Skip to main content

जगणे कसले

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे कसले रोज नव्याने मरणे येथे निष्ठा कसली रात्र उगवता सजणे येथे.. स्वप्नामधली निळी निळाई जाई विरुनी आयुष्याच्या चिन्ध्या साऱ्या लटकत येथे.. नितीच्या त्या थोर कल्पना भरल्या पोटी एक वितीची भूक सजविते सज्जा येथे... शरीर चिरडत घुमे वासना चढ़त्या रात्री बुभुक्षितांचे थवे तोड़ती लचके येथे.... रंगीत चेहरे डोळे मोडीत झुले जवानी रात्रीच्या गर्भातुन ये रात्र च येथे... -पद्मश्री ( वैशाली हळदणकर चे -बारबाला पुस्तक वाचल्यावर सुचलेली कविता.) . चित्र-पियुशा
विशेष

वाचने 5856
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

अस्वस्थ करणारी पण यथार्थ कविता. पियुशाने काढलेलं चित्र ही अगदी समर्पक

:(

वाचले कि फार अस्वस्थता येते :(

:( :( माझे तर असे काहि वचले कि डोकेच फिरते. दिवसभर तेच डोक्यात चालु राहते. नको वाटते अगदी. :'(

वाचून रेस्टलेस झाले आहे. स्वाती

:(

कवितेवरचं चित्र छान … अगदी समर्पक . अशीच कुणी तरी होती मनात

नितीच्या त्या थोर कल्पना भरल्या पोटी एक वितीची भूक सजविते सज्जा येथे...
अगदी खरं!! झटक्यात एक आख्खं जीवन पुढ्यात आलं कविते मार्फत. :( पियु च्या रेषांनी कविता समर्पक रित्या सामोरी आली.

अस्वस्थ, बेचैन करणारी कविता , चित्रही समर्पक.

मोजक्या आणि समर्पक शब्दांत उभं केलेलं भेदक चित्र. जोडीला असलेलं चित्र कवितेतल्या चित्राला अजून गडद करणारं. नितीच्या त्या थोर कल्पना भरल्या पोटी - ....खासच!

एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्यावरील प्रतिक्रिया कवितेतून इतक्या भावस्पर्शी शब्दात व्यक्त होणं, हे खूप आवडलं. त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन! प्रखर वास्तव तितक्याच प्रखरपणे मांडणारी कविता. पियुशा, चित्र स्तब्ध करणारं! तुझं खूप खूप अभिनंदन!