Skip to main content

महिला दिन

झाले मोकळे आकाश

लेखक अजया यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पीएमएस बद्दल प्रथमच कळलं होतं ते अनिल अवचटांचं कोणतंतरी पुस्तक वाचताना. त्यांनी लिहिलं होतं की महिन्यातल्या काही काळात त्यांची पत्नीशी भांडणं व्हायची. ती विचित्र वागायची, नंतर मात्र नॉर्मलला येऊन माफी मागायची, लाड करायची. त्यानंतर सर्वच स्त्रियांना पिरियड्स आधीच्या दिवसांत असा त्रास होतो का, हे शोधून काढायचं माझं कुतूहल वाढलं. कारण हा नुसता स्त्रीपुरता मर्यादित त्रास नसून याचे अनेक सामाजिक, कौटुंबिक असे बरे वाईट परिणाम होत असणार, असं लक्षात आलं. मग ते का, कसे, काय होतात याचा अभ्यास करण्यासाठी रीतसर एक प्रश्नावली तयार केली. १८ ते ५२ वयोगटातल्या निरनिराळे उद्योग करणाऱ्या उदा.
विशेष

तुझी माझी मैत्री

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी मैत्री म्हणजे एक उंच झोका असतो, हसणं असतं,रुसणं असतं, चिमणीच्या दातांनी तोडलेलं चिंचेचं बुटुक असतं.. तुझी माझी मैत्री .. पडणं असतं,सावरणं असतं, आपलंच खरं करणारं भांडणही असतं तुझी माझी मैत्री.. खेळ असतो,वादही असतो, कुणीच न दिलेला अधिकार असतो तुझी माझी मैत्री.. नात्यापलिकडचं नातं असतं, उसवलेल्या धाग्यांची रफू असते, तीच मैत्रीला श्रीमंत करते. तुझी माझी मैत्री.. . चित्र-पियुशा
विशेष

किस ऑफ लव्ह : जादूची पप्पी

लेखक स्रुजा यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी एक नितीमत्ता रक्षक, धर्म पालक. मी काय काम करतो म्हणता? अहो हेच महान कार्य माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. मी कुठे असतो? अहो मी कुठे नसतो? "संभवामि युगे युगे ", कयामत का दिन या सारखी वचनं त्या प्रभूंनी, अल्लानी आमच्याच जीवावर दिली होती! जिथे जिथे धर्माला ग्लानी येते तिथे तिथे आम्ही तोंडावर पाणी शिंपडायला तत्परतेने हजर असतो. मध्यंतरी "कीस ऑफ लव्ह" या चळवळीने धुमाकूळ घातला होता.
विशेष

दोघीजणी

लेखक स्पंदना यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"यु? अपन्ना?" "युअर हसबंड?" "आ, आ" "हिज फ्रेन्ड सेंट मी" "सॉरी आ माय इंग्लिश नो गुड" दारात मिनी आणि गुड्घ्यापर्यंत पोहोचणारा याच्या मधला स्कर्ट घालून एक गोर्यातपान म्हणता येइल अशा वर्णाची बाई उभी होती. जमेल तसं इंग्लिश फाडत होती. "मी क्लिनींग, आय.. आय क्लिन फॉर यु" ही माझी अन ‘मीमी’ची पहिली ओळख. दीड वर्षाचा मुलगा अन सहा वर्षाची मुलगी घेउन मी नुकतीच सिंगापूरला गेले होते. आजवरच्या आयुष्यात धुणीभांडी अन केर कचरा या गोष्टी अगदीच नाईलाज झाला तर केलेल्या. त्यात लहान मूल घेउन हे सगळं करणं हा विचारच असह्य होत होता. मुंबईच्या सुखासीन आठवणी सिंगापूरला अगदीच भिकार ठरवत होत्या.
विशेष

जर्मनीतील स्त्रियांचे समाजजीवन

लेखक मधुरा देशपांडे यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"पाश्चात्य संस्कृती" या दोनच शब्दात सर्वसाधारण पणे भारताबाहेरील, विशेषतः युरोप किंवा अमेरिकेतील देशांच्या संस्कृतीकडे बघितले जाते. जेव्हा स्त्रियांच्या बाबतीत हा विचार केला जातो तेव्हा आत्मविश्वास असणाऱ्या, हवे तसे राहण्याची, कपडे घालण्याची मुभा असणाऱ्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभ्या असणाऱ्या स्त्रिया असे काहीसे चित्र ढोबळमानाने समोर येते. भारतातही अगदी खेड्यापाड्यातील स्त्रियांना जसे शहरातील स्त्री जीवनाचे अप्रूप असते, तसेच साधारण मोठ्या प्रमाणात भारत आणि कुठलाही विकसित किंवा पुढारलेला देश याबाबतीतही असते.
विशेष

व्हर्जिनिया वुल्फचे ‘अ रूम ऑफ वन्स ओन’

लेखक विशाखा पाटील यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्जिनिया वुल्फची ओळख विसाव्या शतकातली प्रसिद्ध कादंबरीलेखक आणि समीक्षक म्हणून आहे. स्त्रीवादी समीक्षेचा पाया रचणार्यांमधलं हे एक महत्त्वपूर्ण नाव. सर्वसाधारणतः समीक्षा म्हटलं की, किचकट विषय, बोजड भाषा असा समज असतो आणि त्यामुळे त्या वाटेला जाणं टाळलं जातं. वुल्फचं ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ हे समीक्षेच्या प्रांतातलं गाजलेलं पुस्तक. साध्या परंतु उपहासात्मक शैलीत लिहिलेलं. वुल्फने याद्वारे स्त्रियांना लेखन करण्यासाठी लागणारा वेळ, जागा आणि पैसा या तीन आवश्यक घटकांकडे लक्ष वेधलं आहे. त्याशिवाय स्त्रियांच्या लेखनाबद्दल मूलभूत असे विचार मांडले आहेत. हे विचार 1929 मधले.
विशेष

मनोगत

लेखक इनिगोय यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर फक्त स्त्रियांचं असं एक दालन असावं हा विचार प्रत्यक्षात आला, या गोष्टीला या पाडव्याला दोन वर्षं पूर्ण होत आहेत. या काळात असं दालन हवंच कशाला या टीकेपासून, ते असं दालन जरूर असावं या पाठिंब्यापर्यंत सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मुख्य बोर्डावर येत राहिल्या. ही कल्पना नवी नसूनही अनेक संमिश्र मतांनी मिपा गजबजलं. त्याचवेळी बहुतेक सगळ्या स्त्री सभासद या कल्पनेला भरभरून प्रतिसाद देत होत्या, अगदी सुरुवातीला अनाहिता हे नाव नक्की करण्यापासून ते तिथे नेमाने लेख, प्रतिसाद देण्याच्या उत्साहात सातत्याने वाढच होतेय.
विशेष

संपादकीय

लेखक अजया यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो! अनाहिताची दोन वर्ष पूर्ण होत असताना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा अनाहिता विशेषांक तुमच्यासमोर आणताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे.
विशेष