Skip to main content

महिला दिन

लई भारी..

लेखक सस्नेह यांनी रविवार, 08/03/2015 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही कोल्हापुरी. म्हंजे जगात भारी. कमीतकमी महाराष्ट्रात तरी भारीच ! का म्हणून विचारता ? खिक ! अहो नकाशा बघा की, आख्खा महाराष्ट्र खांद्यावर पेललाय कोल्हापुरानं ! हे कोल्लापूर इचिबन लई गुणाचं. ग्वाडबी आन तिकाटबी. हितली मान्सं अंगानं उभी-आडवी आन मनानं आश्शी ग्वाड जशी उसाची काकवी ! ...कॉलेजात असताना कोल्हापूर आत्तापेक्षा खूप निराळे होते. तेव्हाच आम्ही मैत्रिणी प्रथम कोल्हापूरच्या प्रेमात पडलो. दोन वर्षात दोन पायावर आख्खे करवीर पालथे घातले ! आणि जसा परिचय होईल तसं हे इचिबन कोल्हापूर लैच आवडायला लागलं ! थेट कावळा नाक्यापासून ते कात्यायनी-पन्हाळ्यापर्यंत !
विशेष

आरपार घुसलेलं असं काही......

लेखक सविता००१ यांनी रविवार, 08/03/2015 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीची सुट्टी लागलेली शाळेला. नुसतं हुंदडणं चालू होत. खरं तर मी आणि माझी एक मैत्रीणच काय त्या राहिलो होतो पुण्यात. बाकी सगळ्या गुल. कुणी गावाला, कुणी कुठे तर कुणी कुठे. मग आम्ही दोघींनी ठरवलं, संध्याकाळ झाली की जायचंच फिरायला. मग हे लांब लांब कुठेही जायचो. ४ वाजता निघायचं आणि ७ वाजता परत यायचं. मस्तच. दररोज नवीन रस्ते घ्यायचे. शिवाय पुण्यात घरसुद्धा अशा सुरेख ठिकाणी की एकीकडून हनुमान टेकडी, (एफ. सी. ची टेकडी ), एकीकडून वेताळ टेकडी, एकीकडून चतु:श्रुंगी आणि राहिलेल्या बाजूने गावात जायला हमरस्ता. त्यामुळे फिरायला जायचं तरी कुठे हा प्रश्न कधीच पडला नाही. उंडारत असायचो दररोज.
विशेष

राणी पद्मिनीचा चित्तोडगड

लेखक इशा१२३ यांनी रविवार, 08/03/2015 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ आली आणि सुट्टीत ट्रीपला जाण्याचे बेत ठरू लागले. मग जाण्यासारख्या ठिकाणांची उजळणी सुरू झाली. मी गोवा आणि नवरा राजस्थानवर अडून बसला आणि शेवटी जिंकला. मुलांना असणार्या सुट्ट्यांचा हिशोब करून त्यानुसार मुख्य ठिकाण, अंतर इ. माहिती मिळवून एकदाची आखणी झाली. सुंदर शाही राजवाड्यांच्या हॉटेलात राहायचा अनुभव घ्यायचे ठरले. दिवाळीनंतर ठरल्याप्रमाणे उदयपूरला पहिल्यांदा पोहचलो. उदयपूरचा भव्य सिटी पॅलेस आणि इतर ठिकाणे पाहून चौथ्या दिवशी गाडी पुष्करकडे वळली. जाताना वाटेत पाहायचे होते चित्तोड.
विशेष

स्त्री असणं ही मर्यादा नव्हेच!

लेखक इनिगोय यांनी रविवार, 08/03/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती पांडे बँकिंग इंडस्ट्रीतील इन्फ़र्मेशन सिक्युरिटी व ईडीपी ऑडिट याविषयातील तज्ज्ञ समजल्या जातात. विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यांनी सिस्टिम ऑडिटच्या प्रसार व प्रशिक्षणासाठी केलेलं काम मूलगामी असून त्या क्षेत्राचा चेहरा बदलून टाकणारं ठरलं आहे. ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्युट या जागतिक मानांकने बनवणाऱ्या संस्थेने भारतातील 'एलिट ऑडिटर्स पॅनल'वर त्यांना निमंत्रित केले असून या पॅनलवर काम करणारी ही पहिली मराठी महिला आहे. या संस्थेतर्फे भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांचे इन्फ़र्मेशन सिक्युरिटी ऑडिट केले जाते तेव्हा स्वाती पांडे यांचा त्यात समावेश असतोच.
विशेष

स्वयंसिद्धा

लेखक अनाहिता यांनी रविवार, 08/03/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
खडतर परिस्थितीशी सामना खरंतर अनेकींना करावा लागतो. पण या सगळ्याला झुगारून त्यातून मार्ग काढणाऱ्या स्त्रिया या कुठल्याही स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य अशा कुठल्याही शब्दांशिवाय त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया दिसतात ज्यांनी अशी अनेक आव्हानं समर्थपणे पेलली, आणि नुसती पेलली नाही, त्याची झळ आजूबाजूच्यांना किंवा पुढच्या पिढीला बसू दिली नाही. अशा परिस्थिती मधून अगदी सहज पणे येऊ शकणारा कडवटपणा त्यांनी शिताफीने चुकवला आणि पुढच्या पिढीकडे तो जाता जाता राहिला !
विशेष

जगणे कसले

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 08/03/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे कसले रोज नव्याने मरणे येथे निष्ठा कसली रात्र उगवता सजणे येथे.. स्वप्नामधली निळी निळाई जाई विरुनी आयुष्याच्या चिन्ध्या साऱ्या लटकत येथे.. नितीच्या त्या थोर कल्पना भरल्या पोटी एक वितीची भूक सजविते सज्जा येथे... शरीर चिरडत घुमे वासना चढ़त्या रात्री बुभुक्षितांचे थवे तोड़ती लचके येथे.... रंगीत चेहरे डोळे मोडीत झुले जवानी रात्रीच्या गर्भातुन ये रात्र च येथे... -पद्मश्री ( वैशाली हळदणकर चे -बारबाला पुस्तक वाचल्यावर सुचलेली कविता.) . चित्
विशेष

गाथा स्मायलींची

लेखक जुइ यांनी रविवार, 08/03/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर जास्त जाणून घेण्याविषयी रस निर्माण झाला तो अतृप्त आत्मा यांचा विविध स्मायलींचा मुक्त वापर पाहून. 'स्मायली' बहुतकरून एका हसणाऱ्या मानवी चेहऱ्याला संबोधले जाते जसे :-) . स्मायलीची संकल्पना साधारण १९४८ साली प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातून झाली. पोर्ट ऑफ कॉल ह्या सिनेमातील एका दृश्यात दु:खी नायिका लिपस्टकच्या साह्याने एक चेहरा आरशावर चितारते. त्या चेहऱ्यावरील भाव उदास असून नाकासाठी एक टिंब योजला आहे.
विशेष

क्रोशायार्न

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 08/03/2015 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
. अगदी लहानपणापासून ह्या कलेचं अप्रुप वाटे मला. एका हुकाने / सूईने कशी काय लोकर विणून छान-छान वस्तू बनवता येते असा प्रश्न पडे.
विशेष

अर्थ्स चिल्ड्रेन

लेखक पैसा यांनी रविवार, 08/03/2015 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आज आपण Jean Marie Auel यांनी लिहिलेल्या Earth’s Children या कादंबरी मालिकेची ओळख करून घेऊया. १९८० साली या मालिकेतील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले, The Clan of the Cave Bear. यानंतर २०११ पर्यंत या मालिकेत एकूण ६ भाग क्रमाक्रमाने प्रकाशित झाले. The Clan of the Cave Bear, The Valley of Horses, The Mammoth Hunters, The Plains of Passage, The Shelters of Stone, The Land of Painted Caves एकूण सुमारे ४५०० छापील पाने मजकूर ६ खंडात विभागून लिहिण्याची प्रचंड कामगिरी श्रीमती ऑएल यांनी केली. २०१० पर्यंतच या पुस्तकांच्या एकूण साडेचार कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या.
विशेष

नक्षी

लेखक इनिगोय यांनी रविवार, 08/03/2015 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
तिची पाठ दरवाज्याकडे होती. स्वतःच्याच तंद्रीत ती खिडकीबाहेर पाहत होती. समोरचा बगिचा आता बर्फाच्या चादरीतून बाहेर पडून उमलायला लागला होता. आता या झाडांना पानं फुटतील, मग कळ्या येतील, त्या उमलतील.. माझ्या स्वप्नांसारख्याच! तिचे विचार सुरूच होते. होय. अजूनही तिच्या मनात कळ्या, फुले, पाने, चंद्र, सूर्य, तारे असे प्रेमकवितांमधले शब्द येत असत. पांढराशुभ्र घोडा, रुबाबदार राजकुमार, गोंडस मुलंबाळं, सुंदर सजलेलं घर, नोकरचाकर या कल्पनाविश्वात रमणं हा तिच्या दिनक्रमाचा भाग होता.
विशेष