आईस पत्र
लेखनप्रकार
शुचिचे मुलीस पत्र पाहून मलाही पत्रलेखनाची सुरसुरी आली. पंतप्रधान आणि/किंवा जगप्रमुख (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) यांना पत्र लिहीण्याएवढा मला वेळ नाही. मग ("माझ्या" काल्पनिक) आईलाच पत्र लिहून टाकलं.
हाय आई,
आता मोठी समजशील, नंतर मोठी समजशील आणि मग तरी तुझे उपदेशाचे डोस थांबतील असं वाटलं होतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही की आता मी नोकरीनिमित्ताने दुसर्या ठिकाणी येऊन रहाते आहे तरीही तू मला अजून बाळच समजते आहेस. अशा वेळी तरी तुला तुझं तरूण वय आठवेल असं वाटलं होतं. कालपर्यंत तू मला डोस पाजत होतीस, पण आतातरी निदान तू मला माझा स्वतंत्र विचार करू देशील असं वाटलं होतं. तो मी तसाही करतेच, पण ते तुला समजेल अशी अपेक्षा होती.
मानापमान - माते, तुला हे कधी समजलं आहे की लहान मुलांच्या मनातही त्यांचे स्वतंत्र विचार, कल्पना असतात. डोस पाजणारे कोणालाच आवडत नाहीत आणि म्हणूनच चुकूनसुद्धा डोस पाजायचा आव आणायचा नसतो.
संस्कार - संस्कार करताना तू मला कायम झाडाकडे बघ असं शिकवलंस. नारळाला खत म्हणून मीठच घालतात, तू मला आंबा समजून खत घालत असशील याची शक्यता तू कधी विचारात घेतली आहेस का? तुझ्या तरूणपणची मूल्यं, समाज, समज वेगळे असतील आणि माझी वेगळी असतील याची तुला थोडीतरी जाणीव आहे का?
विचार - तू म्हणतेस पैसा खर्च करताना नेहेमी फेरविचार कर. सक्षमपणे निर्णय घेण्यासाठी आधी स्वतंत्रपणे विचार करू दिला पाहिजे. जबाबदारी हा शब्द मला नीट कळण्यासाठी कधी चुकूनतरी तू माझ्यावर जबाबदारी टाकली आहेस का? आणि मी नाही पैसे खर्च करणार तर कोण करणार, खर्च नाही करायचे तर मिळवायचे कशाला पैसे? काय वाईट आहे पैसे खर्च करण्यात?
स्तुती - स्तुतीमुळे किती चांगल्या गोष्टी होतात हे तुला माहित आहे का? जेव्हा आपला आपल्यावरही विश्वास नसतो तेव्हा आपल्या लोकांनी केलेल्या तोंडदेखल्या स्तुतीमुळेसुद्धा खूप आत्मविश्वास निर्माण होतो. एखाद्याची एखादी गोष्ट खरोखरच चांगली वाटली तरी तुझ्या या उपदेशामृतामुळे कोणी सांगणार नाही.
कष्ट - कोणाचे कष्ट विनमोल घेऊ नकोस हे ठीक आहे. पण आपल्याच लोकांसाठी किंवा लोकांनी काही केलं तर काय त्याचं मूल्यमापन करायचं का? मैत्रीसारखी सुंदर नाती वगैरे फक्त बोलण्याची गोष्ट नाही आई, वेळ पडली की निभावून नेण्याची गोष्ट आहे. आणि हे घरापासून दूर राहिल्यानंतर मी शिकले आहे. घरात उपदेशामृत मिळतं आणि बाहेर प्रत्यक्ष अनुभव.
वाचा - मला कोणी काही बोललं तर मी का ऐकून घेऊ? माझी चूक नसेल तरीही मी पडतं का घ्यायचं? वाईट शब्दच वापरायला पाहिजेत असं नाही, पण स्पष्ट शब्दांत आपलं म्हणणं न मांडताच का निघून जायचं मी! हे लोकं मला खायला घालत नाहीत, मी माझ्या कष्टांनी कमावून खाते, उगाच का कोणाचं ऐकून घ्यायचं?
तू नेहेमीच प्रवचन देतेस, हजार गोष्टी सांगतेस. पण त्यापेक्षा कधी माझ्यावर थोडी जबाबदारी टाकली असतीस, मला माझं आयुष्य जगण्याचं, माझ्या निवडी करण्याचं स्वातंत्र्य देऊन मागे उभी राहिली असतीस ना, तर एक अक्षर न बोलताही तू मला खूप गोष्टी शिकवू शकली असतीस. "काय हे उपदेशामृत" असा उद्वेग वाटला नसता, तू माझी मैत्रीण होऊ शकली असतीस. मी तुझ्याशी काही बोलत नाही, शेअर करत नाही कारण माझ्या एका वाक्यावर तुझे दहा बुलेट्स येतात. आता पत्रातूनच काय ते लिही. टंकाळा केलास तर निदान मला वाचण्याचा त्रास कमी होईल.
तुझी(?) दिया
स्वानुभवावर आधारित.
वाचने
22427
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
हॅ हॅ
छान
In reply to छान by प्रकाश घाटपांडे
जर
In reply to जर by विनायक प्रभू
जे जर तर म्हणजे इफ - एल्स
In reply to जे जर तर म्हणजे इफ - एल्स by टारझन
ओक्के
In reply to ओक्के by विनायक प्रभू
गुणगुण!
In reply to गुणगुण! by पिवळा डांबिस
व्वा
>>>>स्वानुभवावर
आम्ही आमच्या आईचे कोणते ही
In reply to आम्ही आमच्या आईचे कोणते ही by टारझन
+१ आईशी वाद घालुन (
In reply to आम्ही आमच्या आईचे कोणते ही by टारझन
+१. मस्त चपराक...... एकदम
In reply to आम्ही आमच्या आईचे कोणते ही by टारझन
+ १
In reply to आम्ही आमच्या आईचे कोणते ही by टारझन
+१
लेखन आवडले.
आई वडीलांकडे अधुन मधुन जाने
आईचे महत्व
छान
आक्षेपार्ह...
In reply to आक्षेपार्ह... by प्रभाकर पेठकर
आता आईच्या मुलीस (दूसर्या)
In reply to आक्षेपार्ह... by प्रभाकर पेठकर
भावनाओं को समझो
In reply to भावनाओं को समझो by ३_१४ विक्षिप्त अदिती
एक निरीक्षणः
In reply to एक निरीक्षणः by प्यारे१
विकेट नं. १
In reply to विकेट नं. १ by ३_१४ विक्षिप्त अदिती
बळंचकर....? अपेक्षित लोळण.
In reply to भावनाओं को समझो by ३_१४ विक्षिप्त अदिती
संस्कृती...
In reply to भावनाओं को समझो by ३_१४ विक्षिप्त अदिती
नोकरी लागते तेव्हा, २४-२५ व्या वर्षी,
In reply to नोकरी लागते तेव्हा, २४-२५ व्या वर्षी, by गोगोल
असुंद्या की.
In reply to असुंद्या की. by धमाल मुलगा
ख्याक्क
In reply to आक्षेपार्ह... by प्रभाकर पेठकर
सहमत.
मुलास पत्र कधी येणार काय
In reply to मुलास पत्र कधी येणार काय by इंटरनेटस्नेही
मुलास पत्र....
हम्म...
पत्रोत्तरः
In reply to पत्रोत्तरः by कवितानागेश
अर्र, साधी सरळ आई होय...
In reply to अर्र, साधी सरळ आई होय... by ३_१४ विक्षिप्त अदिती
कुठल्याही नात्यात, एखादी
खर्चाच्या बाबतीतले सोडले तर
कुठेतरी वाचलेली प्रेमचंद
In reply to कुठेतरी वाचलेली प्रेमचंद by नितिन थत्ते
(No subject)
पत्र आवडलं
In reply to पत्र आवडलं by राजेश घासकडवी
... चंट पोरीचं पत्रही वाचायला
पत्र नाही आवडले
सॉरी! पटले नाही.
In reply to सॉरी! पटले नाही. by प्रियाली
समस
In reply to समस by Nile
समस-२
In reply to समस-२ by प्रियाली
समस - ३
In reply to समस - ३ by ३_१४ विक्षिप्त अदिती
समस-४
In reply to समस-४ by धमाल मुलगा
समस-५
In reply to समस-५ by एक
समस - ६
अवांतर
In reply to अवांतर by पंगा
शर्ट ??
In reply to शर्ट ?? by आनंदयात्री
:)
पत्र अजिबात आवडले नाही.
आजकाल मुली आईला असं पत्र
पत्र आवडलं.....कधीकधी असे
In reply to पत्र आवडलं.....कधीकधी असे by दैत्य
दैत्या, तुला अदितीचं काय
पत्र आवडले.
इन्टरेष्टिंग्
In reply to इन्टरेष्टिंग् by धनंजय
छान सुभाषित
In reply to छान सुभाषित by आनंदयात्री
व्यत्यास आणि पाल्हाळ
खाया
In reply to खाया by श्रावण मोडक
प्रकाटाआ.
लेखातील विचार पटले नाहीत
जिंदगी तेरे दर पर मै हजार
छान पत्र!