एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !
या फोटो मध्ये फुरस्याच्या डोक्यावरचा "ट्रेडमार्क बाण" नीट दिसतो आहे.
हा फोटो आमोद झांबरे यांचा, त्यांनी पुण्याच्या जवळ काढला आहे, रंग संगती मधला फरक बघा.
लहान असल्यामुळे लपण्यासाठी जागा अनेक: दरवाज्याची कडी, बिजागर; उंबरठ्याच्या, मोरीच्या,पलंगाच्या फटीत, घरातल्या कुंडीच्या खालच्या प्लेट मध्ये, कुंपणाची दगडांची भिंत, अंगणात पसरलेल्या दगडाच्या खाली इ. तसेच या सापाला "हीच-हायकिंग" करायला खूप आवडते, म्हणजे एका भाजीच्या ट्रक मधून दुसऱ्या ट्रक मध्ये असे करून हे साप पुण्यात पोहचतात. मी जी काही फुरशी पुण्यात पकडली ती मार्केट यार्ड परिसरामध्ये भाजीच्या गोडाऊनमध्ये पकडली आहेत. तशी कोथरूडच्या किंवा कोंढवा टेकडी वर मजबूत फुरशी आहेत, पण मला कॉल ला कधी मिळाली नाहीत. असेच एक फुरसे इंग्लंडमध्ये एका आज्जीच्या घरी भाजीच्या कंटेनर मधून पोहचले, "असेल कुठला तरी साप म्हणून", त्यांनी त्याला स्वयंपाकाच्या चिमट्याने उचलून डब्यात टाकले, नंतर ते फुरसे आणि ती आज्जी इंग्लंड मध्ये शेलीब्रिटी झाल्या होत्या, कोणाचे काय...तर कोणाचे काय !
संकटाची जाणीव झाली की फुरसे अंगावरचे खवले घासून करवत घासल्यासारखा आवाज करते,तो आवाज घोणसाच्या शिट्टी एवढा मोठा नसला तरी कचकचीत तीव्र (high frequency) असतो. घोणासाच्याच कुटुंबातील फुरसे असल्यामुळे आधीच्या भागात लिहिलेले वर्णन याला पण लागू होते- "डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला फुरसे पण असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा बी.बी.सी. चा व्हिडिओ बघा: फुरस्याचा हल्ला. हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी फुरस्याचा हल्ला चित्रित केला आहे. )
वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १/१० घोणासाच्या विषाच्या मात्रेएवढे म्हणजे २० mg तो २५ mg एवढे विष फुरसे टोचते.
हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो.
फक्त हे विषाचे प्रमाण(घोणसाच्या तुलनेत) कमी असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी आहे, कारण आपल्याकडे हाफकिनचे प्रती-विष उपलब्ध आहे. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्पदंशाचे रुग्ण हे फुरसे चावल्यामुळे आढळतात, १९९२ ते २००१ या दहा वर्षाच्या काळात २७४ फुरसे दंश तर ७२ नाग दंशाचे रुग्ण फक्त नांदेड भागात आढळले.(डॉ.डी.पी. पुंडे )म्हणजे साधरण पणे नागाच्या चौपट प्रमाणात फुरसे चावण्याचे प्रमाण महाराष्ट्रात आढळते.
निसर्गाला कमी लेखायची ही चूक अशी महागात पडते. हा व्हिटेकर साहेबांचा व्हिडिओ बघा- फुरस्याचे विष !
जास्तीत जास्त फुरसे चावण्याचे प्रमाण हे रात्री आढळते, "व्होल वावर इज अवर" हा मनुष्यप्राण्याचा गैरसमज फुरसे रात्री दूर करते, शेतात डबा टाकायला गेला, धार मारायला गेला आणि फुरसे चावले, हे प्रकरण...आज ३१ नंबर ची पी.एम.टी खूप उशिरा आली एवढे कॉमन आहे.
माणूस वाचला तरी, ज्या जागी फुरसे चावते तिकडचे टिशू जळून जातात, कधी-कधी बोटे कापायला लागतात. एका सर्पतज्ञांच्या भाषेत "एकवेळ नाग परवडला पण फुरसे नको,इतका त्रास होतो की बाळंतपण परवडले !"एका मंगळवारच्या संध्याकाळी (~२००२-२००५ )अनिकेत (माझा सर्पोद्यानचा मित्र)त्याच्या रूमवर (सर्पोद्यान मधली वरची खोली) गप्पा टाकत पडला होता. इतक्यात कोर्पोरेशनचा ड्रायवर, हातात एक साप घेऊन आला. संध्याकाळी कोर्पोरेशनची "दुटी" संपल्यावर त्याने कात्रजच्या गुत्त्यावर पहिल्या धारेची लावली होती. "अरे हा बघ मांजऱ्या धरून आणला बघ !" खालचा फोटो बघा, मांजरऱ्या म्हणजे कॅट स्नेक, बिनविषारी साप, याच्यात पिल्लात आणि फुरस्यामध्ये लोकं, सर्पमित्र नेहमीच गोंधळ घालतात.
अनिकेत मुरलेला सर्पतज्ञ असल्यामुळे संधीप्रकाशात पण त्याने ते फुरसे आहे हे ओळखले, त्याने तो साप पहिल्यांदा डब्यात टाकला. ड्रायवरचे चालूच होते-" गुत्त्यावर हा मांजऱ्या दिसला, इतकुसा साप, असाच धरला..." अनिकेतने त्याची बोटं चेक केली तर बोटाला, ब्लेड मारावे तसा दात लावला होता.
अनिकेतला गंभीर परिस्थीची जाणीव झाली, पण हा आपला तळीराम "फुल ओन" होता, "आपल्याला काय पण होत नाय,लई मोठें मोठें नाग धरले आहेत आपण"..हे चालूच होते. पुढच्या काही क्षणात , अनिकेत ने त्याला स्प्लेंडर वर झाशीच्या राणीसारखा स्वतःला मागून बांधला आणि गाडी ससूनच्या दिशेला तडक सोडली.
आत्ता ज्यांना कात्रज ते पुणे स्टेशन रस्ता माहित असेल त्यांना माहित असेल की संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे कुष्णा नदीच्या प्रवाहात उडी टाकून उलट्या दिशेने (भोपळा न लावता) पोहोण्यासारखे आहे. कसेबसे करत हा ससूनला पोहचला तर ही मोठी रांग...आता दारूचा अंमल कमी होऊन विषाचा अंमल चालू झाला होता, त्यामुळे ड्रायवर पण बोंबलत होता. लायनी शिवाय फक्त व्हीयपीला एन्ट्री हा तिरुपती-बालाजीचा नियम इकडेपण लागू होता.
मोबाईलच्या आधीचा काळ, त्यामुळे अण्णाना फोन(ल्यांड लाईन) लागे पर्यंत त्या छोट्या-इवलुश्या फुरस्यानी ड्रायवरला सात जन्म दाखवले होते. फोन लागल्यानंतर वरून सूत्र हालली, ड्रायवरला प्रतिविष चालू झाले. ससूनच्या आणि अनिकेतच्या कृपेने, नंतर तो (हाल होत होत)वाचला, त्याचे बोट पण वाचले. पण निसर्गातल्या त्या इतकुश्या फुरस्याने, ड्रायवरला त्याची जागा दाखवून दिली होती.
(हा वरचा अनुभव माझा स्वतःचा नाही पण तो १००% खरा आहे, फक्त थोडे छोटे तपशील कानगोष्टीमुळे चुकू शकतात.)
आत्तापर्यंत मी ४ मुख्य विषारी सापांची (नाग, मण्यार, घोणस, फुरसे) माहिती दिली, हेच साप साधरण करून मानवीवस्ती मध्ये आढळतात. तसे अजून भारतात अजून खूप विषारी साप (साधा,मलबार-चापडा, किंग कोब्रा, पोवळा साप, समुद्र साप इ.) आहेत, पण त्यांचा माझा कॉल वर कधी संबध आला नाही म्हणून मी त्यांची माहिती देणे टाळले.ज्यांना कोणाला अजून त्यांच्या बद्दल माहिती हवी असेल त्यांनी अण्णांचे "साप" (इंग्लिश-स्नेक्स) हे पुस्तक वाचावे.(त्याच्या प्रती सर्पोद्यान मध्ये मिळतात.)
पुढच्या भागात बिनविषारी साप....
(अण्णा म्हणजे सर्पोद्यान चे संस्थापक-श्री.निलीमकुमार खैरे.)
(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)
In reply to ***** by जेपी
In reply to ***** by जेपी
In reply to जबरा लेख.... by मुक्त विहारि
In reply to कांडर by llपुण्याचे पेशवेll
In reply to आणि दिवड पण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to आणि दिवड पण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to कांडर by llपुण्याचे पेशवेll
पुढच्या भागात बिनविषारी साप....आता जरा कमी घाबरवतील हे लेख !!!
In reply to फुरसे हे त्यामानाने( नाग by सुबोध खरे
In reply to तुमचे अनुभव नेहमी माहितीपुर्ण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to फुरसे हे त्यामानाने( नाग by सुबोध खरे
In reply to जबरदस्त.. by चिगो
In reply to भारी माहिती आणि फोटो by ब्रिज
In reply to माहितीचा खजिना by हुप्प्या
जेडीचा लेख आणि डॉक्टरसाहेबांची भर म्हणजे एक पर्वणीअगदी खरंय. जेडी आम्रिकेत आणि डॉ खरे मुंबईत, पण दोघं मिळून जगभरातल्या मिपाकरांना पर्वणी देतात. आंतरजालाच्या सामर्थ्याची ही प्रचीतीच आहे. जेडी आणि डॉक्टरसाहेबांनी मिपा दिवाळी अंकासाठी एक लेख एकत्र लिहावा असं सुचवतो. (या प्रस्तावाला ज्यांचं अनुमोदन असेल त्यांनी या दोघांना खरडी, व्यनि आणि (शक्य असल्यास) प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्यावर मनोवैद्न्यानिक दबाव आणावा)
आमास्नी बेडशे लेणी उतरताना, आल्ता भेटाया! In reply to ह्यो साप कोनचा म्हनायचा हो by अत्रुप्त आत्मा
In reply to हा घ्या जरा अजुन क्लिअर! by अत्रुप्त आत्मा

In reply to हां! अता आला बघा! by अत्रुप्त आत्मा
In reply to हां! अता आला बघा! by अत्रुप्त आत्मा
In reply to मस्त... नेहमीप्रमाणेच by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आमच्याकडे by आनन्दा
In reply to कांडार, कांडर किंवा कान्डोर( by सुबोध खरे
In reply to नेहमी प्रमाणेच रंजक आणि by गणपा
In reply to छान लेख.. by शरभ
In reply to मस्त अनुभव आणि फोटो सुद्धा ! by जॅक डनियल्स
In reply to ओ जे.डी. साहेब..... by मुक्त विहारि
In reply to मी डिसेंबरमध्ये येतो आहे. पण by जॅक डनियल्स
In reply to जे डी साहेब by सुबोध खरे
In reply to + १.... by मुक्त विहारि
In reply to नक्की ! मी ७ डिसेंबर ला by जॅक डनियल्स
In reply to ठाणे(तलावपाळी) मध्ये by सुबोध खरे
In reply to नक्की ! मी ७ डिसेंबर ला by जॅक डनियल्स
In reply to अरे वा..आम्हीही पर्वतीलाच by डॉ.प्रसाद दाढे
In reply to हे असं का करताय तुम्ही? by सुहासदवन
In reply to हे असं का करताय तुम्ही? by सुहासदवन
समजा मी रानात उभा आहे आणि अचानक माझ्या लक्षात आले की पायाला काहीतरी घासत आहे. समजा तो एक साप आहे. तर मी स्वस्थ उभं राहावं की ताडदिशी उडी मारून त्यापासून लांब जावं?
अशा परिथितित होणारी क्रिया प्रतिक्षिप्त (reflex action) असते... विचार करून काही करण्याएवढा वेळ नसतो. तुम्ही गोठून जावून स्तब्ध उभे राहणार की घाबरून ताडदिशी उडी मारून लांब जाणार हे तुमच्या मूळ मानसिक ताकदीप्रमाणे "होईल", तुम्ही "करणार नाही".In reply to समजा मी रानात उभा आहे आणि by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक प्रश्न by सुमीत भातखंडे
In reply to ओजस.. by निशदे
In reply to लेखमाला छान आहेच by दिपक.कुवेत
डूख धरणे ही भावना आहे, नागाचा मेंदू डूख धरण्यासाठी विकसित झाला नसून खाणे कसे शोधायचे यासाठी विकसत झाला आहे. आपल्या घरी बायको- आई ने स्वयंपाक नाही बनवला तर नाक्यावर जाऊन आपण भाजी-पाव खाऊ शकतो पण नागाला मात्र उंदीर (२ आठवड्यातून एकदा का होईना ) स्वतः शोधायचा असतो. जो काही नंतर वेळ उरतो त्यामध्ये स्वतः चे इतर भक्षकापासून (गरुड, घार, माणूस इ.) रक्षण करायचे असते. त्यांची वधूवर सूचक मंडळे नसल्याने दरवर्षी नवीन नागीण (:)) स्वतः शोधून आपली प्रजा वाढवायची असते. त्यामुळे त्याला डूख धरणे वगैरे अश्या फालतू कामांसाठी वेळच नसतो
In reply to भाग ७ मध्ये मी नागाबद्दल by जॅक डनियल्स
In reply to पीएचडीतला अर्धा वेळ क्रॉस by आदूबाळ
In reply to सही जवाब ! पीएचडीच्या by जॅक डनियल्स
In reply to अवांतर by बॅटमॅन
In reply to डिग्रीला आले की डिग्री मिळते, by जॅक डनियल्स
In reply to डिग्रीला आले की डिग्री मिळते, by जॅक डनियल्स
In reply to पी एच डी by सुबोध खरे
In reply to पास्ड विथ हेवी डिफिकल्टी.. by जॅक डनियल्स
In reply to भाग ७ मध्ये मी नागाबद्दल by जॅक डनियल्स
In reply to जे डी साहेब. by शरभ
मी पहिला मी पहिला.