मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अस्फुट

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
नि:संग उदासीन नभ हे धरतीला भिडते जेथे त्या धूसर क्षितिजावरती अस्फुट काही खुणवीते मरुभूमीतुनी जडाच्या चैतन्य जिथे लसलसते त्या अद्भुत सीमेवरती अस्फुट काही खुणवीते शब्दांच्या निबिड अरण्यी अर्थाचे बंधन नुरते त्या अपार मुक्तीमध्ये अस्फुट काही खुणवीते

वाचने 3561 वाचनखूण प्रतिक्रिया 7

चांदणे संदीप 10/08/2020 - 08:18
अनंत यात्री, भारीच, कविता आणि आप, दोनो. :) सं - दी - प

ज्ञानोबाचे पैजार 10/08/2020 - 14:48
अस्फुटाची झलक मिळता तगमग भारी होते हातात गवसते तो वर हुलकावणी देउन जाते पैजारबुवा,

राघव 24/09/2020 - 23:08
खूप आवडल्या गेलेले आहे! दुसरे कडवे विशेष!