मिपावर लिहीणं धोक्याचं!
("सोळावं वरीस धोक्याचं" या लावणीवरून स्फूर्ती घेऊन,)
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
कथा-लेख मी कसा लिहू?
प्रवासवर्णन कसा करू?
जागोजागी उभे "समीक्षक",
निशाण बांधून मोक्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
ओढ लागली खरडीची
धम्या-डॉन्याच्या गंमतीची
इनोबाही इथे नाचतो,
बँडेज सावरत गुढघ्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
तात्याची खादाडी खरी
वरदा टाईम-पास करी
नाना चेंगट गुह्य उकलती,
"समभागां"च्या मटक्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
चतुरंगाची बुद्धिबळं
विजुभाऊचं स्वप्न खुळं
स्वातीबाई कट्लेट तळते,
कोंबडी सोडून हाडकाचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
आचरटपणा सोड बरा
पिकल्या केसां जाग जरा
डांबिसकाका, मनात भय धर,
सरपंचांच्या फटक्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
(निवेदनः आमचे हे पहिले-वहिले विडंबन आमचे या विषयातले मानसगुरू श्री केशवसुमार यांच्या चरणी अर्पण!! कवितेत वर्णन केलेल्या व्यक्तींना प्रार्थना: कृपया, कृपया, ह. घ्या!!:))
वर्गीकरण
काकाश्री.....
In reply to काकाश्री..... by मदनबाण
असेच म्हणतो...
आयला
व्वा...फार
मस्त
जबरा
डाम्बिसकाका, तुम्ही पण ???
छान
नाना चेंगट
In reply to नाना चेंगट by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
यु टु
वा! मस्त!
छान विडंबन
एकदम पटलं
नाना चेंगट
हा हा हा!!
मस्त! मस्त!!
सॉलीड पदार्पण
>>आचरटपणा
भले शाब्बास! :)
सही विडंबन
आवडलं...
वा!
हा माणूस...
लै भारी
वा! वा! डांबिसकाका जोरदार लावणी!!
छान विडंबन...
In reply to छान विडंबन... by llपुण्याचे पेशवेll
अवांतरः बा
खल्लास !!!
सह्ही!!!!
:)
मजा आहे
अहो
आभार!
अरे बापरे
अर्रे..
लेट कट