काचेची बरणी आणि २ कप चहा

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
20 Sep 2007 - 9:28 pm

आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.

तत्व़ज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तु बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपाँगचे बॉल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पुर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॉक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला.आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी ताबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले दोन कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी काही जागा होती ती चहाने पूर्ण भरून निघाली. विद्यार्थांमध्ये एकच हशा पिकला.
तो संपताच सर म्हणाले," आता ही जी बरणी आहे तिला तुमचं आयुष्य समजा. पिंगपाँगचे बॉल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं,आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या अश्या गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सारं काही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य़ परिपूर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी घर आणि कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी. "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॉल किंवा दगड- खडे यांच्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची.तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच राहणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी महत्वाचं काय आहे त्याकडे लक्ष द्या. "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडीकल चेकअप करून घेण्यासाठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेऊन बाहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकाऊ वस्तुंची विल्हेवाट लावायला तर नेहमीच वेळ मिळत जाईल. "पिंगपाँगच्या बॉलची काळजी आधी घ्या त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं हे ठरवून ठेवा बाकी सगळी वाळू आहे." सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं ,"यात चहा म्हणजे काय?" सर हसले नि म्हणाले ," बरं झालं तू विचारलंस. तुझ्या प्रश्नाचा अर्थच असा की आयुष्य कितीही परिपूर्ण वाटलं तरी मित्राबरोबर एक -दोन कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते."

----------------------------------------------------------------------
आंतरजालात विरोपाने प्राप्त झालेली ही कथा आहे. - नीलकांत

जीवनमानविचारआस्वाद

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2007 - 9:54 pm | प्रकाश घाटपांडे

ही बोधकथा सकाळ मध्ये पण आली होती. अर्थात काही बोधकथा या कधी पारंपारिक, कधी पाडलेल्या असतात. कुठलेही विचार मनात लोकांच्या मनात ठसवण्यासाठी बोधकथांचा खुप उपयोग होतो. पण प्रत्यक्षात 'कळतय पण वळत नाही 'अशी अवस्था असते त्या वेळी आपण नेमक्या कुठल्या बोधकथेचा वापर करतो कि करत नाही हे मह्त्वाचे. बर्‍याच वेळी आपली राजकीय विचारश्रेणीचा प्रभाव पाडण्यासाठी आता पाळलेल्या विद्वानांकडून अशा बोधकथा तयार केल्या जातात व प्रसारित केल्या जातात. पुर्वी राज्यकर्ते गुंड पाळत असत आता ते पुरेसे नसल्यावे विद्वान देखिल पाळले जातात. गोबेल्स तंत्रप्रणालीसाठी यांचा खूप उपयोग होतो.
प्रकाश घाटपांडे

व्यंकट's picture

21 Sep 2007 - 6:44 am | व्यंकट

पुर्वी राज्यकर्ते गुंड पाळत असत आता ते पुरेसे नसल्यावे विद्वान देखिल पाळले जातात.

सहीच

प्राजु's picture

21 Sep 2007 - 5:29 am | प्राजु

मी ही वाचली आहे ही कथा.. खूप छान आहे.

सन्जोप राव's picture

21 Sep 2007 - 7:02 am | सन्जोप राव

चहाच्या ऐवजी बियर असेही या कथेचे एक रुप वाचले होते (आणि ते अधिक पटले होते!)
सन्जोप राव

कोलबेर's picture

21 Sep 2007 - 7:28 am | कोलबेर

आमचेही एक व्हर्जन-

"तुमची प्लेट उसळ आणि फरसाण ह्यांनी शिगोशीग भरली असली तरी त्यावर वाटीभर लालभडक तर्री/कटाला जागा असतेच.. "

-कोलबेर

राज जैन's picture

21 Sep 2007 - 10:36 pm | राज जैन (not verified)

चहा, बियर व नंतर लाल भडक कोल्हापूरी कट......... हे मात्र मस्त मिश्रण झाले आहे ह्या चर्चेत ;)
कधी तरी असा मीक्स रस घेऊन पाहवयास हवा !
पण चहा तर कुठला ही चालेल पण बियर कुठली चालेल ह्या मिश्रणला ?

राजे
(राज जैन)

( माझे विश्वप्रसिध्द, महानूभव, मानव श्रेष्ठ , मिसळपाव संस्थेमध्ये सर्वात लोकप्रिय, मराठी विश्वामध्ये विश्वविख्यात श्री श्री टीकाकार-१ ह्यांनी देलेली राजे ही नजर चूकी ने व कळपटलाने दिलेल्या दग्यामुळे प्राप्त झालेली ही पदवी आम्ही आजन्म आपल्या जवळ बाळगू !!!!! टीकाकार महाराजांना विजय असो ! )

धनंजय's picture

22 Sep 2007 - 1:30 am | धनंजय

कॉफीमध्ये मद्य मिसळले तर चालते, पण चहात चालत नाही असा आमच्या कॉलेज-कंपूतला (अवैज्ञानिक) शोध होता. नेलपॉलिशसारखा उग्र वास येणारे द्रव्यही घशाखाली ढकलू शकणार्‍या त्या कंपूकडून "चालत नाही" असा निर्णय आला, तो गंभीर मानला जावा. त्यामुळे कटाबरोबर चहा आणि बियर यांपैकी आमच्या टेबलावर एकच पाठवून द्या.

राजे's picture

22 Sep 2007 - 9:06 am | राजे (not verified)

भाऊ कूठल्या कॉलेज मध्ये होता ?
कोल्हापुरचे के एम सी तर नव्हे ना ? कारण असे आचाट प्रयोग तेथेच चालायचे .

राजे
(*हेच राज जैन आहेत)

मराठी महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातले एम सी नाही - हिंदी/पंजाबी "छावणी" राज्यातल्या 'पूना'तले ए एफ एम सी, अशी दोन व्याज अक्षरे!
खिशात पितृप्रेम खुळखुळे तोपर्यंत वसतीगृहावर उंची आय एम एफ एल ची सद्दी. महिन्याअखेरच्या ओहोटीत स्वस्त विषारी द्रवे कशात घातली तर झिंग येते ते प्रयोग. कोल्हापुरातही आमचे प्रयोगशील बंधू राहातात हे ऐकून त्या झणझणीत गावाबद्दल आदराच्या ठिकाणी आता आपुलकी निर्माण झाली आहे.

केदार-मिसळपाव's picture

16 Jan 2013 - 3:39 pm | केदार-मिसळपाव

एकदम मस्त विचार आहे.

आयुष्याचं सार = चहा+कट+बियर

अनन्न्या's picture

16 Jan 2013 - 4:51 pm | अनन्न्या

पहिलं वाक्य हा धाग्याचा प्रतिसाद आणि पुढचे स्पष्टीकरण प्रतिसादांचे.

वा... जीवनाचा संपुर्ण सार अगदी सोप्प्या शब्दात मांडला आहे. आवडेश.. :)

स्पंदना's picture

16 Jan 2013 - 5:23 pm | स्पंदना

हम्म! किती जरी व्यस्त असलं तरी दोन कप चहासाठी वेळ नक्कीच असावा.....मस्त!

तिमा's picture

16 Jan 2013 - 8:14 pm | तिमा

आवडली. म्हणून अनुभवाने सांगतो की लग्न झाल्यावर खरेदी करताना सर्वात आधी डबल बेड घ्यावा नाहीतर नंतर तो ठेवायला जागाच रहात नाही.

शुचि's picture

17 Jan 2013 - 2:02 am | शुचि

आयला ;)