मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी दिन

मराठी भाषा जग/वाढवण्याचा सोप्पा उपाय....

प्यारे१ ·
विशेष
नमस्कार मंडळी....! मराठी दिन 'साजरा' झाला. काही प्रश्न डोक्यात आणि उत्तरे सापडेनात. मराठी ही अभिव्यक्तीची भाषा म्हणून आपण वापरतो. विचारांची देवाण घेवाण करण्याचे माध्यम. मराठी हीच मुख्य भाषा असण्याचे मराठी माणसापोटी जन्मलो हे एक मुख्य कारण. त्याहून मुख्य म्हणजे मराठी वातावरणात वाढलो. (सांगली, दादर, पुणे येथील बरेच अमराठी शुद्ध मराठी बोलताना पाहिलेत) अपवादात्मक अगदीच काही लोक आवड, प्रेम यापोटी मराठी अंगिकारतात. यामध्ये आपले कर्तृत्व काय? आपण 'लाभले आम्हास 'भाग्य' म्हणत खुश.

मराठी भाषेचे सौंदर्य आणि अचूक उपयोग

इन्द्र्राज पवार ·
विशेष
जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध विषयावरील साहित्य इथे प्रकाशित करण्याचा मानस श्री.ध.मु. आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी व्यक्त केला आहे त्याला अनुलक्षून कोणत्या विषयावर लिहावे हा विचार डोक्यात असताना गेले तीन दिवस आकाशवाणीवरून शासनानेच राज्यातील शाळा-महाविद्यालयांना या निमित्ताने केलेले आवाहन ऐकण्यास मिळाले. शासनाने निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चर्चा, माहिती आदींचे आयोजन तर करावे अशा सूचना संस्थांना दिलेल्या आहेत. हे 'मराठी दिना' निमित्त होईलच. पण या संदर्भात मी काही भाषातज्ज्ञांनी दिलेली व्याख्याने ऐकली आहेत.

नगरी मोरूचा जामदि

नगरीनिरंजन ·
विशेष
कडक थंडीचे दिवस संपून वसंताच्या आगमनापूर्वीच्या उरल्यासुरल्या गुलाबी थंडीच्या गुदगुल्या सहन करीत कोवळ्या उन्हाची चादर घेऊन मोरू माळवदावर तोंड उघडे टाकून साखर झोपेत उताणा पडला होता.

इये ईंदुरीचिये बोली कवतुके

भाग्यश्री कुलकर्णी ·
विशेष
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" हे कौशल इनामदार चे गाणे ऐकताना अंगावर क़ाटा येतो राव. 80 वर्षांचे विठ्ठ्ल उमप अन ती आठ वर्षाची चिमुरडी मुग्धा दोघांनाही एका व्यासपिठावर आणुन समा बांधणारा, खरच ग्रेटच आहे.आज 28 तरखेला ह्या गीताला वर्ष पुर्ण झाले हा अजुन एक योगायोग ह्या मराठी चा "अभिमान" काय वर्णावा! ह्या मराठीच्या अंगाखांध्यावर वाढलेले आम्ही एक दिवस अचानक इंदुरनगरीत जातो काय, अन नगरीच्याच नव्हे तर तिच्या भाषेच्याही प्रेमात पडतो काय, सारेच स्वप्नवत वाटते आहे. इंदोरचे पहिले दर्शन मला भगभगीत वाटले होते.

राष्ट्रीय विज्ञान दिन

अवलिया ·
विशेष
राम राम मंडळी सध्या मिपावर मराठी दिन जोरात चालू आहे. तसेच सर्वत्र मराठीचा जय घोष चालू आहे. मराठी पुन्हा एकदा सर्वत्र मानाचे स्थान पटकावणार याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही. आज राष्ट्रीय विज्ञान दिन. यानिमित्ताने सर्वांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा ! आणि जास्तीत जास्त वैज्ञानिक माहिती मराठीत यावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सुचवून तसा प्रयत्न आपण सर्वांनी करण्याची प्रतिज्ञा या निमित्ताने करुया असे मला वाटते. जय ज्ञान ! जय विज्ञान !

माझिया मराठीचिया कवतिके

प्रदीप ·
विशेष
श्री. माधव भावे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ भारताबाहेर रहात आहेत. त्यांची पत्नी सिंगापूरी चिनी आहे, आणि अनेक वर्षे आन्तरराष्ट्रीय बँकांत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत राहिल्यावर आता श्री. भावे त्यांच्या क्षेत्रात सल्लागाराचे काम करतात. ह्या सगळ्या जंजाळांत त्यांचे मराठी संस्कृतीचे, मराठी भाषेचे भान सुटलेले तर नाहीच, उलट ते उत्तरोत्तर अधिकाधिक दॄढ होत गेले आहे. सुमारे दीड दशकांपूर्वी ते माझ्या गावात असतांना येथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी त्यांच्या ह्या मराठी प्रेमाची चुणुक मला दिसली होती.

जागतिक मराठी दिन -- उभ्या उभ्या विनोद

संदीप चित्रे ·
विशेष
मिपाकर मित्र-मैत्रिणींनो, 'जागतिक मराठी दिन' ह्या निमित्ताने आमच्या 'उभ्या उभ्या विनोद' अर्थात मराठी स्टँड अप कॉमेडी कार्यक्रमाची ही एक झलक! दोन वर्षांपूर्वीच्या आमच्या एका कार्यक्रमाची झलक दाखवणारी ध्वनि-चित्रफीत मिपावर इथे बघता येईलच. कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा चौकशी करायची असेल तर मला जरूर व्यनि पाठवावा. 'जागतिक मराठी दिन' जोरदार साजरा होवो ह्या शुभेच्छा!

पोवाडा मराठी भाषेचा

पाषाणभेद ·
विशेष
पोवाडा मराठी भाषेचा
मराठी भाषा असे धन्य धन्य बोलती जयांचे भाळी असे पुण्य कानी पडती असे हे बोल तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी जगामध्ये भारत देश महान अनेक भाषांची असे तो खाण कितीक बोलींना तेथे मान त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते. अहो ही भाषा असे कुणाकुणाची? ही भाषा कुणाची म्हणून काय प्रश्न विचारता?

आयज जागतिक मराठी दिन

पैसा ·
विशेष
आयज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्तान मराठीची एक धाकटी भैण कोकणी भाषेबद्दल किदें तरी बरोयात अशे हांवे चितलें. म्हणून हो लेख. कोकणी म्हणजे गोंयाची भास असो एक समज आसा, पुण ते सामकें खरे न्हय. कोकणी गोयांन उलैतात, महाराष्ट्रान उलैतात, कर्नाटकान उलैतात, तशी केरळातय उलैतात. काय मंडळी, काही कळलं का? बरं आता मराठीत लिहिते. आज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्ताने मराठीची एक धाकटी बहीण कोकणी भाषेबद्दल काहीतरी लिहूया असा मी विचार केला. म्हणून हा लेख. कोकणी म्हणजे गोव्याची भाषा असा एक समज आहे, पण तो पूर्ण खरा नाही.