शोधू किती बहाणे...
लेखनविषय:
काव्यरस
आधार टाळण्याचे, शोधू किती बहाणे
एकांत पाळण्याचे, शोधू किती बहाणे
शिशिरात मोग-याचा, फुलला इथे फुलोरा
गजरा न माळण्याचे, शोधू किती बहाणे
ती भेट त्या दिसांची, रात्रीस ओढ देते
विरहास भाळण्याचे, शोधू किती बहाणे
देहात जागणा-या, वणव्यात आग आहे
इच्छांस जाळण्याचे, शोधू किती बहाणे
ही ओल पावसाची, स्वप्नास स्पर्शणारी
नक्षत्र गाळण्याचे, शोधू किती बहाणे
आशा जरी न होती, ना नांदते निराशा
आनंद चाळण्याचे, शोधू किती बहाणे
संध्या
२९.१२.२०१२
वाचने
6158
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
छान कविता ..आवडलि
अप्रतिम
साद घातली कवीने त्याला प्रतिसाद देण्यासाठी शोधु किती बहाणे !
सुप्पर लाइक.... :-)
अवांतर- (चाल दिलेली ती हीच रचना ना?.. )
अआ
नाही नाही. ती जुनीच आहे. ही इतक्यातच सुचली. वृत्त सेम असल्याने वाटत असेल. :)
सर्वांचे आभार.
In reply to अआ by सांजसंध्या
कविता आवडली.
ती चाल दिलेली रचना पण येऊ देत.
आधीची सुरांत बांधलेली गझल कोणती ते माहीत नाही, पण हीदेखील गेय आहे, शब्दरचना आवडलीच.
मस्तच्गं ! :)
अप्रतिम
सुंदर ! :)
छान !! असं काही काव्य विभागात पाह्यलं की बरं वाटतं. नाहीतर बेचव जिलब्या पडतच असतात रोज.
In reply to छान !! by सूड
मग तुम्ही पाडा की कायतरी चवदार.
खतरनाक कच्चा माल आहे कविता, हात शिवशिव करत आहेत पण आवरते घेतो ;)
In reply to खतरनाक कच्चा माल आहे कविता, by सुहास..
विडंबनासाठी ना ? नेकी और पूछ पूछ :)
सुरेख गुम्फ्लीये गझल
सर्वांचे मनापासून आभार.
काहीतरी छान छान आहे खरंतर पण मला काही अर्थबोध होईना...(कोण रे तो दगड म्हणतोय?)
हे म्हणजे फुल्टु चानस आहे पण मी लांब लांब पळत आहे असं काहीसं आहे का???? का उलटं काही आहे???
कुणीतरी ज्येष्ठ उचकटून सांगेल काय?
In reply to काहीतरी छान छान आहे खरंतर पण by प्यारे१
कवितेमधे धडा कुठून आला हा? :D
असो. कविता छान आहे!
In reply to छ्या: by पैसा
तुला ग-धडा म्हणायचंय का पैसा 'ताई'???
:)
In reply to तुला ग-धडा म्हणायचंय का पैसा by प्यारे१
मी ताई का? म्हणजे काही बोलायची सोयच नाही! तरी ते बाकी सगळं सिंहगड रोड-धायरी-चिंचवड साहित्य संघवाले म्हणतीलच! काळजी नको.
In reply to वा रे वा! by पैसा
आणि धडा म्हणले की प्रश्न पण आले, हल्ली आम्ही विडंबकसंघाचा राजीनामा देउन नवनितपेक्षित्संघ पकडलेला आहे.
In reply to वा रे वा! by पैसा
तरी ते बाकी सगळं सिंहगड रोड-धायरी-चिंचवड साहित्य संघवाले म्हणतीलच! काळजी नको.ओ ताई... सिंहगड रोड-धायरी-चिंचवड साहित्य संघवाले दिसेल त्या कवितेचे विडंबन पाडत नाहीत बर्र का! तस्मात् आमच्या संघाला उगाच आव्हान देवू नये, नतीजा तुम्ही पाहिला आहेच. कळ्ळे? ;-)
एक मन निराशेने व्याप्त आहे.आशादायी काही घडत असतानाही त्या मनाची ओढ मात्र भलतीकडेच आहे. पण.... अखेर त्याचे त्यालाच उमगते की सगळेच काही बिघडलेले नाही.
संध्येस सांगतो मी, येईल पुन्हा प्रकाश
अंधार टाळण्याचे शोधू किती बहाणे
गजल पुषकळ्शी जमलीय ! सुप्पर डुप्पर लाईक !
आवडली.
छान :)
कविता आवडली.
आवडली.
उत्तम वृत्तबद्ध रचना. आशयाबरोबरच फॉर्मदेखील मस्त जमलाय.
खूप आवडली. तूमचा ब्लॉग आहे का? तूमचे अजून लेखन वाचायला आवडेल.
गजल हा तुमचा Forte दिसतोय. मस्त गजल लिहिता तुम्ही.
सर्वांचे आभार. मीनल थँक्स. लिंक देईन मी :)
आवडली
छान कविता ..आवडलि