मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अ‍ॅप)

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
1 Feb 2012 - 12:57 pm

नमस्कार,

सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अ‍ॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अ‍ॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील.

मिपा अ‍ॅप हे अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल.
अ‍ॅपचा पत्ता - https://market.android.com/search?q=Misalpav

हे अ‍ॅप मोफत आहे हे वेगळे सांगायची गरज नाही ;)

तसेच सोबत क्युआर कोड देत आहे.

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहे. या प्रतिक्रियांमुळे पुढील विकासकामास गती येईल.

धन्यवाद.
- नीलकांत

तंत्रप्रकटनशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

मस्त रे नीलकांता.... आता आधी देवनागरी फाँट टाकतो माझ्या फोन वर.. :)

या नव्या पावलासाठी आपले हार्दिक अभिनंदन !!
चला, अ‍ॅन्ड्रॉईड फोन घ्‍यायला आणखी एक सबळ कारण मिळाले.

मी-सौरभ's picture

1 Feb 2012 - 1:17 pm | मी-सौरभ

सहमत

मोहनराव's picture

1 Feb 2012 - 1:52 pm | मोहनराव

हेच म्हणतो.

सुहास झेले's picture

1 Feb 2012 - 2:43 pm | सुहास झेले

ह्येच म्हणतो.... मनापासून अभिनंदन मालक !!!

गणपा's picture

1 Feb 2012 - 1:05 pm | गणपा

उत्तम.

पण गरीबाकडं अ‍ॅन्ड्रॉईड फोन नसल्यानं चेकवता येणार नाही.

पुढील कार्यास शुभेच्छा. !!!

नगरीनिरंजन's picture

1 Feb 2012 - 1:12 pm | नगरीनिरंजन

असेच म्हणतो.

शुभेच्छा! पुढेमागे घेतला तर मिपावर १६ तास पडीक राहू.

चिंतामणी's picture

1 Feb 2012 - 2:34 pm | चिंतामणी

शुभेच्छा

चिंतामणी's picture

1 Feb 2012 - 2:34 pm | चिंतामणी

शुभेच्छा

रेवती's picture

1 Feb 2012 - 9:10 pm | रेवती

प्रतिसादाशी सहमत.

प्रचेतस's picture

1 Feb 2012 - 1:07 pm | प्रचेतस

मिपाचे अँड्रोईड अ‍ॅप १५ दिवसांपूर्वीच उतरवून घेतले होते. मस्त चालतेय. वेग पण मस्त आहे. पण काहीवेळा एखादा धागा लोड होत असताना झूम करायचा प्रयत्न केला तर क्रॅश होते.
मराठी टाईप करताना एकाच स्ट्रोक मध्ये केले तर व्यवस्थित टाईप होते. बॅक केलं की मग फाँट्स नाचायला लागतात. :)

मराठी टाईप करताना एकाच स्ट्रोक मध्ये केले तर व्यवस्थित टाईप होते. बॅक केलं की मग फाँट्स नाचायला लागतात.

अस नाय कराचं. तुमचा स्ट्रोक सुधारावा म्हणुन मुद्दाम ती सोय ठेवली असावी. सारख बॅक करावच का? अश्यानं तुमचं टंकलेखन सुधारणार कसं?

सरस प्रतिसाद सर्वांनी हलक्यानेच घ्यावा. ;)

मी-सौरभ's picture

1 Feb 2012 - 1:24 pm | मी-सौरभ

अश्या वेळि परत टायपायच्या आधी स्पेस टंकून बघ.. ही अडचण कदाचित येणार नाही.

प्रचेतस's picture

1 Feb 2012 - 1:26 pm | प्रचेतस

खी खी खी.
आमचा स्ट्रोक चांगलाच आहे हो. पण नवागतांकडं पण पाह्यला हवं की कुणीतरी. ;)

मिपाचे अँड्रोईड अ‍ॅप १५ दिवसांपूर्वीच उतरवून घेतले होते. मस्त चालतेय. वेग पण मस्त आहे. पण काहीवेळा एखादा धागा लोड होत असताना झूम करायचा प्रयत्न केला तर क्रॅश होते.

अगदी अगदी..

अँड्रॉईडफोनच्या नॉर्मल ब्राउझरमधे हे सर्व दोष आहेत आणि अ‍ॅपमधेही..

ब्राउझर फारच वरचेवर क्रॅश होतो. अ‍ॅप मात्र जास्त क्रॅश झाले नाही आत्तापर्यंतच्या वापरात तरी
..पण अ‍ॅपमधे काय किंवा ब्राउझरात काय.. टायपिंगचा घोळ भरपूर आहे. टाईप करताच येऊ नये इतका.. मला वाटतं गूगल क्रोम हा अँड्रॉईडमधला डिफॉल्ट ब्राउझर असावा आणि त्यात गमभन रन होताना हे घोळ होत असावेत.

अगदी एका स्ट्रोकमधे अचूक टाईप केलं तरी मधेच डबल डबल अक्षरं यायला लागतात, ती सुधारायला गेलं की सगळा कंटेंट डबल होऊन पेस्ट होतो.. मग ते डुप्लिकेशन डीलीट करायला गेलं की शब्द एकमेकांना चिकटतात..

उदा. म्हणून यापुढील कॉमेंट इथेच मोबाईल अ‍ॅपवरुन टाकतो.. (क्रॅश न होता ब्राउझर किंवा अ‍ॅप दोन मिनिटे राहिले तर.. : ) )

अगदी अगदीआआआअ‍ॅड्रॉईडच्या नॉर्मल ब्राउझरमधे हे दोष आहेआनिणिअअ‍ॅपमधे देखील
क्रॅशस मातझाल्क्लेननाही अ‍ॅआआत्तापर्त्यंतच्या वापरात तरी.

असो.. बास्सआआता.

प्रचेतस's picture

1 Feb 2012 - 1:40 pm | प्रचेतस

येस. अगदी असेच फाँट नाचतात.

प्रशांत's picture

1 Feb 2012 - 1:57 pm | प्रशांत

Samsung Galaxy Y S5360 वर अ‍ॅप एकदम मस्त चालते.
मी १५ दिवसापासुन वापरत आहे अजुन एकदाहि क्रॅश झाले नाहि शिवाय लिहायला आणि वाचायला काहिच अडचण नाहि.

पैसा's picture

1 Feb 2012 - 2:07 pm | पैसा

मी पण Samsung Galaxy Y S5360 वर वापरतेय. काही प्रॉब्लेम नाही. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे धमालराव बारामतीकरांनी लिंक दिलेला anysoft keyboard आणि devnagari for anysoft keyboard ही २ apps download करा. मी आरामात लॉगिन करून प्रतिक्रिया सुद्धा देते आहे.

गणपा आणि इतर "गरीब" लोकांसाठी खास सूचना! Samsung Galaxy Y S5360 रु ७०००/- च्या आसपास, तर सर्वात स्वस्त Android phone ३५००/- पासून उपलब्ध आहेत. कसली वाट बघताय?

अहो, एखाद्या मॉडेलवर नीट चालतात फाँट्स असं असलं तरी आधीच असलेले फोन तेवढ्यासाठी कसे बदलणार.

सहा महिन्यांपूर्वी घेतलेला सॅमसंग गॅलेक्सी प्रो आहे. त्यावर फ्रोयो आहे बहुधा..

इन दॅट केस, तुमच्या फोनवर ओ.एस. ची नवी एडिशन असेल आणि ओ.एस.च्या नव्या एडिशनमधे टाईपिंग चुकत नसावे असे म्हणता येईल..

पण टायपिंगचे हे जंबल "क्रोम"बाबत पी.सी आणि डेस्कटॉपवरसुद्धा होते असं ऐकलं आहे.. मग ठराविक फोनच्या मॉडेल/मेकने कसा सुटेल प्रश्न??

प्रचेतस's picture

1 Feb 2012 - 2:19 pm | प्रचेतस

एनीसॉफ्ट कीबॉर्डने व्यवस्थित टाइपता येते. पण ब्राऊझर मध्ये फाँट्स नाचतातच. माझी जिंजरब्रेड २.३.५ आहे. क्रोम गमभनशी वाकडं वागतो हे मात्र खरे.

पैसा's picture

1 Feb 2012 - 2:23 pm | पैसा

ते "आम्ही गरीब"म्हणणार्‍या गणपासाठी स्पेश्शल होतं! टायपिंग जंबल डेस्कटॉपवर पण होतं हे खरंय. तुम्ही बॅकस्पेस वापरलंत तर वाट लागली.

पण गॅलेक्सीवर फॉण्ट नीट येतात याचं कारण फोनच्या सॉफ्टवेअरमधे नसावं तर तर 'एनीसॉफ्ट कीबोर्ड'मधे असावं बहुतेक. मी एनीसॉफ्ट कीबोर्डचा चक्क मराठी कीबोर्ड वापरते. इंग्लिश कीबोर्ड वापरताना काय वाटेल ते टाईप होऊन येतं. :D तुम्हीही एनीसॉफ्ट कीबोर्ड वापरून बघा.

ते एनीसॉफ्ट बर्‍याचदा पुन्हापुन्हा इन्स्टॉल केलं पण फ्रोयोमधे चालत नाही असं दिसतंय.. :(

ओ.एस. अपग्रेड करण्यात रिस्क आहे असं ऐकतो.. वॉरंटीही जाते म्हणे.. आणि अपग्रेड केल्यावर इतर नीट चालणार्‍या अ‍ॅप्समधे किंवा मेन्यूमधे काय घोळ सुरु होतील सांगता येत नाही.

गविशेठ अँड्रॉईड ओएस अपग्रेड करताना रुटिंग करावे लागते, ज्यामुळे फोनची वॉरंटी जाते. तेव्हा १ वर्ष संपल्यावर ओएस अपग्रेड करायचा विचार करा.

- (रुटींगवाला) पिंगू

धमाल मुलगा's picture

4 Feb 2012 - 1:20 pm | धमाल मुलगा

ओएस, फर्मवेअर अपग्रेड करण्यासाठी रुटिंग केलंच पाहिजे असं नाही. अ‍ॅन्ड्रॉईडची हीच तर खरी मजा आहे. एकच काम वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतं.

गविशेठ,
तुमच्या सॅमसंग गॅलेक्सी प्रो साठी रुट न करता फ्रोयोवरुन जिंजरब्रेडला नेण्यासाठी इथल्या गाईडाचा वापर करु शकता.

अपग्रेड करताना घ्यायची काळजी :

  • फोनची बॅटरी १००% चार्ज करुन घेणे.
  • आवश्यक गोष्टींचा पुर्ण बॅकअप घेणे. (फर्मवेअर्/ओएस अपग्रेडनंतर फोन फॅक्टरी सेटिंग्जना रिसेट होतो.)
  • फोनचे USB tethering चालू आहे ह्याची खात्री करुन घेणे.
  • मेमरी कार्ड, सिमकार्ड काढून घेणे.
  • ज्या काँप्युटरचा वापर करुन हे काम करायचे आहे,तो कॉम्प्युटर मध्येच बंद पडला तर फोन फ्राय झालाच समजा. त्यामुळे भारनियमनाच्या वेळा टाळून्/इन्व्हर्टर/युपीएस लाऊन काम करणे.

ह्याप्पी अपग्रेडींग :)

-(अनरुटेड) ध मा ल.

चिंतामणी's picture

4 Feb 2012 - 3:19 pm | चिंतामणी

कॉलींगला उशीरा का होईना प्रतिसाद दिल्याबद्दल आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल.

जाई.'s picture

1 Feb 2012 - 1:16 pm | जाई.

अभिनंदन

बबलु's picture

1 Feb 2012 - 1:18 pm | बबलु

चांगली बातमी. माझ्या अ‍ॅन्ड्रॉईड device वर डाउनलोड करतो आणि अभिप्राय कळवितो.

बाकी... iOS वर मिपा अ‍ॅप कधी येणार ? (iPhone वर मिपा वाचण्यास उत्सुक).

निखिल देशपांडे's picture

1 Feb 2012 - 1:18 pm | निखिल देशपांडे

अभिनंदन मालक आणी धन्यवाद
मिपाचे अ‍ॅक साधारण १५ दिवसांपुर्वी उतरवुन घेतले...
मला अ‍ॅप्लीकेशन मधेही कस्टम वेब व्हु मधे पेज लोड केलेले दिसते. ब्राउझर प्रमाणेच पुर्ण पेज दिसते. खरेतर हा अ‍ॅप म्हणजे एक प्रकारचे कस्टम ब्राउझर झाले आहे. मला तरी ब्राउझर पेक्षा अ‍ॅप वापरण्याचे फायदे कळले नाहीत. कुणी समजावुन सांगेल का???

माझ्या मिपाच्या अ‍ॅप कडुन अपेक्षा खालील प्रमाणे होत्या.
१. यु आय चा भाग अ‍ॅप्लीकेशन मधे म्हणजेच दर वेळेस पेज लोड करताना फक्त नोड रिलेटेड डेटा मोबाईल वर येणे.

२. मिपाचा फॉन्ट् अ‍ॅप मधे एंम्बेड करणे.. याने जा मोबाईल वर मराठी फॉन्ट नाहीत तिथे पण मिपा वाचता आले पाहिजे. याचे उदाहरण म्हणजे न्युज हंट नावाचे अ‍ॅप्लिकेशन

३. लॉगीन करुन प्रतिसाद देण्याची सोय. माझ्या फोन वर मराठी फॉन्ट नंतर टाकल्यामुळे मला अ‍ॅप मधुनही लॉगीन करता आले नाहीच.

या सगळ्या गोष्टी मिपाच्या अ‍ॅप मधे पाहिला मिळोत आणि मिपा ची अशीच प्रगती होवो.

मला अ‍ॅप्लीकेशन मधेही कस्टम वेब व्हु मधे पेज लोड केलेले दिसते. ब्राउझर प्रमाणेच पुर्ण पेज दिसते. खरेतर हा अ‍ॅप म्हणजे एक प्रकारचे कस्टम ब्राउझर झाले आहे. मला तरी ब्राउझर पेक्षा अ‍ॅप वापरण्याचे फायदे कळले नाहीत. कुणी समजावुन सांगेल का???

हाच प्रश्न पडला होता.. बाकीचा पसारा टाळून वेगळ्या कॉम्पॅक्ट लेआउटमधे किमान आवश्यक गोष्टी लोड व्हाव्यात असं मोबाईल अ‍ॅप जास्त चांगलं वाटेल.

अर्थात ही सुरुवात आहे.. आणि स्वागतार्हच आहे..

फायदा म्हणजे एकाच क्लिक मध्ये मिपा उघडले जाते. ब्राऊझरमध्ये जाऊन परत अ‍ॅड्रेस टाका या भानगडी नाहीत.

प्रचेतस's picture

1 Feb 2012 - 1:32 pm | प्रचेतस

मिपाचे अ‍ॅप क्रोम बेस्ड असावे. पण जिथे मराठी फाँट नाहीत तिथेही वाचता येते. ऑपेरामध्ये चौकोन दिसतात, डॉल्फिनमध्ये व्यवस्थित दिसते.
शिवाय आपले लॉगिन करूनही प्रतिसाद देता येतात की.

धमाल मुलगा's picture

4 Feb 2012 - 2:08 pm | धमाल मुलगा

नेहमीप्रमाणे टेक्निकल अ‍ॅनलिस्ट देशपांडे ह्यांचे परफेक्ट मुद्दे! :)

मिपाचा फॉन्ट् अ‍ॅप मधे एंम्बेड करणे.. याने जा मोबाईल वर मराठी फॉन्ट नाहीत तिथे पण मिपा वाचता आले पाहिजे. याचे उदाहरण म्हणजे न्युज हंट नावाचे अ‍ॅप्लिकेशन

ही उत्तम सुचना आहे. केवळ वाचनमात्र असलेले खूप लोक आहेत त्यांना ह्याचा फायदा होईल.

निख्या,
पण फॉन्ट्स-पॅकमुळे अ‍ॅप कितपत हेवी होईल?
नॉन-रेसिडन्ट फॉन्ट्समुळे रेंडरिंगसाठी कितपत सिस्टिम रिसोर्सेस वापरले जातात?
अशा कॉनफिगमध्ये अ‍ॅप/फोन चा परफॉर्मन्स कसा असतो? कमी प्रोसेसिंगच्या चिप्सचे फोन्स हा लोड सहन करु शकतात का?
ह्याबद्दल काही माहिती मिळू शकेल का रे?

लॉगीन करुन प्रतिसाद देण्याची सोय. माझ्या फोन वर मराठी फॉन्ट नंतर टाकल्यामुळे मला अ‍ॅप मधुनही लॉगीन करता आले नाहीच.

हे कसं काय भो?
कोणता किबोर्ड वापरतोयस?

दादा कोंडके's picture

1 Feb 2012 - 1:36 pm | दादा कोंडके

विंडोजफोन असल्यामुळे (आणि पुढच्या ३-४ वर्षेतरी बदलण्याचा विचार नसल्यामुळे) उपयोग नाही.
आणि परवाच अपडेट केलेल्या ओएस मध्ये सुद्धा युनिकोद सपोर्ट करत नसल्यामुळे वाईत वाटलं.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Feb 2012 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार

विंडोजफोन असल्यामुळे (आणि पुढच्या ३-४ वर्षेतरी बदलण्याचा विचार नसल्यामुळे) उपयोग नाही.

+१

बाकी सकाळी एका मित्राच्या फोनवरती हे अ‍ॅप्लिकेशन ट्राय केले. मिपाच्या पेज खालती अ‍ॅप मध्ये काही जाहिराती बघून आश्चर्य वाटले. हे अ‍ॅप्लिकेशन 'फुकट पौष्टीक' बनवले आहे काय ? असल्यास हा त्याचा परिणाम आहे काय ? का ह्या जाहिरातींमागे काही वेगळे कारण आहे ? अर्थात एक उत्सुकता म्हणून हे प्रश्न विचारले आहेत, ह्याला जाब विचारणे वैग्रे समजू नये. :)

सदर अप्स महिन्याभरापूर्वीच उतरवलेले आहे
मालकांनंतर आमचीच प्रतिक्रिया तेथे पाहता येईल
धन्यवाद

जोशी 'ले''s picture

1 Feb 2012 - 2:00 pm | जोशी 'ले'

मी पण 15 दिवसां पुर्वि हे app. उतरवले या application मधे जर back आणि forward बटन जर system cache memory वापरुन देता आले तर अजुनही फास्ट होइल ...बाकि उपक्रम सुत्यच , हार्दिक शुभेच्छा :)

वाटाड्या...'s picture

1 Feb 2012 - 2:04 pm | वाटाड्या...

फारच छान ...
आपण सुद्धा आय टेक्नॉलॉजीपेक्षा अ‍ॅन्ड्रॉईडलाच पसंती देतो बुवा. नवीनच सॅमसंग गॅलॅक्सी एस - २ घेतलाय..त्यावर थोडे दिवस चालवुन पहातो...तोपर्यंत जागा धरुन ठेवतो.. ;)

- वा

जोशी 'ले''s picture

1 Feb 2012 - 2:15 pm | जोशी 'ले'

दोआप्रकाटा

यशोधरा's picture

1 Feb 2012 - 2:35 pm | यशोधरा

नीलकांत, अभिनंदन! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Feb 2012 - 2:49 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!!! अभिनंदन!

चिंतामणी's picture

1 Feb 2012 - 3:36 pm | चिंतामणी

कुठे आहेस रे तु??

अरे वा!! आभिनंदन...ह्या अ‍ॅप मागील टीम कळेल का? म्हणजे त्यांना व्यक्तिशः धन्यवाद देता येतील!!! :-)

प्रीत-मोहर's picture

1 Feb 2012 - 4:01 pm | प्रीत-मोहर

असच म्हणते.

मिपा अ‍ॅप टीमचे अभिनंदन आणि आभार.!!!

५० फक्त's picture

1 Feb 2012 - 4:10 pm | ५० फक्त

अभिनंदन, पण हे चेक करायला बराच वेळ लागेल, अजुनही विंडोज मधुन बाहेर वाकुन पाहिलेले नाही मी.

विसुनाना's picture

1 Feb 2012 - 4:26 pm | विसुनाना

मिपा अ‍ॅप उतरवून घेतो. पण एनीसॉफ्ट कीबोर्ड सरावाचा वाटत नाही. त्यापेक्षा होन्सो मल्टीलिंग( ;) !!!) कीबोर्ड बरा वाटतो.
गमभनचे अ‍ॅप करता येणार नाही का? त्याचा फोनेटिक कीबोर्ड सरावाचा आणि त्यामुळे सोपा झाला आहे.

विकास's picture

1 Feb 2012 - 7:35 pm | विकास

गमभनचे अ‍ॅप करता येणार नाही का?

अगदी असेच वाटते.

धमाल मुलगा's picture

4 Feb 2012 - 1:27 pm | धमाल मुलगा

गमभनचे तिर्थरुप ॐकारशास्त्री जोशीबुवांना साकडं घाला की. गडी केव्हाचा गायबच आहे. खरं म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईडची धूम उडाली असता अत्तापर्यंत गमभनचा किबोर्ड मार्केटात यायला हवा होता. ॐकार लैच्च कामात बुडालेला दिसतोय.

योगी९००'s picture

1 Feb 2012 - 4:35 pm | योगी९००

अभिनंदन..

मी galaxy tablet वर १० दिवसापुर्वी हे अ‍ॅप टाकले होते. एकदम व्यवस्थित चालले..

चांगला प्रयत्न आहे ...पण..खरे सांगायचे म्हणजे नॉर्मल मि.पा. पाहतोय असेच वाटले. browser मध्ये मिपा बघणे आणि हे अ‍ॅप वापरणे यात फरक कळला नाही.

कदाचित हे अ‍ॅप अजून evolve होत असावे असे वाटले म्हणून काहीच feedback दिला नाही.

रघु सावंत's picture

1 Feb 2012 - 5:14 pm | रघु सावंत

चला आता नविन पाऊल टाकूया

विकास's picture

1 Feb 2012 - 7:18 pm | विकास

चांगले पुढचे पाऊल!

मी एचटीसी इवो आणि तोशिबा टॅब्लेट मधे (दोन्ही अँड्रॉईड ३+) घालून पाहीले आणि चांगले दिसते. टंकताना कधी कधी सोपे जाते तर कधी कधी वर गवींनी/वल्लींनी म्हणल्यासारखे होते. तो प्रॉब्लेम मला फक्त मिपा अथवा या अ‍ॅपसंदर्भातच नाही तर एकंदरीतच क्रोमवर पण येतो आणि अँड्रॉईडवर पण येतो.

बाकी वर निखिलरावांच्या आणि इतरांच्या सुचना चांगल्या आहेत. त्याचा विचार होईल अशी आशा करतो. :-)

मराठे's picture

1 Feb 2012 - 9:32 pm | मराठे

चांगली सुरवात. अ‍ॅप डाउनलोडवले. (ड्रॉइड-२)
त्यातले फॉन्ट्स थोडे विचित्र दिसताहेत (पण निदान दिसत तरी आहेत. आधी ऑपेराशिवाय पर्याय नव्हता)
म्हणजे 'सदस्य' हा शब्द 'स द स् य' असं दिसतं त्यामुळे वाचताना थोडं विचित्र वाटतं.
आधी म्हंटल्याप्रमाणे चांगली 'सुरूवात' आहे. सुधारणेला बराच वाव आहे.

तुमची ओएस फ्रोयो असल्याने होत असावे हे कदाचित.
जिंजरब्रेडला एकदम व्यवस्थित दिसते. देवनागरी पॅक उतरवून बघा.

माझ्या अँड्रॉइड फोनवर युनिकोड नाही. हा अँड्रॉइड फोनचा (माझ्या मॉडेलचा - एच टी सी ईव्हो, स्प्रिंट सेवादाता-लॉक) सगळ्यात मोठा दोष आहे.

मी मराठी संकेतस्थळे "ऑपेरा मिनी"प्रणालीत वाचतो. यात संकेतस्थळे थेट दिसण्याऐवजी त्यांची प्रकाशचित्रे दाखवली जातात.

पाषाणभेद's picture

1 Feb 2012 - 10:27 pm | पाषाणभेद

लँडलाईन फोन माहित होते, वायरलेस फोन माहित होते, सेल फोन माहित होते, मोबाईल फोन माहित होते पण हे अ‍ॅन्ड्रॉईड फोन काय आहे? मी जर अ‍ॅन्ड्रॉईड खरेदी केले तर त्याबरोबर फोन मोफत भेटतो काय?

संस्कारभारती रांगोळी माहित होती, ठिपक्यांची रांगोळी माहित होती, चित्रकलेतील रांगोळी माहित होती पण ही क्युआर कोडची रांगोळी आज पहिल्यांदाच पाहीली. फारच छान कलाकारी आहे नीलकांताची.

मिपा तंत्रज्ञानात पुढे राहो या शुभेच्छा!

आताच उतरवुन घेतले आणि त्यतुनच हा प्रतिसाद देतोय..

---टुकुल

आता हा प्रतिसाद संगणकावरुन.. मि सॅमसंग गॅलेक्सी एस वापरत आहे आणि वर सर्वानी सांगितल्या प्रमाणे मला पण टंकताना त्रासच झाला. जरी असे असले तरी अ‍ॅप पहिल्यांदा पाहुन खुपच आनंद झाला आणी हि सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन.

--टुकुल.

निल्या१'s picture

2 Feb 2012 - 7:49 am | निल्या१

आय फोन चे अ‍ॅप आहे का?

विसोबा खेचर's picture

4 Feb 2012 - 11:40 am | विसोबा खेचर

समाधान वाटले.. नीलकांताचे आभार आणि मिपासाठी अनेकानेक शुभेच्छा..

(संस्थापक) तात्या.

धमाल मुलगा's picture

4 Feb 2012 - 1:59 pm | धमाल मुलगा

apk dev टीमचे अभिनंदन आणि आभार! :)

misalpav 1.0 हे अ‍ॅप म्हणजे मिपाने क्रॉस प्लॅटफॉर्म फंक्शनॅलिटीमध्ये उचललेलं एक उत्तम पाऊल आहे. दर वेळी मोबाईल ब्राऊझरमध्ये टंकायचं किंवा फेव्हरिट्समधून शोधून उघडायचं ह्याला आता फाटा मिळाला आहे. त्यामुळं माझ्यासारख्या आळशी लोकांची झकास सोय झालीए. :)

ह्या अ‍ॅपच्या पुढिल व्हर्जन्सकडून माझ्या अपेक्षा अशा असतील -

  • स्क्रीनफ्रेंडली :- फोन्सचे स्क्रिन हे कॉम्प्युटरच्या स्क्रिनच्या तुलनेत खूप छोटे असल्याने कमीत कमी जागेत वाचण्याइतपत माहिती/चित्रे इ. दृष्य व्हावे लागते. त्यामुळे पुर्ण 'नवे लेखन' हे पान लोड होण्याएवजी सर्वात वरचे ५-७ धागे दिसावेत आणि त्याखाली नेव्हिगेशनचे पुढे-मागे असे बटण्/लिक्स असाव्यात. थोडक्यात अ‍ॅपमध्ये 'नवे लेखन'चे पान साधारणतः ५-७ धाग्यांचे असावे
  • अ‍ॅक्सेसिबिलिटी :- अ‍ॅप उघडल्यानंतर नवे लेखन पान उघडते त्या पानाच्या हेडर्/फूटरमध्ये लॉगिन करण्याची सोय द्यावी. लॉगिन झाल्यानंतर येणारा मेन्यु जसे खरडवही, संदेश, नवे लेखन इत्यादींच्या लिंक्स हेडर/फुटरमध्ये याव्यात. जेणेकरुन उजवीकडे असलेल्या मेन्युमुळे अडणारी स्क्रीनची जागा वाचेल आणि धागा उघडल्यानंतर अधिक टेक्स्ट वाचायला मिळेल.
  • इनपुट फॉन्ट्स कंपॅटिबिलिटी :- अ‍ॅन्ड्रॉईडच्या मुळ ब्राऊझरमध्ये टंकनला होणारा घोळ पाहता, शक्य झाल्यास डॉल्फिन ब्राऊझरसारख्या ब्राऊझरशी अ‍ॅप संलग्न असावे. उदा. अ‍ॅपच्या कोडमध्ये डिफॉल्ट ब्राऊझर डॉल्फिन सेट करावा. होस्टिंग फोनवर डॉल्फिन नसल्यास तसे रेकमंडेशन वापरकर्त्याला द्यावे आणि जर डॉल्फिन नसेल तर डिफॉल्ट ब्राऊझर वापरुन अ‍ॅप चालावे अशी सोय ठेवावी.

-(UAT) ध मा ल. :)

आणि हो, आम्ही आपले वाटेल ते बोलून बसतो, लै टेन्शन घ्याचं न्हाई बरं भौ. जसं सवड मिळेल, जमंल तसं करा. हितं काय कुनाला गडबड न्हाई जी. :)

ब्येस काम करताय गड्यांहो! कवतिक वाटतं.

-(टेष्टरातून माणसात परत आलेला) धम्या. ;)