पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१ : प्रस्तावना
असो, सुरुवातीलाच जनुकशास्त्राच्या गुंतागुंतीत जास्त न घुसता (पुढच्या भागांत योग्य ठिकाणी ते विस्ताराने येणे जास्त योग्य होईल) सर्वांना अधिक रोचक वाटेल अश्या भागाकडे वळूया.
ज्यांचे आणि आपले पूर्वज एक होते हे शास्त्रीय पुराव्याने सिद्ध झालेल्या आदिमानवांची (आपल्या दूरच्या नातेवाईकांची) थोडी खबरबात घेतल्याशिवाय ह्या प्रवासाची पूर्वतयारी अपूर्ण राहील. ही आहे त्यांची तोंडओळख...
३५ लाख वर्षांपूर्वी: Australopithecus afarense : हे आदिमानव दोन पायांवर उभे राहू आणि चालू शकत होते. मात्र ते फक्त आफिकेतच राहिले आणि मुख्यतः: झाडांवर वस्ती करत असत.
२० लाख वर्षांपूर्वी: Paranthropus boisel: हे आदिमानवही आफ्रिका सोडून बाहेर फिरायला गेले नाही. यांचे दात सद्याच्या मानवाच्या दातांपेक्षा चारपट मोठे होते आणि चावायला कठीण असणार्या वनस्पती खाण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे.
२० लाख वर्षांपूर्वी: Homo habilis: हे आधुनिक मानवाचे (म्हणजे आपले) बहुतेक सर्वात पहिले पूर्वज असावेत. यांच्यामध्ये हुशार असल्याची लक्षणे होती. हे हत्यारे बनवणारे पहिले आदिमानव होत. यांनी आपल्या आहारात प्राण्यांच्या मांसाचा प्रथम उपयोग सुरू केला. मात्र प्राण्याची शिकार करण्याची पात्रता त्यांच्यात नव्हती व हे मांस मृत प्राण्यांपासून मिळालेले (इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतून अथवा मेलेल्या प्राण्याचे) असे. हे आदिमानवही आफ्रिका सोडून बाहेर फिरायला गेले नाही.
१५ लाख वर्षांपूर्वी: Homo ergaster: यांचा मेंदू पूर्वीच्या आदिमानवांपेक्षा बराच मोठा होता. ह्यांची हत्यारे अधिक सुधारलेली होती आणि ते कसबी शिकारी होते. हे आपले पूर्वज असण्याची बरीच शक्यता आहे. हे आदिमानव प्रवासी होते. ते आशियात पसरले आणि त्यांना तेथे Homo erectus या शास्त्रीय नावाने ओळखले जाते.
५ लाख वर्षांपूर्वी: Homo heidelbergensis: हे आदिमानवही भटके होते आणि ५ लाख वर्षांपूर्वी ते युरोपमध्ये पसरले होते. त्यांचे हत्यारे बनवण्याचे व शिकारीचे कसब वाखाणण्याजोगे होते. हे आपले पूर्वज नक्की नाही पण नियांडरथाल (Neanderthal) या आदिमानवाचे हे पूर्वज असावे.
२ लाख वर्षांपूर्वी: Homo neanderthalensis: २ लाख ते ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच शेवटच्या हिमयुगापर्यंत हे आदिमानव युरोपचे सर्वेसर्वा होते. मात्र हिमयुगाच्या शेवटाला उष्ण होत गेलेल्या वातावरणामुळे आधुनिक मानवाने युरोपमध्ये शिरकाव करायला सुरुवात केली आणि ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत हे आदिमानव जगातून नष्ट झाले. मात्र हे आधुनिक मानवाच्या काळात आस्तित्वात असलेले आदिमानव नक्की कोणत्या कारणाने नष्ट झाले हे खात्रीलायक रित्या अजून माहिती झालेले नाही.
अश्या या पार्श्वभूमीवर साधारण दोन लाख वर्षांपूर्वी पूर्वोत्तर आफ्रिकेच्या (आताच्या इथिओपिया-केनिया-तांझानिया या भागात) एका Homo Sapiens या प्राण्याच्या जमातीची निर्मिती झाली… हाच तो आधुनिक मानव. इतर सर्व Homo प्रजाती काळाच्या ओघात नामशेष होऊन गेल्या आहेत. या आपल्या शेवटी उरलेल्या एकुलत्या एका प्राणीजमातीचे (species) शास्त्रीय नाव आहे Homo sapiens sapiens.
आजच्या घडीचे सर्व मानव या एकाच Homo sapiens sapiens जमातीचे सभासद आहेत... मग ते कोणत्याही रंगाचे, बांध्याचे अथवा देशाचे रहिवासी असले तरीही.
हा Homo sapiens sapiens सुधारलेला, मोठ्या मेंदूमुळे हुशार, हत्यारे बनवण्यात वाकबगार, कुशल शिकारी आणि भटका प्राणी निघाला. पुढच्या भागापासून आपण त्याच्या भटकंतीच्या सुरस कथांची वर्णने वाचत त्याच्याबरोबर कल्पनेच्या भरार्या घेत भटकूया आणि त्याचबरोबरच "मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? वगैरे, वगैरे" या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करूया.
मग काय, वाट कसली बघताय? करा सुरू प्रवासाची तयारी ! काय समजलात? हा चांगला दोन लाख वर्षांच्या मुदतीचा "पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास" आहे, राजे !
(क्रमशः )
=====================================================================
महत्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================In reply to ह्म्म्म... वाचतोय.मी कोण आहे? by मदनबाण
In reply to जवळपास प्रत्येक लहान मूल हा by रेवती
In reply to देवादिकांवर सगळेकाही ढकलून by मदनबाण
In reply to ह्म्म्म... वाचतोय.मी कोण आहे? by मदनबाण
मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? वगैरे, वगैरे" या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करूया. अशा प्रकारच्या लहान मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची एका व्यक्तीच्या जन्मापुरती उत्तरे भौतीक शास्त्राने फार पूर्वीच दिलेली आहेत. तेथे समस्या "उत्तर काय आहे?" ही नसून "ते उत्तर लहान मुलाला कधी व कसे समजावून द्यावे?" ही आहे... आणि ती समस्या सोडवणे हा या लेखाचा उद्देश नाही, हे आपल्या ध्यानात आले आहेच हे तुमच्या "जाता जाता" वरून आमच्याही ध्यानात आले आहे ;)
जाता जाता :- सध्या ७ वे मन्वांतर {वैवस्वत मनु}चालु आहे म्हणे मग एकुण किती वर्ष झाली ?
या लेखात तेच वरचे प्रश्न पण "सर्व मानवजमातीला मध्यावर्ती धरून विचारलेले" आहेत. आणि "केवळ भौति़क शास्त्रे वापरून" त्यांची उत्तरे शोधण्याचे चाललेले प्रयत्न व आतापर्यंत मिळालेली उत्तरे यांचा उहापोह या लेखांत करण्याचा मानस आहे, हे लेखात सुरुवातीलाच स्पष्ट केलेले आहे. या कारणामुळे या लेखातले कालमापन हे इंग्लिश कॅलेंडरच्या (ग्रेगोरियन) वर्षांमध्येच केलेले आहे आणि तेच मापन पुढेही असेल.
या प्रश्नांचे उत्तर शोधण्याच्या इतर (भौति़क शास्त्रे न वापरणार्या) पद्धतींबद्दल मला आदर आहे. पण त्यांच्याबद्दल अथवा त्यांच्या कालमापनपद्धतींबद्दल माझे ज्ञान शून्य अथवा तोकडे असल्याने मी त्याबद्दल लिहिणे योग्य होणार नाही. शिवाय वरील कारणामुळे या लेखात अथवा लेखासंदर्भात त्यांचा उहापोह करणे म्हणजे विषयांतरच होईल, नाही का?In reply to छान लेख. by धन्या
In reply to मस्त सुरुवात! by पैसा
इंडोनेशियातल्या एका प्रायमेटबद्दल वाचलेले आठवत आहे. यांचा उल्लेख पुढे येईल... पण जर तुम्ही काय म्हणता याचा माझा अंदाज खरा असला तर ते प्रायमेट्स नसून आपले जवळचे भाउबंद आहेत... इतर माहिती पुढे येईलच.
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
दुव्यांची मोठी यादी देणे टाळण्याचे ठरवले आहे.सॉरी, मी लेखातले दुवे म्हणत नव्हते, तर माणूस आणि इतर प्रायमेट्स यांच्यातल्या आणखी काही हरवलेल्या दुव्यांबद्दल विचारत होते!
In reply to मस्त सुरुवात! by पैसा
In reply to मी कुठून आलो by चौकटराजा
सूर्यावर फकत हायड्रोजन व हिलियम ही मूलदव्य आहेत हे सर्वसामान्यांसाठी सांगितलेले धोपट सत्य आहे; पूर्ण अथवा शास्त्रीय सत्य नाही. सूर्याच्या वस्तूमानाचा १.६९% भाग ऑक्सीजन, कार्बन, निऑन, लोह आणि इतर जड मूलद्रव्यांनी बनलेला आहे. हे सूर्याचे १.६९% वस्तूमान वापरून ५,६२८ पृथ्व्या बनू शकतील ! :) सुर्याच्या मध्यभागी १५७ लाख डिग्री सेल्सियस तापमान आहे आणि तेथून पृष्टभागापर्यंत येईपर्यंत ते ५,८०० डिग्री सेल्सियस होते. या सर्व तापमानात सर्व मूलद्रव्ये वायूरूपच असतात.
आवांतरः पृथ्वी कशी बनली हा वेगळा आणि अजूनही तावातावाने चर्चा केला जाणारा (hotly debated) विषय आहे !In reply to मी कुठून आलो by चौकटराजा
In reply to मस्त माहिती by चेतन माने
In reply to धन्यवाद आणी सहलीत स्वागत ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हुश्श मला पण धन्यवाद आला by चेतन माने
In reply to खालचा मोठा प्रतिप्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
आपल्याला साधारणतः ५०००- ७००० वर्षांचा इतिहास ज्ञात आहे ( इसपू ३००० वर्षे ) ..
या कालावधी मधे एखाद्या जीवाची उत्क्रांती झाल्याचे आढळले आहे का ?
१. केवळ ५०००- ७००० वर्षांचा नव्हे तर आपण जो साडेसहा कोटी वर्षांचा इतिहास बघतो आहोत तो केवळ अंदाज (थिअरी) नसून शास्त्रीय (जनुकीय आणि कार्बन डेटींग) पुराव्यांनी सिद्ध झालेले सत्य आहे. त्या शास्त्रीय पद्धतींची आणि पुराव्यांची माहिती पुढे येईलच. या पद्धती वापरून एखादा प्राणी इतर दोन प्राण्यांच्या जमातीचा काही हजार, लाख अथवा कोटी वर्षापूर्वीचा पूर्वज होता की नाव्हता हे खात्रीलायकरित्या ठरवता येते.
२. प्राण्यांच्या उत्क्रांतीत ७००० वर्षे हा अत्यंत कमी काळ आहे. लेखातलेच उदाहरण पाहिले तर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आस्तित्वात असलेल्य प्रायमेट्सच्या एका शाखेपासून गोरिलंचे पूर्वज ८० लाख वर्षांपूर्वी, आपले पूर्वज ७० लाख वर्षांपूर्वी आणि चिंपांझींचे पूर्वज ५० लाख वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यांनंतर आपल्या (मानवांच्या) शाखेतून वेगवेगळ्या जीवांची (स्पेसिज) उत्क्रांती व्हायला ३५ लाख, २० लाख, १५ लाख, ५ लाख आणि २ लाख वर्षे लागली आहेत. याचे कारण म्हणजे सर्वसाधारणपणे जोपर्यंत जनुकांचा संच खूप वेगळा झाल्यामुळे दोन प्राण्यांत संकर होऊ शकत नाही तोपर्यंत त्या प्राण्यांना वेगळ्या स्पेसिज मानले जाउ शकत नाही. In reply to ते नाशणल जाग्राफिक वर म्हनत by मालोजीराव
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आने दो.. by चिगो
In reply to पुरावा गंडला by मराठे
ले भारी हम तय्यार हे