्षा राव तुझ्या!! ;)

उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ मुद्दा बरोबरच आहे असं मला वाटतं. उपमेबद्दल चर्चा तूर्त करीत नाही.

अर्थात याचा अर्थ कर्नाटक पोलिसांची गुंडगिरी समर्थनीय आहे असा आजिबात नाही. पण यांनी विचार करावा, मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत. नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, त्यातही मराठी नेत्यांकडून *ट काही होणार नाही हे ढळढळीत दिसत असतानाही!

हे ***** नेते 'आपल्याच' विदर्भ आणि मराठवाड्याला धड जोडू शकले नाहीत, बेळगाव काय *ट घेणारेत? गफ्फा हो, नुसत्या गफ्फा! बेळगाव इ. आपल्याकडे हवा असं लाख वाटतं हो मलाही, पण यांच्या **त दम नाही त्याचं काय? मुंबैत बसून गफ्फा मारणारे केंद्रात मात्र उघडे पडतात! दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं.

पोटे's picture

30 Jul 2014 - 5:36 pm | पोटे

नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही,

........

म्हणुनच तर म्या त्याना मीराबै म्हटलं . ती लाकडी पुतळा बाळगुन होती, हे लाकडी फलक लावुन बसलेत.

परिणाम भोगायची तयारी असणार्‍यांनीच असले उद्योग करावेत हे बरोबर. पण अगदिच शांतपणे बघत बसले, तर मग गर्व, अभिमान तर सोडाच, स्वतःच्याच 'गल्लीत' लाज वाटायला लागेल की.

मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत
ते कोणते सांगावे.
म्हणजे जर उद्या दुकानावरच्या मराठी पाट्या काढण्यात आल्या तर प्रतिक्रीया काय असेल? (असे किरकोळ प्रकार झाले आहेत.)
त्याच्या पुढे जाऊन दारावरची पाटी कन्नडमध्ये लावण्याची सक्ती केली तर?
-
पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी निपाणी पोलिस स्टेशनमध्ये माझा वाद झाला होता. *** साले मराठीत बोलायलाच तयार नव्हते. "कन्नडा माताड इल्लादरे पासपोर्ट सिगल्ला" (कन्नड बोल नाहीतर पासपोर्ट मिळणार नाही) असे जरी तो पोलिस हसत (?) म्हणाला असला तरी आता मस्ती नक्कीच आलीय त्यांना.
माझ्या जवळच्या नातेवाईकाने, निपाणीत फक्त मराठी बोलल्याने लाठीचा मार खाल्ला आहे.

-(मुळचा KA23/ सध्या MH12) SYG

कन्नडिगांची मस्ती माहितेय बे यसवायजी. पण माझा मुद्दा असा आहे की या लोकांना- द्याटिज़ निप्पाणी, बेळगाव, इ. गावांतल्यांना महाराष्ट्रात येऊन कायच मिळणार नाही. हे कटु सत्य आहे. कर्नाटकवाले माज सोडत नाहीत आणि महाराष्ट्रातल्यांच्या अंगी तो दमही नाही, अशा परिस्थितीत काय करावे? मला असं वाटतं खरं. असो.

जर यांच्याइतक्याच जोराने काही केलं तर ठीक, नपेक्षा दिल्या घरी सुखी रहा असेच खेदाने म्हणावे वाटते. :( :(

असो...भावना समजून घेतल्या, पण मार्ग काय ते कळत नाही. मराठी नेतृत्व नेभळट दिसत असल्याने मी जे म्हणालो ते म्हणालो इतकेच.

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 12:58 pm | बॅटमॅन

बाकी, ऑल सेड & डन, यळ्ळूरकरांनी फलक लावणे चूक आहे असेच मला वाटते. ते एक असो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Jul 2014 - 1:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत रे. काही नातेवाईक आहेत तिकडे.कधीच भाषेची अडचण आली नाहि त्यांना.सीमाभागातही गुजराती,मारवाडी बांधब बर्यापैकी व्यापार करून आहेत असे ऐकले आहे.विशेषकरून मिठाईचा.त्यांना नाही का अडचण येत भाषा शिकायला? कसे शिकतात ते चटकन?
ईकडे महाराष्ट्रात आसाम्,राजस्थानचे लोक येतात्,भाषा आतम्सात करतात व धंदा करून पैसेही मिळवतात.
तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 1:25 pm | प्रसाद गोडबोले

तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.

मग ? तुमचा मनसेला पाठींबा आहे का हो नेफळे ?

स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह म्हणजे मनसे नव्हे.
मनसे म्हणजे असे इतर मुद्दे आणि खळ्ळ खट्याक यांचं काँबिनेशन आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Jul 2014 - 3:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी योग्य बोललास बाळ.मनसेचे 'टार्गेट' का काय म्हणतात ते म्हणजे रोजगारी करणारे अमराठी लोक.मराठीच्या नावाने राजकारण करणार्यांनी राज्यात २/४ मराठी ग्रंथालये बांधली तरी पुरे.

आज एका फोरमवर एका मुंबईच्या बावीस तेवीस वर्षांच्या बाब्याशी ओळख झाली. बोलणं अर्थातच हिंदीत चालू होतं.

म्हटलं तू मुळचा कुठला त म्हणे "देल्हीका. नॉर्थ इंडीयन"
मुंबईत केव्हापासून आहेस तर म्हणे "बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे". बॉम्बे बरं का. मुंबई नाही.
म्हटलं तू नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचा कसं म्हणू शकतोस? तू तर महाराष्ट्रीय आहेस. तुझे आई वडील कामानिमित्त मुंबईत आले असतील तर ते फार तर म्हणू शकतात की आम्ही नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचे आहोत म्हणून.

अशा काही मिरच्या झोंबल्या त्याला.

बाळ सप्रे's picture

1 Aug 2014 - 1:30 pm | बाळ सप्रे

बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे असून "देल्हीका. नॉर्थ इंडीयन" असणे हे देखिल अस्मितेचेच गळू.

बरं झालं मिर्च्या झोंबल्या ते. हरामखोर लोक असतात.

यसवायजी's picture

31 Jul 2014 - 2:30 pm | यसवायजी

तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.

थोडी सुधारणा- स्थानिक भाषा मराठीच आहे. कन्नड लादली गेली आहे. असो.

खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.
कुठल्या सीमाभागाबद्दल बोलताय आपण? निपाणीत मराठी ८०% हून जास्त असतील.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Jul 2014 - 3:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सीमाभागात जे कोणी मराठी असतील त्यातील बहुतांशी लोकांना कन्नड येते असे म्हणतात.स्थानिक भाषा शिकायचीच नाही असा आग्रह धरणार्‍यांची संख्या खूप कमी असेल. होय ना?
कन्न्ड लादली गेलीय म्हणजे काय? अरे राज्ये होवून ५० वर्षे उलटून गेली.मुंबईच्या गुजराती बांधवांनी किंवा नागपूरकरांनी 'आमच्यावर मराठी लादली' असे म्हणण्यासारखे आहे.

.

पैसा's picture

1 Aug 2014 - 10:10 am | पैसा

गुजराती लोक मुंबैत गुजरातमधून स्थलांतर करून आलेत. बेळगाव भागातल्यांचे तेच मूळ स्थान आहे. इवलूसा फरक आहे.

बाळ सप्रे's picture

1 Aug 2014 - 10:23 am | बाळ सप्रे

मुंबैत सगळेच तसे स्थलांतर करुन आलेत.. मराठी माणसं कोकणातून, प. महाराष्ट्रातून.. गुजराती, गुजरातमधून..इ..
मुंबै पहिल्यांदा फक्त इंग्रज, पारशी लोक आणि काही कोळी एवढेच होते..

स्थलांतर करुन आलेल्या गुजरात्यांच्या आता ४-५ पिढ्या मुंबैत राहिल्यात.. किती वर्ष स्थलांतरीत म्हणणार ??

बेळगावात बर्‍याच जुन्या लोकांना मराठी, कन्नड दोन्ही भाषा येतात..
अस्मितेचा प्रश्न करुन लढा देत रहायच की परिस्थितीचा स्वीकार करुन पुढे जायच हे महत्वाचं..
राज्यस्थापनेनंतर इतक्या वर्षांत पुढच्या पिढ्यांनी कामकाजापुरतं कन्नड शिकण नक्की शक्य आहे.. आणि इतर जीवनात मराठी वापरा ना तिथे कोण येत नाहिच आहे अडवायला..

पैसा's picture

1 Aug 2014 - 11:31 am | पैसा

ते बिचारे कन्नड शिकतातच ना! तसे गुजराती लोकसुद्धा बर्‍यापैकी मराठी बोलतात. आता गुजराती/मराठी असा काही वाद आहे असं वाटत नाही. पण तिथल्या कानडी सरकारने सीमाभागात सगळे ऑफिसर्स कानडीच नेमायचे, सगळे बोर्ड कानडीत लावायचे असली दंडेली करू नये ना! बेळगावातले दुकानदार सांगतात की मराठी दुकानदारांना हे कानडी ऑफिसर्स भयंकर त्रास देतात.

सगळे सरकारी बोर्ड त्रैभाषिक असले पाहिजेत असा नियम असताना सीमाभागात सगळे रस्त्यांचे बोर्ड्स कानडीच आहेत. अगदी राष्ट्रीय हमरस्त्यावरसुद्धा. पोलिसांना मराठी/हिंदीत विचारलं तर कानडीत बोलतात आणि दुर्लक्ष करतात. स्वतःची गाडी घेऊन खानापूर हाळशीकडे जाऊन या एकदा. रस्ता विचारायला प्रत्येक वळणावर कोणतरी मावशी/मामा भेटतात का बघत रहावं लागतं.

आणि ही कानडी दंडेली सर्वपक्षीय आहे. म्हादेईच्या उपनद्यांवर धरणे बांधू नका कारण गोवा सीमेवरचे दूधसागर जंगल आणि धबधबा ओसाड पडेल, शिवाय गोव्याचे पाणी कमी होईल असा लवादाचा निर्णय आहे, तरी भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही कन्नडिग सरकारांनी धरणांचे काम चालूच ठेवले आहे. गोवा सरकार निषेध करण्यापलीकडे काहीही करू शकलेले नाही.

बाळ सप्रे's picture

1 Aug 2014 - 11:57 am | बाळ सप्रे

कानडी दंडेली निषेधार्हच आहे. पण जितक्या दोन्ही बाजू हट्टाला पेटतील तेवढी दंडेली वाढतच जाणार. आणि इथे सामंजस्याने प्रश्न सुटण्यासारखा आहे. कामापुरतं कानडी वापरुन सोडुन द्यावं. जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला.

पोलिस मराठीत पत्ता विचारल्यास उत्तर देत नसतील तर जवळच्या दुकानदाराला मराठीत विचारावा (मराठी बहुसंख्य आहेत असं ऐकलय. त्यामुळे मराठी दुकानदारच नाहित असे होणार नाही) .. पोलिसाशिवाय पर्याय नसल्यास हिंदी/ इंग्लिशमध्ये विचारावा.. पत्ता शोधताना पत्ता मिळण्याला प्राधान्य द्यावे. भाषिक अस्म्तेला नव्हे.

अस्मिताही असावी पण डेडलॉक होतयं म्हटल्यावर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काहितरी विचार करायला हवा. लोकशाही मार्गाने केंद्रात मागण्या चालू ठेवाव्या भाषिक सक्तिविरुद्ध.

>>जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला.>>

मला वाटते तिथले लोक तसेच वागतात. तरी परवा पोलिसांकडून येळ्ळूरला लोकांना घरात घुसून मारहाण झाली असं ऐकलं. पण एवढी दंडेली अस्ताना आणि महाराष्ट्र सरकारची कोणतीही भरीव मदत नसतानाही ते एवढा लढा देत आहेत, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणारच. निव्वळ पुढार्‍यांची सोय/मतलब म्हणून असे लढे इतकी वर्षे चालत नाहीत. नाहीतर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई गुजरातला जोडायची मागणी हळूहळू थंड झाली, तशी ही चळवळसुद्धा बंद झाली असती.

तुम्ही खानापूरच्या जंगलात आहात. जवळपास माणूस नावाचा प्राणी ५ एक किमि मधे नसावा. समोर सारख्याच रुंदीचे दोन रस्ते दिसताहेत. गोव्याकडे जाणारा कुठचा रस्ता ते तुम्हाला माहिती नाही. जो बोर्ड आहे तो फक्त आणि फक्त कानडीत. इंग्लिशसुद्धा नाही. अशावेळी काय कराल? त्या सरकारला शिव्या देण्यापलिकडे? हे जास्तच जाणवतं कारण कोल्हापूरकडून किंवा लोंढ्याकडून कर्नाटकात शिरताच फक्त एकाच कानडी भाषेतले बोर्ड दिसायला लागतात आणि गोव्यात तर ३ काय चार भाषांतले बोर्ड्स आहेत सगळीकडे! कर्नाटक सरकारला मराठीची चळवळ दडपून टाकायची आहे ना, मग त्याचा त्रास प्रवासी लोकांना का?

आणि पोलिसांना हिंदी/इंग्लिशमधे विचारलं तर सरळ दुर्लक्ष करतात. मराठी तर सोडूनच द्या! टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता!

बाळ सप्रे's picture

1 Aug 2014 - 1:39 pm | बाळ सप्रे

येळ्ळूरला घरात घुसून मारहाण हे अतिच झालं पोलिसांचं पण "येळ्ळूर महाराष्ट" बोर्डाचा हट्ट धरणं हेदेखिल अतिच झालं..

बाकी फक्त कन्नड बोर्ड लावणं हे देखिल या हट्टाचा परीणाम.. बेंगळूरला इंग्लिश बोर्ड लावतील पण सीमाभागात नाही!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Aug 2014 - 10:20 am | माईसाहेब कुरसूंदीकर

दोन्ही राज्यांनी प्रश्न सुटावा म्हणून महाजन आयोग नेमला.बहुतेक १९६५-६६ च्या सुमारास.आयोगाने निकाल कर्नाटकच्या बाजुने दिला.शहरात/जिल्ह्यात मराठी भाषिक अधिक असले मूळ संस्कृती कन्नड होय असा आयोगाने निर्वाळा दिला होता.त्याच सुमारास शिवसेनेची स्थापना झाली. काहीतरी करून मराठी प्रश्न,अन्याय जिवंत ठेवणे ही मराठी राजकिय नेत्यांची गरज बनली. मग कधी मनोहर जोशी तर कधी शरद पवार तर कधी आणखी कुणी जनता पार्टीचा कुणी नेता.'अन्यायाला वाचा फोडून' स्वतःच्या राजकारणाला सीमाभागाची फोडणी देण्याचे काम त्यांनी केले.
सध्या येळ्ळूरकरांमागचा बोलवता धनी कोण हे सांगणे कठीण पण सेना व कॉन्ग्रेस असण्याची शक्यता वाटते.

नानासाहेब नेफळे's picture

31 Jul 2014 - 1:38 pm | नानासाहेब नेफळे

सीमा भागात बिगरमराठा 'मराठी' लोक आहेत, लिंगायत वाणी जैन वगैरे जास्त आहेत. त्यामुळे इथल्या 'मराठा 'नेतृत्वाला त्यांच्याशी घेणेदेणे नाही, एक बाळासाहेबांनंतर या मुद्दावर कोणीही आक्रमक नाही.
टग्या आणि टग्याचा काका पक्के जातियवादी असल्याने तिकडे फिरकतही नाहीत, विदर्भातही मराठा पाँप्युलेशन कमी असल्याने तिकडे फारसे लक्ष देत नाहीत.सीमा प्रश्नी मराठी लोक संघटीत नाहीत याचे कारण' जात' आहे.

नाव आडनाव's picture

31 Jul 2014 - 2:20 pm | नाव आडनाव

आली, सरकारांची चर्चा जातीवर आली एकदाची.
ही माहिती सरकार कुठून आणतात देवाला माहित. मागे बारामती च्या एका बातमीतील "गाव धनगर" आहे असं सांगितलं होतं सरकारांनी, आता सीमा भागात बिगरमराठा लोक राहतात हि एक नवी माहिती. नेफळे अहो झोप तरी लागते का, कि झोपेत सुद्धा जात-जातच चालू असतं. सुधरा राव.

बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन काहीच फायदा नाहीए आता. ६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली. शाळेत कन्नड सक्तीचे असल्याने पुढच्या पिढीला कन्नड येतंच. उलट माझ्यासारख्यांना पुणे-मुंबै ते बेंगलुरु-मैसुरु पर्यंतचे सगळे पर्याय सोयीचे वाटतात.

फलकाबद्दल- तो फलक बर्‍याच वर्षांपासून होता तिथे. आता न्यायलयाचा निर्णयाविरुद्द पुन्हा फलक लावणे चुकीचेच. पण त्यांच्या दॄष्टीने तो फक्त फलक नव्हता. जाउदे.. फक्त त्या मस्तीचे काय करायचे हाच खरा अनुत्तरीत प्रश्न आहे.
आपण आपलं जिकडं(KA-MH) खोबरं मिळंल तिकडं चांगभलं म्हण्तो. ;)

सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं हेच उत्तम!!!!

बाकी मराठी नेतृत्वाने मनावर घेतल्याखेरीज त्या मस्तीचं काय होत नसतंय.

नानासाहेब नेफळे's picture

1 Aug 2014 - 12:39 pm | नानासाहेब नेफळे

"गुलाल तिकडं चांगभलं" असा ग्रामीण वाक्प्रचार आहे हे नमूद करु इच्छितो.

यसवायजी's picture

1 Aug 2014 - 2:44 pm | यसवायजी

वाक्प्रचार आपले आपले.. :p

'चाय त्याचा न्याय' असा रायगड वैगरे भागात वाक्प्रचार आहे.

मिरजेत आम्ही खोबरं घालूनच ऐकलेला आहे. तुमचं गाव कोन्तं म्हणे?

नितिन थत्ते's picture

2 Aug 2014 - 4:53 pm | नितिन थत्ते

आम्ही 'सरशी तिथे पारशी' अशी म्हण ऐकली आहे.

ही म्हण कुठेशीक वाचल्याचे आठवते. म्हणींचे स्कॉलरशिपवाले कळेक्षन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्याचे वटवाघूळ's picture

1 Aug 2014 - 12:31 pm | पुण्याचे वटवाघूळ

६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली.

बापरे माझी पण निम्मी लाकडं मसणात गेली हे ऐकून उगीचच म्हातारं झाल्याचे वाटायला लागलं :(

प्रभाकर पेठकर's picture

1 Aug 2014 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर

मी ५४चा, त्यामुळे स्वर्गातूनच मिपा-मिपा खेळतोय.

:))
भावानावोंको समझो काकालोग्ज.

बाळ सप्रे's picture

1 Aug 2014 - 3:14 pm | बाळ सप्रे

अरे!!! स्वर्गातून मजा काय बघताय राव??
इकडे देव असण्या नसण्यावर इतका वाद चालू आहे.. धावतं समालोचन करा की देवभेटीच!!

प्रभाकर पेठकर's picture

2 Aug 2014 - 7:21 pm | प्रभाकर पेठकर

मी काय धावतं समालोचन-बिमालोचन वगैरे करणार? मराठीत म्हण आहे नं 'आप मेल्याशिवाय स्वर्ग (पर्यायाने देव) दिसत नाही.'

मग कायssss मरा.....!

मरे आपके दुश्मन काका! (आहेत का कोणी? ;) )

प्रभाकर पेठकर's picture

2 Aug 2014 - 7:45 pm | प्रभाकर पेठकर

हा: हा: अजून तरी आमने-सामने कोणी दुश्मनी करू धजलेले नाही.

दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं.
पूर्णपणे सहमत ! महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले ? कन्नडिगांनी का ?
बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं जी महाराष्ट्रात येण्यास आसुसली आहेत, त्यांना महाराष्ट्रात काय मिळणार आहे ?
इथे फक्त आमच्या माजलेल्या सांड नेत्यांच्या वाढदिवसांच्या फ्लेक्स शिवाय काही नाही !
बरं महाराष्ट्रातली जनता यांच्या {बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं} यांच्यासाठी पेटुन उठेल का ? तर खेदाने सांगावे लागेल नाही ! अहो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पाण्यासाठी उपोषणाला बसणार्‍यांची टिंगल करतात आणि गलिच्छ भाषा वापरतात... त्या महाराष्ट्रात येउन काय मिळणार ? इथे विजही नाही ! बरं वीज नाही त्यामुळे जास्त मुल जन्माला येतात असा जगावेगळा शोध लावणारेच हेच टग्या ! इथे फक्त टगेगिरी चालते... विकास आणि सुव्यवस्थेच्या नावाने पुरती बोंब आहे.

जास्त कशाला वेगळ बोलु ? माझ्या लहानपणा पासुन आणि जेव्हा पासुन पेपर वाचत आलो आहे तेव्हा पासुन पावसाळ्याच्या आधी नाले सफाई झाली नाही, नाले सफाईत भ्रष्टाचार, सगळीकडे पाणी तुंबले, मुंबइच्या लोकलवर पावसाचा परिणाम, हार्बरलाइन बंद पडली, खड्डे आणि त्याच्या बातम्या आणि फोटो... हे इतके वर्ष सातत्याने घडताना पाहत आहे,वाचत आहे. कालच लोकसत्तेचा अग्रलेख {राज्य रुतले खड्डय़ांत..!} वाचला होता... फार अस्वस्थ व्हायला होत मला... आपल्या महाराष्ट्रातले राज्यकर्त्ये नक्की काय करतात ? मुंबइच शांघ्याय झाल ? सिंगापुर झाल? कोकणाचा कॅलिफोर्रनिया झाला ? वाटोळ मात्र नक्कीच झालं ! नुसता भ्रष्टाचार...अव्याहतपणे चालणारा !
महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येत पहिला, विद्यार्थींच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,पोलिसांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,सर्व प्रकारच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला.
काय ठेवलय या महाराष्ट्रात भ्रष्टाचारा शिवाय ?
जाता जाता :---
कालच ऑफिसमधुन घरी जाताना जवळपास गुडघाभर पाण्यातुन बाइक काढुन घरी जिवंत पोहचलो ! हेच आमचे जगणे ?
नाहीतर खालच्या तरुणासारखा कुठेतरी वाहुन गेलो असतो...

आजची स्वाक्षरी :- 'काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं' :(

परम खेदाने मदनबाणाशी सहमत व्हावे लागत आहे. :(

एकसे एक माजलेले गुंठामंत्री, किलो किलो सोने घालून फिरणारे हत्ती यांची मोकाट चराई सुरू आहे. माजुरडे नेते अन त्यांचे दीडदमडीचे चेले यांची गुंडगिरी वगळता महाराष्ट्रात काही उरलेलं नाही. सगळे साले मूर्खागमनी :(

पुण्याचे वटवाघूळ's picture

31 Jul 2014 - 2:05 pm | पुण्याचे वटवाघूळ

अगदी मान्य.

बेळगाव- संयुक्त महाराष्ट्र याविषयी मिपावरच २०१० मधील पंगांचा हा आणि
हा प्रतिसाद आठवला.

पंगांसारखे मिपाकर हल्ली इथे का येत नाहीत काय माहित?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Aug 2014 - 5:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पंगांचा आयडी उडवला म्हणून येत नाहीत.

कपिलमुनी's picture

20 Nov 2014 - 4:37 pm | कपिलमुनी

एखाद्या आयडी चा अपमृत्यू कशाने होतो ? :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2014 - 2:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

खेदानेच पण १००% सहमत

बाळ सप्रे's picture

31 Jul 2014 - 2:51 pm | बाळ सप्रे

तुलना अस्थानी आहे..
महाराष्ट्रात त्यांना केवळ कन्नड सक्ती टाळण्यासाठी यायचयं.. आणि ते नक्की साध्य होईल महाराष्ट्रात आल्यास.
बाकी राहिला प्रश्न महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आणि राज्यकारभाराचा.. कर्नाटकात काय एवढं रामराज्य आहे?? इथे टग्या तिथे येडंयुरप्पा.. गुंठामंत्री तिकडेही आहेतच.. खाणवाले रेड्डीबंधु वगैरे या गुंठामंत्र्यांचेही बाप निघतील.. इकडे मनसे,सेना, ब्रिगेड .. तिकडे रक्षण वेदिके, श्रीरामसेना
सगळे एका माळेचे मणी..

पोटे's picture

31 Jul 2014 - 5:31 pm | पोटे

तिकडची घरे विकुन इथे घेउन रहा म्हणावं त्याना.

ऋषिकेश's picture

1 Aug 2014 - 11:31 am | ऋषिकेश

नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही

जर काही पॉइंट नाहि तर तसाच का नाही ठेऊ दिला तो फलक? कशाला उखडला?
तेव्हा कैतरी पॉइंट असणारच ना तो फलक लावण्यात? :P

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Jul 2014 - 5:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वर प्रशांतने म्हंटल्याप्रमाणे सेना-भाजपाची कोंडी करण्यासाठी मनसेला पुढे आणण्याचा कॉन्ग्रेसवाल्यांचा डाव दिसतोय.तिकडे कर्नाटकातही कॉन्ग्रेसचे सरकार आहे त्यामुळे नाटक जास्त वेळ चालवण्याची परवानगी कॉन्ग्रेसश्रेश्ठि देणार नाहीत्.असो.
दिल्ली असो वा येळ्ळूर आपल्या मराठी पुढार्‍यांना कुठलाही मुद्दा चालतो, मराठीच्या नावाने गळा काढायला.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Aug 2014 - 10:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर

हा प्रश्न उकरून काढण्यामागे मती गुंग करणारे बारामतीकरच असणार असे हे परवा म्हणाले होते. ते खरे ठरले.
http://www.loksatta.com/maharashtra-news/rally-of-ncp-in-yellur-736564/

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2014 - 8:37 pm | प्रसाद गोडबोले

धाग्याच्या शीर्षकात बेळगावच्या ऐवजी बेळगावी असा बदल करावा अशी संपादकांना विनंती करीत आहे :D

पैसा's picture

19 Nov 2014 - 8:41 pm | पैसा

कानडी लोकांसमोर मान टाकलीत का राव!

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2014 - 8:51 pm | प्रसाद गोडबोले

झालं की संपलं आता ... आता कस्लं येतेय बेळगाव महाराष्ट्रात ... सोडुन द्या विषय ...

बॅटमॅन's picture

20 Nov 2014 - 3:14 am | बॅटमॅन

नायतर काय. वेगळा विदर्भ (हागणदारीमुक्त) केला नाही हेच नशीब म्हणायचे!

अन नै आलं ते त्यांच्यासाठी बरंच आहे. पुन्हा नायतर दादागिरीसाठी अजूनेक फ्रंट मिळणार, दुसरे काय?

धर्मराजमुटके's picture

19 Nov 2014 - 8:59 pm | धर्मराजमुटके

बेळगावचं काय घेऊन बसलात ? विदर्भ तरी महाराष्ट्रात राहतोय की नाही देवेंद्र जाणे !

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2014 - 9:01 pm | टवाळ कार्टा

१०० झालेच पाहिजेत का??? :)

हाडक्या's picture

19 Nov 2014 - 10:02 pm | हाडक्या

करा सुरु बॅटिंग..!! *lol*

प्यारे१'s picture

19 Nov 2014 - 10:27 pm | प्यारे१

हे बघा मी टीआरपीसाठी एकही प्रतिसाद देणार नाही आधीच सांगून ठेवतोय.
समजलं का???
समजलं नसलं तर पुन्हा सांगेनच असं नाही असं नाही असंही नाही.

टीआरपी साठी कोणीही प्रतिसाद देऊ नये ही नम्र ईनंती.

कपिलमुनी's picture

20 Nov 2014 - 1:22 pm | कपिलमुनी

काश्मीर की बेळगाव ?

कोणता प्रश्न आधी ( अजून साधारण ५० वर्षात) सुटेल ?

हाडक्या's picture

20 Nov 2014 - 3:38 pm | हाडक्या

बेळ्ळगावी म्हणा वो..

बॅटमॅन's picture

20 Nov 2014 - 4:16 pm | बॅटमॅन

डबल ळ नैये ओ तिथे. शिंगल ळ आहे.

काळा पहाड's picture

20 Nov 2014 - 4:27 pm | काळा पहाड

नाही. ते "बेळगाव"च. सध्या तरी मी एखादा कन्नड्या माझ्या तोंडावर मला करेक्ट करायची वाट बघतोय.

हाडक्या's picture

20 Nov 2014 - 5:13 pm | हाडक्या

चला झाले १०० .. आता आम्ही सुखाने धाग्यावरून कल्टी मारतो.. :)

विटेकर's picture

20 Nov 2014 - 3:50 pm | विटेकर

नै , दादांचे काम वाढायला नको .... वाढत्या वयाबरोबर त्यांना झेपायला पण पायजेल .!