शोधू किती बहाणे...
लेखनविषय:
काव्यरस
आधार टाळण्याचे, शोधू किती बहाणे
एकांत पाळण्याचे, शोधू किती बहाणे
शिशिरात मोग-याचा, फुलला इथे फुलोरा
गजरा न माळण्याचे, शोधू किती बहाणे
ती भेट त्या दिसांची, रात्रीस ओढ देते
विरहास भाळण्याचे, शोधू किती बहाणे
देहात जागणा-या, वणव्यात आग आहे
इच्छांस जाळण्याचे, शोधू किती बहाणे
ही ओल पावसाची, स्वप्नास स्पर्शणारी
नक्षत्र गाळण्याचे, शोधू किती बहाणे
आशा जरी न होती, ना नांदते निराशा
आनंद चाळण्याचे, शोधू किती बहाणे
संध्या
२९.१२.२०१२
वाचने
6154
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
छान कविता ..आवडलि
सुंदर
सुप्पर लाइक....
अआ
In reply to अआ by सांजसंध्या
कविता आवडली.
फारच सुंदर!
मस्तच्गं !
अप्रतिम
सुंदर !
छान !!
In reply to छान !! by सूड
मग तुम्ही पाडा की कायतरी
खतरनाक कच्चा माल आहे कविता,
In reply to खतरनाक कच्चा माल आहे कविता, by सुहास..
विडंबनासाठी ना ? नेकी और पूछ
सुरेख गुम्फ्लीये गझल
सर्वांचे मनापासून आभार.
काहीतरी छान छान आहे खरंतर पण
In reply to काहीतरी छान छान आहे खरंतर पण by प्यारे१
छ्या:
In reply to छ्या: by पैसा
तुला ग-धडा म्हणायचंय का पैसा
In reply to तुला ग-धडा म्हणायचंय का पैसा by प्यारे१
वा रे वा!
In reply to वा रे वा! by पैसा
आणि धडा म्हणले की प्रश्न पण
In reply to वा रे वा! by पैसा
हॅ हॅ हॅ....
मी अर्थ असा घेतला...
आवडली.
छान
आवडेश!
चांगली आहे रचना
उत्तम वृत्तबद्ध रचना.
सुंदर
गजल हा तुमचा Forte दिसतोय.
सर्वांचे आभार. मीनल थँक्स.
मस्त मस्त मस्त