✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक

स
सहज यांनी
Fri, 09/21/2007 - 16:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15531 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

र
राज जैन (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 16:18 नवीन

;)

सहज व सुंदर ! क्या बात है ! राज जैन
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 16:32 नवीन

मित्रा, चां

मित्रा, चांगले लेहितोस. पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 09/21/2007 - 16:36 नवीन

का?

>>पण फुल्टाईम वेबसाईट चालवणे हा चांगला धंदा नाही. असे का बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीकाकार-१
आ
आजानुकर्ण Fri, 09/21/2007 - 16:36 नवीन

"पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली

हा हा.. :) चालू द्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/21/2007 - 16:44 नवीन

सुंदर !

सहजराव, काही दिवसापासून आम्ही पाहतोय आपल्या लेखनाला एक धार चढलेली आहे, ब-याचदा विनोदी शैलीने,तर कधी-कधी गंभीर प्रसंगी गंभीर प्रतिसादही पाहिले आहेत.अभ्यासाच्या वेळेस अभ्यास या पध्दतीने आपली वाटचाल चालू आहे. इतके लिहिण्याचे कारण की,आपण ज्या ''मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक'' या प्रतिभावंत साहित्यिकांचा योग्य शैलीत,त्यांचा आणि त्यांच्या साहित्यप्रवासाचा (गौरव) परिचय करुन दिला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गणेशोत्सव सोडून त्यांच्या जयजय कारात गुंतला आहे.त्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र सारस्वतांच्या यादीत पाहून संपूर्ण संकेतस्थळवासी आज धन्य झाले ! अवांतर ;) बरे झाले आपण यांच्यावर सुंदर लेख लिहिला, नाहीतर आमच्या मनात त्यांच्याविषयीच्या आदराने एका लेखाचा आकार धारण केलाच होता :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:09 नवीन

प्रा. डॉ.

प्रा. डॉ. साहेब, तुमचाही लेख येऊद्या. तेवढाच टाईम पास... तुमच्या कडेही भरपूर वेळ आहेच. ;) बाकी तुमची डॉ. आणि प्रा. ही बिरूद निळ्या अक्षरात मिरवायची हौस कधी संपणार? :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/21/2007 - 17:20 नवीन

सही !

एच टी एम एल कोडींगचा इतकाच फॉर्मेट सेव्ह केलेला आहे आणि तो कोठे वापरायचा म्हणून इथे वापरतो.(तोही मित्रांनी दिलाय,निळ्या रंगासहीत) बाकी प्रा.डॉ. चेही तसेच आहे,आहे तर कुठे वापरायचा म्हणून इथे. आता आग्रह करता आहात तर झक्कास लेख रविवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण दाद द्यायची हं आवडला तर ! तोंड वाकडे करुन म्हणायचं नाही ठीक होता म्हणून ! :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीकाकार-१
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:25 नवीन

बरं बरं

बरं बरं छान आहे म्हणीन हा... नाहीतर बाकिचे आहेतच ...नेहमीप्रमाणे..:)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/21/2007 - 17:30 नवीन

आस्सं आहे तर !

आरे त्यांचे पाठबळ आहे म्हणून तर लिहितो रे ! नाही तर वाचनमात्र राहावे लागले असते किंवा टूकाराम-टूकाराम १ नावे घेत काड्या करत फिरावे लागले असते ना ! :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीकाकार-१
र
राज जैन (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 17:48 नवीन

टूकाराम-टूकाराम

;) मस्त नाव आहे ! पण साहेब अजून एक आहे की काड्याराम ! कसे एकदम दक्षिण भारतीय भारदस्त तेलगू अथवा तामिळ हीरोचे नाव वाटत नाही ! अजून एक टिकाकार देखील नाव एकदमच भारदस्त आहे, जेव्हा मी प्रथम हे नाव वाचले तेव्हा वाटल होतं की कोणीतरी गंभीर प्रकाराचा मानव आहे "टिकाकार" जो गंभीरपणे वाचन करुन गंभीरपणे त्याचा सविस्तर पंचनामा करत असतील ! पण काय करावे .... नाम अमीरचंद ..... पर जेब फकीरचंद असा काहीतरी प्रकार दिसतो आहे ! राज जैन "मानसाने कमीत कमी आपल्या नावाची तरी किमंत राखावी ह्या मताचा असलेला मी"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टीकाकार-१ Fri, 09/21/2007 - 17:53 नवीन

राजे

राजे साहेब.. इथल्या "कोंबडी" कडून अंड्याची आणि "प्रा.डॉ." कडून डॉक्टर्कीची तर आपेक्षा तुम्ही करत नाही आहात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राज जैन
व
विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 18:35 नवीन

सहजराव, छान लिहिलं आहेस रे! :)

ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्‍याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते. अगदी खरं आहे! प्रसव इथून उडवून लावल्याच्या प्रसुतीवेदना विनायकालाच जास्त झाल्या आणि त्याच्याकडून 'अभिव्यक्ति स्वातंत्र्य' हा लेख जन्माला आला! :) असो, च्यामारी मला शिकवतात अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या गप्पा!:) अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली. हा हा! 'पार्टटाईम लेखक' हा प्रकार आवडला! :) काय पण बाकी नशीबवान मनुष्य आहे मी! लोकं हौशीहौशीने माझ्या ब्लॉगावरील उतारेच्या उतारे दुसरीकडे कॉपी पेष्ट करण्यात धन्यता मानतात! असो, या सर्वांना संत तात्याबांचा आशीर्वाद आहे! :) नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला. गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्‍या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्‍याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको. क्या बात है! सुंदर लेख.. आपला, (एक नंबर काड्याघालू!) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 23:44 नवीन

गद्य पद्य आणि लाज

गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय खूपच हसलो !! आपली शैली आवडली, ह्याविषयी पुढे कधीतरी (म्हणजे दुसर्‍या भागात.) - सर्किट
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 09/21/2007 - 23:39 नवीन

मस्तच!!

टीकाकार हा आपल्यातलाच आहे हे सर्वांनी ओळखलेच असावे. जाणून बु़जून केलेल्या टंकलेखनातल्या चूका आणि जिथे तिथे तोंड खुपसणे इत्यादी प्रकार म्हणजे, - 'लोकशाहीवाले संकेतस्थळ काढता काय? बघा कसा पीडतो' ह्या मानसिकतेतुन आलेला जळफळाट आहे हे स्पष्ट आहे. पण हा टीकोजीराव तसा आळशी माणूस असुन त्याला सहसा एका ओळीच्यावर लिहिता येत नसल्याने त्याची डाळ शिजत नाही हेच खरे! :-) ह्या प्रतिसादावर देखिल त्यांची एक ओळ येणार हे नक्की!! बाकी लेख 'सहज' सुंदर -कोलबेर
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 09/22/2007 - 08:34 नवीन

सहमत आहे

शिवाय टीकाकारांची संकेतस्थळावर हजेरीची वेळ लक्षात घेता ते भारतातच वास्तव्यात आहेत हे लक्षात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ट
टिकाकार Sun, 09/23/2007 - 21:17 नवीन

तुमच्या

तुमच्या चातुर्य्कथा कधी लिहिताय टिकाकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
क
कोलबेर Sun, 09/23/2007 - 23:47 नवीन

हा हा हा

टिकाकारा तू इतका प्रेडीक्टेबल असशील असे वाटले नव्हते.. माझ्या चातुर्यकथांआधी तुजे आयपी पत्ते प्रसिद्ध होणार नाहीत ह्याची काळजी घे हो!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकाकार
व
विसोबा खेचर Mon, 09/24/2007 - 00:04 नवीन

हो रे बाबा,

हो रे बाबा टिकाकारा, इथे गावकीचं राजकारण आहे हो! कोणत्या गोष्टी उजेडात आणल्या जातील आणि कोणत्या रातोरात दाबून टाकल्या जातील याचा काही पत्त्या लागायचा नाही! :) तेव्हा नावाने 'टिकाकार' आहेस ते चांगलेच आहे. टीका करायचं लायसन तुझ्या नावातच आहे. परंतु केवळ करायची म्हणून टीका करू नकोस, तर अभ्यासपूर्ण टीका कर. टीका करणार्‍याचा मूळ लेखनावर/लेखनप्रकारावर जबरदस्त अधिकार असला पाहिजे एवढं लक्षात घे. तुझ्या टीकेची दखल सगळ्यांना घ्यावी लागेल असा आदर्श निर्माण कर. केवळ नाव टिकाकार आहे म्हणून जिथेतिथे पिंका टाकत हिंडू नकोस. नाहीतर काही दिवसानी लोक तुझ्या प्रतिसादांकडे लक्ष देईनासे होतील आणि अधिकच फ्रस्ट्रेट होशील. आणि तसं सध्याही तुझ्या सोकॉल्ड टीकेच्या निरर्थक पिचकार्‍या पाहिल्यावर तू ऑलरेडी फ्रस्ट्रेट असावास असं वाटतं! बाकी मिसळपाव सुरू झाल्यापासून काही मंडळींनी फ्रस्ट्रेट होऊन संतुलन गमावल्याचे माझ्या पाहण्यात आहे! तसेच अनेकांना अचानक पोटदुखीचे विकारही सुरू झाल्याचं माझ्या पाहण्यात आहे! अरे मिसळ आवडते म्हणून ती प्रमाणात खाणे हे ठीकच आहे पण तिच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर पचायची नाही :) असो, काळजी घे... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ग
गुंडोपंत Mon, 09/24/2007 - 13:17 नवीन

वा सही!

व आवडले लेखन... मस्तच हाणलाय हो! "नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला." सही! मजा आ गया! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
क
क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:50 नवीन

वा वा!!

या लेखमालेतील प्रत्येक पूष्प वाचनीय आहे. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा