मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपावर लिहीणं धोक्याचं!

पिवळा डांबिस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
("सोळावं वरीस धोक्याचं" या लावणीवरून स्फूर्ती घेऊन,) मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || ओढ लागली खरडीची धम्या-डॉन्याच्या गंमतीची इनोबाही इथे नाचतो, बँडेज सावरत गुढघ्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || तात्याची खादाडी खरी वरदा टाईम-पास करी नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते, कोंबडी सोडून हाडकाचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || आचरटपणा सोड बरा पिकल्या केसां जाग जरा डांबिसकाका, मनात भय धर, सरपंचांच्या फटक्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || (निवेदनः आमचे हे पहिले-वहिले विडंबन आमचे या विषयातले मानसगुरू श्री केशवसुमार यांच्या चरणी अर्पण!! कवितेत वर्णन केलेल्या व्यक्तींना प्रार्थना: कृपया, कृपया, ह. घ्या!!:))

वाचने 12198 वाचनखूण प्रतिक्रिया 36

मदनबाण गुरुवार, 07/03/2008 - 10:31
जबरा.... अजुन काय म्हणणार.. (नमस्कार माझा तया विडंबनास) असे म्हणणारा..... मदनबाण.....

अरुण मनोहर गुरुवार, 07/03/2008 - 10:32
आयला हे पिवळ ड्यांबीस पन मानसाले टरकून असतय हे माहीतच नव्हत. हे सरपंच पन पोहोचलेले मांत्रीक दिसतात.

सखाराम_गटणे™ गुरुवार, 07/03/2008 - 10:45
जबरा ऐकदम, सकाळ ची चांगली सुरवाआट झाली. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

छोटा डॉन गुरुवार, 07/03/2008 - 11:10
आता चक्क विडंबन !!! तुमच्या व्यक्तीमत्वातला नवाच पैलु कळाला. मला आधी शिर्षक वाचुन वाटले की पुन्हा एक "धराधरी आणि आपटाआपटीचा विषय" दिलात की काय ? पण मस्त जमले आहे ....
चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते, कोंबडी सोडून हाडकाचं |
हे भारीच ....
आचरटपणा सोड बरा पिकल्या केसां जाग जरा
आणि हे काय? डायरेक्ट पिकल्या केसांचा उल्लेख !!! म्हणजे आपण कबुल करता की आपले वय झाले ... मग आधी माझ्याबरोबर "काका पणाबद्दल" एवढा वाद घातला त्याचे काय ? [ पुन्हा तेच , कॄपया ह. घ्या. ]
पहिले-वहिले विडंबन आमचे या विषयातले मानसगुरू श्री केशवसुमार यांच्या चरणी अर्पण!!
जय हो गुरुदेव !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी गुरुवार, 07/03/2008 - 11:22
पिडाकाका पहिलं विडंबन छान जमलं आहे. आवडलं. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II गुरुवार, 07/03/2008 - 11:27
नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | हा हा हा .... जबरा !!! =)) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

अवलिया गुरुवार, 07/03/2008 - 12:21
यु टु ब्रुट्स नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

प्रगती गुरुवार, 07/03/2008 - 11:47
कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | घाबरलेली प्रगती. :S

अवलिया गुरुवार, 07/03/2008 - 12:20
नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | अरे काय हे ? उगाचच नाकाला पारंबी आली असं वाट्त नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

केशवसुमार गुरुवार, 07/03/2008 - 13:00
वत्स डांबिसकाका, एकदम डांबिस विडंबन.. झकास.. आवडल.. चालू द्या.. =D> (मानस गुरू)केशवसुमार :B स्वगतः लेका केश्या तुला गुरू म्हणून सगळ्यात जास्त तुझीच खेचलीय कळतयं का तुला उगाच हुरळून जाऊ नको:W

सखाराम_गटणे™ गुरुवार, 07/03/2008 - 13:39
>>आचरटपणा सोड बरा >>पिकल्या केसां जाग जरा तुम्हीच जर आचरटपणा सोडला तर आम्ही कोणाच्या तोडांकडे बघायचे ? नका आम्हाला पोरके करु :( सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

विसोबा खेचर गुरुवार, 07/03/2008 - 13:52
अरे डांबिसा, अलिकडे तुझ्या प्रतिभेला काव्याचे हे नवेच घुमारे फुटलेले मी पाहतो आहे. याआधी गोलकाची अंगावर येणारी एक सुंदर कविता अन् आता हे हसरेखेळते विडंबन! क्या बात है. सह्ही केलं आहेस विडंबन. आपण साला मनापासून दाद देतो....! डांबिसकाका, मनात भय धर, सरपंचांच्या फटक्याचं | अरे नाही रे बाबा! सरपंच उगाच कशाला कुणाला फटके मारतील? आणि तुला तर नाहीच नाही! :) आपला, (डांबिसाचा फ्यॅन!) तात्या.

नारदाचार्य गुरुवार, 07/03/2008 - 17:28
धोकादायक दिसतो... व्यक्तिचित्रं लिहितो, मध्येच भावनीक लेख लिहितो. आता विडंबन आणि त्यात जाता-जाता खेळीमेळीत एकेकांची मापं काढून गेला आहे. मान गये उस्ताद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/03/2008 - 19:06
कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | हा हा हा :) हे बाकी खरं आहे !!!! विडंबन आवडले.

चतुरंग गुरुवार, 07/03/2008 - 19:50
चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते, कोंबडी सोडून हाडकाचं | क्या बात है! एकदम टेरिफिक!! तुमचं हे विडंबन वाचून आणि गुरु-शिष्यातलं प्रेमळ नातं बघून, आम्हाला झट्क्यास एक कडवं आठवलं ते इथे टाकतोय. 'केशा' करतो विडंबनं फाडे शायरी अन् कवनं 'पिडा'सारखे वत्सही मिळता आम्ही कोपर्‍यात बसायचं मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || चतुरंग

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/03/2008 - 22:36
कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | हे काही इतके पटले नाही मला. अवांतरः बाकी पिडाकाका तुम्ही कशाला उगाच ते लिहिण्याच्या वगैरे भानगडीत पडता. ते प्रमाचे क्लास तुमचे उत्कृष्ठ चालत आहेत ना! कशाला ते प्रवास वर्णन आणि काय ते लिहिता, त्यापेक्षा प्रेम आणि पोरी पटवणे याबद्दल पाठ्यपुस्तके लिहा ना. मी तर त्याचा वाचक आणि वितरक म्हणून नक्की आहे. :) (ह.घ्या.हे. वे. सां. न. ल.) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सखाराम_गटणे™ गुरुवार, 07/03/2008 - 23:17
अवांतरः बाकी पिडाकाका तुम्ही कशाला उगाच ते लिहिण्याच्या वगैरे भानगडीत पडता. ते प्रमाचे क्लास तुमचे उत्कृष्ठ चालत आहेत ना! कशाला ते प्रवास वर्णन आणि काय ते लिहिता, त्यापेक्षा प्रेम आणि पोरी पटवणे याबद्दल पाठ्यपुस्तके लिहा ना. मी तर त्याचा वाचक आणि वितरक म्हणून नक्की आहे. Smile (ह.घ्या.हे. वे. सां. न. ल.) मिपा वर बरेच त्या क्लास चे विद्यार्थी आहेत. (ह.घ्या.हे. वे. सां. न. ल) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

सर्किट गुरुवार, 07/03/2008 - 22:55
डांबिसा , हितच जरा टेका मिसळ्पाव ओका (बोका) तुम्हाविण काका ... - सर्किट

शितल गुरुवार, 07/03/2008 - 23:34
काका, मस्त विडबन जमले आहे

विजुभाऊ Fri, 07/04/2008 - 18:56
अहो डाम्बीसाचा पिंड वेगळा सांगता येणार नाही केंव्हा फेडुन तुमचे नेसुचे ते करील तुम्हा येडा खुळा.... जी रं जी जी रं जी जी....... :::::::::डाम्बीस काकाच्या वगात शिट्ट्या फुंकणारा विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पिवळा डांबिस Sun, 07/06/2008 - 19:49
अभिप्राय दिलेल्या (व न दिलेल्या) सर्व वाचकांचे आभार! विडंबनात वर्णन केलेल्या माझ्या मिपा मित्रमैत्रिणींना त्यांनी ही थट्टा दिलदारपणे घेतल्याबद्दल विशेष धन्यवाद! असाच लोभ असू द्यावा! थट्टेखोर, पिवळा डांबिस

वरदा Mon, 07/07/2008 - 22:14
काका तुम्ही एवढं छान विडंबन करता? माहितच नव्हतं....मस्तच आहे.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

स्वाती दिनेश Tue, 09/23/2008 - 11:41
हे माझ्या नजरेतून कसं काय सुटलं ? मस्तच आहे.. कटलेटच्या निमित्ताने का होईना नजरेला आणून दिल्याबद्दल धन्यु सुलेशबाबू.. स्वाती

विजुभाऊ Tue, 09/23/2008 - 12:00
हे माझ्या नजरेतून कसं काय सुटलं ? एवढ्या उशीरा प्रतिसाद म्हणजे हे कटलेट च्या ऐवजी लेट कट झाले :) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत