शोधू किती बहाणे...

सांजसंध्या जे न देखे रवी...
आधार टाळण्याचे, शोधू किती बहाणे एकांत पाळण्याचे, शोधू किती बहाणे शिशिरात मोग-याचा, फुलला इथे फुलोरा गजरा न माळण्याचे, शोधू किती बहाणे ती भेट त्या दिसांची, रात्रीस ओढ देते विरहास भाळण्याचे, शोधू किती बहाणे देहात जागणा-या, वणव्यात आग आहे इच्छांस जाळण्याचे, शोधू किती बहाणे ही ओल पावसाची, स्वप्नास स्पर्शणारी नक्षत्र गाळण्याचे, शोधू किती बहाणे आशा जरी न होती, ना नांदते निराशा आनंद चाळण्याचे, शोधू किती बहाणे संध्या २९.१२.२०१२
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

31 टिप्पण्या 6,158 दृश्ये

Comments

लीलाधर नवीन

अप्रतिम साद घातली कवीने त्याला प्रतिसाद देण्यासाठी शोधु किती बहाणे !

सांजसंध्या नवीन

अआ नाही नाही. ती जुनीच आहे. ही इतक्यातच सुचली. वृत्त सेम असल्याने वाटत असेल. :) सर्वांचे आभार.

बहुगुणी नवीन

आधीची सुरांत बांधलेली गझल कोणती ते माहीत नाही, पण हीदेखील गेय आहे, शब्दरचना आवडलीच.

सूड नवीन

छान !! असं काही काव्य विभागात पाह्यलं की बरं वाटतं. नाहीतर बेचव जिलब्या पडतच असतात रोज.

प्यारे१ नवीन

काहीतरी छान छान आहे खरंतर पण मला काही अर्थबोध होईना...(कोण रे तो दगड म्हणतोय?) हे म्हणजे फुल्टु चानस आहे पण मी लांब लांब पळत आहे असं काहीसं आहे का???? का उलटं काही आहे??? कुणीतरी ज्येष्ठ उचकटून सांगेल काय?

पैसा नवीन

In reply to by प्यारे१

मी ताई का? म्हणजे काही बोलायची सोयच नाही! तरी ते बाकी सगळं सिंहगड रोड-धायरी-चिंचवड साहित्य संघवाले म्हणतीलच! काळजी नको.

मोदक नवीन

In reply to by पैसा

तरी ते बाकी सगळं सिंहगड रोड-धायरी-चिंचवड साहित्य संघवाले म्हणतीलच! काळजी नको.
ओ ताई... सिंहगड रोड-धायरी-चिंचवड साहित्य संघवाले दिसेल त्या कवितेचे विडंबन पाडत नाहीत बर्र का! तस्मात् आमच्या संघाला उगाच आव्हान देवू नये, नतीजा तुम्ही पाहिला आहेच. कळ्ळे? ;-)

चौकटराजा नवीन

एक मन निराशेने व्याप्त आहे.आशादायी काही घडत असतानाही त्या मनाची ओढ मात्र भलतीकडेच आहे. पण.... अखेर त्याचे त्यालाच उमगते की सगळेच काही बिघडलेले नाही. संध्येस सांगतो मी, येईल पुन्हा प्रकाश अंधार टाळण्याचे शोधू किती बहाणे गजल पुषकळ्शी जमलीय ! सुप्पर डुप्पर लाईक !

मीनल नवीन

खूप आवडली. तूमचा ब्लॉग आहे का? तूमचे अजून लेखन वाचायला आवडेल.