Skip to main content

अस्फुट

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 09/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
नि:संग उदासीन नभ हे धरतीला भिडते जेथे त्या धूसर क्षितिजावरती अस्फुट काही खुणवीते मरुभूमीतुनी जडाच्या चैतन्य जिथे लसलसते त्या अद्भुत सीमेवरती अस्फुट काही खुणवीते शब्दांच्या निबिड अरण्यी अर्थाचे बंधन नुरते त्या अपार मुक्तीमध्ये अस्फुट काही खुणवीते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3563
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

अनंत यात्री, भारीच, कविता आणि आप, दोनो. :) सं - दी - प

वाह!

अस्फुटाची झलक मिळता तगमग भारी होते हातात गवसते तो वर हुलकावणी देउन जाते पैजारबुवा,

खूप आवडल्या गेलेले आहे! दुसरे कडवे विशेष!