पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न
(अलिकडेच मिपाकर चित्रगुप्त यांनी मृत्यूपूर्वीच्या स्थितीबद्दल चर्चा करणारा धागा काढला होता. त्यापासून स्फूर्ती घेऊन निळोबांनी 'मृत्यूसमयीच्या व्यवस्थेबद्दल' चर्चा करणारा धागा काढला आहे. इजा झाला, बिजा झाला तर तिजा म्हणून मृत्यूपश्चात जीवनाबद्दल आपण धागा काढावा नि आपले अनेक दिवस मळमळणारे प्रश्न भळभळून विचारून टाकावेत असा विचार करून हा धागा टाकला आहे.)
मी जडवादी आहे की अंधश्रद्ध की आणखी काही मधले हे आपल्याला ठाऊक नाही (साला त्याबाबत वाद घालण्याची हुशारी पण आपल्यात नाही). पण हां आपल्याला लै प्रश्न पडतात राव. पुनर्जन्म नि पारलौकिक हे दोन विषय तर आपल्या डोस्क्याला लै म्हंजे लैच त्रास देतात. त्यातील तत्त्व, स्वार्थ, परमार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष (हाण तिज्यायला, हे आठवतील ते जड शब्द ठोकून देणे हल्लीच एका माजी वृत्तपत्र संपादकाकडून शिकलो) वगैरे बाजू जाऊ द्या हो, ते सगळं आपल्याला बाप जन्मी समजणार नाहीच. मी म्हणतोय ते या सगळ्याच्या ऑपरेशनल बाजूबद्दल. आता हेच बघा ना, आमच्या दोस्त लोकांची मारे जोरदार चर्चा घडत होती पुनर्जन्म असतो की नाही. नि आमच्या टकुर्यात भलतेच प्रश्न. त्या नादात तिकडे महत्त्वाचे काही मुद्दे येऊन गेले तिकडे लक्षच नाही. बहुमोल असे ज्ञानसंपादनाचे क्षण आम्ही दवडले, पहिल्यापासून आम्ही करंटेच. पण ते असो. निदान आता प्रश्न टकुर्यात आलेच आहेत तर निदान त्यांची उत्तरे मिळाली तर ते नुस्कान थोडे तरी भरून काढू म्हटलं नि हे प्रश्न त्या दोघांना विचारले. पहिला प्रश्न पुरा होण्याच्या आतच आमच्यासारख्या मूर्ख माणसाला पुनर्जन्म नसावा - निदान माणसाचा नसावा - याबाबत त्या दोघांचे ताबडतोब एकमत झाले. पुनर्जन्म असतो असा दावा करणार्याने माझ्याकडे कीव आलेल्या नजरेने पाहिले नि म्हटले ’तू फक्त आमचे ऐकत जा, जरा तरी अक्कल येईल उगाच तोंड उघडून आपले शहाणपण पाजळू नकोस.’ तर मंडळी मित्र हे असे, आमची ज्ञाननतृष्णा तर ज़ब्ब़र, प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर चैन पडणार नाही (भूत होऊन त्या दोघांच्या मानगुटीस बसतो झालं). मग काय आयतेच सापडलात तर राम जेठमलांनीना.... आय मीन त्यांच्या दहा प्रश्न रोज विचारण्याच्या परंपरेला स्मरून यातले दहा प्रश्न - उपप्रश्नांसह - तुम्हालाच विचारून टाकतो झालं.
१. मागल्या जन्मातले आठवते असेच बरेचदा कुणी कुणी दावा करत असल्याचे अधून मधून ऐकायला मिळते. ही आठवण नेहमी मनुष्यजन्माचीच कशी असते? त्यांना आपला मागचा जनावराचा जन्म का आठवत नाही. की ज्या 'गिफ्टेड' लोकांना हे आठवते त्यांना 'लक्ष-चौर्यांशीच्या फेर्यातून न जाण्याची किंवा किमान दोन मनुष्यजन्म पाठोपाठ मिळण्याची लॉटरी लागलेली असते? तसे नसेल तर मग मागल्या जन्मी मी लांडगा होतो नि ... जाऊ दे जनावराचे आयुष्य वर्णायचे म्हणजे शरीराबरोबर मनालाही लकवा भरलेले लोक अश्लील-अश्लील म्हणून ओरडू लागतील*. तसाही तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि कल्पनाशक्तीवर आमचा विश्वास आहेच.
* पु.लं.च्या ’रावसाहेब” मधून साभार.
२. मागल्या जन्मी आपण गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही?
३. मागल्या जन्मी केलेल्या पापांचे भोग या जन्मी भोगावे लागतात असे म्हणतात. मग मागच्या जन्मी मला जन्मठेप झाली होती नि चौदा ऐवजी दहा वर्षातच मी खपलो होतो, तर सरकार मला या जन्मी उरलेले चार वर्ष तुरुंगवास भोगायला भाग पाडू शकेल काय? याचे उत्तर ’नाही’ असे असेल तर मग मागल्या जन्मीची पापांची फळे या जन्मी भोगावी लागतात हा ’कर्मसिद्धांत’ही खोटा म्हणावा का?
३.१ समजा वरील प्रश्नाचे उत्तर 'होय' असे असेल तर मग माझ्या नव्या जन्मात मी कोणत्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवला जाणार. भारताऐवजी मी बुर्किना फासो नावाच्या देशात जन्मलो तर हा चार वर्षांचा हिशोब तिथे पुरा होणार की की मी भारतीय कायद्याच्या 'ज्युरिस्डिक्शन' मधे पुनर्जन्म घेईपर्यंत कॅरी-फॉरवर्ड होत राहणार?
४. आपल्याकडे दिवंगत झालेले आजोबा/पणजोबा वा आजी/पणजीच नातवाचा/नातीचा जन्म घेऊन आली असे अनेकदा म्हटले जाते. माझ्या बाबत असे असेल तर मीच माझा नातू/पणतू ही स्थिती पाप-पुण्याच्या हिशोबाच्या दृष्टीने जरा गुंतागुंतीची होणार नाही का?
५. नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्यांशीपैकी) 'मनुष्यजन्मांचे'? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, एकाच धर्मात, एकाच जातीत, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर, आपल्या देशी दोघांच्या आईबापांचेही 'कन्सेंट' मिळावेत अशा आईबापांपोटी... वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती, ती किमान ७ भागिले लक्ष-चौर्यांशी इतकी आहे काय? मुळात लक्ष चौर्यांशीच्या हिशोबात एकाहुन अधिक मनुष्यजन्म मिळतात का? मनुष्यजन्म दुर्लभ असतो, लक्ष चौर्यांशीत एकदाच मिळतो असे ऐकून आहे, तर दुसरीकडे हे सात मनुष्यजन्माचे कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यवस्थेमधे कसे काय बसते ब्वा?
५.१ मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले दोघे या जन्मी विरूद्ध जेंडर घेऊन (मागल्या जन्मीची स्त्री पुरूष म्हणून नि पुरूष स्त्री म्हणून) जन्मले नि या जन्मी पती-पत्नी झाले तर हा जन्म सात जन्माच्या कॉंट्रॅक्टमधे धरला जातो की नाही?
५.२. मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले हे दोघे या जन्मी अन्य धर्मीय म्हणून जन्मले (मागील जन्मीच्या पापाची फळे, दुसरे काय.) आणि या जन्मी पुन्हा पती-पत्नी, शोहर-बीवी अथवा हज्बंड-वैफ बनले तर तो जन्म या सात जन्मांच्या काँट्रॅक्ट मधे काऊंट होतो का?
६. दोन जन्मांच्या मधे भूतयोनी नावाचा आणखी एक प्रकार असतो म्हणतो. त्यातही पुन्हा हडळ, वेताळ, डाकीण, खवीस, समंध, मुंजा, ब्रह्मराक्षस वगैरे जातीव्यवस्था आहेच. मेल्यानंतर अतृप्त इच्छा वगैरे राहिल्या असतील वा काही भयंकर गुन्हा वगैरे केला असेल तर हा मधला टप्पा पार करावा लागतो म्हणे. म्हणजे थोडक्यात मनुष्ययोनीतले पापपुण्याचे हिशोब इकडे कॅरी- फॉरवर्ड होतात. मग भूत असताना केलेल्या गुन्ह्यांचे/पुण्याचे क्रेडिट मनुष्ययोनीतील पुढील जन्मात कॅरी- फॉरवर्ड होते का? थोडक्यात पाप-पुण्याच्या बाबतीत 'टीडीआर' असतो का? लक्ष-चौर्यांशीच्या हिशोबात हा मधला काळ एक योनी म्हणून धरतात की फक्त वास्तव जन्मच काऊंट होतात? रिलेटिविटीला स्मरून एखाद्या भुतासाठी त्याचा जन्मच वास्तव नसतो का, नि त्याच्या जगातील समजानुसार पुढला मनुष्य जन्म हा भूत होणे म्हणून काऊंट होतो का? मग भुताच्या इच्छा अपुर्या राहिल्या तर त्याला मनुष्य जन्म मिळतो असे भुतांचे धर्मग्रंथ त्यांना सांगत असतील का?
६.१ प्रत्येक धर्मात या ना त्या प्रकारे भूतयोनीचा उल्लेख असतोच. मृत झाल्यानंतर प्रत्येक धर्माची वेगळी अशी भूतयोनी असते की सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात?
७. पाप-पुण्याचा हिशोब एकमेकाला छेदून बाकी शून्य उरते तेव्हा मोक्ष मिळतो असे म्हणतात. आता हा इक्विलिब्रियम अनायासे साधण्याची वाट न पाहता चित्रगुप्त महाराज एखाद्या जन्मी ज्या क्षणी बाकी शून्य होते तेव्हा उरलेले आयुष्य जगून हा बॅलन्स पुन्हा बिघडवण्याचा चान्स न देता त्याच क्षणी मि. यम यांना त्या व्यक्तीचे प्राण हरण करण्याचा आदेश देऊन (किंवा ज्या देवाला असा आदेश देण्याची पावर आहे त्याला रेकमेंड करून) 'अकाउंट क्लोज्ड' चा शिक्का का मारत नाहीत?
७.१. पाप-पुण्याच्या ज्या अकाउंट मधे क्रेडिट-डेबिट होत असते ते अकाउंट माझे असून मला त्या अकाउंटचा नंबर कसा ठाऊक नाही? ही गोपनीयता माझ्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणे आहे असे माझे प्रामाणिक मत आहे, तुम्हाला काय वाटते?
७.२ काही नाही तर निदान मला नेटबँकिग अॅक्सेस देऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे बॅलन्स-चेक सुविधा का दिली जात नाही? ती मिळावी यासाठी काय प्रोसिजर असते?
७.३. वरील अकाउंट कोणत्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ट्रॅक केले जाते? त्या सॉफ्टवेअरचे क्यू.ए. देवांनीच/पारलौकिक अस्तित्व असलेल्या जीवांनीच केले आहे की माणसांनी? माणसांनी केले असेल तर आपल्या अकाउंटला फक्त क्रेडिटच पडत राहील याची सोय प्रोग्रॅमर्स नि क्यू.ए. वाल्या डॅम्बिस लोकांनी संगनमताने करून ठेवली नसेल याची खात्री कशी करून घेतली होती?
७.४. माझ्या भुताचे नि माझे अकाउंट एकच असते का? थोडक्यात मला मोक्ष मि़ळतो तेव्हाच माझ्या भुतालाही मोक्ष मि़ळतो का?
८. मी जिवंतपणी केलेले एखादे चांगले काम मेल्यानंतरही चालू राहिले नि त्यातून आणखी काही चांगुलपणाचे क्रेडिट निर्माण झाले तर चक्रवाढव्याजाच्या नियमानुसार ते माझ्या अकाउंटला क्रेडिट मिळते का? याचे उत्तर 'हो' असे असेल तर मला मोक्ष मिळाल्यानंतर - थोडक्यात माझे अकाउंट क्लोज झाल्यानंतर - हे क्रेडिट कुणाला ट्रान्स्फर व्हावे यासंबंधी मी काही 'मोक्षपत्र' करू शकतो का? असल्यास ते कुठे रेजिस्टर करावे लागते? चित्रगुप्ताने त्यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास त्याच्या लाभधारकाला कुठल्या व्यवस्थेकडे दाद मागावी लागेल?
९. फार जास्त पाप झाले तर दिवाळे जाहीर करून अकाउंट क्लोज करण्याची सोय आहे का?
१०. पाप-पुण्याच्या हिशोबात खुद्द चित्रगुप्त महाराज नि त्यांचे सहकारी घपला करीत नसतील याची काय खात्री. की त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी 'सिविल सोसायटी'च्या पारलौकिक खात्याचा एखादा प्रतिनिधी उपोषण करीत असतो का? उरलेले सारे त्या भ्रष्टाचाराचे - खरेतर त्या भ्रष्टाचाराचा आपल्याला फायदा होत नाही म्हणून खंतावलेले - विरोधक पांढरी टोपी घालून स्वर्ग-नरकात दुचाकीवर ट्रिपल सीट बसून घोषणाबाजी करत हिंडत असतील का? ते उपोषण 'शांभवी'च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने?
आणखी अनेक प्रश्न आहेत पण सगळे सांगत बसलो तर 'सास भी कभी बहू थी' सारखी मालिकाच होईल. (तसेही त्यात पुनर्जन्म होतेच म्हणे ) तूर्तास थांबतो. किमान एवढ्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकलो तरी खूप झाले. तुम्हालाही काही प्रश्न, उपप्रश्न असतील तर...........अजिबात विचारू नका, आधीच डोस्क्याची मंडई झालीये, त्याची लोकसभा व्हायला नको, क्काय?
वाचने
26755
वाचनखूण
प्रतिक्रिया
80
प्र.का.टा.आ.
आवरा
अरे देवा...
In reply to अरे देवा... by राजेश घासकडवी
आत्मा ट्रान्सप्ल्याण्ट? त्या
In reply to आत्मा ट्रान्सप्ल्याण्ट? त्या by नितिन थत्ते
आत्मा, नाड्या वगैरे
In reply to आत्मा, नाड्या वगैरे by राजेश घासकडवी
ए नाय हो
In reply to आत्मा ट्रान्सप्ल्याण्ट? त्या by नितिन थत्ते
पापपुण्याचा हिशेब त्या शरीरात
In reply to अरे देवा... by राजेश घासकडवी
अच्छा
आणखी प्रश्न
गाढव
व्वा! मस्त लेख आहे. पहिले
निषेध
In reply to निषेध by प्रियाली
असहमत..
;;फार जास्त पाप झाले तर
बाप रे! रमताराम साहेब...हसुन
पुनर्जन्माच्या व्यवस्थेविषयी
वर श्री. रमताराम यांना
काही उत्तरे
In reply to काही उत्तरे by श्रावण मोडक
आमचेही अवतरण
In reply to आमचेही अवतरण by रमताराम
निषेध
In reply to निषेध by राजेश घासकडवी
अपरिहार्य
In reply to अपरिहार्य by श्रावण मोडक
अरेच्या
In reply to अरेच्या by रमताराम
ओ...
In reply to ओ... by श्रावण मोडक
अरेच्या खरंच की
In reply to अरेच्या खरंच की by रमताराम
गुर्जी
In reply to गुर्जी by श्रावण मोडक
एक तुच्छ प्रश्न
In reply to एक तुच्छ प्रश्न by रमताराम
खार खाणे
In reply to खार खाणे by श्रावण मोडक
>>तुम्ही आमच्यावर माणूस
In reply to >>तुम्ही आमच्यावर माणूस by अर्धवट
वेल...
In reply to वेल... by श्रावण मोडक
हॅ हॅ .. साक्षात गुर्जींनी
In reply to खार खाणे by श्रावण मोडक
अरारा
In reply to गुर्जी by श्रावण मोडक
>>जगावं कसं आयडीनं
In reply to >>जगावं कसं आयडीनं by नितिन थत्ते
हम्म्म
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
बोललात?
In reply to बोललात? by राजेश घासकडवी
=)) =))
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
आभारी
In reply to गुर्जी by श्रावण मोडक
बालीशपणा
In reply to बालीशपणा by राजेश घासकडवी
श्रामो, बघितला का कंपूचा
शांभवी?
In reply to शांभवी? by मूकवाचक
ना
In reply to ना by रमताराम
धन्यवाद
अगायायाया..
In reply to अगायायाया.. by Nile
उत्तम प्रतीसाद.
मस्त प्रश्न. मनात तर
तूम्ही बाण कोठेही मारत रहा,आम्ही भोवती वर्तूळ जमवायचा यत्न करतो
In reply to तूम्ही बाण कोठेही मारत रहा,आम्ही भोवती वर्तूळ जमवायचा यत्न करतो by आत्मशून्य
ओ दादा
In reply to ओ दादा by रमताराम
रमताराम ? प्रतीसाद लै सीरीयसली झाला काय ?
In reply to रमताराम ? प्रतीसाद लै सीरीयसली झाला काय ? by आत्मशून्य
नाय ओ
In reply to तूम्ही बाण कोठेही मारत रहा,आम्ही भोवती वर्तूळ जमवायचा यत्न करतो by आत्मशून्य
अवलियांना समाधी?
In reply to अवलियांना समाधी? by राजेश घासकडवी
का? का नाही वाचलात?
In reply to अवलियांना समाधी? by राजेश घासकडवी
कळलं?
In reply to तूम्ही बाण कोठेही मारत रहा,आम्ही भोवती वर्तूळ जमवायचा यत्न करतो by आत्मशून्य
संगीतसभा !!
In reply to संगीतसभा !! by अर्धवटराव
_/\_
:-)
In reply to :-) by सहज
बर्याच दिवसांपासून ह्या
In reply to बर्याच दिवसांपासून ह्या by प्रभो
च्यायला ह्यांचं गणित वेगळंच दिसतंय.
>> माणसांनी केले असेल तर
तुमचं माहिती नाही पण...
In reply to तुमचं माहिती नाही पण... by पिवळा डांबिस
खिक्
In reply to खिक् by रमताराम
अर्र तिच्या!!!
In reply to अर्र तिच्या!!! by Nile
चवळी
In reply to चवळी by नितिन थत्ते
जपून हो थत्ते काका!
In reply to जपून हो थत्ते काका! by Nile
भोपळा
In reply to भोपळा by नितिन थत्ते
अरेव्वा आजचा मुहुर्त पाशवी शक्ती कसा काय जाऊ देतील ?
In reply to भोपळा by नितिन थत्ते
बरोबरच आहे की
In reply to अर्र तिच्या!!! by Nile
>>गवार हक्कभंगाचा प्रस्ताव
जबरदस्त लेख
In reply to जबरदस्त लेख by पैसा
बघा
चुकीच्या वेळेस मेले होते मी!
वा!
पुनर्जन्माबाबत हल्ली संशोधन
मस्त लेख .
शुचि तै / ढालगज भवानीचा लेख "कर्मविपाक"
आपण
तूर्त एव्हढेच..
ररां चा होय!!
पुनर्जन्म आहे कि नाही काही
In reply to पुनर्जन्म आहे कि नाही काही by महेश नामजोशि
ती माणसे एखाद्याचे भूत,
In reply to पुनर्जन्म आहे कि नाही काही by महेश नामजोशि
अरे देवा.. अगस्ती नाडी..
In reply to पुनर्जन्म आहे कि नाही काही by महेश नामजोशि
छान