सुधा मायदेव ह्यांच्या लाजवाब मालिकेतल्या चिकन ह्यामधील ही पाककृती आहे.पाककृतीचे प्रमाण मी आमच्या आवडी व चवीप्रमाणे बसवले आहे.
साहित्य:
अर्धा किलो कोंबडीचे तुकडे हळद + मीठ लावून ठेवलेले
२ कांदे उभे चिरलेले
५-६ लसुण + १ इंच आले ठेचून
३ टेस्पून कांदा-लसूण मसाला (हा मसाला खूप तिखट असतो , थोडी चव घेऊन बघा व त्याप्रमाणे घालावा)
२ टेस्पून सुके खोबरे
१ टेस्पून पांढरे तीळ
१ टेस्पून खसखस
१ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
३ लसूण पाकळ्या
बारीक चिरलेली कोथींबीर
तेल
पाकृ:
एका पॅनमध्ये तीळ, खसखस व सुके खोबरे कोरडेच सोनेरी रंगावर भाजून घ्या.
भाजलेले जिन्नस वेगळ्या ताटलीत काढून घ्या.
पॅनमध्ये १ टेस्पून तेल घालून ३ लसूण पाकळ्या परतून घ्या.
लसूण सोनेरी-तांबूस रंगावर परतल्यावर त्यात उभे चिरलेले कांदे घालून लालसर रंगावर परतावे.
थोडे गार झाले की खसखस, तीळ, सुके खोबरे, परतलेले कांदा+लसूण एकत्र करून, थोडे पाणी घालून वाटून घ्या.
जाड बुडाच्या पातेल्यात किंवा नॉन-स्टीक भांड्यात ४ टेस्पून तेल गरम करावे व त्यात आले+लसूण ठेचा घालून परता.
खमंग परतले की त्यात वरील वाटण घाला.
त्यात लाल तिखट, हळद, कांदा-लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता.
आता त्यात चिकनचे तुकडे व मीठ घालून परता व गरजेनुसार पाणी घालून, झाकून उकळी आणा.
चिकन शिजले की वरुन थोडी कोथींबीर घाला.
झणझणीत सातारी कोंबडी गरमा-गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा.
नोटः
मुळ पाककृतीत एक किलो कोंबडीचे प्रमाण दिले आहे
मी अर्धा किलोच्या व आमच्या आवडीप्रमाणे प्रमाण बसवले आहे.
मुळ पाककृतीत आल्याचा वापर अजिबात नव्हता, मी आले घातले, चांगले लागले.
लसणाचा वापर जास्तं आहे पण इथे मिळणारे लसून मोठं असतं म्हणून पाकळ्या त्याप्रमाणे घेतल्या आहेत, तुम्ही जास्तं घेऊ शकता.
कांदा-लसूण मसल्यात ही मिरच्या व इतर मसाले असल्यामुळे तो तसा झणझणीत असतो, म्हणून घालताना आवडीप्रमाणे कमी-जास्तं घालावे.
पाकृ:
एका पॅनमध्ये तीळ, खसखस व सुके खोबरे कोरडेच सोनेरी रंगावर भाजून घ्या.
भाजलेले जिन्नस वेगळ्या ताटलीत काढून घ्या.
पॅनमध्ये १ टेस्पून तेल घालून ३ लसूण पाकळ्या परतून घ्या.
लसूण सोनेरी-तांबूस रंगावर परतल्यावर त्यात उभे चिरलेले कांदे घालून लालसर रंगावर परतावे.
थोडे गार झाले की खसखस, तीळ, सुके खोबरे, परतलेले कांदा+लसूण एकत्र करून, थोडे पाणी घालून वाटून घ्या.
जाड बुडाच्या पातेल्यात किंवा नॉन-स्टीक भांड्यात ४ टेस्पून तेल गरम करावे व त्यात आले+लसूण ठेचा घालून परता.
खमंग परतले की त्यात वरील वाटण घाला.
त्यात लाल तिखट, हळद, कांदा-लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता.
आता त्यात चिकनचे तुकडे व मीठ घालून परता व गरजेनुसार पाणी घालून, झाकून उकळी आणा.
चिकन शिजले की वरुन थोडी कोथींबीर घाला.
झणझणीत सातारी कोंबडी गरमा-गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा.
वाचने
25389
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
मार डाला टाईपचे फोटो आहेत!
भन्नाट.... शेवटचा फोटो तर
काय फोटो आहेत राव!
हेच!!
In reply to काय फोटो आहेत राव! by पैसा
भाकरी चे अनेकवचन 'भाकरी'च आहे
In reply to हेच!! by तुषार काळभोर
असहमत. भाकरीचे अनेकवचन भाकर्
In reply to भाकरी चे अनेकवचन 'भाकरी'च आहे by प्यारे१
पुण्यात भाकर्या म्हणतात पण
In reply to असहमत. भाकरीचे अनेकवचन भाकर् by llपुण्याचे पेशवेll
णीषेध!!!
In reply to पुण्यात भाकर्या म्हणतात पण by प्यारे१
काय म्हणावं फोटूला? भारी,
+ १
In reply to काय म्हणावं फोटूला? भारी, by रेवती
ह्या वीकांताला करूनच पाहतो.
३ टेस्पून कांदा-लसूण मसाला
मिळतो
In reply to ३ टेस्पून कांदा-लसूण मसाला by यशोधरा
अंबारी, प्रकाश चा मिळतो
In reply to मिळतो by पैसा
मग कसा बनवायचा तेही लिहा ना
In reply to अंबारी, प्रकाश चा मिळतो by सानिकास्वप्निल
हॅ हॅ ते आपले काम नाही
In reply to मग कसा बनवायचा तेही लिहा ना by यशोधरा
अग्गो!
In reply to हॅ हॅ ते आपले काम नाही by सानिकास्वप्निल
हुम्म्म्म
In reply to हॅ हॅ ते आपले काम नाही by सानिकास्वप्निल
यशो, तुला हवे असल्यास साहित्य
In reply to मग कसा बनवायचा तेही लिहा ना by यशोधरा
कोंबडीचे नव्हे हो, कांदा-लसूण
In reply to यशो, तुला हवे असल्यास साहित्य by सस्नेह
कर कर.
In reply to यशो, तुला हवे असल्यास साहित्य by सस्नेह
इथे पाहते मिळतो का ते.
In reply to मिळतो by पैसा
कांदा-लसूण मसाल्याची (गावराण)
In reply to इथे पाहते मिळतो का ते. by यशोधरा
लिहा पटकन
In reply to कांदा-लसूण मसाल्याची (गावराण) by स्मिता चौगुले
कांदा लसूण मसाल्याच्या
In reply to लिहा पटकन by यशोधरा
थ्यांक्यू! :)
In reply to कांदा लसूण मसाल्याच्या by स्मिता चौगुले
..
In reply to थ्यांक्यू! :) by यशोधरा
अय्या
In reply to मिळतो by पैसा
खल्लास,,,,,,,,,,,,,,,,
जय हो.
खप्लोय
घरात कांदा-लसुण मसाला आहेच...
ठ्ठोओओ
कोंबडी तर उत्तम झाली आहेच पण
किलर!
काहीच्या काही किलर फोटो टाकू
खतरनाक.
रस्सा अस्सा मस्स्त दिस्सतो
सदेह वैकुंठवारी!
एकदम बरोबर.
In reply to सदेह वैकुंठवारी! by धमाल मुलगा
मस्त झणझणीत दिसतेय कोंबडी.
अगायायाया
झकास्स्स्स्स्स्....कोंबडी
हायला...
मी
निव्वळ लाजवाब
आहा
मी पण सातारची ... :)
शेवटचा फोटो
वाह !
मस्त पाकृ आणि सादरीकरण
सुरीला खाना
झक्कास !!
शेवटचा फोटो अशक्य आहे...
झणझणीत सातारी कोंबडी
पोस्ट चा विषय वाचल्यावर पोस्ट
सानिका ऑनलाईन कुकींग कोर्स
फोटो पाहून जीव वेडापिसा झाला.
मस्त
.....................
अहा...........कातिल दिसतेय
तुमची हि पाकृ फेसबूक वर वाचली
मुख त्स्युनामी!!!!
उत्कृष्ट व उपयुक्त धागा!