बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.
काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला.
सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो.
सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात.
जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात.
सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!
वाचने
67969
प्रतिक्रिया
207
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
परिचय आवडला.
नाही, कथानक प्रवाही आहे,
In reply to परिचय आवडला. by चौथा कोनाडा
पूर्वग्रह विरहित परिचय
परिचय आवडला
सोकाजी, उत्तम लिहीले आहेस या
रिव्य आवडला. प्रतिसाद केवळ
छान.
छान
धन्यवाद... आजकाल न बघता
आजकाल न बघता
In reply to धन्यवाद... आजकाल न बघता by गणेशा
सहमत
In reply to आजकाल न बघता by चौकस२१२
हो ना आणि आँधी वर बंदी आणली
In reply to सहमत by जेम्स वांड
किस्सा कुर्सी का
In reply to हो ना आणि आँधी वर बंदी आणली by चौकस२१२
मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी
In reply to आजकाल न बघता by चौकस२१२
मी तर चुकून बाजीराव मस्तानी बघून पण आलो.
In reply to मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी by कॉमी
जरा मिपावरचे जुने धागे वाचा
In reply to मानकर्णिक, पानिपत , तान्हाजी by कॉमी
लॉल
In reply to जरा मिपावरचे जुने धागे वाचा by चौकस२१२
चौकस साहेब, हो सर्वच
In reply to आजकाल न बघता by चौकस२१२
मग माझे म्हणणे हि जनरल आहे
In reply to चौकस साहेब, हो सर्वच by गणेशा
आजकाल सिनेमा बघायच्या आधीच
चित्रपट संथ वाटला
काही गोष्टी पटल्या नाहीत -
@ चौकस२१२
In reply to काही गोष्टी पटल्या नाहीत - by चौकस२१२
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Ministerत्यात फॉरेस्ट स्वतःच्याच
In reply to @ चौकस२१२ by मदनबाण
सहमत.
In reply to @ चौकस२१२ by मदनबाण
मायबोलीवरून
In reply to सहमत. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे
In reply to मायबोलीवरून by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime Ministerतुम्ही उगाचच संतापून ओव्हर द
In reply to तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे by मदनबाण
तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द
In reply to तुम्ही उगाचच संतापून ओव्हर द by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansareमुळात हा सिनेमा एक काल्पनिक
In reply to तो पाकिस्तान कसा हलकट आहे हे by मदनबाण
मुळात हा सिनेमा एक काल्पनिक
In reply to मुळात हा सिनेमा एक काल्पनिक by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansareचकली प्रतिसाद देऊन फुकाचा
In reply to मुळात हा सिनेमा एक काल्पनिक by मदनबाण
चित्रपटाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...
समतोल, पूर्वग्रहविरहित
खरे आहे
In reply to समतोल, पूर्वग्रहविरहित by प्रचेतस
पूर्वी हिंदी सिनेमात प्राण
लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा
अरुंधती रॉय ताई
In reply to लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा by डँबिस००७
ह्म्म्म
पी. के आणि आमिर खान
चोप्रा-हिरानी-जोशी
In reply to पी. के आणि आमिर खान by तर्कवादी
आपण जर असे सुचवत असाल कि जोशी
In reply to चोप्रा-हिरानी-जोशी by चौकस२१२
मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन
In reply to आपण जर असे सुचवत असाल कि जोशी by तर्कवादी
मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन
In reply to आपण जर असे सुचवत असाल कि जोशी by तर्कवादी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika SansareAnti India ?
In reply to मग या वेळी ट्रोलर्स हे विसरुन by मदनबाण
तर्कवादी,Altnews, The Wire,
In reply to Anti India ? by तर्कवादी
महम्मद झुबेरचा जामीन
In reply to तर्कवादी,Altnews, The Wire, by डँबिस००७
Altnews
In reply to तर्कवादी,Altnews, The Wire, by डँबिस००७
मी जे वरती ट्विट दिले आहे
In reply to Altnews by चांदणे संदीप
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadarडँबिसजी
In reply to तर्कवादी,Altnews, The Wire, by डँबिस००७
छान
In reply to डँबिसजी by तर्कवादी
धन्यवाद
In reply to छान by सुरिया
तर्कवादीजी,हो बेल मिळालेला
In reply to डँबिसजी by तर्कवादी
अहो बेल मिळालेला आहे ह्याचा
In reply to तर्कवादीजी,हो बेल मिळालेला by डँबिस००७
Altnews, The Wire, The
In reply to Anti India ? by तर्कवादी
ते IPSMF बद्दल काहितरी होतं ना ...?
In reply to Altnews, The Wire, The by निनाद
हिंदूविरोधी दृष्य आणि बहिष्कार !!
In reply to पी. के आणि आमिर खान by तर्कवादी
सिगरेट !
In reply to हिंदूविरोधी दृष्य आणि बहिष्कार !! by तर्कवादी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)"मदनबाण"
दाभोलकरांना फक्त हिंदू
आग्या ... म्हणणे एवढेच आहे
म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर
In reply to आग्या ... म्हणणे एवढेच आहे by चौकस२१२
एखाद उदाहरण आहे का?
In reply to म्हणणे एवढेच आहे की दाभोलकर by आग्या१९९०
https://www.google.com/amp/s
In reply to एखाद उदाहरण आहे का? by सुखी
भोंदूबाबा
In reply to https://www.google.com/amp/s by आग्या१९९०
नेमका
In reply to भोंदूबाबा by वामन देशमुख
आपली वाटचाल ब्लासफेमी लॉ कडे
In reply to भोंदूबाबा by वामन देशमुख
मिपावरच्या किती लोकांनी
In reply to आग्या ... म्हणणे एवढेच आहे by चौकस२१२
मिपावरच्या किती लोकांनी
In reply to मिपावरच्या किती लोकांनी by तर्कवादी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- Gadar,परंतु सेंसर बॉर्डातुन
In reply to मिपावरच्या किती लोकांनी by मदनबाण
अनेक प्रतिसाद सिनेमा न बघताच
धन्स.
बिरुटे सर
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरे! चुकीच्या मार्गाने
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
ते माहिती नाही ब्वा पण
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट
नै नै. जोरात सुरु आहे.
In reply to आयला म्हणजे सिनेमा खरच बॉयकॉट by आनन्दा
बॉयकॉटमुळे आणि अपीलबाह्य कारणांमुळेच पडला
In reply to नै नै. जोरात सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लाल सिंग चढ्ढा मुळे बरेच
बॉयकॉट
काश्मीर फाईल्स सुद्धा?
In reply to बॉयकॉट by कपिलमुनी
ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या
हेच
In reply to ला. सि. चढ्ढा सिनेमाच्या by डँबिस००७
"मज़हब से मलेरिया फैलता है"
"मज़हब से मलेरिया फैलता है"
आमीर खान ने आपला दुटप्पीपणा
" होईना काही, जीवाची लाही ".
In reply to आमीर खान ने आपला दुटप्पीपणा by सुबोध खरे
तुमच्या पातळीच्या वर आहे
In reply to " होईना काही, जीवाची लाही ". by आग्या१९९०
डोळे बंद करून पातळी कशी समजते
In reply to तुमच्या पातळीच्या वर आहे by सुबोध खरे