रविकर
लेखनविषय:
सकाळी सकाळी खिडकीतून येणारी
अवखळ तिरीप पापण्या चाळवते,
आणि दाखवून तुझी पाठमोरी आकृती
लगेच शिरते तुझ्या कुरळ्या केसांत.
न गुंतता तिथेच माझ्या बोटांसारखी
अलगद उतरते तुझ्या कानावरती.
चकाकतो एक थेंब - शिंपल्यातला मोती.
तो कवडसा जेमतेम गाल गोंजारतो
आणि घाईत तुझ्या खांद्यावर उतरतो
खरपूस कांतीवर माखतो वर्ख सोन्याचा
बेमुर्वतपणे, होय! माझ्यादेखत!
तुझ्या कमरेवर टेकतो, नाही राहात
तिथेच रेंगाळत माझ्या मिठीसारखा.
डौलदार ढुंगण वस्सकन लख्ख
करतो हा उजेड - अरसिक, मख्ख.
तुझ्या मांड्या, पोटर्या, पाय
पादाक्रांत करणार काय
हा चक्रवर्ती सूर्यनारायण?
संपत नाही उपभोगूनही मी
ते सर्वस्व जिंकणार का पण
हा उपभोगशून्य स्वामी?
रात्री जोखड म्हणून झटकलेले
पांघरूण पुन्हा घेऊया ओढून.
वाढवू दिवसाच्या मोंगलाईतून
स्वराज्य क्षणाचे काळोखलेले.
वाचने
19266
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
काही दिवस "अप्रकाशित" ठेवलेली
हा हा हा
खल्लास..
द्विधा कडवे
In reply to द्विधा कडवे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अवांतर.. :)
In reply to द्विधा कडवे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सूर्यप्रकाशाबद्दल बदलत्या भावना
लै भारी :)
सुंदर कविता!
कल्पना आवडली
वाहवा आणि सूचना
In reply to वाहवा आणि सूचना by बेसनलाडू
चपखल
In reply to चपखल by कोलबेर
असहमत
In reply to असहमत by बेसनलाडू
भावनाशून्
In reply to भावनाशून् by कोलबेर
पुन्हा असहमत
In reply to पुन्हा असहमत by बेसनलाडू
हाच सर्वात कठिण शब्द
कवडसा
पाडगावकर+ढसाळ!
शैलीची शोधाशोध
कविता छान!
उत्तम!
बेसनलाडवाशी सहमत