Skip to main content

तुझी माझी मैत्री

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी मैत्री म्हणजे एक उंच झोका असतो, हसणं असतं,रुसणं असतं, चिमणीच्या दातांनी तोडलेलं चिंचेचं बुटुक असतं.. तुझी माझी मैत्री .. पडणं असतं,सावरणं असतं, आपलंच खरं करणारं भांडणही असतं तुझी माझी मैत्री.. खेळ असतो,वादही असतो, कुणीच न दिलेला अधिकार असतो तुझी माझी मैत्री.. नात्यापलिकडचं नातं असतं, उसवलेल्या धाग्यांची रफू असते, तीच मैत्रीला श्रीमंत करते. तुझी माझी मैत्री.. . चित्र-पियुशा
विशेष

वाचने 11515
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

In reply to by पियुशा

तुझ्या या प्रतिसादावर मी फिदा आहे. असं स्वतःचं कौतुक करता आलं पाहिजे. तुझा निरागसपणा कायम असाच राहू दे.

चिंचेच बुटुक देणं म्हणजे खरी गाढ मैत्री बरं !!! काय मस्त भाव आलेत मैत्रीचे, साधे सोपे अन म्हणुन्च जीवाला भिडणारे!! अन पियुषा मैत्रीची मेख अशी निरागसच असते!! गोडुल्या दोघी!!

ऑरेंज तिरामिसु सारखी गोड कविता

In reply to by सामान्य वाचक

लहाण्पण सरकल डोल्यासमोरुन

पियुषा, चित्र फारच गोड्डुलं आहे, मैतरिणींनो, मैत्रीत नो सॉरी आणि नो थँक्यु.. असं प. पू सल्लुभाई म्हणून गेलेत, ;) म्हणून धन्यवाद म्हणत नाही, स्वाती

कविता आणि चित्र बघून मैत्रिणीसोबत लॉलिपॉप खाल्ल्याचा जो निरागस आनंद होतो ना, तो झाला.. :)

मैत्री म्हटलं की अमाप आनंद! ही कविता आणि चित्र या दोन्हीमधून हा आनंद पुरेपूर व्यक्त होतोय. स्वातीताई आणि पियुडी... तुम्हा दोघींचं अभिनंदन!

खूप छान लिहिलीय कविता!