Skip to main content

एक विचित्र अनुभव आहे

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/07/2026 19:46 या दिवशी प्रकाशित केले.

माझा एक विचित्र अनुभव आहे

दक्षीण अफ्रिकेत असताना एका विक्रेत्याकडे मला एक  लाकडावर कोरलेला अफ्रिकन माणसाचा मुखवटा ( बस्ट)  दिसला.

त्याच्याकडे इतरही होते. पण  या मुखवट्याकडे लक्ष्या जरा जास्तच वेधले जात होते. पुतळा अगदी जिवंत वाटावा इतका छान कोरलेला होता.

मुखवट्याच्या डोक्या वरच्या भागात लाकडाला  एक लहान चीर पडलेली होती .इतकाच काय ती  थोडीशी खोट होती.

तो विक्रेता अगोदर मला मुखवटा विकायला राजी नव्हता.

पण नंतर त्याने तो मला अनिच्छेनेच  दिला.  देताना तो म्हणाला की हा मुखवटा शक्यतो झाकून ठेवा.

तो मुखवटा मी घरी आणला. आणि दिवाणखान्यात ठेवला.

दोनतीन दिवसात मला एका ओळखीच्या कुटुंबातून कोणीतरी  गेल्याचा निरोप आला. त्या माणसाबद्दल सकाळीच आमची चर्चा झाली होती.

अशीच एक घटना त्या नंतरच्या पंधरा दिवसात तीन वेळा घडली. आम्ही पुतळ्यासमोर कोणाबद्दल चर्चा केली की  त्यांच्याबद्दल काहीतरी अघटीताची बातमी यायची.  आपण पुतळयसमोर कोनाबद्दल काही बोललो की असे घडते आहे हे  आमच्या  पैकी कोणाच्यातरी लक्ष्यात आले. प्रत्येक वेळेस योगायोग असेल अशी समजूत करून घेतली. पण मनात शंका नको म्हणूण तो पुतळा पुन्हा बॉक्स मधे ठेवून दिला.

त्या नंतर हे असे घडणे थांबले.

पण त्या नंतर जेंव्हा जेंव्हा कधी बॉक्स मधून तो पुतळा बाहेर काढला गेला तेंव्हा तेंव्हा  एक दोन दिवसंच्य अंतराने कोणीतरी गेल्याची बातमी आलीच.

आता पुतळा बॉक्स्मधून बाहेर काढण्याचे धाडस होत नाही.   फेकून देण्याचे किंवा कोणाला द्यावे तर तो कोणाकडे तरी असेच प्रताप दाखवत रहाणार

 एबनी लाकडात कोरलेला तो  पुतळा इतका सुंदर आहे की जाळून टाकायचे मन होत नाही.

हा माझा स्वत:चा अनुभव आहे.

एक विचित्र अनुभव : चकोर शाह.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 704
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

भरपूर किंमत येईल. 

नाहीतर मला द्या. बऱ्याच जणांची (व्हीलन लोक्स) भूतलावरून उचलबांगडी करायची ईच्छा आहे. 


थरारक अनुभव आहे पण ऑन अ लाइटर नोट.. इतके मृत्यू घडल्यावर देखील तुम्हाला ती मूर्ती किंवा मुखवटा फेकून देववत नाही यावरून अनेक भयपट आठवले. आठ दहा जण निर्जन अरण्यात जुनाट वाड्यात राहायला जातात. तिथे कायम एक सावधगिरीचा आणि धोक्याचा इशारा देणारा जुना नोकर (कंदील+ अंधार फेम - इथे कंदीबी लाईटी येत्यात जात्यात.. भाईर पडू नका वगैरे..) जसा तुमचा तो आफ्रिकन विक्रेता (नेहमी झाकून ठेवा असं सांगणारा) .. आणि या लोकांची गंमत म्हणजे पहिला खून होतो. दुसरा होतो. कोणाकोणाला आकृत्या किंवा भूत दिसते.. तरीही लोक त्याला वेड्यात काढून आपापल्या खोल्यांत एकेकटे झोपायला निघून जातात. तिसरा खून पडतो. ते सर्व घाबरतात.. चौथा खून पडतो. ते सर्व प्रचंड घाबरतात. पण त्यांना तरीही ते घर सोडून "जाववत नाही". शेवटचा मुडदा पडेपर्यंतही ते तिथून निघून जात नाहीत. बाकी खोक्यात किंवा कव्हरमध्ये घालून ठेवले तरी त्याला तुमचे बोलणे आणि त्यातील व्यक्तींचे उल्लेख ऐकू येत असणारच आहेत. आणि आजवरचा तुमचा अनुभव पाहता ज्यांच्याबद्दल "त्या"च्या समोर बोलले गेले त्यांच्या बाबतीत अघटित घडले. त्यासाठी "त्या"ला कोणी व्यक्ती दिसण्याची गरज पडली नव्हती. तेव्हा फेकूनच द्या. कसला नसता मोह. ? ;-)


विजुभाऊ,

 

मुखवटा उघडून त्याच्यासमोर 'श्री दुरुदेव दत्त' हा नामजप करा. ती जी काही अडकलेली शक्ती आहे तिला गती मिळेल. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कुणाच्याही सल्ल्याने हे सांगंत नाहीये.

 

आ.न.,

-गा.पै.


हा प्रकार म्हणजे बोलाफुलाची गाठ असू शकते, परन्तु विषाची परिक्षा नको, म्हणुन तो मुखवटा सागरा अर्पण करणे एक मार्ग असू शकतो.


थोडक्यात आवरती घेतली  कथा. फुलवली असती तर नक्कीच नारायण  धारपांच्या काळी जोगी किवां प्राध्याप क वाईकरांच्या कथा  वगैरे नाव .... प्राध्यापक विजुभाऊची  कथा म्हणून प्रकाशित करायची.

 

मस्त. 

 

पण हल्ली ही तुमची मुर्ती मोबाईल मधे घुसली आहे का काय शंका  वाटते. काही बोल्ले की तोच विचार गुगलच्या क्लिकबेट वर दिसतो.

परवा तर बायकोशी भांडण झाले तर "सुखी संसाराची सात रहस्य ", हा मानसशास्त्रीय लेख दिसला. 😇


एकतर पुतळा पेटवा किंवा माणसे मेल्याचे जास्त मनावर घेऊ नका. त्याहून भारी, एकदा तुम्ही सगळे सोबत बसून पुतळ्यासमोर पुतळ्याचीच चर्चा करा, म्हणजे काय होईल का पुतळ्यातील ती विविक्षित नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, अन् सुंदर लाकडी पुतळा जाळण्याची गरज उरणार नाही ! बोला चांगभले !


हे वाचून मला प्रतिलिपीवरच्या 'भयमुर्तिका' या भयकथेची आठवण झाली. त्यातही उत्खननात शत्रूमर्दिनी प्रकारातली एक 'सुरसुंदरीची मूर्ती' सापडते आणि तिच्या डोळ्यात पाहणारा माणूस २४ तासात अपघाताने मरतो. तुमच्या या आफ्रिकन मुखवट्याचा प्रतापही अगदी तसाच खतरनाक वाटतोय!

तो पुतळा सुंदर असला तरी त्याला त्या बॉक्समध्येच कायमचं कुलूप लावून ठेवा, किंवा विसर्जित करा तेच सुरक्षित आहे.

Spine-chilling experience by the way! 😅


In reply to by अनिशासूत

<a href="https://ibb.co/p6PjGhJ2"><img src="https://i.ibb.co/JWdj035n/2555.jpg" alt="2555" border="0"></a>

 

पण तो इतकाही लिजेंडरी + अवयव फाडू वाटला नाही (वाचून), त्या पुतळ्याला एनाबेलचे स्थळ सुचवून पहायला हवे ! लग्नानंतर भले भले गार पडतात, आफ्रिकन पुतळा पण पडेल अशी आशा आहे, त्यातही एनाबेल सारखी कजाग बायको मिळाली तर जास्तच चान्स आहे असे वाटते 


In reply to by वृषभ खोंडे

हीच का ती एनाबेला बया ? हीच्याकड बगुन भ्या नाय  वाटल. ही बी मानसा खाते  की काय?


अगदी अश्शाच संकल्पनेवर धारप यांची भयकथा आहे. एका छोट्या मुलीला मामाने आफ्रिकेतून आणलेला मुखवटा आणि त्याच्यात जागृत झालेली दुष्ट शक्ती इ. इ. 

मला तर तुंम्ही हा धागा त्यावरूनच काढला असावा असे वाटते. खरेच असा मुखवटा आहे का तुमच्याकडे?


In reply to by स्वधर्म

असता तर मिपावर लेख लिहित बसले असते का....

.

आता मी राहिलो तर नाहीये. 

नाही राहॅिलो तर प्लीज तो चोरून इराण ला द्या....

अर्ध्या दुनियेचे तरी भले होईल.

 


In reply to by स्वधर्म

असेल तर मला द्या प्लीज 🥲😃... खूप लोकांबद्दल सांगायचं आहे त्या पुतळ्याला😁


अशीच एक कथा वाचली होती फार पूर्वी. इजिप्शियन लावण्यवतीची सुबक मूर्ती असते. लेखका ला मित्राकडुन कळते.मित्र ती मूर्ती घेतल्यानंतर सुरवातीचे काही दिवस खूप आनंदी असतो. नुकतेच लग्न झाल्या नंतरचे दिवस असल्यासारखे. कालांतराने थकत जातो शेवटी अस्थिपंजर होऊन त्याचा मृत्यु होतो. मरण्यापूर्वी तो लेखकाला मूर्तीचे रहस्य सांगतो. रोज रात्री ती मूर्ती एका लावण्यवतीमध्ये परिवर्तीत होत असे व त्यानंतर रात्रभर श्रुंगार सुख देत असे मूर्तीच्या मालकाला. सुरवातीला असे स्वर्गीय सुख मिळते म्हणुन मित्र खुश होता पण हा प्रकार रोज रात्री न चुकता होत असे. मालकाची इच्छा असो वा नसो. शेवटी शेवटी ती एक शिक्षाच होऊन बसली होती मित्राला. बहुदा लेखक पण होणारा शेवट दुर्लक्ष करुन त्या मूर्तीवर भाळुन ती मूर्ती स्वत:च्या ताब्यात घेतो असे काहीसे कथानक होते.


राधिका आपटेची एक शॉर्ट फिल्म बघितली होती. त्यात एक वयस्क कलाकार हुबेहूब खऱ्या व्यक्तींसारख्या मिनिएचर बाहुल्या बनवत असतो. राधिका आपटे ही त्याची तरुण पत्नी .. बाकी सांगत नाही.


कथा आवडली. त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आत्ता ज्याने तो मुखवटा विकत घेतला आहे, त्याने पुन्हा विक्रेता बनून तो आढेवेढे घेऊन विकायचा आणि विकत घेणाऱ्याला तोच सल्ला द्यायचा मुखवटा झाकून ठेवण्याचा.  


पुढचा मिपाकट्टा विजुभौच्याच घरी ठरवा. जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल मनसोक्त गप्पा हाणु. 😁