तांत्रिक अडचणी मिसळपाव संस्थळ
लेखनप्रकार
तांत्रिक अडचणी मिसळपाव संस्थळ
मिसळपाव साईट एका तयार प्रोग्रामवर चालते त्या Drupal CMS (Content Management System) code चे पाच सहा जाणकार सभासद हवेत. म्हणजे साईट सातत्याने सुरू ठेवण्यास गती मिळेल आणि ते काम फक्त एक दोघांवर पडणार नाही. आपापली इतर मुख्य कामं संभाळून हे काम करावे लागते.
बरेच दिवसांच्या खटपटीनंतर मिपा अद्ययावत होत आहे. ( Drupal 7>>Drupal 11) गुढी पाडव्याला नूतनीकरण झाले पण नंतर संस्थळ बंद पडले. आपल्याला जुन्या मिपाची सवय आहे. पण नवीन CMS code अद्यतन झाल्यावर 'खरडफळा' आणि 'व्यक्तिगत संदेश' बाद झाले. यांची उणीव प्रकर्षाने जाणवणारी आहे.
आपल्या तांत्रिक अडचणी लिहिण्यासाठी हा चाचणी लेख धागा उघडला आहे.
वाचन
235
प्रतिक्रिया
10
नमस्कार,
खरडफळा परत येईल. व्यक्तिगत संदेश बाबत विचार सुरू आहे.
या शिवाय बेसीक मध्ये म्हणजे लेखन प्रकाशित करताना आणि प्रतिसाद देताना काही अडचण आल्यास येथे कळवता येईल.
जुने लेख?
जुने लेख गेले का? की ते परत मिळू शकतील?
सर्व जुने लेख आहेत.
सर्व जुने लेख आहेत. तो तर मिपा चा खजिना आहे. हळू हळू विषयानुरूप याद्या देतो.
SEO CHECKS
मला यातलं काही कळत नाही परंतू या तीन ठिकाणी misalpav dot com तपासून पाहिले.....
Seo check sites
1. https://www.seoreviewtools.com/google-seo-checker/
2.https://rankmath.com/tools/seo-analyzer/
3. https://yoast.com/tools/seo-checker/
In reply to SEO CHECKS by कंजूस
misalpav dot com तपासून पाहिले.....
का ? 🤔
In reply to misalpav dot com तपासून पाहिले..... by सुमो
Website check/ know your website
असं search केल्यावर SEO बद्दल कळलं. म्हटलं बघू तरी काय अहवाल देतात इतर वेबसाईटचा आणि मिपाचा. पूर्वी एकदा पाहिलं होतं त्या एका चेक साइटवर सर्वर कुठे आहे, किती दिवस फी भरली आहे हेसुद्धा कळायचं . ( त्याचं नाव आठवत नाही.)
FONT Size
प्रतिसादाच्या विषयाचा FONT Size लहान करता येऊ शकेल का?
- (मिपाकर) सोकाजी
सदस्याना व्यनी / खरडवही दिसत…
सदस्याना व्यनी / खरडवही दिसत नाहीये
In reply to सदस्याना व्यनी / खरडवही दिसत… by विजुभाऊ
प्रति क्रीया पण दिसत नाही
प्रति क्रीया पण दिसत नाही
लेखांची तारीख
अमेरिकन पद्धतीने पडत आहे उदाहरणार्थ
: Mon, 04/13/2026 - 09:21
Wed, 03/18/2026 - 12:54
MM/DD/YYYY