संगीताच्या दुनियेत अनेक प्रतिभावान संगीतकार, गीतकार आणि गायक झालेत की ज्यांची खाजगी आयुष्य कशी का असेनात त्यांच्या संगीतावर आणि अदाकारीवर रसिकांनी आपला जीव ओवाळून टाकला आहे आणि अशा गंधर्वांचे - शापित गंधर्वांचे स्थान त्यांच्या मनात अढळ आहे. अशाच शापित गन्धर्वान्पैकी एक आहे 'किंग ऑफ पॉप' - 'मायकल जॅक्सन' अर्थात आपला 'एमजे'.
३-४ वर्षांच्या मायकलने आपल्या बहिण-भावांबरोबर संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर 'जॅक्सन ५' नावाचा ग्रूप तयार करून त्यात आपली अदाकारी दाखवू लागला. पण कुटुंबियांचा हा ग्रूप त्याच्या प्रतिभेसाठी अपुरा होता. जाणत्या वयात त्याने आपली स्वतंत्र वाट चोखाळली. १९८० च्या दशकापासून घोंगावणारं ही 'एमजे' नावाचं वादळ अखेर २००९ साली त्याच्या अकाली मृत्यूने शमलं.
'एमजे'ने दाखवलेल्या अदाकारीला संपूर्ण जगाने प्रणाम केलेला आहे. त्याचे आणि त्याच्या गाण्याचे, अदाकारीचे लाखो करोडो चाहते संपूर्ण दुनियाभर पसरलेले आहेत. शेवटी 'एमजे'ही एक माणूस होता आणि त्याच्याही हातून चुका झाल्या. त्याची गोर्या कातडीच्या आणि कॉकेशन चेहरेपट्टीच्या आकर्षणाची जगभरात खिल्ली उडवली गेली कारण यापायीच त्याने स्वत: वर अनेक कॉस्मेटिक शल्यकर्मे करून घेतली होती. त्याच्या या नादापायी त्याने दुर्लक्षिले की लोकांना तो त्याच्या प्रतिभेमुळे आणि अदाकारीमुळे आवडतोय, त्यांचं त्याच्या दिसण्याशी काहीही देणं घेणं नाहीये. तरी यामुळेच तो लोकापासून दुरावला. एकटेपणामुळे त्याला व्यसनं जडली. त्याने केलेली लग्नं नि त्याची मुलंही हे देखील त्याला त्याच्या एकटेपणापासून वाचवू शकली नाहीत. एका बाजूला जगभरातील लोकप्रियता आणि एका बाजूला एकटेपणा यांच्यात 'एमजे' पुरता पिचून गेला नि त्याचं वास्तवाचं भान सुटत गेलं.
अनेक गाणी आहेत 'एमजे'ची ज्यांना इथे स्थान नक्की मिळेल पण त्यातलं एक गाणं नक्कीच असेल - "Black or White".
वाचने
3550
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
झक्कास रे दादा. एक मात्र
खरं आहे गवि.
In reply to झक्कास रे दादा. एक मात्र by गवि
नेमके हेच गाणे मी आज दुपारी
एम.जे. च हे एक माझ अतिशय आवडत