थिजली गात्रं (आणि विवाद)
कवी लिखाळ ह्यांच्या काव्यप्रतिभेला सर्वपित्रीच्या रात्री आलेला भेसूर बहर वाचून मी थिजून गेलो :S आणी माझ्या गोठलेल्या तनातून विडंबनाची एक थंडगार लहर सरसरत गेली! :O
वाचता भयानक ओळी
थिजलो गोठून गात्री
क्षणात गमले मजला
'लिखाळ' हा, ना कवियत्री
भयाण-भेसूर कडवी
यमक वृत्तही नाही
थरथरता मुक्तछंद अन्
वाचकाला झोप नाही
जालावरील मुंजा
लिहितो भेसूर तेव्हा
तळमळत्या मनांचा
अभिशाप स्पष्ट होई
थकला अखेर जेव्हा
'चतुरंग' सर्व गात्री
फाडून आता बघ त्याने
कवितेची लक्तरे उरली ...
चतुरंग
विवाद
आमच्याच विडंबनाचे तिर्हाईतपणे समिक्षण करून आम्ही त्याचे मर्मभेदी गांभीर्य आणि वैचित्र्यपूर्ण सौंदर्य नष्ट करु इच्छित नाही. जिज्ञासूंनी आपापल्या जबाबदारीवर समीक्षा करावी.
वाचने
9378
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
ठ्ठो ठ्ठो...
In reply to ठ्ठो ठ्ठो... by प्राजु
नाही
आहाहा
भन्नाट!
हीही
In reply to हीही by मुक्तसुनीत
अहो !
समीक्षणाचा नारळ...
कवीबळी शोधत फिरत असतो आणि कवितेचे विडंबन पाडले की कविच्या मनातील तळमळ शापांतून व्यक्त होतेच असे अनेकदा निदर्शनास आले आहे. पण म्हणून शिव्याशाप खाऊन गप्प बसेल तर तो विडंबक कसला? भेसूर विडंबने लोकांना जास्त आवडतात पण या लिखाळाने भेसूर काव्य करून पंचाईत करून टाकली. आता लिखाळाला सोडून कसं चालेल...पारावर कविता आली आता ती मुंज्याची झाली. असे अनेक विचार करून चतुरंग दमले. या भेसूर काव्याचं अतिभेसूर विडंबन करायचे झाले तर हवी तिथे कात्री चालवून कवितेची चीरफाड करायला हवीच. सुखी,दु:खी, प्रेमकाव्य, गझला, मुक्तछंद सर्वांचं हेच होतं, त्यात आज भेसूर काव्याचीही लक्तरे झाली. ;) डिश्क्लेमरः समीक्षकांनादुस्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही म्हणे. समिक्षकाचा बुरखा काढल्यावर मात्र प्रियालीताई विडंबनाची वाहवा करतात. विडंबन भेसूर काव्याला साजेसे. आवडले. ;) (न आवडून सांगायचं कोणाला?)In reply to समीक्षणाचा नारळ... by प्रियाली
:)
In reply to समीक्षणाचा नारळ... by प्रियाली
आयला! भयाली
In reply to आयला! भयाली by विसोबा खेचर
हाहा!
In reply to समीक्षणाचा नारळ... by प्रियाली
भयालीदेवी!
In reply to समीक्षणाचा नारळ... by प्रियाली
व्वा, क्या बात है!
भ्यालीभयालीदेवींचं समीक्षण एक नंबर आहे. आता असं वाटायला लागलं आहे जसं भूतं झाडं पकडतात तसं या (भय)कवींनी मिपाकरांना पकडलेलं आहे! हहपुवा. अदितीमस्त
मस्त आहे...
हा हा
In reply to हा हा by मुक्तसुनीत
हा हा
In reply to हा हा by लिखाळ
कोण कुणास म्हणाले ?
In reply to कोण कुणास म्हणाले ? by मुक्तसुनीत
.
In reply to हा हा by मुक्तसुनीत
मुक्तराव, ए
काही ओळखले...
In reply to काही ओळखले... by स्वाती राजेश
अजून १
In reply to काही ओळखले... by स्वाती राजेश
डिकास्टा...
भन्नाट...
रंगा, विडंब
(विडंबनाच्या) विडंबनासाठी कल्पना...
In reply to (विडंबनाच्या) विडंबनासाठी कल्पना... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
"स्थायिक विडंबक"
In reply to (विडंबनाच्या) विडंबनासाठी कल्पना... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
टकटक टकटक
ह. ह. पो. दु.
प्रिभयाली ताईच्या त्या साथीला बळी पडल्याबद्दल आभार =)) -(पुन्हा आजही =)) ) ऋषिकेशIn reply to ह. ह. पो. दु. by ऋषिकेश
हेच म्हणतो
वा..
प्रतीसाद मराठीतच आहेत काय...
हे पण पुन्हा वाचायला मजा आली.
In reply to हे पण पुन्हा वाचायला मजा आली. by ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही
भेसूर विडंबण