मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थिजली गात्रं (आणि विवाद)

चतुरंग · · जे न देखे रवी...
कवी लिखाळ ह्यांच्या काव्यप्रतिभेला सर्वपित्रीच्या रात्री आलेला भेसूर बहर वाचून मी थिजून गेलो :S आणी माझ्या गोठलेल्या तनातून विडंबनाची एक थंडगार लहर सरसरत गेली! :O वाचता भयानक ओळी थिजलो गोठून गात्री क्षणात गमले मजला 'लिखाळ' हा, ना कवियत्री भयाण-भेसूर कडवी यमक वृत्तही नाही थरथरता मुक्तछंद अन् वाचकाला झोप नाही जालावरील मुंजा लिहितो भेसूर तेव्हा तळमळत्या मनांचा अभिशाप स्पष्ट होई थकला अखेर जेव्हा 'चतुरंग' सर्व गात्री फाडून आता बघ त्याने कवितेची लक्तरे उरली ... चतुरंग विवाद आमच्याच विडंबनाचे तिर्‍हाईतपणे समिक्षण करून आम्ही त्याचे मर्मभेदी गांभीर्य आणि वैचित्र्यपूर्ण सौंदर्य नष्ट करु इच्छित नाही. जिज्ञासूंनी आपापल्या जबाबदारीवर समीक्षा करावी.

वाचन 9372 प्रतिक्रिया 0