मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाकरांसाठी खुषखबर

परिकथेतील राजकुमार · · जनातलं, मनातलं
नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्यांनी केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्‍या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते. अशावेळी सतत ऑफिसचे काम / बॉसची नजर / इतर कामे / प्रवास अशा अनंत अडचणीतुन मार्ग काढून त्यांना लॉग-इन होउन आपला धागा पुन्हा वर आणावा लागतो. बर्‍याचदा तर धाग्यावर एकही प्रतिक्रीया आलेली नसल्याने प्रतिक्रीयेला उत्तर म्हणुन अथवा धन्यवाद म्हणुन देखील धागा वर न काढता येण्याची अडचण उदभवते, प्रतिसादासाठी टाहो फोडावा लागतो. बर्‍याचदा स्वतःच्याच दुसर्‍या एखाद्या आयडीची मदत घ्यावी लागते. तर कधी आपल्यासारखाच एक आपदग्रस्त पकडून स्वतःच्या धाग्यावर एकमेकांचे मनोरंजन करावे लागते.* (ह्या वाक्याचे श्रेय मकी) अशा सदस्यांना ह्या सर्व अडचणीतुन मुक्ती देण्यासाठी 'परा-नाना प्रोत्साहन मंडळातर्फे' 'शेड्युल प्रतिक्रीया' हे पॅकेज सादर करण्यात येत आहे. ह्या पॅकेजमुळे आपल्या अनेक अडचणी अगदी सहज सुटू शकतील आणि लेखनाला प्रतिक्रीयांचा पाऊस पडेल तो वेगळाच. म्हणजे अगदी 'एक दाम दो काम' असे झाले. पॅकेजची वैशिष्ठे :- १) ठरलेल्या शेड्युल नुसार आपल्या धाग्यावर एक अथवा लागोपाठ २ प्रतिक्रीया दिल्या जातील. २) धाग्यावर प्रतिक्रीया देताना फोटु अथवा वर्तमानपत्रातील दुवे वापरल्यास त्याचे वेगळे चार्ज पडणार नाहीत. ३) आपला धागा दुसर्‍या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल. ४) आपल्या धाग्यावर प्रतिक्रीया देताना आपल्याच जुन्या लेखांचे संदर्भ वारंवार देण्यात येतील. जेणेकरुन ते लेख देखील वर आणण्यास मदत होईल. ५) एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील. ६) चलचित्र (व्हिडो) प्रतिक्रीया उपलब्ध. (मागणी नोंदवताना सजहराव का मदनबाण ह्याचा योग्य निर्देश द्यावा) ७) धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच नाना-परा-पुप्या-धम्या असा चतुरंगी सामना देखील खेळवता येईल. ८) मिभो,घासुगुर्जी,प्रभुगुर्जी,इंद्र पवार अशा अभ्यासु + गर्दीखेचु प्रतिक्रीया रास्त दरात उपलब्ध. ९) आपल्या धाग्यावर दंगा होउन पोपकॉर्नची दुप्पट विक्री झाल्यास नफ्यातील काही हिस्सा आपणास देण्यात येईल. १०) Give and Take प्रतिक्रीया उपलब्ध. काही अटी :- १) धाग्याचे काश्मिर करावयाचे असल्यास स्वतंत्र चार्जेस पडतील. २) तुमच्या धाग्यावर कायम तुमची खिल्ली उडवणार्‍या सदस्यास नडावयाचे असल्यास त्याचे दर सदस्याच्या मिपासदस्यकालावधीवर अवलंबुन असतील. ३) संपादकांशी वैर घेतले जाणार नाही. ४) स्त्रिया / धर्म / लता मंगेशकर / भिमसेन जोशी इत्यादी विषयावर टिपणी करावयाची असल्यास प्रत्येक ओळीला वेगळा दर पडेल. ५) धाग्यावर वैयक्तिक वाद-विवाद घडवायचे असल्यास समोरची पार्टी जे दर लावेल ते ग्राहकास बंधनकारक असतील. ६) मिभोकाका , इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया हव्या असल्यास चार दिवस आगोदर मागणी नोंदवावी. डोन्रावांसाठी ८ दिवस आधी. ७) मिभोकाका व प्रभुगुर्जी ह्यांच्या प्रतिक्रीयांची जबाबदारी सर्वस्वी लेखकाची राहिल. धाग्यालाच विरजण लागल्यास अथवा धागा क्रिप्टिक बनल्यास आम्ही जबाबदार असणार नाही. ८) अवलिया यांच्या प्रतिक्रीयांना कायमच पंख लागत असल्याने त्या प्रतिक्रीयांचे स्क्रिन शॉट पुरावा म्हणुन पाठवले जातील. ९) कलंदर आणि विक्षिप्त प्रतिक्रीया हव्या असल्यास दोन दिवस आधी कळवावे. कलंदर प्रतिक्रीयेमध्ये स्वतःच्या उद्योगांचे फोटु देणे, माहिती देणे असे प्रकार घडून धागा हायजॅक झाल्यास आम्ही जबाबदार नाही. हेच नियम डॉन्रावांच्या प्रतिक्रीयेला देखील लागु. १०) डॉन्राव आणि इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया ह्या सहसा धाग्यापेक्षा मोठ्या असल्याने, त्यांच्या प्रतिक्रीया धाग्यावर हव्या असल्यास धाग्याचा कच्चा मजकुर ४ ते ८ दिवस आगोदर पाठवुन ठेवावा. मग आता विचार कसला करताय ? उचला किबोर्ड आणि टंका नाना अथवा पराला व्यनी.

वाचने 28168 वाचनखूण प्रतिक्रिया 139

In reply to by चिंतामणी

मी-सौरभ 11/10/2010 - 18:39
ह्या सोयी पुरवण्यासाठी च्या वेळा नाहीयेत ;) पुणेकर असून वेळ लिहिलेला नाही असे कसे???

In reply to by चिंतामणी

जाई अस्सल कोल्हापुरी 12/10/2010 - 02:35
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार परा यांना भन्नाट स्किम्च्या आयड्यासाठी साठी"नोबेल" जाहिर करणेत आले आहे.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

मृत्युन्जय 12/10/2010 - 10:59
कशासाठी नोबेल? साहित्यासाठी की शांतीसाठी? (कदाचित अर्थशास्त्रासाठी सुद्धा असु शकेल)

ज्ञानेश... 11/10/2010 - 12:33
व्यनि केला आहे. कृपया दरपत्रक लावावे.

सूड 11/10/2010 - 12:40
आपले धागे एखाद्या सदस्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे असतील, तर त्यास सर्वस्वी धागा काढणारा सभासद जबाबदार असेल, मंडळ नाही.

In reply to by सहज

सर्वसाक्षी 11/10/2010 - 13:19
सहजराव, तरुण आणि धंदे या दोन शब्दांमध्ये बरीच मोकळी जागा आहे, यामागचे रहस्य काय? एक विनंती - 'व्यवसाय' वा 'उद्यमशिलता' म्हणा हो, 'धंदे' म्हणजे जरा.... असो. कलोआ साक्षी

ब्रिटिश टिंग्या 11/10/2010 - 12:43
फाट्यावर मारला आहे! (कोणाच्या हे विचारुन स्वत:चा अपमान करुन घेउ नये)

मस्त कलंदर 11/10/2010 - 12:54
तर कधी आपल्यासारखाच एक आपदग्रस्त पकडून स्वतःच्या धाग्यावर एकमेकांचे मनोरंजन करावे लागते.*
हे मी कुठे म्हटले होते रे???? चिसौंकां परा, नसती श्रेयं देऊ नका हो.
कलंदर प्रतिक्रीयेमध्ये स्वतःच्या उद्योगांचे फोटु देणे, माहिती देणे असे प्रकार घडून धागा हायजॅक झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
जळजळ पोचली. बाकी, या धाग्याने शंभरी पार केल्यास मिभोकाका आणि मी प्रतिसादशतक पार करणारा अभिनंदनपर धागा काढू.

In reply to by मस्त कलंदर

३_१४ विक्षिप्त अदिती 11/10/2010 - 13:08
चिरकुट आणि सौंदर्यप्रेमी कुजकटकुमारांची जळजळ या धाग्यातून ओतप्रोत दिसून येत आहे.
कलंदर आणि विक्षिप्त प्रतिक्रीया हव्या असल्यास दोन दिवस आधी कळवावे.
तरीही त्या मिळणार नाहीत कारण कलंदर आणि विक्षिप्त यांनी केकपाककुशल मिपाकर स्वाती यांच्या समोर केकवर हात ठेवून शपथ वाहिल्याप्रमाणे त्या आता सर्व पुणेकरांना .... हॅ हॅ हॅ तरीही परा हे आमचे पूर्वीचे कंपूतील मित्र असल्यामुळे आम्ही स्वतः या लेखाला चान चान म्हणत आहोत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिर्कुट 11/10/2010 - 16:35
>>चिरकुट आणि सौंदर्यप्रेमी कुजकटकुमारांची जळजळ या धाग्यातून ओतप्रोत दिसून येत आहे. विनाकारण जळजळीसारखे आरोप करून आमचे नाव बदनाम केल्याबद्दल आणि आमचे नेहमीचे सिंहासन (वरून तिसरी फांदी, मिपाचे सुप्रसिद्ध झाड) सोडून प्रतिक्रिया द्यायला प्रवृत्त केल्याबद्दल ३_१४ यांचा तीव्र शब्दांत निषेध!!! :-) बाकी लेख मात्र बेष्ट..आवड्या!! (ब्याक टू झाड) चिर्कुट

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिर्कुट 11/10/2010 - 17:41
>>तुमच्या निषेधाला कचराकुंडी दाखवली आहे हे म्हणजे पाकिस्तानच्या विविध काड्यांचा भारताने निषेध केल्यावर पाकिस्तानची जी प्रतिक्रिया असते तसं वाटलं.. :-)

In reply to by चिर्कुट

हे म्हणजे पाकिस्तानच्या विविध काड्यांचा भारताने निषेध केल्यावर पाकिस्तानची जी प्रतिक्रिया असते तसं वाटलं.. >>> हा हा हा !!चिरक्या , लवकरच तु आपल्या कर्माची फळ भोगशील असा आशीर्वाद देत आहोत.

In reply to by मस्त कलंदर

चिंतामणी 12/10/2010 - 09:04
बाकी, या धाग्याने शंभरी पार केल्यास मिभोकाका आणि मी प्रतिसादशतक पार करणारा अभिनंदनपर धागा काढू. काढला का नवीन धागा?????? सेंचुरी झाली. आज बहुधा सचीन आणि परा दोघेही ड्बल सेंचुरी मारणार.

विंजिनेर 11/10/2010 - 12:59
मितानशी सहमती! शिवायः १. दिवाळी-धमाका योजनेखाली सवलतीचे दर आकारण्यात यावे(जसे महापालिका दिवाळीत सवलतीच्या दरात बुंदी लाडू/चिवडा इ. स्वस्तात विकते तसेच). २. तुमच्या फायद्याचा काही % भाग लोककल्याणासाठी (म्हणजे सौं.फु. च्या नवीन शाखेच्या/नूतनीकरणासाठी) देण्यात यावा. ३. श्क्येड्यूल ऐवजी शेड्युल असा म्हर्‍हाठी आणि देसी शब्द वापरून तुम्ही हिरव्या माजाची कोंडी केली आहे त्या बद्दल एक निषेध. संपादकांकडून योग्य ती दुरूस्ती करण्यात यावी.

छोटा डॉन 11/10/2010 - 14:07
श्री. परा / नाना, आपल्याशी झालेल्या करारानुसार ही केवळ नमुन्यादाखल प्रतिक्रिया देतो आहे. सविस्तर वाचण्यासाठी आधी पेमेंट करा ... बाकी कल्पना उत्तम, निदान ७०-८० प्रतिसादांना मरण नाही. आम्ही आहोतच, बाकी चालु द्यात ! - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

असे नकली प्रतिसाद मिळणार असतील तर बंद करा लेको हे दुकान! साला डान्याचे प्रतिसाद छापायचे असतील तर किमान वीस पंचवीस ओळीतरी छापा. उद्या इन्द्रांचे एकोळी प्रतिसाद द्याल, परवा मिभोंचे चान चान प्रतिसाद द्याल लेको! देणार असाल तर अस्सल द्या नाय तर आवरा तुमचं चंबुगबाळ आता.

In reply to by अवलिया

मिसळभोक्ता 11/10/2010 - 22:46
आयपीओ होईल तेव्हा प्रेंड्स-अँड-फ्यामिली डिस्काउंट द्यायला विसरू नका शेठ. उपक्रमास शुभेच्छा. (मनातः साला, माझी आयड्या ढापतो, आणि पैशे कमावतोस का ?)

In reply to by सुहास..

बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमाल मुलगा,मेघवेडा,प्रकाश घाटपांडे, प्रसन्नदा आणि सुहास यांच्याशी सहमत! --असुर

In reply to by सुहास..

"निदेंशी सहमत" असल्याचा खोटा दावा केल्याबद्दल सुहास यांचा जाहीर णीसेद!! :-) बाकी या बाबतीत मेव्याशी सहमत!! --असुर

In reply to by मस्त कलंदर

असुर 11/10/2010 - 19:22
मक पराशी असहमत असल्याच्या विधानाशी सहमत! परंतु मी स्वतः पराशी सहमत असल्याने मकीच्या असहमतीशी असहमत! थोडक्यात, मकीच्या विधानाशी अंशत: सहमत, बराचसा असहमत! --असुर

इन्द्र्राज पवार 11/10/2010 - 14:48
धागा वाचून माझी तर पंचाईत नव्हे तर चक्क जिल्हा परिषद झाली आहे. कारण 'किर्ती' ला जागायचे असेल तर एकोळी प्रतिक्रिया देऊन चालणार नाही, अन् दिली तर शेअर बाजार गडगडला म्हणून सदस्य धागाकर्त्याचे जानवे धरणार.....त्यांच्या जानव्याची फिकीर खुद्द प.रा. ना असेल नसेल पण ते इतके प्रेम आमच्यावर करतात म्हटल्यावर काहीबाही लिहून (कोल्हापुरी भाषेत ~ रश्श्यात पाणी वाढवून...) ट्रेड मार्क प्रतिक्रिया दिली पाहिजे. "...महत्वाची अडचण म्हणजे केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्‍या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते...." ~~ हे निरिक्षण बाकी फारच नेमके असल्याने आणि अपेक्षित (संख्येने नव्हे....तर मनात जे सदस्य आहेत त्यांच्या) प्रतिक्रिया आल्या नाहीत तर, खरंच थोडेसे/वा बरेच, हिरमुसलेपण येतेच येते. पण ठीक आहे, सदस्यसंख्या दिवसेदिवस वाढत आहे आणि त्यामुळे धाग्यांची संख्याही त्यानुसार वाढणार असल्याने 'आपला धागा दोन नंबरच्या पानावर गेला' म्हणण्यातही काही अर्थ नाही. मग असे जर होऊ नये असे वाटत असेल तर श्री.प.रा. यांच्या 'रामबाण जडीबुटी' चा असर कामी येईल यात तीळमात्र संदेह नाही. रोखठोक दरपत्रक अजून दिसत नाही, पण ज्यावेळी होईल आणि व्यवसायाची अंमलबजावणी सुरू होईल, त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज अकौंटवर तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स दिसायला लागेल अशी आशा आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

३_१४ विक्षिप्त अदिती 11/10/2010 - 14:53
तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स दिसायला लागेल अशी आशा आहे.
याला म्हणतात नीच विचार ... अरे किमान विचारतरी मोठा करा. Low aim is crime, Indra!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इन्द्र्राज पवार 11/10/2010 - 16:19
अगं तसं नाही.... ते आशाताईंचं एक प्रसिद्ध गाणं आहे ना..."जरा होल्ले होल्ले चलो मोरे साजना...", त्याच धर्तीवर सेव्हिंग्ज अकौंटही होल्ले होल्लेच जावू दे....उगाच तीनवरून एका रात्रीत पाच आकडी झाला तर त्या बिचार्‍या भटिंडावालीलाच चक्कर यायची ना. म्हणून...! "Low aim is crime...." ~~ Definitely, I agree, but in these days let the aim starts walking in first place. (बघं, यालाच म्हणतात दूरदृष्टी ठेवून पावले टाकणे..) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

३_१४ विक्षिप्त अदिती 11/10/2010 - 18:42
बल्ले बल्ले नव्हे चांगभले म्हणा! इन्द्रा, भटिंडेवालीला चक्करपण ... वा, वा, चान, चान!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

३_१४ विक्षिप्त अदिती 11/10/2010 - 18:48
इन्द्रा नक्कीच पुराणपुरूष* असणार! ;-) * आठवा पुराणातल्या** चित्रविचित्र कथा! **पुराण म्हणजे वेद, पुराण, आणखी काही ज्यात काहीही अतर्क्य कथा असतात ते सगळं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

परिकथेतील राजकुमार 11/10/2010 - 18:51
मग आता लेख लिहायला सांगायचे का आपल्या विनायकाला ? 'पांडव कोल्हापुरात'.

In reply to by मिसळभोक्ता

बिपिन कार्यकर्ते 12/10/2010 - 09:48
मिपा वाचताना चाळशी विसरलो.
मटा वाचताना नाही विसरत हो तुम्ही चाळशी!!! काय?

In reply to by परिकथेतील राजकुमार

३_१४ विक्षिप्त अदिती 11/10/2010 - 18:55
'आपल्या' विनायकाला? चालू देत, चान चान!! आम्ही देऊच प्रतिसाद, शेवटी सुपारी आणि उत्पन्नाचा सवाल आहे ना!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

परिकथेतील राजकुमार 11/10/2010 - 18:57
आम्ही देऊच प्रतिसाद, शेवटी सुपारी आणि उत्पन्नाचा सवाल आहे ना!!!
चान चान. किती समंजस मुलगी आहेस तु. लोक आपले उगाच काय बाय बोलतात हो. सहजकाका आले की तुला पुन्हा एकदा एक मस्तानी फिक्स.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इन्द्र्राज पवार 11/10/2010 - 19:45
अदिती (दीर्घ 'ती'.... र्‍हस्व नव्हे...) जवळ असलेल्या कल्पना-कंपनी पतंगाच्या भरार्‍या पाहून मी अहिल्येसारखी शिळा झालोय...! नशीब भटिंडा बँकवालीची ओळख ज्या मित्राने करून दिली त्याला मराठी संस्थळावरील घडामोडी समजत नाही....भले तो कितीही आयटी प्रवीण असो....अन्यथा माझी धडगत नव्हती. श्री.प.रा. ~ काढून टाका माझे नाव त्या संभाव्य 'कामगारां'च्या यादीतून आणि डॉन्रावांवरच भागवा. मी राहतो तीन आकड्यातच समाधानी. इन्द्रा

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धमाल मुलगा 11/10/2010 - 19:56
धर्म बुडाला हो, धर्म बुडाला... काय ह्या आजकालच्या पोरी..दोघीजणी मिळून संगनमतानं कोण्या एका मस्तानीसाठी झुरताहेत. छे छे छे!!!! हे वाचल्यावर आता आख्खा पिसी गोमुत्राने शुचिर्भूत करुन घ्यावयांस हवां.

In reply to by धमाल मुलगा

३_१४ विक्षिप्त अदिती 11/10/2010 - 20:06
मग काय फक्त लग्न झालेल्या पुरूषांनीच मस्तानीसाठी झुरावं काय? बाकी तुझा पीसी कॉफीनी शुचिर्भूत होतोच, आता गोमूत्र ... काय फरक पडतो त्याला बिचार्‍याला?

In reply to by धमाल मुलगा

३_१४ विक्षिप्त अदिती 11/10/2010 - 20:36
हाय कंबख्त तूने पी ही नहीं...तुम क्या जानों?
तू लग्नाबद्दल बोलतो आहेस का मस्तानीबद्दल? उई उई उई!

In reply to by धमाल मुलगा

मस्त कलंदर 11/10/2010 - 20:47
हे वाचल्यावर आता आख्खा पिसी गोमुत्राने शुचिर्भूत करुन घ्यावयांस हवां.
नाहीतरी तुला पीसी साफ करायला हाऊसकीपिंगच्या लोकांना (नक्की कुणाला ते उत्तर हवे असल्यास केवळ गरजूंना व्यनिमार्फत कळवले जाईल) बोलवायला कारणच हवं असतं ना!!! आम्ही उगीच निमित्तमात्र!!!

In reply to by इन्द्र्राज पवार

त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज अकौंटवर तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स दिसायला लागेल अशी आशा आहे.
बँकेतल्या भटिंडावालीला भेटायचे निमित्तच शोधा तुम्ही!

In reply to by Nile

इन्द्र्राज पवार 11/10/2010 - 16:25
"....बँकेतल्या भटिंडावालीला भेटायचे निमित्तच शोधा तुम्ही!...." ~~ होय हे कबूल; पण तिला आमच्यासारखा 'परच्युटन' नकोय तर एखाद्या जानी 'राजकुमारा'सारखा 'सॉलिड' खातेदार हवाय; अन् तोही पुण्यनगरीतील किंवा मुंबापुरीतील. तो सध्या मी शोधतोय. "तुका म्हणे उरलो उपकारापुरता...." असाच आमचा सध्या संक्रमणकाल चालू आहे...नाईल. इन्द्रा
लेट नाईट किंवा अरलि मारनिंग प्रतिक्रिया सरविस ठेवनार असाल तर मी उमेदवार व्ह्यायला तयार हाय. म्या आतापतुर फक्त प्रतिक्रिया आनि प्रतिक्रियाच देत आलोय. ४७ आठवड्याचा हितला अनुभव हाय आनि वर रिकामटेक्डापन हाय. पटत आसल त व्य नी करा

नितिन थत्ते 11/10/2010 - 15:44
१. सदर योजनेखाली सदस्यांकडून काही रक्कम मागितली जात आहे. प्रशासनाला हे मंजूर आहे का? २. येथे धागे वर राहतील याचे उपाय करण्याच्या योजनांविषयी लिहिले आहे. इंचाइंचाने वर येणारे धागे फुटाफुटाने खाली घालवण्याचे काही उपाय आहेत का?

In reply to by नितिन थत्ते

परिकथेतील राजकुमार 11/10/2010 - 15:52
सदर योजनेखाली सदस्यांकडून काही रक्कम मागितली जात आहे. प्रशासनाला हे मंजूर आहे का?
येथे रक्कम मागितल्याचा कुठे उल्लेख आहे हे थत्तेचाचांनी दाखवुन द्यावे अन्यथा आम्ही त्यांच्यावर अब्रुलुस्कानीनीचा खटला भरु. आधीच तुम्ही न्यायालयाचा अपमान केल्याचा एक खटला तुमच्यावर चालु आहे हे लक्षात घ्या. मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे, त्यांच्यावर भलते सलते आरोप करणे हेच थत्ते चाचांचे काम आहे. कृपया प्रशासनाने लक्ष घालुन माझ्यासारख्या मराठी तरुणाला न्याय द्यावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

३_१४ विक्षिप्त अदिती 11/10/2010 - 15:54
या प्रतिक्रियेत घाऊकपणे एका धर्माचा द्वेष आहे काय याचीही चौकशी करवून घे रे परा!

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 11/10/2010 - 16:02
योजनेच्या मजकुरात पुढील उल्लेख आहेत
  • 'एक दाम दो काम'
  • आपला धागा दुसर्‍या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
  • एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
  • धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच
(स्वसंपादनाची सोय नसल्याने डीलकथेतील कॅशकुमार यांना मजकूर बदलता येणार नाही :) ) द केस रेस्टस् हिअर. अधिक माहितीसाठी न्यायलयाच्या अपमानाचा खटला केव्हाच डिसमिस झाला आहे. :) >>मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे यातील दुसरा भाग मान्य असला तरी पहिला भाग मान्य नाही सबब पूर्ण वाक्य रद्द समजण्यात येत आहे. (वकील)

In reply to by अवलिया

नितिन थत्ते 11/10/2010 - 16:14
आम्हीदेखील पूर्वी काही करू पहात होतो तेव्हा पहिला खोडा घालणार्‍यांकडून हा आरोप व्हावा? अरेरे. पब्लिक काहीतरी इज शॉर्ट" असं काहीतरी म्हणतात ते खरेच आहे. (योजनेला विचारजंतांचा पाठिंबा मिळवून देण्याबाबत व्यनिने संपर्क साधावा).

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 11/10/2010 - 16:17
बरोबर आहे. तो प्रतिसाद आपण नीट वाचावा. आपल्या खोडसाळ पुर्वइतिहासामुळे तसा प्रतिसाद द्यावा लागला होता. आता असा पराचा काय इतिहास आहे की आपण त्याला नाउमेद करत आहात?

In reply to by नितिन थत्ते

सुहास.. 11/10/2010 - 16:19
आम्हीदेखील पूर्वी काही करू पहात होतो तेव्हा पहिला खोडा घालणार्‍यांकडून हा आरोप व्हावा? अरेरे. पब्लिक काहीतरी इज शॉर्ट" असं काहीतरी म्हणतात ते खरेच आहे. >>> वरील प्रतिसादात 'पूर्वी' एवजी 'फार पूर्वी' असे असावे . परिवर्तन संसार का नियम है !!- श्री संत सुहास बाबा (सेल्फ-डिक्लेयर्ड-सस्केसर टु जालिंदरबाबा)

In reply to by नितिन थत्ते

परिकथेतील राजकुमार 11/10/2010 - 16:27
योजनेच्या मजकुरात पुढील उल्लेख आहेत 'एक दाम दो काम' आपला धागा दुसर्‍या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल. एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील. धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच
पण इथे कुठेही रक्कम मागितलेली दिसत नाही. कशासाठी काय खर्च येईल ते देण्यात आलेले आहे. ते देखील 'रक्कम' हा शब्द वापरुन. देणे न देणे सर्वस्वी सदस्यावर अवलंबुन. उद्या मी तुम्हाला आमच्याकडे १०० रुपये डझन आंबे आहेत असे सांगीतले तर त्याचा अर्थ फक्त माहिती पुरवणे असा होतो. तुम्हाला १०० रुपये मागीतले असा होत नाही थत्ते चाचा. बाकी नानाशी सहमत आहे. मिपावर काही चांगले घडायला लागले की थत्ते चाचा लगेच कुरबुर चालु करतात.

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 11/10/2010 - 15:58
>>>> येथे धागे वर राहतील याचे उपाय करण्याच्या योजनांविषयी लिहिले आहे. इंचाइंचाने वर येणारे धागे फुटाफुटाने खाली घालवण्याचे काही उपाय आहेत का? अरेरे ! एका स्वतःला विचारस्वातंत्र्याचा कैवारी म्हणवणार्‍या एका सदस्याकडुन विचारांची गळचेपी होत आहे आणि संपादक मंडळ शांतपणे कशावर तरी काहीतरी .. हो तेच ते..हातावर हात धरुन बसले आहे.. हा हंत ! @परा - थत्ते मियांच्या प्रतिसादांना असहमतीचे प्रतिसाद असा पण एक मुद्दा घे..

Nile 11/10/2010 - 16:26
ट्यार्पी वाढवण्यात थत्तेचाचांचा वाढता सहभाग पाहुन पर्‍याने विरोधी पक्षनेते थत्तेचाचांनाही सामिल करुन घेतलेले आहे असे दिसते.

In reply to by नितिन थत्ते

परिकथेतील राजकुमार 11/10/2010 - 16:32
थत्ते चाचा हे राण्यांसारखी आपली उपद्रवक्षमता दाखवुन देत आहेत अशी आम्हाला शंका आहे. नाना, अरे थत्ते चाचांच्या नावानी एक चेक काढ बाबा :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 11/10/2010 - 16:40
चेकने पेमेंट ? मायला धंदा करताय की ८०-सी खाली टॅक्स वाचवताय ? नान्या, तु ह्या पराला धंद्यात बरोबर घेऊन फसणार असे भाकित सांगतो ( ह्यावरुन आठवले, घाटपांडेकाका कुठे आहेत आजकाल ? ). असे चेक ने पेमेंट करत बसलास तर एक दिवस 'सर्कारी पाहुणचार' घेणार असे सांगतो. "सल्लागार" म्हणुन घेतो काय मला ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार 11/10/2010 - 16:45
असे चेक ने पेमेंट करत बसलास तर एक दिवस 'सर्कारी पाहुणचार' घेणार असे सांगतो.
डान्राव तुम्ही शस्त्रानी खेळणारी माणसे ;) तुम्हाला हे डावपेच समजायला वेळ लागेल. अहो पुण्यात 'अरे साहेबांना चहा सांग' आणि 'अरे साहेबांचा चेक काढ' ह्या दोन वाक्यात काही फरक नसतो ;) चहापण येणार नसतो आणि चेक पण निघणार नसतो. आता आलाच आहात पुण्यात तर शिकाल हळुहळु...

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 11/10/2010 - 16:49
सल्ला देणे हे आमचे काम, ह्याउप्पर तुमची मर्जी. उगाच पुन्हा हातापाया पडायला लागु नये इतकीच आमची तळमळ बाकी संध्याकाळी चहा घ्यायला येतो अड्ड्यावर