मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अ‍ॅप)

नीलकांत · · जनातलं, मनातलं
नमस्कार, सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अ‍ॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अ‍ॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील. मिपा अ‍ॅप हे अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल. अ‍ॅपचा पत्ता - https://market.android.com/search?q=Misalpav हे अ‍ॅप मोफत आहे हे वेगळे सांगायची गरज नाही ;) तसेच सोबत क्युआर कोड देत आहे. Image removed. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहे. या प्रतिक्रियांमुळे पुढील विकासकामास गती येईल. धन्यवाद. - नीलकांत

वाचन 9628 प्रतिक्रिया 0