मिपावर लिहीणं धोक्याचं!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
("सोळावं वरीस धोक्याचं" या लावणीवरून स्फूर्ती घेऊन,)
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
कथा-लेख मी कसा लिहू?
प्रवासवर्णन कसा करू?
जागोजागी उभे "समीक्षक",
निशाण बांधून मोक्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
ओढ लागली खरडीची
धम्या-डॉन्याच्या गंमतीची
इनोबाही इथे नाचतो,
बँडेज सावरत गुढघ्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
तात्याची खादाडी खरी
वरदा टाईम-पास करी
नाना चेंगट गुह्य उकलती,
"समभागां"च्या मटक्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
चतुरंगाची बुद्धिबळं
विजुभाऊचं स्वप्न खुळं
स्वातीबाई कट्लेट तळते,
कोंबडी सोडून हाडकाचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
आचरटपणा सोड बरा
पिकल्या केसां जाग जरा
डांबिसकाका, मनात भय धर,
सरपंचांच्या फटक्याचं |
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||
(निवेदनः आमचे हे पहिले-वहिले विडंबन आमचे या विषयातले मानसगुरू श्री केशवसुमार यांच्या चरणी अर्पण!! कवितेत वर्णन केलेल्या व्यक्तींना प्रार्थना: कृपया, कृपया, ह. घ्या!!:))
वाचन
12198
प्रतिक्रिया
0