Skip to main content

सुनी जो उनके आने की आहट.......

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 30/06/2026 15:14 या दिवशी प्रकाशित केले.

सा्नीधपमगरेगरेसा. सानीधपमगरेगरेसा सानीधपमगरेगरेसा..... कीबोर्डवर तीहाईचे स्वर वाजले.  ऱ्हिदम सेक्षन मधे मादल वर   धा नी  धा नी धा , धा नी  धा नी धा,  धा नी  धा नी धा ची शेवटची थाप पडली. पुढचे काही क्षण पिनड्रॉप शांतता. अक्षरश: टाचणी पडली तरी आवाजहोईल इतकी शांतता.  माझा  वर गेलेला डावा हात खाली येतो. अगदीस्लो मोशन मधे आल्यासारखा   मिटल्या डोळ्यानी मी शांतता अनुभवते. काही क्षण असेच जाणारअसतात. त्या नंतर टाळ्यांचा कडकडाट होणार आहे. त्या आवाजात ही शांतता  नाहीशी होणार आहे. हा नेहमीचा अनुभव. पण गाण्याची शेवटचीओळ. गाणे संपले आहेआणि प्रेक्षक अजूनही गाण्याच्या जादूतून बाहेर आलेले नाहीत. ते हे दोनक्षण  असीम शांततेचे.  खूप आवडते हीशांतता.   स्वरांच्या समुद्रात  भोवतालचे जग पूर्ण बुडलेलेआहे. आपणच काय तेयाच्या बाहेर आहोत. या जगात असूनहीत्याच्या बाहेर आहोत. भोवतालच्या जगाला साक्षी भावाने अनुभवतोय. गुरूजीनी सांगतलेली साधना. त्यातली संबोधी अवस्था हीच ती

ही शांतता संपूच नये असे वाटतेय.  हा क्षण अस्साच थांबवूनठेवता आला तर कितीछान ना.... घड्याळाचे सगळे काटे घट्ट एकाच जागी चिकटवून टाकावेत. एकही क्षण पुढे  जायला नको. असे करता आलेअसते तर ...   आजच कशाला पण प्रत्येक वेळे हे गाणेआले की हा अनुभव येतोच. लोक म्हणतात की मी  गाण्यात जीव ओतून  गाते. असेलही. पण हे स्वरच असे आहेत की त्यात मी स्वत: एकस्वर होते. स्वत:ला झुळझुळतवाहू देते. वाऱ्या सारखे पाण्यासारखे.  त्या वेळेस  कुठलेच बंध अडवत नाहीत. गाणेआणि मी वेगळे नसतोचमुळी. माझ्या शरीराचा कण कणगाणे झालेला असतो. एकेका स्वरानी तो झंकारत असतो. गाण्याच्या सुरवातीच्या आलापाने त्या अनुभवाला सुरवातहोते. मुखडा झाला , मधला इंटरल्यूड चासतारीचा पीस वाजला की आत मधे काहितरीहोते. सभोवतालचे जग अदृष्य होते. उरते फक्त मी साथीच्यास्वर आणि तालात पूर्णबुडालेली.  आजूबाजूला कसलाच अवका नसतो, स्टेजवरचेझगमगणारे दिवेसतात, समोर ऐकणारा श्रोता नसतो, की थेटरमधला गडद होत जाणारा काळोखही नसतो. मी गाऊ लागते. वेळेचे भान उरत नाही. आवाजात मुद्दाम फॉलसेटो , व्हायब्रेशन देणे याची जाणहीउरत नाही. जे काही ऐकूयेते ते स्वच्छ स्वरअसतात. अगदी अंतरंगातून आलेलेअसतात. शब्द  पोहोचवायला मुद्दाम  आणलेला ठेहेराव नसतो. एका लयीत गाणेयेत रहाते. अगदी श्रावणातल्या मंदपावसात रानात वहाणाऱ्या ओहळासारखे. त्यातल्या  नितळ. निवळशंख पाण्यासारखे. कोणताही आवेश आणताझुळझुळ वहात येते.

त्या पाण्याच्या स्पर्षाइतकेच हे गाणेही अंगातएक अनामिक भावना चेतवते. निदान माझ्यातरी. माझ्या भावना थेट श्रोत्यानही जाणवतात. ते मंत्रमुग्ध होतात. त्यानाही गाणे  संपुच नये असे वाटते. गाण्या नंतर  येणारी ही स्तब्धता त्यानाहीहवी हवी असते. त्याचीधुंदी उतरू नये असेवाटत असते.

दाद देण्यासाठी टाळी वाजवली तरी शांततेचा भंग होईल असेत्याना वाटत असते. बरेचक्षण शांततेत जातात. प्रेक्षागृहातल्या कुठल्यातरी कोपऱ्यातून एक टाळी ऐकूयेते.    तंद्री मोडायला  तेवढी टाळी पुरते. लोक भानावर येतात. अक्षरश: जागे होतात.  टाळ्यावाजवायला विसरलो याची जाणीव होते. मग चहुबाजूनी टाळ्या ऐकू येतात.  मुसळ्धारपाऊस पडल्यासारखा पुढचे दोन तीन मिनीट फक्त टाळ्यांचाच आवाज येत रहातो.मी डोळे उघडते. डोळ्यातल्या  अश्रुंच्या धारांमुळे  समोर अगोदर धूसरप्रकाशच दिसतो. मी हळूहळू भानावरयेते. दोन्ही हात जोडून श्रोत्यांचेआभार मानते. माझ्याकडून ते घडत असते. यांत्रीकपणे .  मी थरथर कापतअसते.तोंडातून एक ही शब्द  बाहेर पडत नाही. रेवतीहे पहात असते. तीपुढे येते. माझा हात पकडूनमला विंग मधे नेतेमलारडू आवरत नाही.  तीमला विंगमधून   ग्रीनरूम मधे नेते.   एकटॉबेल पुढे करतो. मीतो पकडुन हमसून हमसून रडायला लागते. रेवती माझ्या पाठीवरून हात फिरवत रहाते. पाण्याचा ग्लास पुढे करते.  कायझाले का झाले हेविचारत नाही.  हळूहळू मी भावावर येते.  मी रेवती कडे पहाते. तीडोळे मिचकावते आणि हसते.  प्रत्युत्तरादाखलमी ही हसते आणि  डोळे पुसते.

 जेंव्हा जेंव्हा हे गाणे येते तेंव्हा मला  देव भेटलेला असतो.  त्याचा थेट अनुभव आलेलाअसतो.   रेवतीला हे माहीत आहे. याच्यापुढे काही गावे याचीइच्छा होत नाही. जयासामक धावत येतो. तिकडे श्रोत्यानी वन्स मोअर चा गजर चालवलेला असतो. त्याला माहीत आहे.लोक पुढचेगाणे होऊ देणार नाहीत.   जयाच्या आग्रहाखातर मी पुन्हा स्टेजवरजाते. नंदू कामत   सोबतआहे. मी फक्त हातजोडते. बोलायचे काम तोच करतोय. घशावर अतिरीक्त ताण आल्याने मीकाही वेळ तरी गाऊशकणार नाही . श्रोते   विश्वास ठेवतात. नंदूचे गाणे सुरू  होते. मी यांत्रीकपण विंगेत जाते. पुढचा सगळा कार्यक्रम रेवती,नंदू ,जया ओढून नेतात. कार्यक्रम संपतो. आवरा आवर झाल्यानंतर आता मला कुठेचअगदी  घरी जायचीही इच्छाउरलेली नसते. थिएटरच्या पायऱ्यानी आपल्याला थेट  कुठेतरी अदृष्य जगात  जगात घेऊन जावे. असे वाटते.

इतकेसुरेल जग अनुभवल्या नंतरसमोर येणारा प्रत्येक आवाज हा गोंगाटआहे याची जाणीव होतरहाते. आपल्याला या जगातच रहायचेआहे  ही आठवण प्रत्येकआवाज करून देत रहातो. शेवटची लोकल  दीड वाजता आहे. पण त्या ने एकटीजाण्यापेक्षा मी कैब बोलावते. कैब येते. कैब चालवणारा एकतरुण सरदारजी आहे. मला पाहूनतो स्वत: गाडीचादरवाजा उघडतो. मी आत बसते. कैब मधे रेडीओवर माझेचगाणे लागले आहे. असे म्हणतातकी पेरु ला पेरु खाता येत नाही. माझे गाणे श्रोता म्हणून मला ऐकायला मिळतनाही. गाणे ऐकताना रेकॉर्डिंगचीआठवण येते. त्या वेळेस घडलेल्या गमती आठवतात.  इतर किस्से आठवतात. तरी बरंय हल्ली डिजीटलरेकॉर्डिंग मुळे बरेच सोपेझालंय.  एकटे गाउन जायचे . संगीतकाराचा आसिस्टन्ट  नंतर मिक्स  करूनघेतो.  एडिट करताना स्वरचुकला तरी दुरूस्त करूनघेतो.  पूर्वी  रेकॉर्डिंगला सगळे वादक सोबतअसायचे ती गम्मत हरवलीआहे.   गाणे ऐकताना हेआपणच गायलंय का असा प्रश्नपडतो.

आजची गोष्ट वेगळी आहे. मी माझे गाणे ऐकतेय. सरदारजीला माझी ओळख पटलेली आहे. तो रेडीओचा आवाज मोठा करतो. मी माझे गाणे ऐकतेय. गाण्यासोबत येणाऱ्या आठवणी  थाम्बवून  ठेवायच्या म्हंटले तरी त्या थांबत नाहीत. मला एकदा हे गाणे ऐकायचे आहे एक श्रोता म्हणून. गाणे ऐकताना  लोकाना काय अनुभव येतो हे अनुभवायचे आहे. 

पण ते शक्य नाहिय्ये निदान या जन्मी  तरी, गाण्याशी निगडीत येणाऱ्या  आठवणी पूर्ण पुसून टाकता यायला हव्यात, तरच ते शक्य होईल.

आठवणी अशा थाम्बवता येत नाहीत. पेन्सिल चे एक टोक उचलले की दुसरेही उचलले जाते तशा आठवणी येत रहातात. गाणे ऐकताना ते रेकॉर्ड करतानाच्या आठवणी, त्या वेळचे स्टुडिओतले वातावरण , साथीदार वादकांची  वाद्ये जुळवताना  झालेले आवाज त्यानी केलेले विनोद,.पहिल्यांदा माईकसमोर कोरस मधे गायलो ती आठवण , स्टुडिओ पर्यंत जाण्यासाठी केलेली पायपीट, रस्त्यावरून तेंव्हा चालाताना आलेला खमंग वडापावचा घमघमाट. स्वतंत्र्पणे गायलेले पहिले गाणे. सुरवातीची भीति, गाणे पूर्ण झाले त्या वेळचे समाधान या अशा आठवणींसोबत जेवताना गुरगुट्या भात खाताना  खडा लागावा किंवा मग अचानक दाताखाली जीभ यावी तशा बोचणाऱ्या आठवणी, लोकानी फसवून गाणे गाऊन घेतल्याच्या, पैसे बुडवल्या आठवणी . आपण हे  सगळे सहन केले याचे आश्चर्य वाटतंय. 

आठवणी येत रहातात. आसपास गोंगाट ऐकू यावा तशा. त्यातून काहीच अर्थ बोध होत नाही. गोंगाटातून अर्थ काढायचे नसतात.पण गोंगाट असताना हवे ते आवाज ऐकू येत नाहीत तसेच मला गाणेही ऐकू येत नाही. माझ्या डोळ्या समोर आठवणी तरळत रहातात. आईने म्हंटलेली अंगाई. तीच अंगाई आपण सुप्रीयाला ऐकवून झोपवायचो. ती झोपण्या ऐवजी अंगाई पुन्हा पुन्हा गायला लावायची. आपल्याला झोप अनावर झालेली असायची. आणि तीला अंगाई ऐकायची असायची. हसूच येते आता त्याचे.  इतकी मोठी झाली आहे तरीही अजूनही कधी कधी ती त्या अंगाईचा आग्रह करते.

 "ताई घर आ गया". कैब ड्रायव्हरच्या आवाजाने मला भान येते.  त्याने कैब थाम्बवून  माझ्या साठी दार उघडले आहे.अरेच्चा घर आले देखील इतक्यात. मी घड्याळात पहाते. रात्रीचा दीड वाजतोय साडेबारा वाजता आपण निघालो त्याला. एक तास कुठे गेला समजलेच नाही.

मोबाईल मधे आवाज होतो. कैबचे किती बील झाले याचा मेसेज येतो.  गाडीच्या बाहेर उतरताना  मी पाचशेच्या दोन नोटा पुढे करते. पैसे घेण्या ऐवजी कैब ड्रायव्हर माझ्या वाकून पाया पडतो. " ताई मेरे लिये यह बहुत बडी बात है. आप मेरी गाडी मै आयी . यह मै कभी भूल नही पाउंगा..   आपके गाने सुनते हुवे हम बडे हो गये है  हम पैसे नही लेंगे." मी चमकून त्याच्याकडे पहाते. एरवी कलाकार आहे म्हंटल्यावर दुप्पट पैशांची अपेक्षा ठेवणारी माणसे पाहिली होती. हा वेगळाच आहे. अरे भई ये कैसे होगा. घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या" मी काही बोलायचे म्हणून बोलते त्याला ते पैसे त्याला घ्यायला लावते. 

"ताई  हम ये पैसे एक शर्तपर  लें सकतेे है. बस एक  छोटासा एहसान कर दिजीये "   कैब ड्रायव्हरच्या बोलण्याचे मला आश्चर्य वाटते. 

  पुढे  काय   असेल याचे याचे कुतूहल वाटते. कैब ड्रायव्हर बोलतोय. अगदी प्रामाणीक पणे. त्या डोळ्यात सच्चेपणा आहे.  

ताई . मेरी बेटी है.रोज आपका गाना सुनकरही सोती है. उसे मिलना है आपसे कभी .  मैने एक बार उसे झूट मूट का वासता दिलाया था आपसे मिलवाने का. मगर उसे विश्वास नही है मुझपर. मै अगर आपसे मिला था यह उसने देखा तो पूरी जिंदगी भरोसा करेगी मुझपर.आप बात करोगे उससे. 

या वेळेला?  ती झोपलेली असेल.

कोई गल नही जी . उसके लिये आप   मां सरस्वतीसे से कम नही हो. और भगवान के मिलने का कोई वक्त थोडे ही होता है?

त्या  "मा सरस्वती"  या शब्दामुळे मला कानकोंडे झाल्यासारखे होते. छे इतके मोठे बनवू नका हो मला.

कैब ड्रायव्हर  मोबाईलवर एक नंबर लावतो.व्हिडीऑ कॉल सुरु करतो.

  पलीकडे अंधार दिसतो.

की होया जी. इस वेले क्यूं कॉल कित्ता?  दसयो.   एक झोपेतला आवाज येतो.

साड्ढी गल सुण. सुप्रीत नु जगा देणा.  उस लई वड्ढा  सरपराईज . और हा...  लाईट जला. वेखने दे उसनू

पलीकडे उजेड होतो. एक थकलेली स्त्री दिसते.

ती एका लहान मुलीला झोपेतून उठवते. सात आठ  वर्षाची असेल ती मुलगी. ती स्त्री त्या मुलीला कडेवर घेते. सरदारजी बोलत असतो. सुप्रीत , मै तेनू कहांसी ना एक दिण उन्हा नाल मिलांगा? वेख  अज्ज मै किसदे नाल हा!

किसदे नाल हो प्पापा. 

वेख ....असे म्हणत सरदारजी त्याचा मोबाईल माझ्या समोर धरतो.

माझा चेहरा त्या मुलीला दिसत असावा. तीच्या चेहेऱ्याव्र ते दिसतय. डोळे विस्फारलेले आहेत. तीच्या चेहेऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसतय.

त्या मुलीच्या च्या चेहेऱ्यात मला माझ्या  मुलीचा सुप्रीयाचा चेहेरा दिसायला लागला.  अशीच दिसायची लहानपणी. सुप्रीया आणि सुप्रीत.... इतकाच  काय तो फरक.

 नमष्कार ताई. पापाने कहा था आप को वो जानते है. और आपसे मुझे मिलायेंगे. ती मुलगी अस्पष्ट  मोडक्या तोडक्या शब्दात बोलते. नीट बोलता येत नसावे बहुतेक तीला.

मिल तो गये ना बेटा. मै वही हुं आपके पापा सही कहते है. वो जानते है हमे. काहीतरी बोलायचे म्हणून मी बोलते.

ताई आप मेरे लिये गाना गाओगी?  तीच्या प्रश्नाने मला काय करावे समजत नाही.

त्या सरदारजीलाही तीच्या या अशा अचानक मागणीने  काय करावे समजत नाही. तो ओशाळ हसतो.

ताई ,  माफ कर दो. बच्ची की बात है. बुरा मत मानिये. वह ठीक से बोल नही पाती है .  स्पेश्यल चाईल्ड है जी . उनके सकूल मे  आपके गीत गा लेती है.  

 मेनु गाना सुनना है. वही गाना सुनना है. जो रोज सुनती हुं. मेनू गाना सुनना है. वही गाना. पापा आप  सच्ची उनको पहचानते हो ना? त्या निरागस प्रश्नाने आत कुठेतरी काहितरी जाणवते.

त्या  लहान मुलीच्या डोळ्यात काय होते कोण जाणे . मी पुन्हा गाडीत बसले. गाडीचे दार लावले. आणि    मोबाईल समोर धरून  गाणे म्हणून लागले.  . माझ्या गळ्यातून सूर येवू लागले.  कोणत्याही साथ संगती शिवाय.

सुनी जो उनके आनेकी आहट..गरीबखाना सजा दिया.

तीच्या  त्या चमकत्या डोळ्यात मला काहितरी दिसते. आज स्टेजवर  तेच अनुभवले होते. तीच्या नजरेतून मी माझे गाणे अनुभवते.   कोणत्याही जुन्या आठवणींच्या सोबती शिवाय.

 

सुनी जो उनके आनेकी आहट:- चकोर शाह.

 

 

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 219
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सुंदर,तरल आणी हृद्य आठवण. 

नक्कीच  लतादिदी किंवा आशाताई ची असणार..

धन्यवाद 

 


खूप सुंदर कथा, थोडा शास्त्रीय संगीत मैफिलीचा संदर्भ सोडला तर वाचताना लता मंगेशकरच येत होत्या डोळ्यांपुढे.


खूप आवडली कथा.

मात्र वाचताना मला लता, आशा वगैरे काही वाटले नाही. काल्पनिक कथा समजूनच वाचत होतो. कथेतले शेवटले वळण अनपेक्षितपणे आले, तेही खूप भावले