गीतगुंजन - १२ : Black Or White -> Michael Jackson
लेखनप्रकार
संगीताच्या दुनियेत अनेक प्रतिभावान संगीतकार, गीतकार आणि गायक झालेत की ज्यांची खाजगी आयुष्य कशी का असेनात त्यांच्या संगीतावर आणि अदाकारीवर रसिकांनी आपला जीव ओवाळून टाकला आहे आणि अशा गंधर्वांचे - शापित गंधर्वांचे स्थान त्यांच्या मनात अढळ आहे. अशाच शापित गन्धर्वान्पैकी एक आहे 'किंग ऑफ पॉप' - 'मायकल जॅक्सन' अर्थात आपला 'एमजे'.
३-४ वर्षांच्या मायकलने आपल्या बहिण-भावांबरोबर संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर 'जॅक्सन ५' नावाचा ग्रूप तयार करून त्यात आपली अदाकारी दाखवू लागला. पण कुटुंबियांचा हा ग्रूप त्याच्या प्रतिभेसाठी अपुरा होता. जाणत्या वयात त्याने आपली स्वतंत्र वाट चोखाळली. १९८० च्या दशकापासून घोंगावणारं ही 'एमजे' नावाचं वादळ अखेर २००९ साली त्याच्या अकाली मृत्यूने शमलं.
'एमजे'ने दाखवलेल्या अदाकारीला संपूर्ण जगाने प्रणाम केलेला आहे. त्याचे आणि त्याच्या गाण्याचे, अदाकारीचे लाखो करोडो चाहते संपूर्ण दुनियाभर पसरलेले आहेत. शेवटी 'एमजे'ही एक माणूस होता आणि त्याच्याही हातून चुका झाल्या. त्याची गोर्या कातडीच्या आणि कॉकेशन चेहरेपट्टीच्या आकर्षणाची जगभरात खिल्ली उडवली गेली कारण यापायीच त्याने स्वत: वर अनेक कॉस्मेटिक शल्यकर्मे करून घेतली होती. त्याच्या या नादापायी त्याने दुर्लक्षिले की लोकांना तो त्याच्या प्रतिभेमुळे आणि अदाकारीमुळे आवडतोय, त्यांचं त्याच्या दिसण्याशी काहीही देणं घेणं नाहीये. तरी यामुळेच तो लोकापासून दुरावला. एकटेपणामुळे त्याला व्यसनं जडली. त्याने केलेली लग्नं नि त्याची मुलंही हे देखील त्याला त्याच्या एकटेपणापासून वाचवू शकली नाहीत. एका बाजूला जगभरातील लोकप्रियता आणि एका बाजूला एकटेपणा यांच्यात 'एमजे' पुरता पिचून गेला नि त्याचं वास्तवाचं भान सुटत गेलं.
अनेक गाणी आहेत 'एमजे'ची ज्यांना इथे स्थान नक्की मिळेल पण त्यातलं एक गाणं नक्कीच असेल - "Black or White".
वाचने
3549
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
पाश्चिमात्य संगीत आतापर्यंत फक्त मायकेल जॅक्सनचेच ऐकत आलोय. 'ब्लॅक ऑर व्हाईट' हे पुष्प तर या मालिकेत हवेच होते.
तुमच्या मालिकेतून जॅक्सनची अजूनही गाणी येतीलच. त्यांचीच आता वाट पाहात आहे.
झक्कास रे दादा.
एक मात्र वाटतं की गो-या कॉकेशियन स्किनचं आकर्षण आणि सर्जरी हे कितपत खरं कोण जाणे.
त्याला व्हिटिलिगो होता आणि पांढ-या धब्ब्यांची संख्या फ़ार झाल्यावर नाईलाजाने युनिफ़ॉर्म रंग म्हणून तो वरुन काही लावायचा असं वाचण्यात आलं आहे.
In reply to झक्कास रे दादा. एक मात्र by गवि
ओप्रा विन्फ्रेने घेतलेल्या त्याच्या मुलाखतीमध्ये तो हेच म्हणाला होता.
असं असूनही मला कॉकेशन चेहेरेपट्टी आणि वर्ण या दोन्हीबद्दल मायकलला प्रचंड आकर्षण, नव्हे ऑब्सेशन होतं असंच वाटतं. वर्ण कदाचित श्वेतकुष्ठाने (व्हिटिलिगो) त्याला मिळाला असेल तरी कॉकेशन चेहरेपट्टीचं आकर्षण नसतं तर त्याने चेहर्यावर इतक्या वेळेला कॉस्मॅटिक सर्जरीज का केल्या असत्या? ओठ पातळ करण्याच्या शस्त्रक्रिया, कपाळ उंच करण्याच्या शस्त्रक्रिया, हनुवटीला खळी पाडण्याची शस्त्रक्रिया, गालाच्या हाडांची नैसर्गिक ठेवण बदलण्याच्या शस्त्रक्रिया आणि किमान ३-४ वेळा र्हायनोप्लास्टीज् (नाकाची ठेवण बदलण्याच्या शस्त्रक्रिया) करण्यासाठी इतर कोणती कारणं असती? शिवाय त्याने श्वेतकुष्ठामुळे त्वचेत होणारे बदल संपूर्ण शरीरावर सारखे असावे यासाठीही खूप खर्चिक चिकित्सा केलेली आहे.
असो. मायकल कसाही दिसला तरी तो माझ्या आवडत्या कलाकारापैकी एक होता. त्याने, त्याच्या गाण्यांनी, संगीतानी आणि त्याच्या कलेच्या सादरीकरणानी मला प्रचंड आनंद दिलेला आहे. मी एमजेचा शेवटपर्यंत फॅन राहणार हे निश्चित!
नेमके हेच गाणे मी आज दुपारी डाऊनलोडवून ऐकले आणि संध्याकाळी तुमचा हा भाग आला.
हे बहुदा मी ऐकलेले पहिले इंग्रजी गाणे असेल. शब्द तर काही कळत नव्हते, पण धून खुप आवडली होती. धन्यवाद प्रास, लहानपणीच्या काही आठवणी जाग्या केल्याबद्दल :)
एम.जे. च हे एक माझ अतिशय आवडत गाण !
झोपन्याआधी एकदा तरी कानात हेड्फोन घालुन फुल्ल व्होल्युंम मध्ये एकणार म्हण्जे एकणार !
हे गाण पहायलादेखील आवड्त कारण यातल्या भारतीय न्रुत्यशैलीला match करुन छान स्टेप्स केलेल्या आहेत मायकी ने :)
वर अन्याने म्हट्ल्याप्रमाने गाण्यातले शब्द काही समजत नाही
पण प्रास तुम्ही lyrics दिल्यामुळे गाण्याचाही प्रयत्न करुच :) धन्यवाद.
मस्त