नमस्कार मिपाकरांनो!
अनाहिताची दोन वर्ष पूर्ण होत असताना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा अनाहिता विशेषांक तुमच्यासमोर आणताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. अनाहिता सुरू झाल्यापासूनच या बुरख्याआडच्या, सोवळ्यातल्या जगाची चेष्टा, तिथे सासू सुना, गॉसिप यापलीकडे काय होत असणार, अनाहितिक लेखन, मुख्य बोर्डावर वृत्तांत सोडून काही लिहीत नाहीत असं बरंच काही कानांआड करून आमचं अनाहिता चालू तर राहिलं आहे , वाढतं तर आहेच पण पूर्णपणे स्त्रियांनी तयार केलेला, आंतरजालावरील मराठी संस्थळावरचा पहिलावहिला महिला दिन विशेष अंकही सादर करत आहे ही गोष्ट निश्चित सुखावणारी आहे.
दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानंतर इनि आणि माझ्या गप्पांमध्ये असा अंक काढावा, मग तो कसा असावा
याच्या चर्चा चालू झाल्या होत्या. त्याबद्दल इतर संपादिका आणि नीलकांत यांच्याशी बोलणे झाल्यावर त्यांनी सर्व
प्रकारच्या मदतीची तयारी दाखवून आमचा उत्साह वाढवला. मग सर्व अनाहितांशी धागा काढून चर्चा झाली की अंकात
काय वाचायला आवडेल, कसा हवा. आपल्या पहिल्यावहिल्या अंकासाठी काहीतरी लिहायचंच ठरवून सर्वजणी लिहित्या
झाल्या. त्याचं फलस्वरूप हा साहित्याने, चित्रांनी समृद्ध अंक!
काय आहे या अंकात? बऱ्याचशा लेखांत कवितांमध्ये चित्रांत तुम्हाला स्त्रीचे विविध भावनाविष्कार जाणवतील.
लेख स्वतंत्र तरीही कुठेतरी ओवणारा धागा समान असेल. या अंकात पुस्तक परीक्षणं आहेत, प्रवासवर्णनं
आहेत, ललित लेख,फँटसी, कविता तर आहेतच. पण कलाकौशल्य,,काही सुरेख रेखाटनं देखिल बघायला मिळतील.
स्त्रियांच्या संवेदनाशील दिवसांबद्दल माहिती ते खाद्यसंस्कृती, हलकेफुलके सरळ अनुभव ते बालमानसशास्त्र अशा
अनेकविध प्रकारांच्या मिसळीचा आस्वाद घेता येईल.
या अंकाची मध्यवर्ती कल्पना आहे, स्वयंसिध्दा. स्वकर्तृत्वावर घरादाराचा उद्धार करणाऱ्या
स्त्रियांबद्दल आपापले अनुभव सांगणारा हा अनाहितावरचा एक सुरेख धागा तुमच्यासमोर यानिमित्ताने खुला
करत आहोत. त्याचबरोबर इनिगोयने घेतलेली, स्वाती पांडे या स्वयंसिद्धेची मुलाखत या अंकाचं एक विशेष
आहे.
सर्व बंधनं ताण झुगारून मुक्त आनंदात भिजणार्या 'ती 'चं चित्र असणारं अंकाचं मुखपृष्ठ आनन्दिताने
स्वहस्ते तयार केलंय अाणि सर्वात शेवटी आहे अनाहिताच्या आत्तापर्यंत झालेल्या कट्ट्यांचा फोटोकोलाज!आता म्हणा
बघू कट्ट्यांना आभासी,मनाचे श्लोक वगैरे वगैरे!!
अंकाचं सर्व काम करताना इतक्या लोकांची मदत झाली आहे की आभार प्रदर्शन आपल्याच लोकांचं काय
करायचं हा नियम तोडून ऋणनिर्देश करणार आहे. सर्वप्रथम आभार असा अंक काढण्यासाठी आम्हाला सर्वतोपरी मदत
करण्याचे आश्वासन देऊन आमचा हुरूप वाढवणाऱ्या सर्व अनाहिता संपादिका, नीलकांत आणि कधीही हक्काने हाक
मारली की कामाला येणारे आपले कलाकार तंत्रज्ञ अभ्या आणि प्रशांत यांचे . धान्य निवडल्यासारखे
बारकाईने लेख वाचून शुद्धीकरण करणाऱ्या इनि,मितान आणि स्नेहांकिता, स्वयंसिध्दा धाग्याचे संपादन करणारी मधुरा
देशपांडे, या अंकाला अर्थपूर्ण मुखपृष्ठ देणारी आनन्दिता,फोटो कोलाजचे काम हक्काने मागुन करुन देणारी
सानिका,लेखा कवितांना अनुरूप रेखाटने देणारी पियुशा, तुमचे आभार मानले तर रागवाल माहिती आहे.आपल्या
अनाहिताचं काम म्हणून तुम्ही जे काय केलंय त्याची पोच समजा! आणि माझ्या डेडलाईनच्या
कटकटीला, तगाद्यांना न त्रासता , सर्वतोपरी मदतीला तत्पर असणाऱ्या, एका हाकेला ओ देऊन आपापली
कामं, मूलबाळ, संसार सांभाळून सुंदर लिखाण पाठवणाऱ्या माझ्या अनाहितांनो धन्यवाद शब्द अपुरा आहे.
गोड मानून घ्या!
मिपाकरहो, प्रत्येक लेख वाचा, प्रत्येकावर आवर्जून अभिप्राय द्याच! अंकात अजून काय असायला हवं याबद्दल
नक्की कळवा. तुमच्या सुचवण्यांचं स्वागत असेल.
कळावे, लोभ आहेच. तो वाढावा ही विनंती._
विशेष
वाचने
18967
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ सुंदर आनंदिता!आणि
वा वा
सुंदर चित्र आहे! अंक वाचतो
आनंदिताने मुखपृष्ठ काय सुरेख
कसला सुंदर दिसतोय अंक !
+१
In reply to कसला सुंदर दिसतोय अंक ! by आरोही
वाचतोय !!
सुरेख!
जस्ट दोन तीन सदर वाचली
मुखपृष्ठ अप्रतिम झाले आहे.
भारीच की!!!
आणि हो, सर्व अनाहिता संपादिका
मुखपृष्ठ भारीय. एखादा लेख
आपला अंक
सुंदर अंक..
सुंदर मुखपृष्ठाला तितकंच
दोन्हीला सलाम!
In reply to सुंदर मुखपृष्ठाला तितकंच by अजया
लोकहो......
काय छान मुखपृष्ठ आहे!
मुखपृष्ठ च इतके देखणे आहे .
सुरेख मुखपृष्ठ !!! अंक
सुंदर...
अप्रतिम!
अंकाची कल्पना, मुखपृष्ठ,
अतिशय देखणा अंक! अभिनंदन!
..समस्त अनाहितांस महिला दिनाच्या शुभेच्छा....!!!
अभिनंदन!!
मुखपृष्ठ मस्त झालेय. संपादकीय
छान!
आनंददायी
अतिशय सुंदर !
खुप मस्त...
अप्रतिम झाला आहे हा पहिलाच अंक...
एएइत्या
अप्रतिम
+१
In reply to अप्रतिम by श्रीरंग_जोशी
अतिशय देखणा आणि सुंदर अंक!
मस्त ………………….
मस्त! ग्रेट!
यथोचित संपादकीय आणि त्याला
खूप मस्त, मुखपृष्ठ अप्रतिम !
अंक सुरेख झाला आहे.. शंकाच
मुखपृष्ठ खुप सुंदर आहे..
अंक सुंदर झालाय… सगळ्या
खुपच छान अन्क
अतिशय देखण्या,विचारपूर्वक
देखणे मुखपृष्ठ व मुख्य अंक
वावा..
अंक सुरेख झाला आहे.
मुखपृष्ठ अतिशय सुरेख झालयं
अप्रतिम मुखपृष्ठ ! अतिशय
मुखपृष्ठ खरोखरच सुंदर आहे.
दणदणीत अंक
माझ्या सर्व अनाहितांचे
ते सवळ्याबद्दल पार संपादकीय
वा!
खुपच देखणा अंक..सर्व
अभिनंदन...
मस्तच
सुंदर मुखपृष्ठ आहे. अंक वाचून
आनंदिता ,
हुश्श!
देखणा अंक.
अभिनंदन असे वाचावे.
अजया ताई,सर्व लेखिका,निलकांत
अंक सुरेख झाला आहे. देखणा व
सुरेख संपादकीय.
सुरेख झाला आहे अंक.सगळ्या
अंक पूर्ण वाचून झाल्यावर
अतिशय छान झाला आहे अंक. सुरेख
उपक्रमाला अनेक शुभेच्छा!!!
छान अंक..
एवढ्यात ?
In reply to छान अंक.. by जेपी
असो उत्तर लवकरच दिले जाईल.
In reply to एवढ्यात ? by सस्नेह
चित्र आवडल्याचं आवर्जून
अरे वा
In reply to चित्र आवडल्याचं आवर्जून by आनन्दिता
रंजक माहिती!!
In reply to चित्र आवडल्याचं आवर्जून by आनन्दिता
masta anka, mukhya prushtha
सुंदर!
मुखपृष्ठ च इतके देखणे आहे .
मुखपृष्ठ खरच खूप सुंदर आहे.
अंकाचे मुखपृष्ठ आता दिसत