वळवथेंब
लेखनविषय:
काव्यरस
एक थेंब वळवाचा
अंकुर पुन्हा उजवेल
खपलीखालच्या वळणापाशी
नवा श्रावण हिरवळेल
पाउलवाटांचं काय
पाऊल पडेल तिथे वाट सापडेल
अवखळ खळखळणारं पाणी
ओंजळीत साकळेल
आकाशही मावेल मग त्यात
रुसलेलं गावेल
निर्व्याज पावेल
मावळतीच्या संध्येकाठी
चंद्र चांदणं हसेल
..................अज्ञात
वाचने
2895
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
अप्रतिम!
कविता आवडली!
क्या बात है।
रुसलेलं गावेल
निर्व्याज पावेल
मावळतीच्या संध्येकाठी
चंद्र चांदणं हसेल
अंहं?
मस्त ,झक्कास... :)
मस्त
आवडली कविता.
कविता आवडली
टुक्कार धाग्यांमध्ये उठून दिसणारे काव्य. अज्ञातकुल यांच्या अश्याच सुंदर सुंदर कविता वरचेवर वाचायला मिळोत. :)
क्या बात है ! सुन्दर ! आवडली कविता ! ! !
अप्रतिम कविता....
...>>>क्कार धाग्यांमध्ये उठून दिसणारे काव्य. अज्ञातकुल यांच्या अश्याच सुंदर सुंदर कविता वरचेवर वाचायला मिळोत.
सहमत.
छान आहे कविता.
छान. :)
मस्त !!
मस्त!आवडली!
रुसलेलं गावेल निर्व्याज पावेल मावळतीच्या संध्येकाठी चंद्र चांदणं हसेलक्या बात है|
व्वा! "वळवथेंब" हा शब्दच मनोहारी आहे.
पाउलवाटांचं काय पाऊल पडेल तिथे वाट सापडेलक्या बात! पण...
रुसलेलं गावेलहा शब्द काव्याच्या इतर शब्दसंपदेशी फटकून राहिला आहे असं वाटतं...
अप्रतिम...
खूपच आशादायी.
छान
फारच सुंदर आहे रचना... परत परत वाचतेय.. गार गार वाटतय. :)
अप्रतिम!