नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्यांनी केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते. अशावेळी सतत ऑफिसचे काम / बॉसची नजर / इतर कामे / प्रवास अशा अनंत अडचणीतुन मार्ग काढून त्यांना लॉग-इन होउन आपला धागा पुन्हा वर आणावा लागतो. बर्याचदा तर धाग्यावर एकही प्रतिक्रीया आलेली नसल्याने प्रतिक्रीयेला उत्तर म्हणुन अथवा धन्यवाद म्हणुन देखील धागा वर न काढता येण्याची अडचण उदभवते, प्रतिसादासाठी टाहो फोडावा लागतो. बर्याचदा स्वतःच्याच दुसर्या एखाद्या आयडीची मदत घ्यावी लागते. तर कधी आपल्यासारखाच एक आपदग्रस्त पकडून स्वतःच्या धाग्यावर एकमेकांचे मनोरंजन करावे लागते.* (ह्या वाक्याचे श्रेय मकी)
अशा सदस्यांना ह्या सर्व अडचणीतुन मुक्ती देण्यासाठी 'परा-नाना प्रोत्साहन मंडळातर्फे' 'शेड्युल प्रतिक्रीया' हे पॅकेज सादर करण्यात येत आहे. ह्या पॅकेजमुळे आपल्या अनेक अडचणी अगदी सहज सुटू शकतील आणि लेखनाला प्रतिक्रीयांचा पाऊस पडेल तो वेगळाच. म्हणजे अगदी 'एक दाम दो काम' असे झाले.
पॅकेजची वैशिष्ठे :-
१) ठरलेल्या शेड्युल नुसार आपल्या धाग्यावर एक अथवा लागोपाठ २ प्रतिक्रीया दिल्या जातील.
२) धाग्यावर प्रतिक्रीया देताना फोटु अथवा वर्तमानपत्रातील दुवे वापरल्यास त्याचे वेगळे चार्ज पडणार नाहीत.
३) आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
४) आपल्या धाग्यावर प्रतिक्रीया देताना आपल्याच जुन्या लेखांचे संदर्भ वारंवार देण्यात येतील. जेणेकरुन ते लेख देखील वर आणण्यास मदत होईल.
५) एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
६) चलचित्र (व्हिडो) प्रतिक्रीया उपलब्ध. (मागणी नोंदवताना सजहराव का मदनबाण ह्याचा योग्य निर्देश द्यावा)
७) धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच नाना-परा-पुप्या-धम्या असा चतुरंगी सामना देखील खेळवता येईल.
८) मिभो,घासुगुर्जी,प्रभुगुर्जी,इंद्र पवार अशा अभ्यासु + गर्दीखेचु प्रतिक्रीया रास्त दरात उपलब्ध.
९) आपल्या धाग्यावर दंगा होउन पोपकॉर्नची दुप्पट विक्री झाल्यास नफ्यातील काही हिस्सा आपणास देण्यात येईल.
१०) Give and Take प्रतिक्रीया उपलब्ध.
काही अटी :-
१) धाग्याचे काश्मिर करावयाचे असल्यास स्वतंत्र चार्जेस पडतील.
२) तुमच्या धाग्यावर कायम तुमची खिल्ली उडवणार्या सदस्यास नडावयाचे असल्यास त्याचे दर सदस्याच्या मिपासदस्यकालावधीवर अवलंबुन असतील.
३) संपादकांशी वैर घेतले जाणार नाही.
४) स्त्रिया / धर्म / लता मंगेशकर / भिमसेन जोशी इत्यादी विषयावर टिपणी करावयाची असल्यास प्रत्येक ओळीला वेगळा दर पडेल.
५) धाग्यावर वैयक्तिक वाद-विवाद घडवायचे असल्यास समोरची पार्टी जे दर लावेल ते ग्राहकास बंधनकारक असतील.
६) मिभोकाका , इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया हव्या असल्यास चार दिवस आगोदर मागणी नोंदवावी. डोन्रावांसाठी ८ दिवस आधी.
७) मिभोकाका व प्रभुगुर्जी ह्यांच्या प्रतिक्रीयांची जबाबदारी सर्वस्वी लेखकाची राहिल. धाग्यालाच विरजण लागल्यास अथवा धागा क्रिप्टिक बनल्यास आम्ही जबाबदार असणार नाही.
८) अवलिया यांच्या प्रतिक्रीयांना कायमच पंख लागत असल्याने त्या प्रतिक्रीयांचे स्क्रिन शॉट पुरावा म्हणुन पाठवले जातील.
९) कलंदर आणि विक्षिप्त प्रतिक्रीया हव्या असल्यास दोन दिवस आधी कळवावे. कलंदर प्रतिक्रीयेमध्ये स्वतःच्या उद्योगांचे फोटु देणे, माहिती देणे असे प्रकार घडून धागा हायजॅक झाल्यास आम्ही जबाबदार नाही. हेच नियम डॉन्रावांच्या प्रतिक्रीयेला देखील लागु.
१०) डॉन्राव आणि इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया ह्या सहसा धाग्यापेक्षा मोठ्या असल्याने, त्यांच्या प्रतिक्रीया धाग्यावर हव्या असल्यास धाग्याचा कच्चा मजकुर ४ ते ८ दिवस आगोदर पाठवुन ठेवावा.
मग आता विचार कसला करताय ? उचला किबोर्ड आणि टंका नाना अथवा पराला व्यनी.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
28169
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा. काय भन्नाट योजना (योजनेला मराठीत scheme म्हणतात.) आहे.
धागा छाण आहे...
In reply to वा. काय भन्नाट योजना (योजनेला मराठीत scheme म्हणतात.) आहे. by चिंतामणी
नुकत्याच हाती आलेल्या
In reply to वा. काय भन्नाट योजना (योजनेला मराठीत scheme म्हणतात.) आहे. by चिंतामणी
कशासाठी नोबेल? साहित्यासाठी
In reply to नुकत्याच हाती आलेल्या by जाई अस्सल कोल्हापुरी
मस्त.
चान चान .....................
भलतंच खर्चिक प्रकरण दिसतंय
आणखी एक अट घाला त्यात !!
उद्योजकताविकास!
मोकळी जागा काय सांगते?
In reply to उद्योजकताविकास! by सहज
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो ठ्ठो
धागा
मिपा सेन्सेक्स २५,००० च्या वर
ए मेल्या...
+१
In reply to ए मेल्या... by मस्त कलंदर
त्रिवार निषेध!!!
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या निषेधाला कचराकुंडी
In reply to त्रिवार निषेध!!! by चिर्कुट
हे हे हे..
In reply to तुमच्या निषेधाला कचराकुंडी by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे म्हणजे पाकिस्तानच्या विविध
In reply to हे हे हे.. by चिर्कुट
+१
In reply to हे म्हणजे पाकिस्तानच्या विविध by सुहास..
कलंदर
In reply to ए मेल्या... by मस्त कलंदर
मितानशी सहमती! शिवायः १.
किबोर्ड उचलला.. मग व्यनी
पैसे पाठवुन देणे ...
असे नकली प्रतिसाद मिळणार
In reply to पैसे पाठवुन देणे ... by छोटा डॉन
;-)
In reply to असे नकली प्रतिसाद मिळणार by Nile
तुला काय आता ट्रेलरमध्येच
In reply to असे नकली प्रतिसाद मिळणार by Nile
किती पैसे जमा झाले रे आत्ता
आयपीओ
In reply to किती पैसे जमा झाले रे आत्ता by अवलिया
बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमा
बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमा
In reply to बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमा by सुहास..
असुर आणी पुण्याचे पेशवे
In reply to बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमा by असुर
पुपे आणि परा यांच्याशी
In reply to असुर आणी पुण्याचे पेशवे by सुहास..
मस्त कलंदर आणी निखील
In reply to पुपे आणि परा यांच्याशी by असुर
"निदेंशी सहमत" असल्याचा खोटा
In reply to मस्त कलंदर आणी निखील by सुहास..
मी पराशी एकदम असहमत!!!
In reply to "निदेंशी सहमत" असल्याचा खोटा by असुर
मी रंगाशेठशी अगदी सहमत
In reply to मी पराशी एकदम असहमत!!! by मस्त कलंदर
मक पराशी असहमत असल्याच्या
In reply to मी पराशी एकदम असहमत!!! by मस्त कलंदर
दरपत्रक
तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स
In reply to दरपत्रक by इन्द्र्राज पवार
होल्ले होल्ले
In reply to तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
बल्ले बल्ले
In reply to होल्ले होल्ले by इन्द्र्राज पवार
ऑ ऑ ऑ ?? नुसते बघुन बघुन ??
In reply to बल्ले बल्ले by ३_१४ विक्षिप्त अदिती
इन्द्रा नक्कीच पुराणपुरूष*
In reply to ऑ ऑ ऑ ?? नुसते बघुन बघुन ?? by परिकथेतील राजकुमार
मग आता लेख लिहायला सांगायचे
In reply to इन्द्रा नक्कीच पुराणपुरूष* by ३_१४ विक्षिप्त अदिती
"भटिंडाच्या सीतेला अनावृत्त
In reply to मग आता लेख लिहायला सांगायचे by परिकथेतील राजकुमार
भटिंडा
In reply to "भटिंडाच्या सीतेला अनावृत्त by Nile
आताश्या फार चुका व्हायला
In reply to भटिंडा by मिसळभोक्ता
चाळशी
In reply to आताश्या फार चुका व्हायला by ३_१४ विक्षिप्त अदिती
वय विसरून तुम्ही मिपा (आणि
In reply to चाळशी by मिसळभोक्ता
मिपा वाचताना चाळशी
In reply to चाळशी by मिसळभोक्ता
आताश्या फार चुका व्हायला
In reply to भटिंडा by मिसळभोक्ता
तुमचा पार दु:शासन झाला हो
In reply to भटिंडा by मिसळभोक्ता
'आपल्या' विनायकाला? चालू देत,
In reply to मग आता लेख लिहायला सांगायचे by परिकथेतील राजकुमार
आम्ही देऊच प्रतिसाद, शेवटी
In reply to 'आपल्या' विनायकाला? चालू देत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
तिला एकटीलाच का म्हणून???
In reply to आम्ही देऊच प्रतिसाद, शेवटी by परिकथेतील राजकुमार
अगं, त्या पर्याकडून एक
In reply to तिला एकटीलाच का म्हणून??? by मस्त कलंदर
तीन आकड्यांची जादू....!
In reply to अगं, त्या पर्याकडून एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हन्त हन्त!
In reply to अगं, त्या पर्याकडून एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
मग काय फक्त लग्न झालेल्या
In reply to हा हन्त हन्त! by धमाल मुलगा
तुम क्या जानो? कुई! हाय
In reply to मग काय फक्त लग्न झालेल्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
उई उई उई!
In reply to तुम क्या जानो? कुई! हाय by धमाल मुलगा
पीसी आहे का काय?
In reply to मग काय फक्त लग्न झालेल्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे... तो त्याचा प्रश्न
In reply to पीसी आहे का काय? by पैसा
आता
In reply to अरे... तो त्याचा प्रश्न by धमाल मुलगा
आम्ही उगीच निमित्तमात्र!!!
In reply to हा हन्त हन्त! by धमाल मुलगा
त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज
In reply to दरपत्रक by इन्द्र्राज पवार
शोध....!!
In reply to त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज by Nile
लेट नाईट किंवा अरलि मारनिंग प्रतिक्रिया सरविस (भा.प्र.वे.)
हाहाहा लेख आवडला.
आम्ही idea दिली, आम्हाला किती
मस्त आहे! गुड!
दोन प्रश्न
सदर योजनेखाली सदस्यांकडून
In reply to दोन प्रश्न by नितिन थत्ते
+१
In reply to सदर योजनेखाली सदस्यांकडून by परिकथेतील राजकुमार
योजनेच्या मजकुरात पुढील
In reply to सदर योजनेखाली सदस्यांकडून by परिकथेतील राजकुमार
- 'एक दाम दो काम'
- आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
- एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
- धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच
(स्वसंपादनाची सोय नसल्याने डीलकथेतील कॅशकुमार यांना मजकूर बदलता येणार नाही :) ) द केस रेस्टस् हिअर. अधिक माहितीसाठी न्यायलयाच्या अपमानाचा खटला केव्हाच डिसमिस झाला आहे. :) >>मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे यातील दुसरा भाग मान्य असला तरी पहिला भाग मान्य नाही सबब पूर्ण वाक्य रद्द समजण्यात येत आहे. (वकील)"मराठी माणसाचे पाय खेचायची वृत्ती"
In reply to योजनेच्या मजकुरात पुढील by नितिन थत्ते
इतिहास
In reply to "मराठी माणसाचे पाय खेचायची वृत्ती" by अवलिया
बरोबर आहे. तो प्रतिसाद आपण
In reply to इतिहास by नितिन थत्ते
आम्हीदेखील पूर्वी काही करू
In reply to इतिहास by नितिन थत्ते
योजनेच्या मजकुरात पुढील
In reply to योजनेच्या मजकुरात पुढील by नितिन थत्ते
>>>> येथे धागे वर राहतील याचे
In reply to दोन प्रश्न by नितिन थत्ते
ट्यार्पी वाढवण्यात
अरेरे
In reply to ट्यार्पी वाढवण्यात by Nile
थत्ते चाचा हे राण्यांसारखी
In reply to अरेरे by नितिन थत्ते
चेक ?
In reply to थत्ते चाचा हे राण्यांसारखी by परिकथेतील राजकुमार
असे चेक ने पेमेंट करत बसलास
In reply to चेक ? by छोटा डॉन
आता आलाच आहात पुण्यात तर
In reply to असे चेक ने पेमेंट करत बसलास by परिकथेतील राजकुमार
हरकत नाही
In reply to असे चेक ने पेमेंट करत बसलास by परिकथेतील राजकुमार
अड्ड्यात सामील केलेले
In reply to हरकत नाही by छोटा डॉन