अस्फुट
काव्यरस
नि:संग उदासीन नभ हे
धरतीला भिडते जेथे
त्या धूसर क्षितिजावरती
अस्फुट काही खुणवीते
मरुभूमीतुनी जडाच्या
चैतन्य जिथे लसलसते
त्या अद्भुत सीमेवरती
अस्फुट काही खुणवीते
शब्दांच्या निबिड अरण्यी
अर्थाचे बंधन नुरते
त्या अपार मुक्तीमध्ये
अस्फुट काही खुणवीते
वाचने
3561
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
नेहमीप्रमाणे सुरेख!!
अनंत यात्री, भारीच, कविता आणि आप, दोनो. :)
सं - दी - प
वाह!
अस्फुटाची झलक मिळता
तगमग भारी होते
हातात गवसते तो वर
हुलकावणी देउन जाते
पैजारबुवा,
कवितारसिकांना धन्यवाद.
सुरेख !!
खूप आवडल्या गेलेले आहे! दुसरे कडवे विशेष!
नेहमीप्रमाणे सुरेख!!