ठाकुर भले बिराजे

जगन्नाथ's picture
जगन्नाथ in जनातलं, मनातलं
21 Sep 2007 - 9:23 am

हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले.

जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।।

काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी
झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।।

सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी
झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।।

सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते.

हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल? त्या घालमेलीतून त्यांनी मार्ग कसा काढला असेल?

इतिहासाच्या अव्याहत ओघाची जाणीव आपल्यात जागृत करणे हाच तो मार्ग. "आपले घर", "आपली भूमी" ह्या गोष्टीही अनित्यच आहेत हे समजून घेतले पाहिजे, श्रीकृष्णाला देखील वेगवेगळ्या युगांत वेगवेगळ्या ठिकाणी "स्थायिक" व्हावे लागले, हे ह्या काव्यात सांगितले आहे.

आता झारखंड ह्या शब्दाचा वापर करून अर्थाला कसा पदर जोडला हे लक्षात येते. झारखंडचा मूळ अर्थ "झाडांचा प्रदेश" एवढाच. तो ऍमेझॉनच्या परिसरातल्या प्रचंड वन्य प्रदेशालाही लागू पडतो. तिथेही वृंदावनातली बासरीच वाजते आहे, हे एका ओळीत कसे सहज सांगितले आहे हे ऐकून फार कौतुक वाटते. अत्यंत साध्या घरेलू शब्दात गंभीर अर्थ बेमालूमपणे "लपवणे" ही तर खास भारतीय कला आहे. हे रचणारा कवी अथवा कवयित्री किती बुद्धिमान असेल!

अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी आहे. त्यांचे आपल्या देशावर अतिशय प्रेम आहे. पनामा हॅट घालून रम पीत बाकड्यावर बसून गप्पा हाणणा-या माणसांच्या घरी देवघरात राधेकृष्ण आहेत. हे लोक अस्सल कॅरिबियन "बेंडबाजा" वर डान्सही करतात, आणि फगवा वगैरे पारंपरिक त्यौहारही जोरात साजरे करतात.

परदेशस्थ भारतीय म्हणजे फक्त आपले उच्चशिक्षित मध्यमवर्गीय असा कधीकधी आपल्याला भ्रम होतो. ह्या लोकांना आपली संस्कृती नष्ट होते आहे असे म्हणून रडण्याची खूप सवय आहे. खरा परदेशस्थ भारतीय समाज किती अठरापगड आहे, आणि त्यांनी मुळीच आरडाओरडा न करता आपली संस्कृती कशी सहज टिकवली आहे, त्यातून आपण शिकले पाहिजे.

इथे एकदा मला एका अरब टॅक्सीवाल्याने सांगितले होते की इंडियन लोकांचे कौतुक वाटतं. कारण ते परदेशात कितीही राहिले तरी आपलं सोडत नाहीत म्हणून. तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ...

संस्कृतीकविताभाषासमाजआस्वाद

प्रतिक्रिया

सहज's picture

21 Sep 2007 - 9:43 am | सहज

>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे...

होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले...

असो पण जगन्नाथराव तुमच्या एका पॉइंटवर फूल मान्य की बहूतेक "उच्चशिक्षित मध्यमवर्गीयांच्या" जोरावर परदेशात भारतीय संस्कृती आहे तशी टिकली नसती नक्कीच फ्यूजन झाले असते. मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत.

अजून एक गोष्ट म्हणजे कधीनाकधी लुंगी, मद्राशी, गुज्जू म्हणतो आपण त्या तामीळ , गुजराथी लोकांच्यामुळे आज परदेशात कित्येक ठीकाणी "शाकाहारी" आहार आपल्या कट्टर शाकाहारी मराठी जनांना मिळतो.

विसोबा खेचर's picture

21 Sep 2007 - 10:16 am | विसोबा खेचर

श्रीकृष्णाला देखील वेगवेगळ्या युगांत वेगवेगळ्या ठिकाणी "स्थायिक" व्हावे लागले, हे ह्या काव्यात सांगितले आहे.

क्या बात है...:)

अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी आहे. त्यांचे आपल्या देशावर अतिशय प्रेम आहे. पनामा हॅट घालून रम पीत बाकड्यावर बसून गप्पा हाणणा-या माणसांच्या घरी देवघरात राधेकृष्ण आहेत. हे लोक अस्सल कॅरिबियन "बेंडबाजा" वर डान्सही करतात, आणि फगवा वगैरे पारंपरिक त्यौहारही जोरात साजरे करतात.

परदेशस्थ भारतीय म्हणजे फक्त आपले उच्चशिक्षित मध्यमवर्गीय असा कधीकधी आपल्याला भ्रम होतो. ह्या लोकांना आपली संस्कृती नष्ट होते आहे असे म्हणून रडण्याची खूप सवय आहे. खरा परदेशस्थ भारतीय समाज किती अठरापगड आहे, आणि त्यांनी मुळीच आरडाओरडा न करता आपली संस्कृती कशी सहज टिकवली आहे, त्यातून आपण शिकले पाहिजे.

लेखन आवडले..

जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।।

काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी
झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।।

सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी
झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।।

वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का?

आपला,
(बृजवासी) तात्या.

जगन्नाथ's picture

21 Sep 2007 - 11:04 am | जगन्नाथ

वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का?

तोच सापडत नाही अाहे. पण जरूर शोधेन. तोपर्यंत हा फार वेगळा त्रिनिदादचा "धैकाला" बघून घ्या: रंग डाल के मोहनवा . . .

कॅरिबियन वाद्यवृंद अाणि ताल, अाणि भन्नाट कॅरिबियन पद्धतीचे इंग्रजी उच्चार, हे सगळं असूनही कसं अस्सल देशी अाहे. हे पण प्रतीकात्मक वाटतं . . .

जगन्नाथ's picture

21 Sep 2007 - 11:50 am | जगन्नाथ

Guyana Tribute च्या पहिल्या भागात अाहे. अाता ऐकल्यावर वाटतं उच्चार थोडेसे कलले अाहेत. "जगरनाथ" असा काहीसा इंग्रजाळलेला ऐकू येतो. बघा कसं वाटतं ते.

अाणि बोनुस म्हणून हे घ्या: घरलिए जाय . . . ह्यात निखळ भारतीय सूर अाणि अानंदी अाफ्रिकी वृत्ती ह्यांचा असा काही मिलाफ झाला अाहे की ऐकताक्षणी मोह पडतो.

विसोबा खेचर's picture

21 Sep 2007 - 11:56 am | विसोबा खेचर

दुव्यांबद्दल धन्यवाद जगन्नाथराव,

सध्या शेअरबाजारात बसलो आहे, घरी जाऊन दोन्ही गाणी सवडीने ऐकतो..

तात्या.

जगन्नाथ's picture

21 Sep 2007 - 10:23 am | जगन्नाथ

>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे...

होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले...

ते एक "गोळाबेरीज" पद्धतीचं म्हटलं हे तुम्हाला माहीतच अाहे. तशी बेकारी, दारुबाजपणा, बायकांचा छळ करणे असल्या गोष्टी कुठल्या समाजाला चुकल्या अाहेत? पण एकूण ते संतुष्ट वाटतात. विशेष म्हणजे त्यांना अापल्या गरिबीच्या राहणीची शरम वाटत नाही. न्यूनगंड नाही. ह्या स्वच्छ दृष्टीचा उगम त्या देवभक्तीतच अाहे असे मला वाटते.

मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत.

हे अापण कधी शिकणार काय माहीत. अापण मंतरलेली गाणिबिणी ऐकतो अाणि अापल्यानंतर सगळं संपणार म्हणून गळा काढतो.

अाता हे पण जरा टोकाचंच विधान अाहे हे लक्षात घ्या.

>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ...
यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा.
(जिज्ञासू)बेसनलाडू

>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ...

यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा.
(जिज्ञासू)बेसनलाडू

असल्या गोष्टी सिद्ध करता येतात का?

डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे. तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा. "अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. "कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . .

विसोबा खेचर's picture

21 Sep 2007 - 12:45 pm | विसोबा खेचर

डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता"

आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा..

बेसनलाडू's picture

21 Sep 2007 - 1:30 pm | बेसनलाडू

डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे.
महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात. उदा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, तबला/सतार/वीणावादन इ. तुम्ही अठरापगड जातीधर्माच्या परदेशस्थ भारतीयांचा उल्लेख केला आहे, म्हणून सांगतो, अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे. संपूर्ण अमेरिकेत असलेल्या एकमेव अशा सॅन होजेमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नवजीवन देण्यासाठी येथे स्थित असलेल्या भारतीयांनी पुढाकार घेतला आहे, हे विशेष; उलट भारतात बसून येथील डॉक्टर आणि अभियंत्यांच्या नावाने शंख करणार्‍यांनी याबाबत काही केले असेल की नाही शंकाच आहे (तेथे पुतळ्यांच्या पुनरुज्जीवनापेक्षा त्यांना चपलांचे हार घालण्यात कोण पुढे, याची जणू स्पर्धाच लागलेली असते). बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत. गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात.

तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा.
"अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही.
का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत? अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला. जन्माने अथवा स्वीकृत नागरिकत्त्वाने 'अमेरिकन', 'ब्रिटिश', 'आयरिश' वगैरे झालेल्यांनी तसे म्हटले, तर त्यात गैर ते काय? भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता!

"कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . .
का नाही तथ्य? सरसकट विधाने ठोकून नका देत जाऊ राव! मुद्देसूद बोला. काही आगापिछा नसताना, अनुभव नसताना अशी विधाने ठोकण्यामागची आपली भूमिका कळेल काय?
(मुद्देसूद)बेसनलाडू

जगन्नाथ's picture

23 Sep 2007 - 2:51 am | जगन्नाथ

महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात.

करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे.

अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे.

हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय?

बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत.

असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले.

भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता!

मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे.

माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही.

का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत?

तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या.

अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला.

म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही.

सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही.

मुलांचे कौतुक करा, त्याला ना नाही. अाणि स्वतःचीही पाठ थोपटून घ्या. माझा मुद्दा वेगळा आहे.

अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात.

बाकी आनंद. हल्ली तर Onion मध्ये सुद्धा असल्या सांस्कृतिक "बुफे"वर लेख लिहून आला. म्हणजे प्रकार रसातळाला पोचला अाणि इंडियन लोक मध्यमवर्गात आले, दुसरं काय ...

गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात.

भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही.

अमेरिकेत तसे करावेच लागते हा ही मुद्दा बरोबर नाही. इकडे अाफ्रिकन फेस्टिव्हल झाला तेव्हा लोक चपला अडकवून चालत नाहीतर बस पकडून पार्कात आले.

आणखी खूप बोलता येईल. पण मुख्य मुद्दा असा की अमेरिकन मध्यमवर्गाचा पायाच सच्चाई नसण्यात आहे. ह्या विषयावर गेल्या ५०-६० वर्षांत असंख्य लेख आणि पुस्तके प्रसिद्ध झाली. रॉक/फोक वगैरेला तर दुसरा विषयच नाही असे म्हणता येईल.

तुमच्या "अागापीछा", "अनुभव" वगैरे शब्दांवरून शाखेची भाषा चांगलीच अवगत असलेली दिसते. म्हणून शाखेतला पिढीजाद प्रश्न तुम्हाला नीट समजेल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

सहज's picture

23 Sep 2007 - 8:36 am | सहज

>>भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही.

अमेरीका भारताच्या ७ पट मोठी आहे, तसेच लोकसंख्या भारताच्या मानाने खूपच कमी, शिवाय सर्वजण हिंदूधर्मीय (हिंदू सण साजरे करणारे) नाहीत. तरी तुमचे हे तुमचे म्हणणे समजत नाही बुवा.

>>मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे.

"बसलो" ह्या शब्दाला काही वेगळा अर्थ असेल तर सांगा, तुमची सूटका करायला तिकडचे देसीजन नक्की येतील. बसला आहात का तुमच्या मनाविरूध्द बसवले गेले आहे?

काही मदत हवी असेल तर सांगा, कारण बहूतेक तशी गरज तुम्हाला आहे असे तुमच्या लिखाणावरून वाटते.

----------------------------------------------------
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती? बास करणार कधी?" - सही आहे

बेसनलाडू's picture

23 Sep 2007 - 11:09 am | बेसनलाडू

करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे.
बरोबर आहे. मग असे असेल तर सांगा ना भयाण काय ते. मोघम विधाने करून, आपले मुद्दे सोदाहरण स्पष्ट न करता विधाने ठोकून देता आहात, यावरूनच आपली आणि आपल्या विचारांची पात्रता कळते आहे.

हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय?
तुम्हाला उपचार वाटले, तर ते सगळे खोटे/चुकीचे असा स्वतःचा (गोड गैर)समज करून घ्यायला तुम्ही काय पंचम जॉर्ज की लॉर्ड फॉकलन्ड? मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी केली तर त्यात गैर काय आहे, ते सांगा की स्पष्ट करून...भारतात राहून नाही केली सरकारी नोकरी तर नाही केली, तर काय झाले? आणि सरकारी नोकरीचाच एव्हढा पुळका तर भारतात सॉफ्टवेअरमध्ये काम करणार्‍यांना सांगा की महानगरपालिकेत काम करायला, आणि मग बघा काय प्रतिक्रिया येते ते!

असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले.
पुन्हा तेच. तुम्हाला समाधान नाही वाटले म्हणून अख्खा उपक्रमच बकवास? तुम्ही बाहेर पडून मग तुम्हाला हायसे वाटले, म्हणून त्या कार्यक्रमाचा/उपक्रमाचा काही दर्जा नाही आणि त्याचे योगदान उल्लेखनीय नाही? काय बोलताय राव...संगणक मिळालाय म्हणून कळफलक बडवत सुटलाय नुसते!

मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे.
आपण वर पाजळलेले ज्ञान पाहता आपण येथे बसला आहात ही आपली घोडचूक आहे, असे म्हणावेसे वाटते. आपण भारतात का नाही आहात मग? येथे का "बसला" आहात?

तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या.
हाहाहाहाहा!!! काय हास्यास्पद विधान आहे! जर्मन. पोलिश वगैरेंच्या तुलनेत येथे तीनचार पिढ्या घालवलेल्या भारतीयांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून या मग तोंड उघडा!

म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही.
अच्छा म्हणजे तुम्हाला न आवडलेले कार्यक्रम लोकप्रिय नाहीत तर! अनुष्का शंकरचा कार्यक्रम ऐकला आहात का कधी? त्या वाद्यवृंदात गाणे म्हणणारी आणि वाद्ये वाजवणरी अनेक मंडळी अमेरिकेत जन्मली आणि/किंवा वाढली आहेत. जरा बघून-ऐकून या मग येथे येऊन मतांची पिंक टाका.

सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही.
"सांज ये गोकुळी" ला दर्जा नाही? माझी मिसळपावला विनंती आहे की जगन्नाथांचे हे वाक्य फ्रेम करून येथे लावावे आणि आल्यागेल्याला येथे तसेच भारतात ते दाखवावे. आणि त्यावरील प्रतिक्रिया जगन्नाथांना वाचायला-ऐकायला-पहायला द्याव्यात :))

अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात.
असेच अनेक अपवाद मीही दाखवून देऊ शकतो. च्यालेन्ज करताय का?

भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही.
आपली कीव येते आहे साहेब! फक्त इतकेच सांगू शकतो की हा प्रतिसाद लिहिताना आपले डोके ठिकाणावर राहिलेले नाही. सॉरी यापुढे आपल्या तोंडाला लागण्यात काही अर्थ दिसत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. उत्तर द्या. हवेत तारे तोडू नकात आपल्या अकलेचे!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
ह्याला म्हणतात बेसनलाडवाला धम्मकलाडू देणे.

जगन्नाथ's picture

21 Sep 2007 - 1:32 pm | जगन्नाथ

आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा..

मला सर्व बरोबर नि "शुद्ध" दिसत अाहे. तुम्हाला कसे दिसते?

अा / आ वेगळे दिसतात का?

ऐ कसा दिसतोय?

प्राजु's picture

23 Sep 2007 - 3:13 am | प्राजु

सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही.

जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ?

- प्राजु (परदेशस्थित)

जगन्नाथ's picture

23 Sep 2007 - 3:28 am | जगन्नाथ

जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ?

- प्राजु (परदेशस्थित)

मला दहाच काय पंधरा वर्षांतले माहित नाही. पण भारतीय संगीत त्याआधीही होते अशी अफवा आहे! :)

मी ते गाणे ऐकले असेल. पण ते लक्षात राहिले नाही. कारण मध्यंतरी मला आशा भोसलेंची फार भीती वाटत होती. त्यांच्या सर्व गाण्यात एक प्रकारचा जो भयंकर खिन्नपणा आला होता तो ऐकवत नव्हता. अक्षरशः "clinical" वाटत होता. आता परिस्थिती त्या मानाने बरी आहे असे वाटते. पण आवाज नाहीसा झाला. असो. ठीक आहे. परत ऐकेन.

हा depression सारखा प्रकार का होतो ह्याचा मात्र अभ्यास झाला पाहिजे. मला असं वाटतं की भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे.

चित्रा's picture

23 Sep 2007 - 6:12 am | चित्रा

बोलते. कुठच्याही निष्कर्षापर्यंत आपण फार पटकन येत आहात असे वाटते.

१. अमेरिकेतील उच्च मध्यमवर्गीय भारतीय समाज संस्कृती गेली म्हणून गळे काढतो - प्रत्यक्षात मी तरी कोणालाही गळे काढताना पाहिले नाही. उलट येथे पटकन रूळायला बघताना पाहिले आहे. कदाचित अमेरिकेत स्थायिक व्हायचे हे ठरवून येणारे लोक विचाराने अधिक स्थिर असावेत. मला दिसते ते असे की एकदा इथे रहायचे ठरवले तर जास्तीत जास्त भारतीय गोष्टी कशा मुलांपर्यंत पोचत्या करायच्या ते ठरवून प्रत्येकजण त्या आपापल्या उत्साहाप्रमाणे आणि घरच्या वळणाप्रमाणे पार पाडतो. आता जे आडात (भारतातल्या घरात) नसते किंवा कमीजास्त प्रमाणात असते तसे ते पोहर्‍यात (येथे) दिसते. बॉलीवूड/ मलमलीचे कुडते इत्यादी गोष्टी जर तिकडच्या जनतेला आवडत असतील तर त्या इथेही आवडतात यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही. या परिस्थितीमुळे मूळ संस्कार कसे आहेत त्याला महत्त्व आहे - आणि तेही लोक आपापल्या मगदूराप्रमाणे आणि काय शक्य आहे त्याप्रमाणे मुलांपर्यंत ते पोचते करीत असतात. त्यात चूक काय?

एखाद्या कार्यक्रमाला जाताना ५० मैल जावे लागते का दोन मैल / गाडीने का घोड्याने याचे काही कौतुक नाही, महत्त्व आहे ते "जावेसे" वाटते याला. ते जोवर वाटते आहे, तोवर काही प्रश्न नाही. आता कोणी आम्ही कसे ५० मैल जातो म्हणून बोलत सुटला तर तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण मी तरी असे कोणालाही करताना पाहिले नाही.

२. गयानातील गरीब भारतीय समाज संस्कृती टिकवतो - हे खरे आहे, पाहिले आहे आणि ऐकलेही आहे - पण ते लोक जेव्हा गेले तेव्हाची स्थिती, तो काळ, त्यांचे आधुनिक पाश्चात्य संस्कृतीला "एक्स्पोजर" कमी असावे - शिवाय ते गेले ते साध्याश्या कॅरिबिअन देशांत. या सगळ्यामुळे त्यांनी केलेले श्रम, टिकवलेले प्रेम आणि रितीरिवाज याला कमीपणा आणायचा नाही. पण आताच्या पाश्चात्य संस्कृतीच्या सोसाट्यात ही संस्कृती कशी टिकते ते पहायचे.

३.भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे. - भारतात स्त्रियांना पात्रता पटवून द्यावी लागते तर अमेरिकेत त्यांना सुखात सर्व accept करतात का ? अमेरिकेतले काही भारतीयही ज्यांनी आपली पात्रता पटवून दिली आहे अशा स्त्रियांबद्दल फार काही गौरवाने बोलताना पाहिलेले नाहीत. असो.

चित्तरंजन भट's picture

24 Sep 2007 - 3:28 pm | चित्तरंजन भट

इंग्रजांनी आणि इतर फिरंग्यांनी कॅरबियन, फिजी, मॉरिशसमध्ये उसतोडणीसाठी लागणारा मजूरवर्ग मुख्यतः उत्तर भारतातून नेला होते, हे खरे. आता ह्या लोकांपैकी किती लोक स्वतःच्या मर्जीने गेले आणि किती लोक धाकदपटशामुळे हा संशोधनाचा विषय. [पण १९ व्या शतकातल्या बिहारमधल्या इंडिगो प्लांटेशनवाल्या (निळीची शेती करणाऱ्या) गोऱ्या इंग्रजांचा दाखला बघितला ह्या लोकांना जबरदस्तीनेच नेले असण्याची शक्यता अधिक. न ऐकणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांचे हात कलम करणे, त्यांना आंधळे करणे ह्या गोष्टी त्या काळी आम होत्या आणि अनेक दंगलीही झाल्या. (आंधळे करण्याची क्रेझ बिहारात ह्यामुळेच आली असावी काय?)]

तर ह्या लोकांचे तिथले जीवन वेठबिगाराचेच. ते वेठबिगारच होते. त्याकाळात भारत आणि कॅरबियन किंवा फिजीमधली अंतरे बघितली तर त्या काळी गावाकडे परतणेही अशक्य. आणि आता आयुष्यभर इथेच राहावे लागेल आणि "अब वो अमराईयाँ, वो सावन, वो फागुन, वो बसंत कहाँ," ह्या विचाराने त्या लोकांना किती यातना होत असतील! (माणूस कुठल्याही काळातला असो. पण हा विचारच किती यातनादायी!) कदाचित म्हणूनच ह्या लोकांनी अशी भजनांतून, लोकगीतांतून मनातला त्या आमराया, तो श्रावण, तो फाल्गुन, तो वसंत जीवंत ठेवला असावा.

भजनाबद्दल धन्यवाद जगन्नाथ. लेख एकंदर चांगला झाला आहे.