मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वळवथेंब

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एक थेंब वळवाचा अंकुर पुन्हा उजवेल खपलीखालच्या वळणापाशी नवा श्रावण हिरवळेल पाउलवाटांचं काय पाऊल पडेल तिथे वाट सापडेल अवखळ खळखळणारं पाणी ओंजळीत साकळेल आकाशही मावेल मग त्यात रुसलेलं गावेल निर्व्याज पावेल मावळतीच्या संध्येकाठी चंद्र चांदणं हसेल ..................अज्ञात

वाचने 2894 वाचनखूण प्रतिक्रिया 19

स्पंदना Sat, 09/01/2012 - 07:26
क्या बात है। रुसलेलं गावेल निर्व्याज पावेल मावळतीच्या संध्येकाठी चंद्र चांदणं हसेल अंहं?

ज्ञानराम Sun, 09/02/2012 - 10:04
अप्रतिम कविता.... ...>>>क्कार धाग्यांमध्ये उठून दिसणारे काव्य. अज्ञातकुल यांच्या अश्याच सुंदर सुंदर कविता वरचेवर वाचायला मिळोत. सहमत.

आदूबाळ Tue, 03/05/2013 - 21:19
व्वा! "वळवथेंब" हा शब्दच मनोहारी आहे.
पाउलवाटांचं काय पाऊल पडेल तिथे वाट सापडेल
क्या बात! पण...
रुसलेलं गावेल
हा शब्द काव्याच्या इतर शब्दसंपदेशी फटकून राहिला आहे असं वाटतं...