माझा एक विचित्र अनुभव आहे
दक्षीण अफ्रिकेत असताना एका विक्रेत्याकडे मला एक लाकडावर कोरलेला अफ्रिकन माणसाचा मुखवटा ( बस्ट) दिसला.
त्याच्याकडे इतरही होते. पण या मुखवट्याकडे लक्ष्या जरा जास्तच वेधले जात होते. पुतळा अगदी जिवंत वाटावा इतका छान कोरलेला होता.
मुखवट्याच्या डोक्या वरच्या भागात लाकडाला एक लहान चीर पडलेली होती .इतकाच काय ती थोडीशी खोट होती.
तो विक्रेता अगोदर मला मुखवटा विकायला राजी नव्हता.
पण नंतर त्याने तो मला अनिच्छेनेच दिला. देताना तो म्हणाला की हा मुखवटा शक्यतो झाकून ठेवा.
तो मुखवटा मी घरी आणला. आणि दिवाणखान्यात ठेवला.
दोनतीन दिवसात मला एका ओळखीच्या कुटुंबातून कोणीतरी गेल्याचा निरोप आला. त्या माणसाबद्दल सकाळीच आमची चर्चा झाली होती.
अशीच एक घटना त्या नंतरच्या पंधरा दिवसात तीन वेळा घडली. आम्ही पुतळ्यासमोर कोणाबद्दल चर्चा केली की त्यांच्याबद्दल काहीतरी अघटीताची बातमी यायची. आपण पुतळयसमोर कोनाबद्दल काही बोललो की असे घडते आहे हे आमच्या पैकी कोणाच्यातरी लक्ष्यात आले. प्रत्येक वेळेस योगायोग असेल अशी समजूत करून घेतली. पण मनात शंका नको म्हणूण तो पुतळा पुन्हा बॉक्स मधे ठेवून दिला.
त्या नंतर हे असे घडणे थांबले.
पण त्या नंतर जेंव्हा जेंव्हा कधी बॉक्स मधून तो पुतळा बाहेर काढला गेला तेंव्हा तेंव्हा एक दोन दिवसंच्य अंतराने कोणीतरी गेल्याची बातमी आलीच.
आता पुतळा बॉक्स्मधून बाहेर काढण्याचे धाडस होत नाही. फेकून देण्याचे किंवा कोणाला द्यावे तर तो कोणाकडे तरी असेच प्रताप दाखवत रहाणार
एबनी लाकडात कोरलेला तो पुतळा इतका सुंदर आहे की जाळून टाकायचे मन होत नाही.
हा माझा स्वत:चा अनुभव आहे.
एक विचित्र अनुभव : चकोर शाह.
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाड्याने द्या नां
भरपूर किंमत येईल.
नाहीतर मला द्या. बऱ्याच जणांची (व्हीलन लोक्स) भूतलावरून उचलबांगडी करायची ईच्छा आहे.
😂 चांगली कल्पना!
In reply to भाड्याने द्या नां by अकिलिज
😂
चांगली कल्पना!
परत बाहेर काढून असिफ मुनीर…
परत बाहेर काढून असिफ मुनीर बद्दल चर्चा करा.
थरारक अनुभव आहे पण ऑन अ…
थरारक अनुभव आहे पण ऑन अ लाइटर नोट.. इतके मृत्यू घडल्यावर देखील तुम्हाला ती मूर्ती किंवा मुखवटा फेकून देववत नाही यावरून अनेक भयपट आठवले. आठ दहा जण निर्जन अरण्यात जुनाट वाड्यात राहायला जातात. तिथे कायम एक सावधगिरीचा आणि धोक्याचा इशारा देणारा जुना नोकर (कंदील+ अंधार फेम - इथे कंदीबी लाईटी येत्यात जात्यात.. भाईर पडू नका वगैरे..) जसा तुमचा तो आफ्रिकन विक्रेता (नेहमी झाकून ठेवा असं सांगणारा) .. आणि या लोकांची गंमत म्हणजे पहिला खून होतो. दुसरा होतो. कोणाकोणाला आकृत्या किंवा भूत दिसते.. तरीही लोक त्याला वेड्यात काढून आपापल्या खोल्यांत एकेकटे झोपायला निघून जातात. तिसरा खून पडतो. ते सर्व घाबरतात.. चौथा खून पडतो. ते सर्व प्रचंड घाबरतात. पण त्यांना तरीही ते घर सोडून "जाववत नाही". शेवटचा मुडदा पडेपर्यंतही ते तिथून निघून जात नाहीत. बाकी खोक्यात किंवा कव्हरमध्ये घालून ठेवले तरी त्याला तुमचे बोलणे आणि त्यातील व्यक्तींचे उल्लेख ऐकू येत असणारच आहेत. आणि आजवरचा तुमचा अनुभव पाहता ज्यांच्याबद्दल "त्या"च्या समोर बोलले गेले त्यांच्या बाबतीत अघटित घडले. त्यासाठी "त्या"ला कोणी व्यक्ती दिसण्याची गरज पडली नव्हती. तेव्हा फेकूनच द्या. कसला नसता मोह. ? ;-)
दत्तागुरूंचा जप करा ....
विजुभाऊ,
मुखवटा उघडून त्याच्यासमोर 'श्री दुरुदेव दत्त' हा नामजप करा. ती जी काही अडकलेली शक्ती आहे तिला गती मिळेल. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कुणाच्याही सल्ल्याने हे सांगंत नाहीये.
आ.न.,
-गा.पै.
योग्य सल्ला दिलात.
In reply to दत्तागुरूंचा जप करा .... by गामा पैलवान
योग्य सल्ला दिलात.
बोलाफुलाची गाठ असू शकते
हा प्रकार म्हणजे बोलाफुलाची गाठ असू शकते, परन्तु विषाची परिक्षा नको, म्हणुन तो मुखवटा सागरा अर्पण करणे एक मार्ग असू शकतो.
नको. आमची पापलेटे अन् सुरमया…
In reply to बोलाफुलाची गाठ असू शकते by सौन्दर्य
नको. आमची पापलेटे अन् सुरमया मेल्या मं ?
हा हा 😂 खरय की!!
In reply to नको. आमची पापलेटे अन् सुरमया… by गवि
हा हा 😂 खरय की!!
हायला,नारायण धारप इस्टाईल....
थोडक्यात आवरती घेतली कथा. फुलवली असती तर नक्कीच नारायण धारपांच्या काळी जोगी किवां प्राध्याप क वाईकरांच्या कथा वगैरे नाव .... प्राध्यापक विजुभाऊची कथा म्हणून प्रकाशित करायची.
मस्त.
पण हल्ली ही तुमची मुर्ती मोबाईल मधे घुसली आहे का काय शंका वाटते. काही बोल्ले की तोच विचार गुगलच्या क्लिकबेट वर दिसतो.
परवा तर बायकोशी भांडण झाले तर "सुखी संसाराची सात रहस्य ", हा मानसशास्त्रीय लेख दिसला. 😇
विजुभाऊ
एकतर पुतळा पेटवा किंवा माणसे मेल्याचे जास्त मनावर घेऊ नका. त्याहून भारी, एकदा तुम्ही सगळे सोबत बसून पुतळ्यासमोर पुतळ्याचीच चर्चा करा, म्हणजे काय होईल का पुतळ्यातील ती विविक्षित नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, अन् सुंदर लाकडी पुतळा जाळण्याची गरज उरणार नाही ! बोला चांगभले !
"डोलांड तात्या
अमर रहे" असा जप करा मुखवट्या समोर. काय होते ते मग कळेलच पेपरातून.
छान आहे आयडियाची कल्पना 🤩🙏🏻😂
In reply to "डोलांड तात्या by अनन्त्_यात्री
छान आहे आयडियाची कल्पना 🤩🙏🏻😂
🗿
हे वाचून मला प्रतिलिपीवरच्या 'भयमुर्तिका' या भयकथेची आठवण झाली. त्यातही उत्खननात शत्रूमर्दिनी प्रकारातली एक 'सुरसुंदरीची मूर्ती' सापडते आणि तिच्या डोळ्यात पाहणारा माणूस २४ तासात अपघाताने मरतो. तुमच्या या आफ्रिकन मुखवट्याचा प्रतापही अगदी तसाच खतरनाक वाटतोय!
तो पुतळा सुंदर असला तरी त्याला त्या बॉक्समध्येच कायमचं कुलूप लावून ठेवा, किंवा विसर्जित करा तेच सुरक्षित आहे.
Spine-chilling experience by the way! 😅
आफ्रिकन पुतळा ओके
In reply to 🗿 by अनिशासूत
<a href="https://ibb.co/p6PjGhJ2"><img src="https://i.ibb.co/JWdj035n/2555.jpg" alt="2555" border="0"></a>
पण तो इतकाही लिजेंडरी + अवयव फाडू वाटला नाही (वाचून), त्या पुतळ्याला एनाबेलचे स्थळ सुचवून पहायला हवे ! लग्नानंतर भले भले गार पडतात, आफ्रिकन पुतळा पण पडेल अशी आशा आहे, त्यातही एनाबेल सारखी कजाग बायको मिळाली तर जास्तच चान्स आहे असे वाटते
(No subject)
In reply to आफ्रिकन पुतळा ओके by वृषभ खोंडे
आर तिच्या !
In reply to (No subject) by वृषभ खोंडे
हीच का ती एनाबेला बया ? हीच्याकड बगुन भ्या नाय वाटल. ही बी मानसा खाते की काय?
तात्यासाहेब विंचवीकर काय…
In reply to आफ्रिकन पुतळा ओके by वृषभ खोंडे
तात्यासाहेब विंचवीकर काय करतील मग?🤭😂
धारप यांची भयकथा
अगदी अश्शाच संकल्पनेवर धारप यांची भयकथा आहे. एका छोट्या मुलीला मामाने आफ्रिकेतून आणलेला मुखवटा आणि त्याच्यात जागृत झालेली दुष्ट शक्ती इ. इ.
मला तर तुंम्ही हा धागा त्यावरूनच काढला असावा असे वाटते. खरेच असा मुखवटा आहे का तुमच्याकडे?
ह्या ह्या ह्या
In reply to धारप यांची भयकथा by स्वधर्म
असता तर मिपावर लेख लिहित बसले असते का....
.
आता मी राहिलो तर नाहीये.
नाही राहॅिलो तर प्लीज तो चोरून इराण ला द्या....
अर्ध्या दुनियेचे तरी भले होईल.
होय
In reply to ह्या ह्या ह्या by अभ्या..
ईराणला खूपच उपयोग झाला असता.
हो आहे.
In reply to धारप यांची भयकथा by स्वधर्म
हो आहे.
असेल तर मला द्या प्लीज 🥲😃…
In reply to धारप यांची भयकथा by स्वधर्म
असेल तर मला द्या प्लीज 🥲😃... खूप लोकांबद्दल सांगायचं आहे त्या पुतळ्याला😁
अशीच एक कथा वाचली होती फार…
अशीच एक कथा वाचली होती फार पूर्वी. इजिप्शियन लावण्यवतीची सुबक मूर्ती असते. लेखका ला मित्राकडुन कळते.मित्र ती मूर्ती घेतल्यानंतर सुरवातीचे काही दिवस खूप आनंदी असतो. नुकतेच लग्न झाल्या नंतरचे दिवस असल्यासारखे. कालांतराने थकत जातो शेवटी अस्थिपंजर होऊन त्याचा मृत्यु होतो. मरण्यापूर्वी तो लेखकाला मूर्तीचे रहस्य सांगतो. रोज रात्री ती मूर्ती एका लावण्यवतीमध्ये परिवर्तीत होत असे व त्यानंतर रात्रभर श्रुंगार सुख देत असे मूर्तीच्या मालकाला. सुरवातीला असे स्वर्गीय सुख मिळते म्हणुन मित्र खुश होता पण हा प्रकार रोज रात्री न चुकता होत असे. मालकाची इच्छा असो वा नसो. शेवटी शेवटी ती एक शिक्षाच होऊन बसली होती मित्राला. बहुदा लेखक पण होणारा शेवट दुर्लक्ष करुन त्या मूर्तीवर भाळुन ती मूर्ती स्वत:च्या ताब्यात घेतो असे काहीसे कथानक होते.
राधिका आपटेची एक शॉर्ट फिल्म…
राधिका आपटेची एक शॉर्ट फिल्म बघितली होती. त्यात एक वयस्क कलाकार हुबेहूब खऱ्या व्यक्तींसारख्या मिनिएचर बाहुल्या बनवत असतो. राधिका आपटे ही त्याची तरुण पत्नी .. बाकी सांगत नाही.
गुढकथा. त्याने विकायला तरी…
गुढकथा. त्याने विकायला तरी का ठेवावा?
कथा आवडली. त्याच्यापासून…
कथा आवडली. त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आत्ता ज्याने तो मुखवटा विकत घेतला आहे, त्याने पुन्हा विक्रेता बनून तो आढेवेढे घेऊन विकायचा आणि विकत घेणाऱ्याला तोच सल्ला द्यायचा मुखवटा झाकून ठेवण्याचा.
पुढचा मिपाकट्टा विजुभौच्याच…
पुढचा मिपाकट्टा विजुभौच्याच घरी ठरवा. जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल मनसोक्त गप्पा हाणु. 😁
ओह नो.. कोण आहे रे तिकडे?…
In reply to पुढचा मिपाकट्टा विजुभौच्याच… by कानडाऊ योगेशु
ओह नो.. कोण आहे रे तिकडे? अरे यांचे खाते गोठवा रे.. ;-)
ऑन सेकंड थॉटस कट्ट्याला शंभर…
In reply to ओह नो.. कोण आहे रे तिकडे?… by गवि
ऑन सेकंड थॉटस कट्ट्याला शंभर टक्के हजेरी भरावी यासाठी हा उपाय जालीम आहे.
पुढचा मिपाकट्टा विजुभौच्याच…
In reply to पुढचा मिपाकट्टा विजुभौच्याच… by कानडाऊ योगेशु
पुढचा मिपाकट्टा विजुभौच्याच घरी ठरवा.
कांदा-लिंबाशिवाय मिसळपावला चव नाही. मला यावेच लागेल. आणि मी येणारच.
Déjà vu?
कथा मस्त आहे. याची किंचित विस्तृत आवृत्ती याआधी वाचण्यात आली होती असे वाटते. पूर्वप्रकाशित आहे का? (Déjà vu?)
हा अनुभव फार फार पुर्वी…
हा अनुभव फार फार पुर्वी आंबोळी नामक एका सदस्याने त्यांच्याकडे असलेल्या कंदील या धाग्यावर थोडीशी वाच्यता केली होती.
लिंक शोधुन टाकतो
ही लिंक पहा कंदील | मिसळपाव
ही लिंक पहा कंदील | मिसळपाव
त्या लिंकवरची कथा https:/…
In reply to ही लिंक पहा कंदील | मिसळपाव by विजुभाऊ
त्या लिंकवरची कथा https://www.misalpav.com/story/1417
साधारण 4 वर्षापूर्वीची कथा आहे. माझे आई-वडील कोकण दर्शनला गेले होते. तीकडून येताना सावंतवाडीवरुन एक लाकडाचा नक्षीदार कंदील घेऊन आले. त्या कन्दीलात बल्ब लावायची सोय आहे. मी लगेच त्यात बल्ब लावून बघितला. सगळ्या घरातल्यानी त्या कंदिलाचे कौतुक केले. मग तो कंदील शोकेसमधे ठेऊन सगळेजण आपापल्या उद्योगाला लागले. पण दुसर्या दिवशी सकाळी आमच्या बाबांचे एक मित्र वारल्याची खबर आली. नंतर साधारण 2-3 महिने तो कंदील शोकेस मधे होता. दिवाळीच्या आगोदर 15 दिवस घरात अशी कल्पना मांडली गेली की नवीन आकाश-कंदील आणायच्या ऐवजी हाच कंदील आत लाइट लावून वापरावा. त्यानुसार मी त्या कंडीलात दिवा बसवून कसा लागतोय , कसा दिसतोय याचे प्रात्यक्षीक बघितले आणि….. दुसर्या दिवशी आमचे एक जवळचे ओळखीचे गृहस्थ वारल्याची खबर आली. 7-8 दिवस त्यांच्या कार्यात आणि इतर गडबडीत गेले. आणि मी नुसताच टीवी बघत लोळत पडलेला बघून आईने फर्मान सोडले की दिवाळी 8 दिवसावर आली जरा घरी कामात मदत कर. आकाश कंदील तयार आहे का? कधी आणि कुठे लावायचा? नीट लागातोयका ते बघ. मी परत तो कंदील लावून आईला दाखवला. आणि परत…. दुसर्या दिवशी सकाळी आमच्या एका ओळखीच्या बाई गेल्याचा सांगावा आला. हा योगायोग पाहून आईची गंमत करायला म्हणून मी म्हणालो “बघ आई, आपण कंदील लावला की कोणी तरी गचकतय”. पण आईला काही ते पटले नाही. तिने ते म्हणणे उडवून लावले. वसुबारसचा दिवस. सकाळी आंघोळी करून तयार होत आलेल्या फराळावर ताव मारुन मी आकाश कंदील म्हणून तो कंदील लावला. आणि मित्रानो काय सांगू… संध्याकाळी आमच्या घरा समोर राहाणारे एकजण अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले. मग मात्र आईचा या गोष्टीवर विश्वास बसून तो कंदील तिने मला काढायला लावला. आजुन 1-2 महिने झाल्यावर आई नको म्हणत आसतानाही माझ्या 4 वर्षाच्या पुतण्याच्या आग्रहावरून (त्याला मीच पेटवले होते)पुन्हा एकदा कंदील लावला. मित्रहो काय सांगू तुम्हाला… अहो त्याच दिवशी परत एक ओळखीची व्यक्ती इहालोक सोडून गेली….. इतके झाल्यावर तो कंदील फक्त शोकेस मधे ठेवण्यात आला. पण मी ही स्टोरी माझ्या मित्राना खूप रंगवून रंगवून सांगायचो. त्यातील एक पुण्याचा मित्र ती स्टोरी ऐकून फारच प्रभावित झाला. मे महिन्यात सुट्टीला तो माझ्या गावी त्याच्या काकान्कडे आलेला आसताना त्याने माझ्याकडे तो कंदील पहाण्याचा हट्ट धरला. मी पण मानभावी पणे त्याला म्हणालो “कंदील दाखवतो… आपण तो सुरू करून सुध्दा पाहू… पण त्यानंतर जर काही घडले तर माझी जबाबदारी नाही…”. त्यानंतर त्याला कंदील सुरू करून दाखवला. नंतर बराच वेळ गपा मारुन , बाहेर जाउन चहा+सिगरेट मारुन त्याला त्याच्या काकाच्या घरी सोडले. उद्या भेटू असे ठरवून एकमेकाचा निरोप घेतला. दुसरया दिवशी भेटायच्या वेळेच्या आगोदर त्याचा एसएमएस आला. “गोइंग बॅक तो पुणे, XXX ‘स(आमचा दोघांचा मित्र) मदर एक्सपाइर्ड ”. मित्रा हो त्यानंतर इतके दिवस त्या कन्दीलाकडे गमतीने पाहणारा मी जाम टरकलो. आणि त्याच दिवशी तो कंदील उचलून माळ्यावर टाकून दिला. आजतागायत तो तिथेच धूळ खात पडलाय. 3-4 वर्षे झाली या घटनेला पण आजूनही तो कंदील डोक्यातून जात नाही. आणि इतकी वर्षे माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घोळतोय , ’याचा नेम कसा धरायचा?’ (ही एक सत्य घटना आहे. आजूनही तो कंदील आमच्या माळ्यावर आहे. ज्याना खात्री करून घ्यायची आहे त्यानी स्व जबाबदारीवर आमच्या घरी येऊन कंदील लावून खात्री करून घ्यावी) (आमची किन्वा गेलेल्या व्यक्तिन्ची नावे येथे मुद्दामच दिलेली नाहित. उगाच कोणाच्या भावना दुखावण्यात अर्थ नाही)
चॅटजीपीटी मोड ऑन. मी समजू…
In reply to त्या लिंकवरची कथा https:/… by विजुभाऊ
चॅटजीपीटी मोड ऑन.
मी समजू शकतो, की अशा घटनांकडे पाहताना एक त्रयस्थ आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवणे अवघड असते.
आपल्या संवेदनाक्षम वयात बघण्यात आल्यामुळे अशा घटना मनावर कायमचा ठसा सोडतात.
कुणाचे वाईट होऊ नये अशी आपली सत्प्रवृत्त भावना सतत जागृत असावी. त्यामुळेच न जाणो, निदान आपल्या मनाला टोचणी लागू नये एवढ्यासाठी का होइना, पण आपण अनेकदा असे भावनाप्रधान निर्णय घेतो.
आणि दैनंदिन आयुष्यात जर या वस्तु नजरेआड करून काही फरक पडत नसेल, तर मुद्दाम होउन, ती नजरेसमोर ठेवून पुढच्या वाईट बातमीची वाट बघत बसण्यात तरी काय असे फार समाधान आहे?
चॅटजीपीटी मोड ऑफ
(बघतो आता कितपत जमलंय)
कंदील
In reply to ही लिंक पहा कंदील | मिसळपाव by विजुभाऊ
हीच, हीच ती कथा. धन्स्!
जाळून टाकायचे मन होत नाही
माणसे जळण्यापेक्षा पुतळा जळालेला चांगला.