दिशाहीन विरोधी पक्ष?
युपीए-२ आले आणि डाव्यांशिवाय बनलेले हे सरकार बरेच काही करेल अशी आशा जागृत झाली. मात्र प्रत्यक्षात एकच नव्हे तर अनेक आघाड्यांवर सत्ताधारी कोंडीत सापडले. खरं तर ते तसे सापडले असते. मात्र सध्या विरोधी पक्षाने एखादा मुद्दा हाती घ्यावा आणि तो पूर्णत्त्वास न नेताच दुसरीकडे वळावे असे चालले आहे.
गेल्या काहि दिवसांत भ्रष्टाचारासंबीधी अनेक प्रकरणे उजेडात येऊ लागली. राष्ट्रकूल घोटाळा, आदर्श घोटाळा वगैरेंबरोबरच ३जी घोटाळ्याने तर भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात पुढे आला. (प्रथेप्रमाणे) विरोधी पक्ष आक्रमक झाला. जेपीसी साठी रान माजवले पण पुढे? जेपीसी नाही मिळाली तर लोकांमधे जाऊन आंदोलन करणार अश्या घोषणा झाल्या पण कसले काय? भ्रष्टाचाराविरूद्ध रान माजवून सरकारला पळता भुई थोडी करायची सोडून विरोधी पक्षांनी आपणहूनच प्रश्न सोडून दिला.
बरं पुढे अचानक कांदे आणि त्यापाठोपाठ भाज्या आणि शेवटी पेट्रोलचे भाव वाढले आणि महागाई विरूद्ध विरोधक आक्रमक होताहेत असं वाटलं. आपले थोर कृषीमंत्री तर बिंदास भाववाढ अटळ आहे वगैरे वक्तव्य करत असताना विरोधक अचानक शांत झाले.
याशिवाय लवासा, शेतकर्यांच्या आत्महत्या, तेलंगाणा वगैरे अनेक अंगांनी सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगण्याऐवजी आतापर्यंत विकासासाठी आक्रमक होतो आहे अशी अशा देणारा विरोधी पक्षाने पुन्हा एक'काश्मिरात झेंडा फडकवायचा' असे भावनात्मक आवाहन केले. अर्थातच महागाई, भ्रष्टाचार, शेतमालाला कमी भाव, चुकीची वितरण व्यवस्था वगैरेंवर सरकारचे आसन डळमळीत करू शकणारे प्रश्न सोडून विरोधी पक्षांचे काश्मिरातील झेंडे वगैरे भंपक आणि पोकळ भावनात्मक मुद्द्यांवर राजकारण सुरू करणे सरकारच्या पथ्यावरच पडते आहे.
तुम्हाला काय वाटते? विरोधी पक्ष दिशाहीन झाले आहेत का? का अजूनही विकासाचे राजकारण करू न इच्छिता ते मुद्दामहून भावनाप्रधान, पण दिवसअखेर काहिहि न मिळवून देणार्या हीन दिशेलाच जाऊ इच्छितात?
वाचन
9377
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
गृहीतक तपासणे इष्ट आहे
In reply to गृहीतक तपासणे इष्ट आहे by पंगा
दर पाच वर्षांनी जसे सरकार
In reply to दर पाच वर्षांनी जसे सरकार by ऋषिकेश
आणि सत्ता मिळाल्यावर?
लेखातील विचारांशी सहमत आहे.
In reply to लेखातील विचारांशी सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
प्रश्न प्राथमिकतेचा
In reply to प्रश्न प्राथमिकतेचा by ऋषिकेश
ऋ, प्राथमिकता ही राष्ट्राच्या
In reply to लेखातील विचारांशी सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
अजुन किंचित भर
चुक विरोधी पक्षाची नाही आहे.
In reply to चुक विरोधी पक्षाची नाही आहे. by मृत्युन्जय
अपयशी सरकार
काँग्रेस हितचिंतक थत्तेचाचा ...
छान विषय...
In reply to छान विषय... by प्रसन्न केसकर
सहमत मात्र..
In reply to सहमत मात्र.. by ऋषिकेश
दादा...
In reply to दादा... by प्रसन्न केसकर
वा!
थोडा वेगळा प्रश्न...
In reply to थोडा वेगळा प्रश्न... by विकास
हम्म्म प्रतिसाद आवडला.. सहमत
उत्तम चर्चा
In reply to उत्तम चर्चा by सहज
सदनातील दंग्याकडे...
नैतिक बळ
बेगडी देशप्रेम
छान आणि समयोचित धागा
In reply to छान आणि समयोचित धागा by सुधीर काळे
धन्यवाद काळेकाका...
In reply to धन्यवाद काळेकाका... by प्रसन्न केसकर
किती वर्षें हे गुन्हेगार असे जामीनावर मोकाट हिंडणार आहेत?
In reply to किती वर्षें हे गुन्हेगार असे जामीनावर मोकाट हिंडणार आहेत? by सुधीर काळे
अनेक प्रश्न असतात...
In reply to अनेक प्रश्न असतात... by प्रसन्न केसकर
बा प रे !! डें ज र !!
In reply to बा प रे !! डें ज र !! by टारझन
:-(
In reply to :-( by सहज
बघू भविष्यकाळात काय दडून बसले आहे!
In reply to अनेक प्रश्न असतात... by प्रसन्न केसकर
मिडियाचे हितसंबंध
In reply to मिडियाचे हितसंबंध by क्लिंटन
प्रायव्हेट ट्रीटीज...
In reply to प्रायव्हेट ट्रीटीज... by प्रसन्न केसकर
हितसंबंध
In reply to हितसंबंध by नितिन थत्ते
बरोबर पण अर्धवट...
In reply to बरोबर पण अर्धवट... by प्रसन्न केसकर
+१
भाववाढीबाबत भाजपला दोष नाही
भाववाढीला काही प्रमाणात "
अशा वेळी सर्व माध्यमांनी खूप बोभाटा करायला हवा!